कसा फुलताना दिसू?

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
18 Nov 2016 - 2:57 pm

नाही ओठावर हसू
डोळा नुसतेच आसू
उभा आत जळताना
कसा फुलताना दिसू?

रूपाची तुझ्या चांदी
झळाळे उष्ण बेभान
माझ्या उघड्या मनाने
सांग कसे आता सोसू?

तुझी साद खोलवर
चिरत मला गेलेली
आता नव्या पाखरांच्या
गाण्यांना मी कसा फसू?

तुला मिळालाय कोरा
चकाकता तो आईना
माझी जागा सांग कुठे
सांग कुठे आता बसू?

- संदीप चांदणे

कविता माझीकरुणकलाकविता

प्रतिक्रिया

Bhagyashri satish vasane's picture

18 Nov 2016 - 3:10 pm | Bhagyashri sati...

छान कविता!

जव्हेरगंज's picture

18 Nov 2016 - 6:06 pm | जव्हेरगंज

उत्तम हो संदीपराव!

प्राची अश्विनी's picture

18 Nov 2016 - 6:06 pm | प्राची अश्विनी

सुरेख!

प्रचेतस's picture

18 Nov 2016 - 6:46 pm | प्रचेतस

सुरेख.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Nov 2016 - 7:25 pm | अत्रुप्त आत्मा

छानच!

शार्दुल_हातोळकर's picture

19 Nov 2016 - 12:21 am | शार्दुल_हातोळकर

खुप अर्थपुर्ण आहे कविता.... आवडली....

फक्त तिसऱ्या कडव्यात "चिरत मला गेलेली" ऐवजी "मला चिरत गेलेली" असे मी वाचुन पाहिले तर ते अधिक छान वाटले.... बाकी उत्तमच आहे....

कवि मानव's picture

19 Nov 2016 - 3:20 am | कवि मानव

छान झाली आहे कविता !!

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Nov 2016 - 10:20 am | ज्ञानोबाचे पैजार

मस्त रे संदीप, मनापासून आवडली कविता,
पैजारबुवा,

चांदणे संदीप's picture

19 Nov 2016 - 11:12 am | चांदणे संदीप

पैजारबुवा, शार्दूल, कमा, बुवा, वल्ली, जव्हेरभाऊ, भाग्यश्री, प्राची अश्विनी, सगळ्यांचे मनापासून धन्यवाद!!

Sandy

पुंबा's picture

19 Nov 2016 - 11:19 am | पुंबा

अतिशय सुंदर..

यशोधरा's picture

19 Nov 2016 - 11:30 am | यशोधरा

पहिली ३ कडवी आवडली.

शेवटच्या कडव्यात तुला मिळालेला कोरा, चकाकणारा आईना.. असे करुन पाहिले. तो वगैरे फिलर्स वापरायची मग गरज लागणार नाही असे वाटते. चुभू.

नाखु's picture

21 Nov 2016 - 8:59 am | नाखु

शेवटचा आईना तर एक्दम जबराट आहे.

आईना का बाईना वाचल्या बिगर राहिना वाला नाखु

रातराणी's picture

5 Dec 2016 - 5:06 pm | रातराणी

मस्त !

सस्नेह's picture

6 Dec 2016 - 11:55 am | सस्नेह

उत्तम कविता !

देशप्रेमी's picture

17 Jan 2017 - 7:12 pm | देशप्रेमी

सुरेख कविता..!
खुप अर्थ सामावला आहे.