संवाद

भावना कल्लोळ's picture
भावना कल्लोळ in जनातलं, मनातलं
12 Dec 2016 - 5:06 pm

आजच्या इंग्लिश मिड डे या वर्तमानपत्रात एक पुर्ण पानभर मुंबईच्या विविध भागात घडलेल्या तीन घरातल्या बातम्या आल्या आहेत. त्यात २ बातम्या मध्ये शाब्दिक वादामुळे संतापाच्या भरात नवऱ्याने बायकोला जीवे मारले तर एका मध्ये कौटुंबिक वादामुळे वेगळे झालेल्या नवऱ्याला आपल्या मुलांना भेटु न दिल्याने नवऱ्याने घेतलेला स्वतःचा जीव. आपल्यासाठी तरी हि नुसतीच बातमीच, वाचावी आणि सोडुन द्यावी. पण थोडे लक्ष दिले तर लक्षात येईल या तिनी बातमी मध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे कुटुंब- नवरा आणि बायको. एका दिवसात तीन कुटुंब उध्वस्त झाली. त्या तीन कुटुंबातल्या लहानग्याचे पुढे काय? हे एक यक्ष प्रश्न असेल आता. एकत्र कुटुंब पद्धती ऱ्हास होत चौकोनी आणि त्रिकोणी कुटुंब पद्धतीला जास्त पसंती देत आहेत लोक. नाही यात गैर काही नाही. पण मानसिकता ... ती कधी बदलणार? आज कुटुंब लहान, खर्च जास्त , उत्पन्न कमी, मनाजोगते राहता यावे म्हणून दोघे हि शर्यतीं मध्ये पळत आहेत. पण या सगळ्या मध्ये भावना, समंजसपणा, एकटे पण, सामाजिक दडपण यामुळे व्यक्त होणे विसरत आहेत. घरात संवाद कमी भांडण जास्त झाले आहे. एका मर्यादेपर्यंत दुर्लक्ष केले तरी नंतर येणार अहं भाव, मी पण एकमेकांबद्दल असलेल्या प्रेमाला, आदराला वाळवी लावत आहेत. प्रेमाची जागा चीड, त्रागा,घृणा याने घेतली जाऊन येतंय ते डिप्रेशन. पहिल्या एकत्र कुटुंब पद्धतीत घुसमट असली तरी आपले एक हक्काचे माणुस असायचे जे आपल्यातले वाद मिटवायचे. ज्याच्याकडे आपल्याला बोलता यायचे, आपल्या समस्याचे उत्तर मिळायचे. पण ते हक्काचे माणूस हरवलाय हल्ली. मित्र- मैत्रिणी मध्ये व्यक्त व्हावे तर काय रडतो/ रडते रे, गॉसिप करणाऱ्या लोकांना आपण एक खाद्य बनु हि भीती सतावत राहते. मग ती मळमळ अशीच साठुन राहते मनात आणि मग एके दिवशी ब्लास्ट होऊन अश्या घटना घडतात. दुसऱ्यासाठी घटनाच या पण ज्याच्या वाटेला आल्या त्यांचे तर आयुष्य बदलुन टाकणारे ती १० मिनिटे. आज प्रत्येकी ५ माणसामागे ३ माणसे तरी डिप्रेशन मध्ये आहेत. मी काही मोठी फिलॉसॉपर नाही आहे, पण प्रत्येक माणसाने आत्मचिंतन करून आपल्या आयुष्याचा एक साधा फंडा ठेवला तर ७० टक्के तरी या गोष्टी टळू शकतील. कुटुंब म्हंटले कि त्यात समर्पण आले, स्वपण जपत इतरांची मने जपणे आपली. कुरबुरी आल्या पण त्यात भांडण नको शांत आणि संयमित संवाद हवा. स्वतः मध्ये नेहमी एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन हवा. एखाद्या दुखऱ्या /खुपणाऱ्या गोष्टीला हि वेळ प्रसंगी दुर्लक्षित किंवा विनोदी अंगाने पाहता येण्याचे कसब हवे. या साठी हवे स्वतःला व्यक्त करणे. मग कसे हि करा. तुमच्या आवडत्या गोष्टी करा, छंद जोपासा, आपल्या आवडत्या देवाशी एकांतात बोला, निसर्गाच्या सानिध्यात जा, ज्याने तुमचे मन शांत होईल ते करा पण व्यसन हि त्यावर तोडगा नाही. आयुष्य खूप सुंदर असते आणि ते एकदाच भेटते तेव्हा ते भरभरून जगा. आनंद देण्यात जो आनंद आहे त्याची तोड कशालाच नाही. मग त्यासाठी थोडीशी मुरड स्वतःला घातली तर बिघडले कुठे. पण हा जर तुमचा स्वभाव नसेल तर मग नात्याचे गुंफण लावून घेऊ नका. कारण नाती आली कि जवाबदारी आली आणि जवाबदारी बरोबर कर्तव्य हि. मग जगावे आपले हरफन मौला बनुन पुरी दुनिया मेरा संसार करत. पण कुटुंब म्हंटले कि स्थैय हवं, सुरक्षितता हवी, विश्वास हवा. सर्वांत महत्वाचे संवाद हवा. संवादाने पूर्ण जग एकमेकांसोबत एका लाकडी टेबलावर बसुन विश्वशांती राखू शकतो तर इथे तर प्रश्न आपल्या चार भिंतीचा आहे. नात्याला वेळ द्या, संवादाने तोडगा काढा, प्रेमाने मन जिंका, शेवटी लग्न हि व्यवहार त्यात लेन देणं शेवटी प्रेमाचेच म्हणून तर व्यक्त होऊन मुक्त व्हा कारण " जडत्व हे मेलेल्याचे लक्षण आणि मुक्ती हे पुन्हा नव्याने जगण्याचे. . "

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

12 Dec 2016 - 5:44 pm | चौथा कोनाडा

तळमळीने लेखन आवडले !

नात्याला वेळ द्या,
संवादाने तोडगा काढा,
प्रेमाने मन जिंका !
शेवटी लग्न हा व्यवहार, त्यात देवाण-घेवाण शेवटी प्रेमाचीच !
म्हणून तर व्यक्त होऊन मुक्त व्हा, कारण
" जडत्व हे मेलेल्याचे लक्षण आणि
मुक्ती हे पुन्हा नव्याने जगण्याचे. . "

अगदी काव्यमय !
माझ्या पुढील सिनेमात हे संवाद वापरु का ?

भावना कल्लोळ's picture

12 Dec 2016 - 6:26 pm | भावना कल्लोळ

:) नेकी और पूछ पूछ ... चालेल...

पद्मावति's picture

12 Dec 2016 - 7:28 pm | पद्मावति

छान लिहिलंय. आवडलं.

मितान's picture

12 Dec 2016 - 10:24 pm | मितान

छान ! खरं लिहिलं आहेस !

रुपी's picture

13 Dec 2016 - 2:27 am | रुपी

छान लिहिलंय.. आवडलं.

ज्योति अळवणी's picture

14 Dec 2016 - 11:52 am | ज्योति अळवणी

खरच नात्यातला संवाद हरवला आहे. छान लिहिलं आहात

ज्योति अळवणी's picture

14 Dec 2016 - 11:52 am | ज्योति अळवणी

खरच नात्यातला संवाद हरवला आहे. छान लिहिलं आहात

इडली डोसा's picture

14 Dec 2016 - 1:02 pm | इडली डोसा

आवडलं...