सुट्टी हा तसा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय . लहान असताना आतासारख्या छोट्या छोट्या नाही तर चांगल्या मोठ्या सुट्ट्या असत . एकदा सुट्टी पडली की डायरेक्ट १२ जून ला परत घरी. आता कामातून तासभर जरी सुट्टी मिळाली तरी बरं वाटतं :)) तर सांगायचा विषय काय प्रत्येकाचीच सुट्टी कुठे ना कुठे तरी गेलेली असते.माझीही गेली कधी कोकणात कधी पुण्यात कधी साताऱ्यात, कोल्हापूर तर दस्तुरखुद्द आमचंच गाव त्यामुळे ते तर आलंच. ह्या ठिकाणांवर बरंच काही लिहिलं आहे .पण मला सर्वात सुट्टीत जायला आवडायचं ते बदलापूर आणि कर्जत ला .बदलापूर व्हाया मुरबाड ते कर्जत अतिशय समृद्ध प्रदेश आहे हा. (आता होता म्हणावा का?) .माझी मावशी राहायची तो बारवी धरणाचा रस्ता, गर्द झाडी करवंदाच्या जाळ्या दिवस रात्र मजा चालायची .लोक पण निवांत असायची तेव्हा .करवंदाच्या जाळीत घुसून कोणी किती करवंद काढली यात स्पर्धा असायची. किती खरचटतय कोण बघतय. पण आमची फक्त एकाच गोष्टीकडे नजर असायची. तो दिवस झाला कि सुट्टी सार्थकी लागली . ती म्हणजे रानडुकराची शिकार . कधीतरी गावातला पुरुषमाणूस घोषणा करायचा कि आज शिकार आहे कि सकाळपासून आमच्या उत्साहाला उधाण . वास्तविक आम्ही काय जाणार नसायचो लांबवरच घाबरून थांबणार .पण तो प्राणी आणि ती शिकार झाल्यावर दारात त्या प्राण्याला पाहणं कसलं थरारक असायचं त्या वयात .कधी शाळेत जाऊन मित्रांना सांगतोय असं व्हायचं. शिकार केलेले गावातले त्या वेळी शूरवीर योद्धे वाटायचे.. बारवी धरणाच्या परिसरात शिकारी चालायच्या तेव्हा .त्यानंतर जेवण .. त्या रात्री आजही मनावर कोरल्या आहेत. असाच एक आनंदाचा प्रसंग म्हणजे खेकडे पकडणं रात्री निघावं लागत त्या करिता. आम्ही खुश सगळे कोण खेकडा आला बोल तरी पळून जायचो पण काका मामाने त्या वेळी पकडल्यावर कोण कौतुक त्यांचा आम्हाला .गोणी गोणी भरून खेकडे मिळायचे रात्रीत.
यावरूनच कर्जातही आठवलं. आमचं घर आहे तिथून ५-७ किलोमीटर वरून माथेरानला जाणारी मागच्या बाजूने पायवाट आहे . थोड्या अंतरावर धरण झाडी आजही हिरवागार पट्टा आहे हा .प्रबळगड ,कलावंतीण गड, सोंडाई माता ,मागे माथेरान थोडं वरून पाहिलं की लांबवर दिसणारा पनवेलचा लिंगोबा . असं अत्यंत सुरेख होतं कर्जत तेव्हा . म्हणजे मी म्हणतोय तो काळ सगळं माझ्या लहानपणीचा आहे १९९५-२००० मधला. जमिनीला भाव अजून यायचे होते . तर कर्जत ला वाम मारणं हा एक कार्यक्रम असायचा .एक प्रकारचा मासा जो कि नदीच्या पाण्यात भाल्याने मारावा लागतो. साहजिकच आमचे डोळे त्या कार्यक्रमाकडे लागलेले असायचे .रात्री बॅटरी घेऊन निघायचं, मोठे लोक भाले घेऊन. आमच्याही हातात छोटीशी बॅटरी कोणातरी म्हणायचं बघ हा लक्ष ठेव येतेय का बघ वाम . कसली मोठी जबाबदारी पडल्यासारखा वाटायचं तेव्हा . वाम काय गांडूळ दिसलं तरी पळण्याच वय ते पण असं कोण बोल कि जाम भारी वाटायचं . घरच्या मागच्या बाजूला डोंगरावर ठाकरांचे कातकऱ्यांचे पाडे असायचे. त्यांना पाहणं हा पण एक कार्यक्रम काय पटापट झाडावर चढणार हवं ते आणून देणार . कर्जत माथेरान डोंगर उलट्या बाजूने ते दिवसातून २-२ वेळा ये जा करत अक्षरशः ..अश्या खूप साऱ्या अआठ्वणी. हा परिसर आजही त्यामुळे आवडतो माझी सगळी सुट्टी इथे जायची . कर्जत आता बदललय. बारवी धरणाच्या रोड च्या हि करवंदाच्या जाळ्या जाऊन आता धाबे आले .चालायचं. बदल होणारच. मी काय उसासे वैग्रे टाकत नाहीये ते टाकायला अजून संसार बाकी आहे .:))
तर आज हे सारं आठवायचं कारण म्हणजे माझा भाचा आहे त्याला म्हटलं चल आपण नाटकाला जाऊया (बालनाट्याला).मागे एकदा घेऊन गेलेलो त्याला पण त्यावेळी त्याला काही आवडला नव्हता मामा काय पागल आहे अशी त्याची प्रतिक्रिया होती. म्हटलं परत एकदा विचारून अपयशाचा शिक्का पुसावा . च्य्यक करत तो बोला आपण हॅमलेज ला जाऊ म्हटलं गिफ्ट तर तुला देणारच ना पण नाटकाचा काय ?तेव्हा गिफ्ट आणि कुठलासा ३D मूवी इतका सांगून तो गेला पण .मी आपला त्याला कुठला प्ले स्टेशन गमे द्यावा विचार करत बसलो.
असो प्रत्येकाच्याच बालपणीच्या कल्पना पिढीनुसार बदलतात .त्याला आज ते आवडत असेल .कदाचित आज आम्हाला त्या वेळी जे वातावरण मिळाला ते मिळणाराही नाही त्यांना त्यामुळे त्यांचाही चुकत नाही .कर्जतला जायला पण तो बोर होतो .पण तरी मला नेहमी वाटतं आपल्यासारखं अनुभवलेली पिढी समृद्ध आहे. नेहमीच राहील
प्रतिक्रिया
17 Nov 2016 - 12:23 pm | संजय पाटिल
चांगल्या आहेत आठवणी...
पण जरा डीटेल मध्ये लिहा हो. फरच त्रोटक वाटतय..
17 Nov 2016 - 12:29 pm | असंका
+१
17 Nov 2016 - 12:38 pm | धोणी
असे का लिहिता , प्रत्येक लेख त्रोटक