पाखराला ध्यास लागला दूर देशी जाण्याचा
दुसरी माती, दुसरी नाती अनुभवण्याचा
पाखरा जा दूर देशी
मन त्याचे त्यालाच सांगे
दे झुगारुन बंधन इथले
नकोत काही पाश मागे
उडोनी जाई पाखरु
जाई ते दिगंतरा
धडपड, खटपट पुन्हा नव्याने
मांडण्या संसार सारा
एकटेच ते सदैव आता
नसे सोबत्यांचा मेळा
आठव येई घरट्याची
येई आता कंटाळा
प्रतिक्रिया
1 Oct 2008 - 9:44 am | मेघना भुस्कुटे
सहिये...
छुपा रुस्तुम निघालास की तू!
1 Oct 2008 - 9:59 am | अनिरुध्द
vielen dank fuer deine hilfe und antwort.
1 Oct 2008 - 10:28 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
कविता चांगली आहे पण ....
एकटेच ते सदैव आता
नसे सोबत्यांचा मेळा
हे थोडं सरसकट विधान वाटलं आणि तेही स्वानुभवातूनच! कुठेही जा माणसं तीच असतात, भले ती मराठी नाही पोलिश नाहीतर इंग्लिश बोलतात. तीन वर्षांनी परत कायमचं आल्यावर आता मला माझ्या तिकडच्या मित्रांचीही खूप आठवण येते जशी तिकडे असताना इथल्यांची यायची.
(सदैव नॉस्टॅल्जिक) अदिती
2 Oct 2008 - 11:10 am | नीधप
>>तीन वर्षांनी परत कायमचं आल्यावर आता मला माझ्या तिकडच्या मित्रांचीही खूप आठवण येते जशी तिकडे असताना इथल्यांची यायची.<<
हे तर अगदीच डिट्टो!
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
1 Oct 2008 - 11:14 am | मदनबाण
एकटेच ते सदैव आता
नसे सोबत्यांचा मेळा
आठव येई घरट्याची
येई आता कंटाळा
मस्त...
(चिमण आणि गुंड्या भाऊ चा दोस्त्त)
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
1 Oct 2008 - 11:16 am | सहज
एखादा पक्षी उडणे वेगळे व थवा एकत्र उडणे वेगळे.
जिथे असाल तिथे खुश रहा!
:-)
2 Oct 2008 - 9:58 am | फटू
छान लिहिलंय गं / रे काऊ...
पण हे:
एकटेच ते सदैव आता
नसे सोबत्यांचा मेळा
आठव येई घरट्याची
येई आता कंटाळा
तितकंसं खरं नाही हा... जिथे कुठे आपण जाऊ तिथे आयुष्य माणसांनी फुलवता आलं पाहिजे...
(दूर देशी असणारा),
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...