ॲन्टीबायोटीक्स अर्थात प्रतिजैविकाचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला हे अनेकांना ज्ञात असेलच.पेनिसिलीनचा शोध लागल्यानंतर बॅक्टेरीअल इन्फेक्शन ट्रिट करणे सोपे झाले .त्यानंतर अनेक प्रकारची प्रतिजैविके शोधली गेली.यातून बॅक्टेरीयल एन्फेक्शनने होणारे मृत्यु वा इतर कॉम्प्लीकेशन टाळता येऊ लागली.साहजिकच जगाचे आयुर्मान त्यामुळे वाढले.
पण मानवाने लावलेल्या या शोधाला लवकरच ग्रहण लागले ते म्हणजे ॲन्टीबायोटीक रेझिस्टंटचे.एखादे ॲन्टीबायोटीक ठराविक काळ वापरले गेल्यानंतर बॅक्टेरीया त्याच्या विरोधात प्रतिरोध तयार करतात.बॅक्टेरीया स्वतःच्या genetic makeup मधे बदल घडवतात,इतर बॅक्टेरीयाकडून ठराविक जनुकं मिळवून असा रेझिस्टन्स विकसीत होतो.मग असे बॅक्टेरीया त्यावर वापरल्या जाणार्या प्रतिजैविकाला दाद देत नाहीत.
यावर उपाय म्हणून मल्टिड्रग थेरपीचा वापर केला जातो.यात एक ॲन्टीबायोटीक न देता अनेक ॲन्टीबायोटीक्सचा वापर केला जातो.पण अत्यंत लवचिक असलेले हे बॅक्टेरीया यावरही प्रतिरोध विकसीत करत आहेत.leprosyअर्थात कुष्ठरोगावर आधि डॅप्सोन हे ॲन्टीबायोटीक दिले जायचे, पण लवकर लेप्रसीला कारणीभूत ठरणार्या Microbacterium leprea या बॅक्टेरीयाने यावर प्रतिरोध विकसीत केला .WHO ने मग मल्टीड्रग थेरपी रेकमंड केली ,या मल्टीड्र्ग थेरपीला अवरोध करणारे बॅक्टेरीया तयार होऊ लागले आहेत.
टीबी हा घातक रोग आहे ,यावर ॲन्टीबायोटीक देऊन उपचार करता येतात.पण आता मल्टीड्रग रेझिस्टंस टीबी असा नवीन इन्फेक्शनचा शोध लागला आहे ,असा मल्टीड्रग रेझिस्टंट टीबी झाल्यास रुग्णाला प्राण गमवावा लागतो,या मल्टीड्रग टीबीवर सध्याचे कोणतेही ॲन्टीबायोटीक काम करत नाही.
गंभीर प्रकार असा आहे की साध्या एन्फेक्शनला कारणीभूत होणारे बॅक्टेरीयासुद्धा आता प्रतिरोध (resistance) विकसीत करत आहेत.यावर कडी म्हणून की काय ,१९८५ पासून एकाही नव्या ॲन्टीबायोटीकचा शोध लागला नाही आहे.जागतिक आरोग्य संघटनेने या antibiotic resistance ला एकविसाव्या शतकातला सर्वात मोठा धोका असे म्हणट्ले आहे.असे बॅक्टेरीया ज्यांना ' सुपरबग ' असे म्हण्टले जाते त्यांचे प्रमाण वाढत आहे.यावर उपाय म्हणून अमेरीकेत ओबामा प्रशासनाने national action plan for combating antibiotic resistant bacteria असा अनेक कलमी प्लान २०१४ जाहीर केला.
हे सुपरबग तयार होण्याची प्रक्रीया वेग घेत आहे व नवीन प्रतिजैविकांचा शोध लागत नसल्याने फार मोठा धोका मानवासमोर उभा ठाकला आहे.जर नवीन प्रतिजैविके शोधली गेली नाहीत तर साधं इन्फेक्शनही प्राणघातक ठरणार आहे.शस्त्रक्रीयेनंतर इन्फेक्शन होऊ नये म्हणून ॲन्टीबायोटीक्स दिले जातात ,सुपरबगमुळे अश्या शस्त्रक्रीया करणेही प्राणघातक ठरु शकते.व अगदी नजिकच्या भविष्यात साध्या शस्त्रक्रीयाही प्राणघातक ठरु लागल्याने अनेकांना प्राण गमवावे लागू शकतात.हा फार मोठा धोका असून सुद्धा याकडे डोळेझाक केली जात आहे .नवीन प्रतिजैविके शोधण्यात बराच पैस खर्च होत असल्याने फार्मा कंपण्या यात दिरंगाई करत आहेत.
आपण काय करु शकतो
१. सर्व प्रथम ॲन्टीबायोटीक्सचा होणारा सर्रास वापर टाळावा.
२.अनेक डॉक्टर्स साध्या व्हायरल इन्फेक्शनलाही ॲन्टीबायोटीक्स देतात ,हे थांबले पाहीजेत.
३. ओव्हर द काउंटर ॲन्टीबायोटीक्सवर बंदी आणायला हवी.
३. जगभरातल्या पुढारलेल्या देशांनी फार्मा कंपण्यांना ,इतर संशोधन संस्थांना इन्सेंटीव्ह देऊन नवीन प्रतिजैविकांच्या शोधासाठी मदत केली पाहीजे,तसा दबाव सामान्यांनी आपआपल्या सरकारांवर टाकायला हवा.
प्रतिक्रिया
23 Nov 2016 - 2:46 pm | कपिलमुनी
ओक्के
23 Nov 2016 - 3:26 pm | सामान्य वाचक
माझ्या माहिती मधील 4 जणांचा या वर्षात मृत्यू झाला
डॉ नि सांगितलेले कारण, infection कुठल्याही अँटीबीओटीक ला दाद देत नव्हते
नॉन मेडिको असल्याने फार विचारले नाही
23 Nov 2016 - 7:33 pm | पुंबा
हे भयानक आहे.
23 Nov 2016 - 3:34 pm | डॉ सुहास म्हात्रे
ही समस्या खरोखरच भयंकर बनत चालली आहे. त्यामागे रुग्ण आणि डॉक्टर या दोघांचाही तोडीसतोड बेजबाबदारपणा कारणीभूत आहे.
यासंबंधात, 'सरकारी कायदे' आणि 'रुग्ण व डॉक्टर शिक्षण' दोन्हीही करणे जरूर आहे. कोणताही एक पुरेसे यश देणार नाही.
23 Nov 2016 - 3:43 pm | धोणी
अजून विस्तृत माहिती दिलीत तर बरे
23 Nov 2016 - 4:24 pm | जॉनी
अनेक डॉक्टर्स साध्या व्हायरल इन्फेक्शनलाही ॲन्टीबायोटीक्स देतात ,हे थांबले पाहीजेत.
हे अगदी खरंय. काहीही असलं तरी प्रिस्क्रिप्शन मध्ये अँटी बायोटिक असतातच.
23 Nov 2016 - 4:38 pm | कानडाऊ योगेशु
खरेतर लहानपणा पासुनच हा प्रतिजैविकाचा मारा शरीरावर होतो आहे. सध्यच्या काळात आई व बाप दोघांनाही वेळ नसल्याने अपत्यांची आजारपणे त्वरीत निस्तरण्यावर भर असतो त्यामुळे ज्याच्या औषधामुळे मूल लवकर बरे होईल असा डॉक्टर चांगला असे समीकरण बनुन जाते. लहान वयात होणारी काही आजारपणे ही औषधांपेक्षा पुरेसा वेळ दिल्याने बरे होतात व पुढे प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते पण इतका वेळ आहे कुणाला ?
25 Nov 2016 - 1:04 pm | जॉनी
अतिशय वैयक्तिक असं मत सांगतोय.
आयुर्वेदिक, होमिओपॅथिक हे सगळे ट्रायल अँड एरर प्रकार वाटतात. Allergic rhinitis, म्हणजे ऍलर्जी ची सर्दी, यासाठी आयुर्वेदिक, होमिओपॅथिक सगळं घेऊन पाहिलं. काही उपयोग नाही झाला. शेवटी फॅमिली डॉक च साधं पण लाखमोलाचं वाक्यच उपयोगी पडलं. ते म्हणाले ज्या पदार्थांची ऍलर्जी आहे ते टाळायचा प्रयत्न करायचा, बस..
Levocitrizine च काय ती उपयोगी पडते.
अर्थात अँटिबायोटिक्स चा काही संबंध नाही ह्यात, पण आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी वरची साशंकता वाढली आहे.
23 Nov 2016 - 4:55 pm | प्रान्जल केलकर
मी डॉक्टर नाही मला मेडिकलचे कुठलेही ज्ञान नाही. प्रश्न हास्यास्पद वाटू शकतो
ऍलोपॅथी बरोबर जर आयुर्वेदिक औषधांचा वापर चालू केला तर यात काही फरक पडेल का ???
कारण सध्या वेळ नाहीये लोकांना त्यामुळे पटकन बरे होण्यासाठी अँटिबायोटिक दिली जातात.
जर आयुर्वेदाची मदत घेतली तर हि समस्या दूर होऊ शकते का???
25 Nov 2016 - 1:28 pm | जॉनी
अतिशय वैयक्तिक असं मत सांगतोय.
आयुर्वेदिक, होमिओपॅथिक हे सगळे ट्रायल अँड एरर प्रकार वाटतात. Allergic rhinitis, म्हणजे ऍलर्जी ची सर्दी, यासाठी आयुर्वेदिक, होमिओपॅथिक सगळं घेऊन पाहिलं. काही उपयोग नाही झाला. शेवटी फॅमिली डॉक च साधं पण लाखमोलाचं वाक्यच उपयोगी पडलं. ते म्हणाले ज्या पदार्थांची ऍलर्जी आहे ते टाळायचा प्रयत्न करायचा, बस..
Levocitrizine च काय ती उपयोगी पडते.
अर्थात अँटिबायोटिक्स चा काही संबंध नाही ह्यात, पण आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी वरची साशंकता वाढली आहे.
चुकून हा प्रतिसाद वर पण पडला.
23 Nov 2016 - 5:32 pm | असंका
हे आशादायक आहे असं वाटलं. आपलं काय मत?
23 Nov 2016 - 5:46 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
But 99 per cent of microbes will not grow in laboratory
conditions leaving researchers frustrated that they could not
get to the life-saving natural drugs.हे वाचले का? सध्यातरी कष्टाचं काम आहे पण नवीन ॲन्टीबायोटीक सापडतील ,फक्त त्याचा वेग वाढवायला हवा.
23 Nov 2016 - 6:33 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
मी आजारी पडलो तरी शक्यतो औषधं घेतं नाही. नैसर्गिकरित्या बरा होण्याकडे माझा कल असतो.
रच्याकने मेडिकल इम्युनिटी हि पिढीजात ट्रान्सफर होते का?
23 Nov 2016 - 7:44 pm | सामान्य वाचक
कुणी हि विनाकारण बेछूट औषधे घेतलि कि बॅक्टेरिया त्याला दाद न देणारे बनत जातात
जसे डासांच्या औषधाचा उपयोग कमी कमी होत आहे
आणि त्या डासांचा त्रास तुम्हाला होतो, डास विरोधी औषधे तुम्ही वापरली नाही तरी
तसेच उद्या आपल्याला जर बॅक्टेरिअल infection झाले, तर ते बॅक्टेरिया प्रतिजैविकाना दाद देणार नाहीत
कारण दुसऱ्या कोणीतरी त्याना immune किंवा evolve करायला मदत केली आहे
23 Nov 2016 - 7:44 pm | सामान्य वाचक
कुणी हि विनाकारण बेछूट औषधे घेतलि कि बॅक्टेरिया त्याला दाद न देणारे बनत जातात
जसे डासांच्या औषधाचा उपयोग कमी कमी होत आहे
आणि त्या डासांचा त्रास तुम्हाला होतो, डास विरोधी औषधे तुम्ही वापरली नाही तरी
तसेच उद्या आपल्याला जर बॅक्टेरिअल infection झाले, तर ते बॅक्टेरिया प्रतिजैविकाना दाद देणार नाहीत
कारण दुसऱ्या कोणीतरी त्याना immune किंवा evolve करायला मदत केली आहे
25 Nov 2016 - 11:54 am | मराठी कथालेखक
घाबरून जाऊ नका.
सरकार लवकरच याविरोधात एक सर्जिकल स्ट्राईक करणार आहे. सगळ्या बॅक्टेरियांची फे फे होणार आहे. बॅक्टेरिया औषधालाही उरणार नाही.
सध्या अत्यंत गोपनीयरित्या यावर काम चालू आहे (मग मला कसे कळाले हे विचारु नका)
25 Nov 2016 - 12:14 pm | योगेश कोकरे
superbug तयार होण्यामागची कारणे हि अतिशय सोप्या सोयीस्कर रित्या उपलब्ध असलेली औषधे , डॉक्टरांच्या परवान्गीऊ शिवाय घेतली जाणारी औषधें हे आहे. त्यात जर रोग्याने दिलेली औषधे पूर्ण न घेता अर्ध्यातून सोडून दिल्या मुळे superbug चे प्रमाण वाढले आहे. आणि जगातील सगळ्यात ज्यास्त superbug भारतात असण्याची शक्यता आहे. त्यावर अल जजिरा या अंतर राष्ट्रीय वाहिनीने documentry ची लिंक देतोय. https://youtu.be/_LGA2tcS-Fs
आणि भारतीय लोक स्वतःची मनाने औषध घेण्यात माहीर आहेत. आपण डॉक्टरांच्या ऐवजी,आपले शेजारी ,मित्र यांचा वैद्यकीय बाबतीत सल्ला ऐकायचे आणि त्यानुसार स्वतः औषधे घ्यायचं बंद केलं पाहिजे.एकूणच काय वैद्यकीय बाबतीत जे काही करायचंय ते डॉक्टरनं करुद्यात स्वतःच डोकं लावू नये . हाच एक उपाय सुपेर्बुग ला थांबवण्यावर आहे.आणि अवैध्य रित्या औषधे ,गोळ्या विक्री ताबडतोब थांबणे गरजेचे आहे.
25 Nov 2016 - 1:58 pm | अनिरुद्ध.वैद्य
नॅणोटेकनॉलॉजीचा वापर करुन बनवलेले छोटुकले रोबोट्स वापरुन ह्या बॅक्टेरियांना हातघाईच्या लढाईत मारण्यात यावे.