(मी आज केलेला आराम - डिसेंबर २०१६)

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
7 Dec 2016 - 3:36 pm

नमस्कार मंडळी.

मी आज केलेला आराम या धाग्याला उदंड प्रतिसाद मिळाला. अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन पोटभर आराम सुरू केला.
आराम सुरू केलेल्या आणि आरामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन.

नोव्हेंबर महिन्यात मिपाकरानी केलेला एकूण आराम पुढीलप्रमाणे

रात्रीची झोप - २४० तास
दुपारची झोप - १६ तास .
(वरील तास धाग्यावर कोणीच माहीती न दिल्याने वैयक्तिकली अंदाजपंचे काढली आहे - ऑफीसमधील झोपेचे तास कळवल्यास ट्रॅक करणे सोपे जाईल.)

सर्व आरामपटू मिपाकरांचे हार्दिक अभिनंदन..!!!
डिसेंबर महिन्यातील आराम आणि आराम करायचे नवनवीन पर्याय या धाग्यावर टाकत राहूया..

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

पगला गजोधर's picture

7 Dec 2016 - 4:26 pm | पगला गजोधर

मी पैला

खरंतर मला या धाग्यावर भरपूर मोठी प्रतिक्रिया द्यायची होती,
पण दुपारची माझ्या ऑफिसमधली विश्रांतीत जास्ती खंड पडेल म्हणून... तूर्तास इतकेच ....

मी दुसरा. तूर्तास इतकेच. वामकुक्षीची वेळ झाली आहे.

टवाळ कार्टा's picture

7 Dec 2016 - 4:54 pm | टवाळ कार्टा

.

सूड's picture

7 Dec 2016 - 5:16 pm | सूड

मी चौथा!!

चांदणे संदीप's picture

7 Dec 2016 - 5:19 pm | चांदणे संदीप

.whitetext {
color: white;
.
}

आदूबाळ's picture

7 Dec 2016 - 5:23 pm | आदूबाळ

आज हपीसात पाण्याची बाटली संपली. मग स्वतः नळापर्यंत न जाता शेजारणीला बाटली दिली आणि तिच्याकरवी पाणी भरून घेतलं.

#आजचाआराम #आरामहीरामहै #आजकरेसोकल #कलकरेसोपरसों

यसवायजी's picture

8 Dec 2016 - 5:59 pm | यसवायजी

#इतनी भी #क्या जल्दी है #जब जीना हय #बरसो

गणामास्तर's picture

7 Dec 2016 - 5:47 pm | गणामास्तर

धागा पाहिला तेव्हा आराम चालू होता. मटन खाऊन मस्त सुस्ती आली होती, उगाच हालचाल करायला नको म्हणून आत्ता प्रतिसाद दिला. आता पटकन चहा पिऊन परत आरामाला लागतो.

कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Dec 2016 - 5:57 pm | कैलासवासी सोन्याबापु

सद्ध्या आराम पोस्टिंग असल्यामुळे आम्हीही फुल न फुलाची पाकळी ह्या उदात्त विचार प्रसारक धाग्याला वाहू शकतो प्रगो, थकलो तिच्यायला, आता उरलेलं नंतर लिहितो

पगला गजोधर's picture

7 Dec 2016 - 5:59 pm | पगला गजोधर

'आराम' हा खरंतर सुखी जीवनाचा अविभाज्य घटक.
म्हणून आम्ही या ठिकाणी, या सभागृहापुढे सरकारकडे
मागणी करतो, की लेझी-बॉय या साधनावरील सर्व कर माफ करावा,
तसेच त्याला १०० % अनुदान चालू करावे, म्हणजे आमच्या सारख्या
उपद्रवशून्य (कारण आरामप्रिय) नागरिकांची सोय होईल,
व समाजातील ताणतणाव आपसूकच कमी होऊन, शेवटी लयाला जाईल (ताणतणाव लयाला जाईल, समाज नाही)

lb

टवाळ कार्टा's picture

8 Dec 2016 - 2:21 pm | टवाळ कार्टा

यात सकाळची सोय नाही....तस्मात कधीनाकधी उठावे लागेलच

पगला गजोधर's picture

8 Dec 2016 - 4:36 pm | पगला गजोधर

सकाळची सोयवाले मॉडेल सुद्धा आणू आपण, पण कुंथण्याचे कष्ट चुकणार नाहीत .....
;)

बरेच दिवसांनी दारुविरहीत सही विडंबन वाचायला मिळालं. मस्त.

बाकी ऑफिसातले डुलकीचे तास मोजता इथे आम्ही टार्गेट पूर्ण करत आहोत असं विनयपूर्वक नोंदवतो. ;-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Dec 2016 - 9:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

तलवारी (पक्षी : तलवारींपेक्षा धारदार शब्द असलेले धागे, प्रतिसाद, लिंका, इ) हाती घेऊन लढाया न करता मिपाकर एकमताने आराम साजरा करत आहेत हे पाहून ड्वाळा जळ भरले ! भरल्या पोटी बिछान्यावर आरामात लोळत हे सर्व चतुरध्वनीवरून पोष्टीत आहे हे कृपया ध्यानात घ्यावे =)) =)) =))

संजय पाटिल's picture

8 Dec 2016 - 12:11 pm | संजय पाटिल

.

प्रसाद गोडबोले's picture

8 Dec 2016 - 1:25 pm | प्रसाद गोडबोले

सकाळि आठ वाजता मस्त पैकी गाडीवरुन एक चक्कर मारुन आलो . घरी येवुन गरमागरम चहा आणि कांदेपोह्यांच्या आस्वाद घेत युट्युब वर सर्फिंग करत दीड तास आराम केला :)

उद्या पासुन ३ दिवस वानखेडेला भारत-इग्लंड कसोटी बघायला जाणार आहे.
तीन दिवस कचकुन आराम :)

नीलमोहर's picture

8 Dec 2016 - 7:42 pm | नीलमोहर

मगाशी दोन पिल्लू भाच्यांसोबत झोपाळ्यावर विथ कॅरॅक्टर्स स्टोरी सेशन झालं,
(गैरसमज नको, माझा आरामच चालला होता, भाची गोष्ट तयार करून सांगत होती,
गोष्ट ऐकता ऐकताच मस्त झोप यायला लागली होती)
आताही गादीवर लोळत bourbon बिस्कीट खात प्रतिसाद लिहिलाय,
बोटांना प्रमाणाबाहेर exertion झालं, आता निवांत मिपा वाचते,