तू भरावे, मीच प्यावे,
साधणे ह्या क्रियेचे जमेना
अंतरीची, वारुणी ही
कां अशीही ओठी पडेना
हीच गोडी, हीच थोडी
पीण ग्लासात, काही पडेना
बूच वेढे, थोडे थोडे
सोडवावे, तरीही निघेना
बूच ढकलता, आत जाता
दारूमध्ये, तेही बुडेना
वास त्याचा, लाकडाचा
दारूला ह्या, मुळीही खुलेना
वास सुकल्या, या पेल्याची
आज भरता, तळी भरेना
वाट पाहत्या, या घशाची
आज खुलता, कळी खुलेना
प्रतिक्रिया
16 Nov 2016 - 9:28 am | औरंगजेब
:-)
16 Nov 2016 - 11:14 am | अनुप ढेरे
मस्तं!
16 Nov 2016 - 2:12 pm | कवि मानव
धुन्द कविता ::)
16 Nov 2016 - 3:21 pm | संजय पाटिल
=)
16 Nov 2016 - 3:32 pm | सूड
व्हर्जिनल गाणं चांगलं आहे हो काका!