शेवटी तो दिवस उगवलाच.....

बाजीप्रभू's picture
बाजीप्रभू in जनातलं, मनातलं
7 Dec 2016 - 10:36 am

त्यादिवशी सकाळी ऑफिसला निघतांना उंबरठ्यावरच एक डांग्या शिंक आली होती. त्या आवाजाने पॅसेजच्या सिलिंगवरील एक पालीचं पिल्लू अंगावर पडलं नाही पण घाबरून दरवाज्याच्या फटीतून घरामध्ये घुसलं. 'मार दिया जाय, या छोड दिया जाय' हा विचार करण्यात काही सेकंद गेली. ते पिल्लूही "चार दिवस रहाते, किडा-मुंगी खाते, धष्ट-पुष्ट होते, मग तू मला मार" असं चुकचुकत गेल्याचा भास झाला म्हणून लगबगीने दरवाजा लॉक करून निघालो. लिफ्टमधे माझ्याबरोबर तिन-चार काळे कपडेवाले होते. (थायलंडमधे राजासाठी वर्षभर "दुखवटा" असल्याने लोकांचे काळे कपडे नेहमीचेच झालेत). त्या गर्दीत सहाव्या माळ्यावरची मांजरीसारख्या घाऱ्या डोळ्यांची "मिस सिरीपोन" देखील होती. पुढे ती मला घाई घाईत ओलांडून गेली पण मला घरातून निघाल्यापासून मिळत असलेले हे अशुभ संकेत लक्षात येत नव्हते.

ऑफिसला पोहोचलो, दिवस नेहमीसारखाच सुरु झाला. मेल्स, मिटींग्ज, कॉन्फरन्स कॉल्स सगळं एकामागून एक नेहमीप्रमाणे चालू होतं....बॉसची बडबड, एच आरचे टीम-बिल्डिंगचे घिसे-पिटे मेल्स सगळं नेहमीप्रमाणेच. दुपारचे तीन-साडेतीन झाले असतील. मी दुसऱ्या एका स्टाफच्या टेबलावर PC वरील एक "एरर" मेसेज वाचत होतो. वाचुन पूर्ण होतो न होतो तोच माझ्या टेबलावरचा फोन खणखणला म्हणून जागेवर गेलो.

HR मॅनेजर :- हॅलो!! सवादी खा! खून विनोद.
मी :- सवादी ख्राप खून "डूआंग."
(आवांतर :- थाई भाषेत 'सवादी' म्हणजे 'हॅलो'. मिस्टर, मिस, मिसेस यासाठी "खून" हा एकच शब्द वापरतात आणि "खा" व "ख्राप" हे आपल्या गुजराती भाषेतल्या "छे" सारखं. दर दोन वाक्यामागं चिटकवत जायचं. मात्र "खा" स्त्रियांसाठी आणि "ख्राप" पुरुषांसाठी) एनीवे,

मी :- येस! टेल मी डूआंग.
डूआंग:- कॅन यु प्लिज सी मी इन माय ऑफिस?
मी :- शुअर, आय विल बि देअर इन १० मिनिट्स.
मी :- एनी इशूज इन PC?
ती :- नथिंग!! जस्ट वॉन्ट टु टॉक विथ यु.
मी :- ओके अॅम कमिंग इन कपल ऑफ मिनिट्स.
ती :- ओके आय वेट फॉर यु.

परत त्या स्टाफच्या स्क्रीनवरील एररकडे बघत असतांनाच अवचितपणे एका विचाराने एक थंड शिरशिरी अंगातून गेली. महिना अखेरीस, शुक्रवारच्या संध्याकाळी ३ वाजता आलेला HR मॅनेजरच्या त्या कॉलने अचानक पोटात भीतीचा गोळा उठला. आमच्या कंपनीत "पिंक स्लिप" देऊन "GPL" देण्याच्या फेव्हरेट साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस. नुसत्या कल्पनेनेच दरदरून घाम फुटला. यापूर्वीच्या "GPL" न्यूज मला लगेचच कळायच्या कारण विकेट पडली रे पडली कि 'युजर अकाउंट' ब्लॉक करण्यासाठी लगेचच IT रिक्वेस्ट यायची. आता माझा नंबर होता. आयला! या वयात कुठे नोकरी शोधत फिरायची? एकतर आपण सिंगल अर्निंग मेंबर. हाऊसिंग लोन, बायको, मुलगी, शिक्षण सगळं झपझप डोळ्यासमोर येऊन गेलं. मागच्या वेळेस मला स्वतःला किती इन्क्रिमेंट पाहिजे हे सुचवायला म्हणून माझ्याच असिस्टंटची इन्क्रिमेंट तिपटीने प्रपोज केली होती. त्यावर बॉसबरोबर आर्ग्युमेंट्स झाल्या होत्या पण तोच काय तो एक -ve इन्सिडन्स. कंपनीची हालत यावर्षी खराब होती (तशी ती नेहमीच असते, इनफॅक्ट हि कंपनी चालते कशी हे न समजून देवावरचा विश्वास मात्र वाढला होता). मनात वाईट विचारांची खूप गर्दी होऊ लागली. पटकन बँक बॅलन्स चेक करून घेतला.

पण मला काढताहेत यावर विश्वासच बसत नव्हता. थायलंड युनिटमधल्या ११ इंडियन्सपैकी मी एकटाच उरलो होतो आता. गेल्या ८ वर्षात काहीजण सोडून गेलेत किंवा कमी करण्यात आले होते. माझीही विकेट कधी ना कधी पडेलच हि धास्ती होती पण माझा सक्सेसर यायच्या आधीच? या सगळ्या विचारांच्या गर्दीत १५ मिनिटे गेल्याने HR मधून परत एक रिमायंडर कॉल आला.

मी :- मे आय कम इन खून डूआंग?
ती :- कम कम खून विनोद.
(मिस डूआंगने एक सिगरेट शिलगावून रूममधे आधीच भितीयुक्त धुक्याचं वातावरण निर्माण केलं होतं)
मी :- येस खून डूआंग, टेल मी.
ती :- विनोद! आय गॉट ए कॉल फ्रॉम हॉस्पिटल.
(समहाऊ हॉस्पिटल सारखा गंभीर शब्द ऐकूनही मी एकदम रिलॅक्स झालो. आपण समजतोय तो हा मॅटर नाहीये, पण हॉस्पिटल मधून फोन? कशासाठी?)

मी :- हॉस्पिटल? विच? व्हाय? (मी एका दमात सगळे प्रश्न विचारले)
ती :- फ्रॉम "इंटरमेडिकल अँड लॅब" हॉस्पिटल.
मी :- फ्रॉम इंटरमेडिकल? फॉर व्हॉट?
ती :- युवर “युरीन” रिपोर्ट इज व्हेरी स्ट्रेंज.
मी :- एस्क्युज मी!!.. अगेन प्लिज. आय डिंट गेट यु.
ती :- आय सेड "युवर युरीन रिपोर्ट इज व्हेरी स्ट्रेंज"
मी :- स्ट्रेंज! डू आय हॅव डायबिटीस?
मी :- बाय द वे! मेडिकल रिपोर्ट्स आर कॉनफीडेंशीयल राईट?
ती :- ऑफ कोर्स कॉनफीडेंशीयल!! बट युअर केस इज डिफरंट.
मी :- हाऊ इट्स डिफरंट?
ती :- (मंद स्मित करत) कमॉन विनोद! शाल आय रिवील्ड सीक्रेट्स ऑर यू वॉन्ट टू डू दॅट?

आता जास्त ताणण्यात काही अर्थ नव्हता पण सिक्रेट 'डूआंग'ला सांगण्याआधी मिपाकरांना सांगतो.

खरंतर "इंटरमेडिकल अँड लॅब" हॉस्पिटलचं नाव ऐकल्याबरोबरच मी केलेले किडे आठवले होते. हा किडा खरंतर गेल्यावर्षीच वळवळला होता. दरवर्षी आमच्या कंपनीत एम्पॉईजची मेडिकल चेकअप होते. संपूर्ण ब्लड टेस्ट, ECG, X-Ray ते कॅन्सरपर्यंतच्या सगळ्या टेस्ट विनामूल्य होतात. घर बंद असलं तरी मागच्याच महिन्याचं लाईट बिल पाठवणाऱ्या महावितरण संस्थेचा कायम संशय घेणारा ग्राहक असल्याने, दरवर्षीचे थोड्याफार फरकाने तेच आकडे मेडिकल रिपोर्टमधे दिसत असल्याने हे लॅबवाले खरंच चेक करत असतील का? जवळपास ५०० लोकांच्या रिपोर्टमधे कॉपीपेस्टच्या चुका होत असतील का? हा संशय गेल्या ४-५ वर्षांपासून मनात घर करून होता.

म्हणून मागच्याच वर्षी याचा सोक्ष-मोक्ष लावायचा ठरवला होता. आमच्या कॉफी रूममधे एक काउंटर "ग्रीन-टि" चं देखील आहे. युरीनच्या डबीत आपण "ग्रीन-टि" भरूयात का? च्याआयला बघुयात तरी! असा विचार करत त्या वर्षीच्या "हेल्थ चेक अप" कॅम्पच्या वेळेस डबीत "ग्रीन-टि" भरली. पण एक गडबड झाली. एकदम कडकडीत गरम ‘ग्रीन-टि’ मुळे प्लास्टिकच्या डबीचा शेपच बदलला. आता आली का पंचाईत. “आयडिया केली आणि बोxx गेली" असं झालं, पण यातून लगेचच मार्ग शोधला.

युरीन भरण्याआधी ‘डबी’ गरम पाण्याने धुतल्यामुळे वाकडी झाली असं सांगून नवीन ‘डबी विथ बारकोड’ मिळवण्यात यशस्वी झालो होतो. च्याआयला 'येडचापच' आहे असं बहुतेक म्हणत हँस्पिटलच्या स्टाफनेहि नवीन डबी दिली खरं पण वेड्यावाकड्या डबीसकट माझ्यासारखा पूर्णतः वेगळा दिसणारा भारतीय त्यांच्या नजरेत ऑलरेडी आला होता. त्यामुळे मीही अंगातल्या किडयांना गप्प करत गपचूप खरोखरीची युरीन भरून दिली होती.

मागच्या वर्षीचा किडा यावर्षी परत वळवळला. यावेळेस मागच्या वर्षीचा लर्निंग कर्व होता त्यामुळे मिस्टेक होण्याची गुंजाईस बिलकुल नव्हती. सगळ्या गोष्टी शांतपणे केल्या आणि 'युरीन सदृश्य ग्रीन-टि' ची डबी ट्रेमधे नेऊन ठेवली. आता उसुक्ता होती ती रिपोर्टची. जवळपास ५०० लोकांचे रिपोर्ट यायला साधारण दोन महिने लागतात. एव्हाना सगळं विसरून गेलेल्या मला, केलेला प्रताप आठवला तो "शाल आय रिवील्ड सीक्रेट्स ऑर यू वॉन्ट टू डू दॅट?" या HR मॅनेजरच्या प्रश्नाने.

मी :- (मंद स्मित करत) सॉरी खून डूआंग. लेट मी अपोलोजाईज्ड फर्स्ट.
ती :- सो यु अॅग्री यु पुट 'ग्रीन-टि' इन द बॉटल?

होय सांगून कन्फेस करून एकूण ऑब्जेक्टिव ‘मिस डूआंग’ सांगितल्यानंतर तिच्याकडे पाहिलं तेव्हा ती डोकं आपटून घेण्यासाठी काहीतरी शोधत होती असं वाटलं.

ती :- आर यु क्रेजी विनोद? आय कूड नॉट इमॅजिन थिस. (आणि हसायला लागली)

तिच्या हसण्याने वातावरणातला ताण थोडा निवळला होता. भारतात असतांना एप्रिल फुलच्या दिवशी तुरटी गरम करून कॉइन रस्त्यावर चिटकवणे. फेक कॉल करणे इत्यादी इत्यादी आवडते छंद मी थायलंड ऑफिसमधेही जोपासले होते त्यामुळे मी "कार्टून" आहे हा समज ऑफिसमधे ऑलरेडी होता. पण आता चिंता लागली होती ती "फायनल वर्डीक्ट" ची.

ती :- विनोद युवर ऍक्ट इज सपोज टू गेट "वॉर्निंग लेटर" बट आय रिअली डोंट अंडरस्टँड व्हॉट शुड आय राईट इन वॉर्निंग लेटर. सो आय गिव्ह यु ओन्ली व्हर्बल वॉर्निंग. डोन्ट डू थिस अगेन.
मी :- शुअर नॉट!!
ती :- बाय द वे विनोद! आय हॅव ए गुड न्यूज अॅज वेल फॉर यु.
मी :- (चमकून) रिअली! व्हॉट इज दॅट?
ती :- यु आर सिलेक्टटेड फॉर "Distinguished Service Award" थिस इअर. सो प्लिज बी प्रेझेंट ऑन ख्रिसमस पार्टी.

आईशप्पथ!! इतके वर्ष इतरांना अवॉर्ड घेताना पहातांना पुढेमागे आपल्यालाही कधी मिळेल असं वाटलं नव्हतं. शेवटी तो दिवस उगवलाच……. पण अनेक प्रश्न अनिर्णित ठेऊनच. 'लॅबवाल्याला कसं कळलं ती 'ग्रीन-टि' होती म्हणून?.. त्याने पिऊन बघितली कि काय? आणि खरच युरीन असती तर? पुढल्यावर्षी माझ्या मागे एक स्टाफ लावतील का? मी डबीत काय भरतोय ते बघायला? पण जाऊदेत! पुढल्यावर्षीच पुढल्यावर्षी बघू सध्या प्रमोशनचा आनंद घेऊ.

जाता जाता,
खरंतर एका "फिलॉसॉफर" कडून प्रेरणा घेत "माझ्या अंगातले किडे, खोडकरपणा कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे?" असा धागा काढायचा विचार होता पण धागाकर्त्यासाठी गायलेल्या ओव्या पाहून स्वतःला आवरलं.

नोकरीबातमी

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

7 Dec 2016 - 10:40 am | आनन्दा

__/\__

पैसा's picture

7 Dec 2016 - 10:43 am | पैसा

=)) बक्षिसासाठी अभिनंदन!

मंजूताई's picture

7 Dec 2016 - 10:56 am | मंजूताई

अभिनंदन!

मज्जाच की! :)
अभिनंदन सुध्धा!

विशुमित's picture

7 Dec 2016 - 11:09 am | विशुमित

छान लिहलंय... आवडलं

अनन्त अवधुत's picture

7 Dec 2016 - 11:31 am | अनन्त अवधुत

बक्षिसासाठी अभिनंदन !!

एस's picture

7 Dec 2016 - 11:43 am | एस

भारी.

गवि's picture

7 Dec 2016 - 11:49 am | गवि

धमाल किस्सा. आता यापुढे थाई ग्रीन टी असा काही प्रकार कुठेही दिसला तर आमचा नम्र नकार.

;-)

बबन ताम्बे's picture

7 Dec 2016 - 12:01 pm | बबन ताम्बे

मस्त लिहीलंय !

रातराणी's picture

7 Dec 2016 - 12:01 pm | रातराणी

ही ही ही ! भारी आयड्या!

आदूबाळ's picture

7 Dec 2016 - 12:04 pm | आदूबाळ

थोर किस्सा आहे!

संजय पाटिल's picture

7 Dec 2016 - 12:15 pm | संजय पाटिल

शाल आय रिवील्ड सीक्रेट्स ऑर यू वॉन्ट टू डू दॅट?>>> यानंतर मला आलेला संशय... तुम्ही केलेला किडा, त्यातुन कळालेली गोड बातमी... असं काहीतरी..

बाजीप्रभू's picture

8 Dec 2016 - 7:19 am | बाजीप्रभू

हुशार अहात पाटील साहेब.

संजय क्षीरसागर's picture

7 Dec 2016 - 12:21 pm | संजय क्षीरसागर

अभिनंदन !!

हतोळकरांचा प्रसाद's picture

7 Dec 2016 - 12:31 pm | हतोळकरांचा प्रसाद

ग्रिन टीच्या काउंटरकडे गेल्यावर किंवा युरीन टेस्टला गेल्यावर तुमची आठवण आल्याशिवाय रहाणार नाही! अभिनंदन बढतीसाठी! :)

आकाश कंदील's picture

7 Dec 2016 - 12:41 pm | आकाश कंदील

लेखन शैली मस्तच, तुमचे अजून अनुभव वाचायला आवडतील. "Distinguished Service Award" करता मनापासून शुभेछया

बाजीप्रभू's picture

8 Dec 2016 - 7:21 am | बाजीप्रभू

नक्की...नक्की बरेच प्रताप केलेत आतापर्यंत.. लिहीन हळू हळू.

सिरुसेरि's picture

7 Dec 2016 - 12:50 pm | सिरुसेरि

धमाल किस्सा आणी लेखन शैली . तुमचे विनोद हे नावही थायलंडमध्ये खुप शोभुन दिसत असेल .

बाजीप्रभू's picture

8 Dec 2016 - 7:24 am | बाजीप्रभू

आमचे तीर्थरूप या बाबतीत "द्रष्टे" निघाले.

मद्रकन्या's picture

7 Dec 2016 - 2:27 pm | मद्रकन्या

अवॉर्ड साठी अभिनंदन आणि एकंदरीत तुम्ही हे जे काही किडे करता म्हणजे स्वतःच्या नावाला जागता (कि नाव 'जगता') असे दिसते. ☺

बाजीप्रभू's picture

8 Dec 2016 - 7:31 am | बाजीप्रभू

"बंदर कितना भी बुड्ढा हो जाये गुलाटी मारना नही भूलता" असा सगळा प्रकार आहे एकूण.

बाजीप्रभू's picture

8 Dec 2016 - 7:31 am | बाजीप्रभू

"बंदर कितना भी बुड्ढा हो जाये गुलाटी मारना नही भूलता" असा सगळा प्रकार आहे एकूण.

सस्नेह's picture

7 Dec 2016 - 2:52 pm | सस्नेह

धमाल किस्सा.

नि३सोलपुरकर's picture

7 Dec 2016 - 5:33 pm | नि३सोलपुरकर

अभिनंदन !!

धमाल किस्सा, मस्त लिहिलंय

चांदणे संदीप's picture

7 Dec 2016 - 5:56 pm | चांदणे संदीप

ही ही ही!

आवडलंय जाम!

Sandy

पाटीलभाऊ's picture

7 Dec 2016 - 6:31 pm | पाटीलभाऊ

धमाल आहे हि...!

पिशी अबोली's picture

7 Dec 2016 - 6:48 pm | पिशी अबोली

धमाल! काहीही काय? =))

लॉरी टांगटूंगकर's picture

7 Dec 2016 - 6:59 pm | लॉरी टांगटूंगकर

तुफान किस्सा .. =))

पिलीयन रायडर's picture

7 Dec 2016 - 9:39 pm | पिलीयन रायडर

हाईट आहे ही!!!! =))

अभिनंदन हो!

अभिजित - १'s picture

7 Dec 2016 - 9:45 pm | अभिजित - १

अभिनंदन

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Dec 2016 - 10:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =)) धमाल !!!

'लॅबवाल्याला कसं कळलं ती 'ग्रीन-टि' होती म्हणून?.. त्याने पिऊन बघितली कि काय?

क्षणभर, केवळ योगाचेच नव्हे तर मोरारजी देसाईंचेही चाहते थायलंडमध्ये आहेत असा विचार मनात तरळून गेला ;)

हतोळकरांचा प्रसाद's picture

7 Dec 2016 - 10:45 pm | हतोळकरांचा प्रसाद

:):)

बाजीप्रभू's picture

8 Dec 2016 - 7:32 am | बाजीप्रभू

:-)

निशाचर's picture

7 Dec 2016 - 10:31 pm | निशाचर

अभिनंदन!

ज्योति अळवणी's picture

8 Dec 2016 - 12:50 am | ज्योति अळवणी

धमाल... मस्त... जाम आवडलं

खटपट्या's picture

8 Dec 2016 - 1:42 am | खटपट्या

छान कीस्सा !!!

काहीही हं प्रकारातला किस्सा असला तरी अवॉर्डबद्दल अभिनंदन.

जयन्त बा शिम्पि's picture

8 Dec 2016 - 2:50 am | जयन्त बा शिम्पि

मी एके ठिकाणी एक वाक्य वाचलेले मला आठवले, " Never accept a drink from an urologist "
उत्कंठावर्धक लेख. छान वाटला.

बाजीप्रभू's picture

8 Dec 2016 - 7:33 am | बाजीप्रभू

आलेल्या सगळ्या शुभेच्छांसाठी मिपाकरांचे धन्यवाद.

अत्रुप्त आत्मा's picture

8 Dec 2016 - 9:31 am | अत्रुप्त आत्मा

@लॅबवाल्याला कसं कळलं ती 'ग्रीन-टि' होती म्हणून?.. त्याने पिऊन बघितली कि काय?

››› http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif वारलो रे वारलो. http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif हसून हसून वारलो.
महान आहात! __/\__ http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif
नावाप्रमाणेच खिंड लढवलीत!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

8 Dec 2016 - 9:54 am | मिसळलेला काव्यप्रेमी

हा हा हा, तुम्ही लवकर भेटा हो..

सानझरी's picture

8 Dec 2016 - 11:06 am | सानझरी

लोल किस्सा.. हाहाहा..

टवाळ कार्टा's picture

8 Dec 2016 - 3:05 pm | टवाळ कार्टा

लोलवा

स्वीट टॉकर's picture

8 Dec 2016 - 4:05 pm | स्वीट टॉकर

कसला धमाल किस्सा आहे!!
'एकदम कडकडीत गरम ‘ग्रीन-टि’ मुळे प्लास्टिकच्या डबीचा शेपच बदलला.'>>>> भरपूर हसलो!

अवॉर्डबद्दल अभिनंदन!