शांत गूढ रात्र उशाशी,
नील व्याप्त गगन छताशी,
नेत्र टिपत असे नक्षत्रे तेव्हा,
झुळूक देत असे त्रास जराशी !!
रातराणीचा स्वैर विहार,
सुगंध दरवळे मज श्वासाशी,
मोहक वारे बिलगून अंगी,
खळी पडत असे मज गालाशी !!
राहिले बरेच तसेच तिथेच,
येऊन थांबले बहू ओठांशी,
माझ्या मनातले अबोल गाणे,
थेट भिडत असे उंच नभाशी !!
रात्र जिवलग सखी जाहली,
दडून बसली माझ्या उराशी,
उजेड मारी सुरुंग प्रभाती, ------(सकाळचा प्रहार)
पण त्यासही मिळे ना ती तळाशी !! ---- ( ती म्हणजे रात्र , मनाच्या तळाशी)
प्रतिक्रिया
1 Dec 2016 - 4:53 pm | सस्नेह
...पण झुळूक 'त्रास' देते हे काय भावलं नाय बॉ !
1 Dec 2016 - 5:33 pm | कवि मानव
नेत्र टिपत असे नक्षत्रे तेव्हा - ही ओळ परत वाचा मग तुम्हाला भावेल :)))
2 Dec 2016 - 8:51 pm | मदनबाण
मस्त...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- उड़े दिल बेफिक्रे... ;) :- Befikre
3 Dec 2016 - 5:14 pm | कवि मानव
धन्यवाद... आभारी _/\_