वयाच्या १४-१५ व्या वर्षी कधीतरी सवय लागली व मी स्मोक करु लागलो, व वयाच्या २२-२३ व्या वर्षीपासून हार्ड ड्रिन्क देखील सुरु झाले. रोज ३०-४० सिगरेट, सिगार. किमान ३६०mL ड्रिक.
वयाच्या ३८ व्या स्टेप पर्य्न्त हे सगळे सोडण्यासाठी अनंत उपाय केले चालू आहेत. पण गेल्या २०१२ मध्ये मला कुठे तरी वाचताना समजले की रोज किमान १०,००० पाऊले चालावेत जेणे करुन तुमची आज पर्य्न्त झालेली हानी भरुन निघते.
१३०० नियमित पाऊले म्हणजे १ किलोमिटर.
वाचले व सोडून दिले, पण एकदा शरिराने सगळ्याच गोष्टीला नकार देण्यास सुरुवात केली, अगदी पाणी देखील पिले तर बाहेर येत होते वेळ होती २०१५ जुलै. थोडे उपचार इत्यादी घेऊन ३-४ महिने सर्व परत व्यवस्थीत झाले होते. तेव्हा वाचण्यात आले की रोज १०,००० पाऊले चाला व जगा. उत्तम म्हणू शकत नाही कारण आधीच दिले आहे, पण याचा उत्तम फायदा घेतलेल्या अनेक लोकाचे अनुभव वाचले व एका क्शणी ठरवले, रोज २ तास चालायचे तर आहे.
गेली एक वर्ष चालतो आहे रोज ८ किमी ते १० किमी कमीत कमी.
तोटा -
पहिले काही महिने तुमचे वजन कमी होते (जर वजन खूप असेल तर फायदाच आहे)
नशा लागते चालण्याची.
स्वतः मध्ये झालेला बदल पाहण्याची सवय नसेल तर मानसिक त्रास होऊ शकतो. मी कधीच सकाळी ६ वाजता उठत नव्हतो पण चालणे सुरु केल्यावर काही दिवसांनी मला आपोआप सकाळी ६ वाजता जाग येऊ लागली. आधी मी जेव्हा मनाला वाटेल तेव्हा उठत असे.
जेवण व नाष्टा आणी इतर सवयी यांना एक उत्तम वेळेची सवय लागली.
तर हे तोटे मान्य असतील तर, चला सुरु करा १०,००० पाऊले रोजची.
प्रतिक्रिया
7 Nov 2016 - 11:10 pm | कविता१९७८
रोज सलग 2 तास चालते पण मोजुन मापुन नाही. १०,०००पाउलापेक्षा जास्तच चालणे होते पण रात्री. १० मि.=१ कीमी पकडतात म्हणजे १२० मि म्हणजे कीती कीमी होतील बरे?? नशा लागते चालण्याची हे खरय पण पदयात्रेमुळे चालायची सवय लागली हे ही खरे
8 Nov 2016 - 10:45 am | पैसा
लेख आवडला. आता तुमची व्यसने आटोक्यात आली का? चालणे चांगलेच. पण त्यासोबत इतर व्यायाम पाहिजे असे डॉक्टर लोक म्हणतात. तेव्हा नुसते चालून इतका फायदा खरेच होतो, का त्यासोबत इतर खाणे पिणे यात काही बदल केले होते?
8 Nov 2016 - 10:49 am | नाखु
वजनात आणि जाडेपणात (विशेष तः पोटावरील चरबीत) लक्षणीय फरक पडतो काय? कुणाला सिद्धहस्त अनुभव असतील तर टंकावेत.
चालण्यात खंड पडलेला नाखु
8 Nov 2016 - 12:40 pm | अनिरुद्ध.वैद्य
आपलं शरीर हे अॅडॅप्टीव्ह आहे. तुम्ही चालायला सुरुवात करता, हळु हळु स्पीड वाढवता, मग एखाद्या तासा सहा साडेसहा किमीवर आपण युझुवली थांबतो, म्हणजे स्पीड त्यापेक्षा वाढवण्यासाठी विषेश प्रयत्न करत नाहीत.
मग हळुच, शरीर ह्या कंडीशनला अॅडॅप्ट होउन जातं. तोपर्यंत वजन अन जाडेपणा कमी होत असतो. पण एकदा अॅडॅप्ट झालं की मग वजन फारस कमी होत नाही.
थोडक्यात, चालणे धावणे ह्या कार्डीओ प्रकारात आपल्याला त्या त्या अॅक्टीव्हीटीची तीव्रता वाढवत न्यावी लागते, जे एका विशिष्ठ मर्यादेनंतर सहजशक्य नसते. आपली हाडं, मसल्स आदी गोष्टी त्या तीव्रतेवर काम करण्यची शक्यता कमी असते. जर आपण पुश केलं तर दुखापत होऊ शकते. (हे वाढलेल्या वजन वाल्यांसाठी) मग ती क्षमता वाढवायला जीमचे दरवाजे ठोठवावे लागतात.
मी स्वतः सध्या ह्या स्टेटमध्ये आहे. चालायला सुरुवात केली, वजन कमी व्हायला लागल, मग हळु हळु जॉग करायला लागलो, वजन कमी झालं. नंतर वजनही कमी होत नव्हत अन जोरात जॉग करायचा म्हण्ट्ल तर पाय खुप दुखायला लागायचे. तेव्हा काहितरी चुकतंय अस वाटुन, जरा सर्च केला. मग कळल की अॅडॅप्टीव्हीटीचे आपण शिकार झालोय :)
8 Nov 2016 - 5:29 pm | वेल्लाभट
प्रोग्रेस हवीच. अहो दहा किलो वजनही पहिले चार दिवस जड वाटेल, नंतर जडही वाटणार नाही आणि स्नायूंवर परिणामही होणं थांबेल. मग ती एखाद्या दैनंदिन कामासारखी क्रिया होईल.
इफ इट डजन्ट चॅलेंज यू, इट डजन्ट चेंज यू.
त्यामुळे गेली दोन वर्ष रोज्ज! रोज्ज ५ किमी चालतोय. वजन कॉन्स्टंट हं एकदम. एक किलो जास्त नाही की कमी नाही.
अशा बढाया मारणार्यांवर भयंकर हसू येतं.
8 Nov 2016 - 7:00 pm | निओ१
तुम्हीतर माझे मोरल पार ठार मारले साहेब :(
8 Nov 2016 - 7:09 pm | अनिरुद्ध.वैद्य
डाउन कधीच होउ देउ नका. एक मॉरल अन दुसरी विल पॉवरच वजनाच्या विळख्यातुन बाहेर काढु शकते अन फिटनेसकडे परत नेउ शकते.
8 Nov 2016 - 7:12 pm | यशोधरा
ऐकावे जनांचे, करावे मनाचे.
शुभेच्छा.
8 Nov 2016 - 12:16 pm | मराठी_माणूस
चांगला उपक्रम.
व्यसने ताब्यात आली का ?
8 Nov 2016 - 1:01 pm | वरुण मोहिते
पाणी जात नसणं हि व्यसनाची पुढची स्टेप आहे आपल्यालाच समजत असतं. लगेच सुटत नसेल तरी थोडा कमी करा आणि तुमचा उपक्रम चालू ठेवा . शुभेच्छा . बाकी उपाय व्यनि करतो
8 Nov 2016 - 2:13 pm | कंजूस
तरुणपण गेलं वाया आता दुध पिऊन काय होणार? असो . व्यसनं सुटणं कठिण असतं पण ती मारक होणार नाहीत अशासाठी ज्वारीच्या कण्या- ताक दिवसातून एकदा जेवण म्हणून घ्या.थोडा पालेभाजीचा कच्चा पाला.कोणताही व्यायाम करण्याची गरज नाही. ओफिसला जाता येता दोन स्टॅाप अगोदरच उतरा आणि चालत जा.चालण्याचा अतिरेक करण्याची गरज नाही. आपली चूक कळणे हेच दुरुस्तीतले पहिले पाऊल.
8 Nov 2016 - 2:23 pm | संदीप डांगे
चांगला सल्ला दिलात काका.
8 Nov 2016 - 3:57 pm | निओ१
इकडे कोठे मिळाणार या गोष्टी सर.आहे, चालण्याचा फायदा नक्की होत आहे हे जाणवत आहे.
8 Nov 2016 - 6:05 pm | कंजूस
खूप चालल्याने पाठीच्या कण्याच्या शेवटी असलेल्या माकडहाडातले मणके झिजू लागतात. वय वाढल्यावर ते दुखू लागतील. व्यसनमुक्तीचा चालण्याशी संबंध नसावा.ज्वारी नसल्यास बार्ली,रागी वगैरे काहितरी धान्य असेलच.फिटबिट वगैरे अॅपस आहेत पण ते एक फॅड आहे.
8 Nov 2016 - 3:57 pm | निओ१
आताच मी हा दिलेला मेसेज येथे पण देत आहे.
हो,मी माझे वजन कमी करण्यासाठीच हे सुरु केले होते. अजून बाकी कारणे देखील होती. पण हे महत्त्वाचे होते. मी बाहेरचे काही खात नाही, तेलकट तुपकट देखील नाही. रोज किमान १०००० पाउले चाला मदतीसाठी खुप मोबाईल एप आहेत मी समसंग हेल्थ वापरतो आहे.
8 Nov 2016 - 4:38 pm | स्वाती दिनेश
हा बेस्ट व्यायाम.
माझा पोलार बँड पावले आणि किमी मोजतो. रोज एकदा ते पहायची सवय लागली की चैन पडत नाही. किमान १०,००० पावले झाल्याशिवाय. जितकी जास्त होतील तितका जास्त आनंद होतो आणी हुरुप वाढतो.
स्वाती
8 Nov 2016 - 5:25 pm | वेल्लाभट
आणि बिन्धास्त स्मोक करा, दारू प्या...
असं नाही ना म्हणायचंय तुम्हाला? नसेल अशी आशा आहे. चालण्यापेक्षा आधी त्या दोन गोष्टी थांबवा असा मित्रत्वाचा सल्ला देईन. पापं करा आणि आठवड्याकाठी कन्फेस करा असलं धोरण घात करणारच. फक्त मानसिक समाधान होईल काही काळ.. हा! आता चाललो आता काही बाधणार नाही!... नो.
३०-४० अ डे... इज टू मच. एक वेळ ७५ मिली दारू ठीक म्हणायला लागेल. तीही वाईटच पण सिगारेटपेक्षा बरीच.
8 Nov 2016 - 5:37 pm | अमर विश्वास
चालण्याने वजन कमी होते का?
चालणे हा करायला सोपा व्यायाम असला तरी तो सर्वोत्तम व्यायाम नाही.
आपण जर रोज एक तास चालणार असु, तर त्या एका तासात दुसरा काही व्यायाम करून अधिक फायदा मिळेल का? तर नकीच मिळेल. जर वजन कमी करणे (आणि त्याहीपेक्षा महत्वाचे जर फिटनेस वाढवायचा असेल) तर नुसत्या चालण्याने काहीही साध्य होणार नाही.
फिटनेस तीन महत्वाच्या गोष्टींवर अवलंबुन असतो :
स्ट्रेंथ, स्टॅमिना (Cardio वॅस्क्युलर फिटनेस) आणि फ्लेक्सीबिलिटी ....
नुसत्या चालण्यामुळे यातील कशातही सुधारणा होत नाही.
त्यामुळे आपल्या ध्येयानुसार व्यायामप्रकार ठरवणे अत्यंत आवश्यक आहे.
8 Nov 2016 - 6:22 pm | अप्पा जोगळेकर
रोज २ क्वार्टर डाउन म्हणजे औघड वाटतय. मुक्तांगण गाठा राव.
8 Nov 2016 - 6:59 pm | निओ१
त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सध्या एए जॉइन केले आहे.
8 Nov 2016 - 7:18 pm | वेल्लाभट
निओभाऊ, कदाचित राग येईल पण मी माझ्या जवळात जवळच्या मित्रालाही जे म्हटलं तेच तुम्हाला म्हणतो,
आता सिगरेट्/दारू कमी करतोय, सोडणारंय या सगळ्या स्वतःला आणि दुसर्याला मारलेल्या थापा आहेत. यू आयदर डू इट ऑर यू डोन्ट. आणि सोडायला एक सणक पुरेशी असते. तुम्ही 'प्रयत्न' बियत्न करतोय म्हणणार आणि त्यावर समोरचे उगाच सहानुभूतीने 'येस आय अॅम विथ यू' वगैरे म्हणणार, मग येरे माझ्या मागल्या...ड्डोन्ट फूल युअरसेल्फ. . तुम्हाला हे लवकर उमगावं अशी सदिच्छा.
8 Nov 2016 - 8:06 pm | सुबोध खरे
बाडीस
निओ साहेब
एकाच वेळेस ऍक्सिलरेटर आणि ब्रेक वर पाय ठेवून आपण गाडी चालवता का? त्याने पेट्रोलही जास्त जळते आणि ब्रेक हि झिजतो. वर आपल्या इच्छित ठिकाणी पोहोचायला अधिक वेळ लागतो. दारू आणि सिगारेट ताबडतोब बंद करा. त्याने झालेली हानी १०००० पावले चालून कमी होणार नाही.
१०००० पावले चालून तुमचा व्यायाम आणि फिटनेस वाढेल. पण दारूने खराब झालेलं यकृत( लिव्हर) कसा सुधारेल आणि सिगारेट फुंकून झालेला फुप्फुसाचा कर्करोग (किंवा फुप्फुसाची हानी) कसा बरा होईल.
उगाच मनाचे खोटे समाधान करणे सोडून द्या त्याच बरोबर सिगारेट आणि दारू हि आजच आणि आत्ताच सोडून द्या.
सुरुवातीला तुम्ही सिगरेटचा धूर करता नंतर ती तुमचा धूर करते.
सिगरेट आणि दारूचा सर्वात जास्त फायदा ती निर्माण करणार्यांना आणि विकणार्यांना होत असतो ती पिणार्यांना कधीच नाही हे आयुष्यभर लक्षात ठेवा.
8 Nov 2016 - 10:31 pm | निओ१
तुम्हा दोघांचे हे मत पटले आहे. थोडा वैचारिक गोन्धळ आहे तो आफ्टर ईफेट्चा. तो कोणी जर क्लियर केला तर नक्कीच मला मदत होईल.
8 Nov 2016 - 7:26 pm | सप्तरंगी
१०००० पावले चालतोय यावर मनाचे समाधान करून घेऊ नका, व्यसने जेवढी लवकर लागतात तितकी ती शरीराची मनाची हानी करतात, लवकरात लवकर सगळी स्वतःहून व्यसने बंद करा अथवा मुक्तांगण गाठा. शुभेच्छा !!
8 Nov 2016 - 7:52 pm | Ram ram
निओ भाऊ प्राणी व्यसन करतात का?मग आपणही त्यांच्याकडून हे शिकायला पाहीजे , मी 96 पासून व्यसनमुक्त आहे.
8 Nov 2016 - 11:11 pm | वरुण मोहिते
पण पहिले सिगरेट बंद करा ...30 दिवसाला म्हणजे काही प्रमाण नाही पिण्याचं...अजून एक सांगतो ज्या दिवशी ठरवलं ड्रिंक नको असं तेव्हा आदल्या दिवशी अमूल कूल किंवा ताक किंवा ज्युस पण खूप थंड गार आणून ठेवा. तुम्हाला आवडेल ते पहिले 3 दिवस खूप अस्वस्थ वाटेल झोपून राहा किंवा उत्साह नाही असं वाटेल पण सारखं काही थंड पीत राहा . त्यात पण बाहेर येतंय कि काय असं वाटेल पण घाबरू नका तुम्ही जेव्हा वाटेल तेव्हा पीत राहा थंड काहीपण . 7 दिवसात बरं वाटेल. बाकी मनाचा निर्णय शेवटचा निर्णय
12 Jan 2017 - 2:51 am | निओ१
खुप खुप आभारी आहे. मला या सल्ल्याची मदत झाली आहे. स्मोकिग बंद केले आहे व ड्रिंक देखील. आधी काही दिवस त्रासदायक होते. त्रास झाला पण आता काहीच वाटत नाही आहे. पण अजून कधी कधी ट्राय करावा असे येते, पण कंत्रोल करणे सुरु आहे. २-३ महिने लागले पण आता शक्यतो सवय सुटली आहे फक्त एक ईश्यु झाला आहे पोट वाढत आहे पण ते परवडले म्हणावे :) घरचे आनंदी आहेत अजून काय हवे ?
9 Nov 2016 - 12:35 am | संदीप डांगे
कोणतंही व्यसन एका क्षणात सुटतं,
9 Nov 2016 - 9:12 am | नाखु
मिपाच व्यसन सोडण्यासाठी काय करावे ब्रे?
फक्त मिपा व्यसनी नाखु
9 Nov 2016 - 9:42 am | संदीप डांगे
एक सेकंद लागतो, आणि मनाचा निग्रह. स्वानुभवावरून... (ते आपलं फस्टह्यांड एक्सपिरियन्स)
=))
9 Nov 2016 - 12:18 pm | यशोधरा
डू आयडी पण घ्यायचा नाही हां!
9 Nov 2016 - 12:52 pm | संदीप डांगे
बरोबर.
11 Nov 2016 - 3:44 pm | चौकटराजा
दर दिवशी तुमच्या बंगल्यापासून आमच्या " हिरवे महाला" पर्यंत चालत या. १०००० पावले अंदाजे. गप्पा मारा म्हणजे मिपाचे व्यसन सुटेल. वात्रट पणा चावटपणा, फोटोशॉप पिच्चर, विनोद, पुलं नय्यर कुमार गंधर्व आपल्याकडं माल खच्चून आहे. काही दिवसानी पोरं तुम्हाला ओळखणार नाहीत हाच एक तोटा !
आपला गाववाला......
10 Nov 2016 - 9:18 pm | महामाया
माझा अनुभव असा आहे...
रात्रीच्या जेवणानंतर पायी चालण्या मुळे पंधरा दिवसांत बेल्ट वापरावा लागला...दुपारी जेवणाला सुट्टी. भात एकदम बंद केला होता
मला कामानिमित्त जयपुर ला जावं लागलं...दोन महीने तिथे मुक्काम होता.
टोंक फाटका जवळ हॉटल होतं...तिथून दीड ते दोन किलोमीटर वर आफिस होतं...हॉटेल मधे सामान सोडून पहिल्या दिवशी ऑटो नी आफिस ला गेलो...परततांना पायी आलो...
हॉटेलवालाल्या सांगितलं पहाटे साडे पाचला चहा हवा...बाकी काही नको...
चहा, नंतर फ्रेश होणं, तिथेच पेपर वाचणं...साडे आठ पर्यंत हैंडबैग घेऊन खाली...शेजारच्या हॉटलात एक कचौरी, आिण जिलबी...हा नाश्ता...तिथून पायीच आफिस गाठायचं...इतक्या सकाळी कुणीच येत नसे...सगळे आल्यावर चहा यायचा...दुपारी दोन वाजता आफिसच्या कैंटीन मधे एक प्लेट जे गरम असेल ते...
संध्याकाळी 4 ला पुन्हां चहा...
रात्री साधारण आठच्या सुमारास सुटी व्हायची...सुरवातीला काही दिवस टोंक फाटक जवळ असलेल्या हाॅटेलात जेवलो...समग्र जेवण...
एका आठवडयात लक्षात आलं की यार मी एकटा इतका खर्च परवडेल का खिशातूनच तर जातील ना...काही उरले तर कामी येतील...
मग काय विचारता...दहाव्या दिवसापासून आफिसच्या समाेर असलेल्या टपरीवजा हॉटेलात जेवायला सुरवात केली...
टेबलावर थाळी...वरण-भाजी आणि चुलीवरुन थेट थाळीत पडणाारी गरम-गरम पोळी...
छे...भाताची गरजच उरली नाही....पोटभरुन पोळया खाल्यावर तिथून हॉटेलपर्यंत पायी रपेट...मधेच एक रेलवे स्टेशन होतं...त्याच्या प्लेटफार्म वरुन चालत-चालत हाॅटेल गाठायचं...
शरीर इतकं थकून गेलेलं असायचं की पडताक्षणी झोप लागे...
इतकं पुराण या साठी सांगितलं की नुसत्या पोळया खाणं आणि नंतर पायी चालणं...या क्रियेनं इतका फरक पडला की पुढच्या पंधरा दिवसानंतर मला बेल्ट ध्यावा लागला...
त्या आधी मी बेल्ट वापरत नव्हतो...
11 Nov 2016 - 2:12 pm | अप्पा जोगळेकर
हायला हे सगळे वजन कमीवाले लोक भाताच्या नावे का शंख करतात कोणास ठाऊक. ते अर्ध्या भारताचे स्टेपल फूड आहे.
भाताचे व्यसन कसे सोडावे या विचारात आहे.
11 Nov 2016 - 3:46 pm | चौकटराजा
ते तुम्ही भाते ना विचारा..
11 Nov 2016 - 12:26 pm | भम्पक
दिवसाला ३६० ml , तरीच म्हणलं निओ साहेबांची सुरुवातीची मराठी अशी का डिंगडोंग होती.....
निओ साहेब हलकं घ्या अन व्यसनं सोडा.....
11 Nov 2016 - 7:46 pm | खटपट्या
माझा अनुभव.
हाफीस घरापासून २ कीलोमीटरवर आहे. घर ते हाफीस जोरात चालत जातो. जेवणाची सुट्टी एक तासाची आहे. जेउन झाल्यावर अर्धातास हळू चालतो. परत हाफीस सुटल्यावर घरी जोरात चालत जातो.
घरी गेल्यावर थोडा आराम करुन जीममधे जातो ट्रेडमीलवर २० मीनीटे जोरात चालतो. १० डीप्स चे चार सेट रोज.
आठवड्यातून दोनदा १० बेंचप्रेसचे ४ सेट.
आठवड्यातून दोनदा बायसेप्सचे वीवीध व्यायाम, ट्रायसेप्सचे वीवीध व्यायाम
आठवड्यातून एकदा पायांचा व्यायाम
शुक्रवार, शनिवार आणि रविवार जोरात चालणे एक तास.
माझा उद्देश पोट कमी करणे हे होते. जीम इन्स्ट्रक्टर म्हणाला की नुसते पोट कमी करता येत नाही. संपूर्ण चरबी कमी करावी लागेल. वरील व्यायाम चार महीने चालू आहे. पँट लूज झाली, वजन थोडे कमी झाले. शरीर शेपमधे आल्यावर आत्मविश्वास खूपच वाढला. ज्यांनी मला वर्षाने पाहीले त्यांना मेकओवर झल्यासारखे वाटले.
जेवणात भात बंद. सकाळी एक मोठा कप दूध, दोन स्लाइस गरम करुन कींवा तीन अंडी उकडून. दुपारी तीन पोळ्या आणि भाजी. संध्याकाळी तीन पोळ्या भाजी. मधे भूक लागली तर एक अवॅकाडो/सफरचंद/केळं/द्राक्ष खातो.
मी घरी चहा पीत नाही. पाहूण्यांकडे गेल्यास पीतो. वेगळी साखर खात नाही. गोड खात नाही. कट्टा/पार्टी असल्यास हातचे राखून खातो.
11 Nov 2016 - 7:53 pm | यशोधरा
अवॅकाडो/केळं/द्राक्ष मध्ये कॅलरीज असतात ना?
11 Nov 2016 - 8:41 pm | खटपट्या
हो खूप भूक लागली तरच खातोय. तसेही वजन कमी करणे हा माझा हेतू नसून शरीर शेपमधे आणणे हे आहे. बघूया कसे जमतेय ते. हा सुरवातीचा फेज आहे. त्यामुळे थोडे थोडे विचारुन माहीती घेउन करतोय. पण रीजल्ट खूप हुरुप देणारे आहेत.