बंदिनी

जयवी's picture
जयवी in जे न देखे रवी...
29 Sep 2008 - 7:31 pm

जन्मजात लाभली
बंधने जगातली
कुशीत जरी पहुडली
कोवळी कुमुदिनी
ती एक बंदिनी, ती एक बंदिनी

तरुणाई चिवचिवते
स्वप्नी पंख पसरते
जनकाच्या परी सदनी
पराधीन नंदिनी
ती एक बंदिनी, ती एक बंदिनी

सप्तपदी चालता
जोडवी हासती
नजरकैद कुंकाची
असून हृदयस्वामिनी
ती एक बंदिनी, ती एक बंदिनी

सांजकाली जीवनी
पुत्र सुकाणू धरी
पुनश्च वाट चालते
पायी बेडी घालुनी
ती एक बंदिनी, ती एक बंदिनी

जयश्री

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

प्राजु's picture

29 Sep 2008 - 8:41 pm | प्राजु

जनकाच्या परी सदनी
पराधीन नंदिनी
ती एक बंदिनी, ती एक बंदिनी

अतिशय सुंदर कविता... खूप आवडली.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

श्रीकृष्ण सामंत's picture

29 Sep 2008 - 10:09 pm | श्रीकृष्ण सामंत

जयवीजी,
आपली कविता मला आवडली.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

विसोबा खेचर's picture

29 Sep 2008 - 11:43 pm | विसोबा खेचर

वा जयू!

एक वेगळीच कविता. जियो...!

अवांतर : बर्‍याच दिसांनी मिपावर डोकावलीस! :)

असो, येत रहा नेहमी...

तात्या.

जयवी's picture

1 Oct 2008 - 1:21 am | जयवी

प्राजु, श्रीकृष्ण, तात्या...... धन्यवाद !!
तात्या......मिपाशिवाय चैन पडत नाही इतकं मात्र खरं..... पण बरेचदा फक्त वाचकाच्या भूमिकेत असते. आता मात्र अगदी नियमित येत जाईन :)

विसोबा खेचर's picture

1 Oct 2008 - 7:41 am | विसोबा खेचर

पण बरेचदा फक्त वाचकाच्या भूमिकेत असते. आता मात्र अगदी नियमित येत जाईन

ओके, डन..! :)

भडकमकर मास्तर's picture

1 Oct 2008 - 2:34 am | भडकमकर मास्तर

कविता आणि त्यातलं सौन्दर्यशास्त्र मला कळत नाही... पण या कवितेचा आशय मला समजला तसाच असेल तर मला पटला नाही... आताची स्त्री मला बंदिनी वगैरे अजिबात वाटत नाही...
बापाकडे वाढणारी मुलगी मला पराधीन नंदिनी वाटत नाही, कुंकवाची नजरकैद तर नाहीच नाही,... वृद्धापकाळात कदाचित
पायी बेडी शक्य आहे...पण ती तर पुरुष वृद्धावरही असतेच की...
मला न समजलेला यापेक्षा वेगळा काही अर्थ असेल तर समजावून सांगावा...

थोडे अवांतर : ८८ किंवा ८९ साली घरोघरी आसवे ढाळत पाहिल्या जाणार्‍या एका अधिकारी ब्रदर्सच्या मराठी मालिकेचे शीर्षकगीत असेच काहीसे होते...बंदिनी ..बंदिनी
स्त्री ही बंदिनी.
...
माहेरा सोडून येते, सासरी सर्वस्व देते...
हृदयी पान्हा , नयनी पाणी
जन्मोजन्मीची कहाणी....बंदिनी..
लिंगभेदाला आणि स्त्रीवर जन्मोजन्मी होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही कविता लिहिली गेली असेल कदाचित....
पण मला तरी हे काव्य केवळ करूण वाटत नाही तर स्त्रीच्या बंदिनी असण्याचे वृथा कौतुक वाटते... असो...

अतिअवांतर : हीच कविता पुरुषाने लिहिली असती तर त्याला केवळ कौतुकाचे प्रतिसाद आले असते काय?
उलट "कुठल्या जमान्यात वावरताय राव?स्त्री आज पुढे चालली तर तुमची जळजळ होते आणि तुम्ही तिला पुन्हा डांबून ठेवायला निघालाय ....." अशी प्रतिक्रिया आली असती...

असो..ज्याच्यात्याच्या दृष्टीचा प्रश्न... :)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/