दिशा : फ्रान्झ काफ्का

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
28 Nov 2016 - 1:45 pm

दिशा : मूळ कथा फ्रान्झ काफ्का

अगदी छोटीशी असलेली गोष्ट काफ्का ने १९१७ ते १९२३ दरम्यान लिहिली गेल्याचं मानलं जातं, पण काफ्का जिवंत असतांना हि प्रकाशित होऊ शकली नाही. काफ्काच्या मृत्यूपश्चात १९३१ साली The Great Wall of China (German: Beim Bau der Chinesischen Mauer) या कथासंग्रहात ती पहिल्यांदा प्रसिद्ध झाली.
------------------------------------------------------------------------------------------------------------

"हे जग दिवसेंदिवस लहान होत चाललं आहे." दुःखी चेहऱ्याने उंदीर म्हणाला. आधी तर हे जग किती मोठं होतं, तेव्हा मला खूप भीती वाटायची. मी कायम इकडून-तिकडे धावत असायचो आणि शेवटी मला आजूबाजूला भिंती दिसायला लागल्या, तेव्हा तर मला खुप आनंद झाला होता".
"पण या लांबच लांब भिंती खूपच वेगाने एकमेकींकडे वेगाने ओढल्या जात आहेत ना कि क्षणात मी भिंतीच्या शेवटच्या टोकाला पोहचलो पण, जिथे पिंजरा ठेवला आहे आणि मी तिकडे ओढल्या जातो आहे."

"तुला फक्त दिशा बदलायची गरज आहे, बस्स." मांजर म्हणाली आणि त्याला खाऊन टाकलं.

पूर्वप्रकाशित : ब्लॉग आणि Franz kafka- मराठीमधे या फेसबुक ग्रुपवर.

साहित्यिकभाषांतर

प्रतिक्रिया

वरुण मोहिते's picture

28 Nov 2016 - 2:03 pm | वरुण मोहिते

बाकी द कंप्लिट नॉवेल ऑफ फ्रान्झ काफ्का वाचून पहा सुचवेन . नुसत्या द ट्रायल या कथेमध्येच कितीतरी लघुकथांची बीजे सापडतील .

महासंग्राम's picture

28 Nov 2016 - 2:09 pm | महासंग्राम

सुचवणीबद्दल धन्यवाद, नक्कीच वाचेन.

रूपकात्मक कथा आवडली. राज्य (State) हे स्वातंत्र्यावर वेगवेगळ्या मार्गाने निर्बंध कसे आणते हा Anarchism चा पुरस्कार करणाऱ्यांचा अभ्यासाचा विषय आणि पाया आहे.

जयंत कुलकर्णी's picture

28 Nov 2016 - 2:09 pm | जयंत कुलकर्णी

मंदार,
छोट्या गोष्टीत अर्थ बरोबर लागण्यासाठी काही शब्दांचे आयोजन करावे लागते. किंवा काही वाक्ये तोडावी लागतात किंवा काही शब्द टाकावे लागतात. उदा.
आधी हे जग किती मोठं होतं. तेव्हा मला खूप भीती वाटायची.

"पण या लांबच लांब भिंती इतक्या वेगाने एकमेकींकडे वेगाने ओढल्या जात आहेत ना कि क्षणात मी भिंतीच्या शेवटच्या टोकाला पोहचलो. पण तेथे पिंजरा ठेवला आहे आणि मी तिकडे ओढला जात आहे."

"तुला फक्त दिशा बदलायची गरज आहे, बस्स." मांजर म्हणाली आणि तिने त्याला खाऊन टाकलं.

हा अर्थात माझा तुम्ही मागितलेला नसताना दिलेला सल्ला आहे. मानायलाच हवा असे मुळीच नाही.... तुम्ही काफ्का वाचताय हेच माझ्यासाठी खूप आहे. :-)

महासंग्राम's picture

28 Nov 2016 - 2:20 pm | महासंग्राम

काका, तुम्ही कायमच सकारात्मक आणि चांगलं सांगितलं आहे. तुमच्या कथा वाचूनच कथा वाचायची आणि अनुवाद करायची आवड निर्माण झाली. तुम्ही सांगितलेलं नक्कीच लक्षात ठेवेन. :)

जयंत कुलकर्णी's picture

28 Nov 2016 - 2:10 pm | जयंत कुलकर्णी

आधी हे जग किती मोठं होतं. ! *

यशोधरा's picture

28 Nov 2016 - 2:12 pm | यशोधरा

वाचतेय...

मराठी_माणूस's picture

28 Nov 2016 - 2:24 pm | मराठी_माणूस

तुम्ही ही स्वतः भाषांतरीत्/रुपांतरीत केली आहे का ?

महासंग्राम's picture

28 Nov 2016 - 2:54 pm | महासंग्राम

मराठी अनुवाद मी केलाय.