"चवचाल आहे झालं" श्यामल काकू करवादल्या
"खरेच सासरच्यांनी बळजबरी केली की हीच गेली होती मागे राम जाणे" शांता मावशी उद्गारली
"देहाची भूक चुकत नाही श्यामल. तरुण आहे आपली कुसुम अजुन" दुर्गा आज्जी मुलीला समजावु लागल्या.
"भोळी आहे गं कुसुम" वसंतराव कळवळुन म्हणाले.
"भोळी कसली? प्रत्येक वेळेस् नोटा बर्या सापडतात तिच्या हातात?" इति श्यामल काकू.
इकडे लग्नाच्या रात्रीच विधवा झालेली कुसुम मात्र हातातल्या बाहुलीशी बोलत होती "बाटलीचा आकार कसा वाढत जातो ना ठमे? मला तर बाई गंमतच वाटते. आपल्याकडे नाहित नाही असल्या बाटल्या? रमेश भाऊजी, मामंजी आणि सुरेश काका दुष्ट जादूगार असतील का गं? म्हणूनच सगळे जण इतके चिडले असतील का?"
प्रतिक्रिया
31 Jan 2017 - 12:09 am | रातराणी
:( कथा आवडली असं म्हणवत नाही.
31 Jan 2017 - 10:16 am | अॅस्ट्रोनाट विनय
देहाची भूक भागत नाही वगैरे वाक्यांवरुन कुसुम मोठी आहे असं सूचित होतंय. तरीपण ती बाहुलीशी खेळते आणि तिला ते ज्ञान नाही?!
हा बालविवाह होता असं स्पष्ट झालं असतं तर ही नक्कीच चांगली कथा बनली असती.
31 Jan 2017 - 10:56 am | आंबट गोड
बाटलीचा आकार..?
31 Jan 2017 - 11:02 am | जव्हेरगंज
सासं, हे वाक्य आप्य निय्मवलीत ( Rule no.9) madhye बसते वाटतं.
10 Feb 2017 - 7:18 pm | मृत्युन्जय
हा प्रश्न होता की उत्तर ;)
31 Jan 2017 - 10:58 am | जव्हेरगंज
kahitari vegal aahe he nakki.
31 Jan 2017 - 12:14 pm | सूड
शेवटचा परिच्छेद बालविधवा असेल तर समजू शकतो अन्यथा बळजबरीने शॉकिंग शेवट करायचा म्हणून केल्यासारखं वाटतं.
31 Jan 2017 - 2:42 pm | तिमा
बाटलीचा अर्थ ज्यांना कळला नसेल ते मराठी शाळेत शिकलेले नसावेत.
31 Jan 2017 - 5:34 pm | यशोधरा
अंगावर येणारी कथा..
31 Jan 2017 - 5:45 pm | मराठी कथालेखक
नाही आवडली
31 Jan 2017 - 8:25 pm | पिलीयन रायडर
खुपच शंका आहेत.. ती मुलगी लहान आहे की नाहीये? बरं धक्का बसुन डोक्यावर परिणाम झालाय म्हणावं तर बाकीच्यांच्या बोलण्यातुन तर तसं वाटत नाही.
बाटलीचा अर्थ मला वाटतोय तोच असेल तर मग ती मुलगी ज्या परिस्थितीतुन गेली आहे, ते पहाता ती इतकं बालीश बोलणार नाही हे नक्की.
शिवाय पैशाचं काय नक्की? कुठुन आलेल्या नोटा?
सॉरी.. पण नाही जमली कथा..
3 Feb 2017 - 4:22 pm | निओ
कथेत दुवे नीट पेरले असते तर भारी अंगावर येणारी झाली असती
29 Mar 2017 - 2:17 pm | चिनार
कृपया लेखकाने या कथेचा अर्थ उलगडून सांगावा. मला वाटतोय तोच अर्थ असेल तर, ही कथा माझ्या मते एक मास्टरपीस आहे.