रेल्वे आपला भोंगा वाजवत फलाट २ वर आली.रात्रीची १० वाजायला आलते.
फलाटावर उतरलो तसा फुलारी समोर आला,सलाम ठोकुन माझ्या हातातील बॅगला हात घातला.
"राहु दे आतली सुटकेस घे."
किडमीडा फुलारी सुटकेस उचलत माझ्या मागे ओढत येत राहीला.
मला त्याची पर्वा नव्हती,मरु दे साला.!
**
१० वर्ष नंतर पुन्हा स्वत:च्या गावात आलतो. १० वर्षापुर्वी सोडल त्या पेक्षा फार बदलत नव्हत.
गाडीत बसताना ताईच्या घरचा पत्ता दिला. फुलारी मागे बसला आणी लोचट हसत म्हणला "साहेब ओळखला".
**
घरातुन बाहेत पडताना ताईला सांगीतल " जेवायला नाही"
आज फुलारीच्या जागी गुडमेवार होता.
**
गाडी एसपी ऑफीस ला घ्यायला सांगितली.आत आलो तसा सगळ्यानी कडक सलाम ठोकला. सगळ्यावर माझा राग नव्हता. हलकी मान झुकवुन संमती दिली.
एसपीला भेटलो.त्याची माझी दुसरी भेट. पुर्वी नाशिकला भेटला होता.
आता चार्ज घ्यायला ग्रामीण ला जाव लागणार होत. गुडमेवार काय बोलत होता ते माझ्या डोक्यात घुसत नव्हत.
डोक भंजाळल होत.
माझी नजर बाहेर फिरत होती.
एक बॅनर दिसला. त्यावरच्या मोठ्या फोटो ने ,माझ लक्ष खेचल.
प्रकाश पुरोहीत .
त्याच्या *यचा कि* .हरामी इथे कुठे आला.
क्रमश..
प्रतिक्रिया
12 Jan 2017 - 11:08 pm | एस
सुरूवात चांगली आहे. भाग थोडे मोठे असल्यास वाचायला मजा येईल. पुभाप्र.
12 Jan 2017 - 11:21 pm | पैसा
जरा मोठे भाग येऊ देत!
13 Jan 2017 - 1:00 am | जेपी
नमस्कार,
हा भाग लहान झाला आहे.आणी शेवटच्या ओळी लिहीतना पकड सुटली आहे,याची जाणीव होतेय.एखादी दिर्घकथा लिहायचा प्रथमच प्रयत्न करतोय,चांगले- वाईट,आवडल -नाय आवडल, प्रतिसाद जरुर द्यावे.
13 Jan 2017 - 1:03 am | जेपी
पुढचा भाग मोठा लिहीन.
लिखाणासंबधी सूचनांच स्वागत आहे.
13 Jan 2017 - 1:50 am | रेवती
वाचतिये.
13 Jan 2017 - 6:30 am | फेदरवेट साहेब
ए भावसाहेब तू एकदम atmosphere बनवलेनी. साला एकदम भारी, लवकर लिव हो पुढले पार्ट सिरीज चे. :)
13 Jan 2017 - 9:04 am | प्रचेतस
छान सुरुवात.
13 Jan 2017 - 10:26 am | नि३सोलपुरकर
चार्ज घ्या लवकर ...
छान लिहले . पुलेशु
13 Jan 2017 - 1:25 pm | पुंबा
वेटींग इगर्ली..
13 Jan 2017 - 2:48 pm | राजाभाउ
वाचत आहे. पुभाप्र.
13 Jan 2017 - 3:55 pm | बबन ताम्बे
पुढचा भाग लवकर येवो.
10 Apr 2017 - 1:21 pm | पुंबा
पुढचा भाग कधी?