बायका बायकांची बरोबरी का करतात हा मला पडलेला एक प्रश्न आहे.जेव्हापासून मला समजायला लागले आहे तेव्हापासून मी आजुबाजुला बघतो की आकर्षक,टंच,अधिकार पदावर असलेल्या बायका ज्या गोष्टी करतात त्या केल्या की अन्य सामान्य बायकांना आपले मेटल सिद्ध् केल्याचा फील येतो.
१. कतरिना कैफ छोटे कपडे घालते, करा अनुकरण. प्रियांका चोप्रा बिकिनी घालते, करा अनुकरण. मग बेफिकीरीत आपल्या बेढब देहावर तंग कपडे घालून स्वतःला माधुरी दीक्षितच्या बरोबरीत आणून ठेवल्याचा ' लूक ' देत असतात
२. शेजारची टंच मुलगी जिन्स ,टी शर्ट वापरते. मग इतर बायकाही तिचे अनुकरण करतात. शोभत नसेल तरीही जिन्स टीशर्ट घालून फिरणार्या बायका सर्रास दिसतात. टंच मुलींना डेनिम अगदी मावा-खवा लुक देते,तसा लुक क्वचीतच या बायकांना कॅरी करता येतो.पण नाही ती करते ना ,तर मग मीही करणार,हा अट्टाहास कशासाठी?
३. आर्ची मोटारसायकल चालवते ,ती तिला जमतेहि . पण बाजारत गिअरलेस गाड्यांची फौज उभी असताना या लुकड्या मुलींनाही बुलेट चालवायची असते.भले ही चालवताना फेफे उडाली तरी हरकत नाही. या पुढे जाऊन काही चवळीच्या शेंगा ट्रॅक्टरही चालवतात,आमच्यासारखे पामर त्यांच्यापासून जीव वाचवायला लांब अंतर ठेऊनच सायकल चालवतात.
४ स्वयंपाकघर चालवणे आणि अधिकार गाजवणे हा खास सासवांचा प्रांत.पण घुसखोरी करणार नाही त्या सुना कसल्या. नवर्याला बकरा बनवून ताटावर बसवले जाते,इतर वेळी मल्टीटास्कींग असणार्य स्मार्ट सुना बायका मात्र इथे गडबडतात. लोणचे दे असे सांगितले की चटणी देतात व भाकरी थापायला सांगितले की पराठे वाढतात.आणि वर यांना रोटी मेकर नको असते. यांना हवा असतो मायक्रोवेव्ह. केक आणि पिझ्झा बनवायला. मग सासूने डोळे वटारले की यांना काही सुचत नाही आणि त्या नवर्यावर डोळे वटारतात. मग नवरा कंटाळून जेवण अर्धवट सोडून बाहेर निघाला की त्याला सासू-सुनांचे सुसंवाद कमी आणि आदळलेल्या भांड्यांचे आवाज जास्त ऐकू येतात.अरे काय वेडेपणा आहे हा?
५. उत्साहावर विरजण पाडणे हे खास म्हातार्या बायांचे कुरण. पण आजकाल तरण्याताठ्या बायकांनी त्यात प्राविण्य मिळवले आहे. इतके की 'भलत्या' वेळी मैत्रिणीला फोन करुन नवर्याला ताटकळत ठेवणे आणि तो कंटाळून झोपी गेला की मगच फोन ठेवणे ही त्यांची फर्माईश असते.
तर बायकांनो जरुर अन्य स्मार्ट बायकांना कॉपी करा ,त्यात गैर काही नाही. पण ज्या गोष्टी मुदलातच आपल्यासाठी नाहीत त्याचा अट्टाहास धरु नका.कॉपी अशी करा की बघणारा पुरुष बघत राहीला पाहीजे. स्मार्ट बायकांचे एकच उदाहरण देतो, वारंवार माहेरी जाणे हा खरतर गेल्या पिढीतल्या बायकांचा प्रांत ,पण स्मार्ट स्त्रियांनी तिथे असे प्राविण्य मिळवले आहे की बहुतांश आनंदी प्रुरुषांच्या बायका या वारंवार माहेरी जाणार्या स्मार्ट सूनबाई आहेत.
तर बायकांनो , मदनिकांना कॉपी करणे म्हणजे आपण मॉड् झालो हा कन्सेप्ट मनातून काढून टाका.तुमची स्वतःची अशी exclusive क्षेत्रे तयार करा.कतरिनाला बेंचमार्क ठरवून भलतेच काहीतरी करण्याचा प्रकार सोडून द्या,after all , कतरिना इज कतरिना.
प्रतिक्रिया
21 Nov 2016 - 5:16 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
मी पहिली रे अप्पा.
21 Nov 2016 - 6:44 pm | सूड
तुम्ही अनादिकाळापासून आहात माई. मिपाच्या आद्य स्त्री असा किताब तुम्हाला देणेत यावा अशी शिफारस मी पुढील कट्ट्याला करणार आहे.
21 Nov 2016 - 7:21 pm | टवाळ कार्टा
फक्त मिपाच्या?
22 Nov 2016 - 10:41 am | नाखु
इथे आहे.
आप्पांनी मोहोळ उठवले आहे आता मध मिळतो का माश्या डसतात ते पहावे लागेल.
धाग्यावर लक्ष ठेऊन असलेला नाखु
21 Nov 2016 - 6:10 pm | श्रीगुरुजी
मज्जा.
आता अनाहिता धावून येतील.
21 Nov 2016 - 7:04 pm | सोंड्या
हि आमची कतरीना
हिच्यावर आमचा खुप जीव
त्यामुळं हिची बरोबरी कोनी केली तर आपली काही आडकाठी न्हाई
21 Nov 2016 - 8:16 pm | पुंबा
खंग्री..
21 Nov 2016 - 9:48 pm | मनिमौ
बायकाचा जन्म
मेली साधी बरोबरी देखील करू देत नाहीत
21 Nov 2016 - 9:53 pm | पिलीयन रायडर
=))
21 Nov 2016 - 10:06 pm | प्राजु
मग काय! सल्मान ने शर्ट काढला .. लग्गेच रोड रोमिओ शर्ट काढून हिंडू लागले. छ्या! हि काय बरोबरी म्हणायची का? कुठे सल्मान, कुठे त्याचे ते सिक्स प्याक.. आणि कुठे चिप्पाड मिरवणारे खुळचट! चालयचच! कलियुग आहे भाऊ! ;)
22 Nov 2016 - 1:04 pm | कैलासवासी सोन्याबापु
पानपट्टीवर गोवा विमल स्टार किंवा तत्सम मावा चघळत एखादे पोरगे खाली प्यांट वरती उघडे उभे आहे असे आजवर पाहण्यात आलेले नाही, तुमच्या पाहण्यात असले तर सांगा,त्यामुळे रोड रोमियो उघडे हिंडू लागले ह्या वाक्यावर मी आक्षेप नोंदवतो, रोड रोमियो अजून जास्त चीप प्रकार करतात, अधिक माहितीकरता अंग्रेज ह्या चित्रपटातील सलीम फेकू हे पात्र आवर्जून अभ्यासावे अशी नम्र विनंती. बाकी फेसबुक रुपी संडासात कोण किती हागतो त्याची आपणाला खबर नाय! त्यापासून आपण लांब हाओत
22 Nov 2016 - 12:33 pm | संजय पाटिल
बायका- पुरुष; पुरुष - बायका; पुरुष-पुरुष; बायका-बायका.. सगळि कॉम्बीनेशन संपली. आता पुढे काय?
22 Nov 2016 - 12:48 pm | अप्पा जोगळेकर
१) ऐसीकर मिपाकरांची बरोबरी का करतात ?
२) माई नानासाहेबांशी बरोबरी का करतात ?
३) डुआयडी जिलब्यांशी बरोबरी का करतात ?
४) 'आप' वाले आयडी 'संघ' वाल्या आयडींशी बरोबरी का करतात ?
५) 'संघ'वाले आयडी प्रचारकांशी बरोबरी का करतात ?
६) 'ओशो'वाले आयडी झोपेच्या गोळ्यांची बरोबरी का करतात ?
अजून बरीच शिल्लक आहेत.
22 Nov 2016 - 2:52 pm | श्रीगुरुजी
अजून ८ शिल्लक आहेत.
गे-पुरूष, गे-स्त्रिया, गे-गे, गे-लेस्बिअन, लेस्बिअन-पुरूष, लेस्बिअन-स्त्रिया, लेस्बिअन-गे आणि लेस्बिअन-लेस्बिअन
22 Nov 2016 - 8:32 pm | सुबोध खरे
गुरुजी ते बाय सेक्स्युअल, ट्रान्स जेंडर आणि क्वीअर राहिले ना!
http://www.thewelcomingproject.org/lgbtq-community.php
22 Nov 2016 - 1:07 pm | jp_pankaj
मस्त धागा.
23 Nov 2016 - 12:35 am | कंजूस
एवढं चिरडीला का आलायसा? जरा इनोदी लिहिलं असतं तार-----