डी फॉर डान्सबार

वरुण मोहिते's picture
वरुण मोहिते in जनातलं, मनातलं
5 Nov 2016 - 11:03 pm

सुन रहा है ना तु रो राहा हू मै...
क्या बात है ..आत गेलो आम्ही डान्सबार हा प्रकार काही नवीन नव्हता पण काही घटना त्या वेळी घडून जातात आपल्या हातात नसतं.
वास्तविक माझे बाहेरच्या राज्यातून मित्र आले तरी त्यांना घेऊन जाणं व्हायचं. परदेशात असताना हि जाणं व्हायचं. त्यात काहीच नवीन नाही. पण कधीतरी होतं. चालायचं
मुंबई मध्ये तीन प्रकार चे डान्सबार आहेत. एक काहीही करून देणारे दुसरे मोठी गाणी आणि रेग्युलर लोकांमध्ये प्रतिमा असते तसे आणि तिसरं महत्वाचं .एलिट क्लास टाईप. पूर्ण प्रकाश . एकदम फॉर्मल वातावरण .तर सांगायची गोष्ट अशी एके दिवशी गेलो आम्ही . नेहमी जायचो पण काही वेळा काळ वेळ जुळून यावी लागते. गाणं चालू होतं एका रूपसुंदरी ने आमच्याकडे नजर दिली मी पण दिली मग नजरांचा खेळ नेहमीप्रमाणे का कुणास ठाऊक मी पण अडकत गेलो .लक्षात घ्या पैसे देऊन काहीपण करता येईल असे हे बार नसतात सहज बसलो टाइम पास केला निघालो परत दोन दिवसांनी जाव तिला पाहाव असा वाटलं. गेलो परत . कुठून कुठून आणलेल्या मुली पण त्यांना कला असायची कसा जाळ्यात अडकवायचं. मी दर वेळी कित्येक वर्षांपासून नोटीस करत आहे कसं शिकतात ह्या मुली . असो मी परत तिला पाहायला गेलो . दुसऱ्यांदा आपण पैसे दिल्याशिवाय ती काही बोलणार नाही कळलं. त्या दिवशी काही पैसे दिले नाहीत निघालो . परत गेलो १५-२० हजार घेऊन उडवले .चालायचं
हे काय मला नवीन नव्हतं. सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, युके मध्ये मोठे मोठे लोक गळ्यात पैशांच्या माळा घालतात मुलींच्या (डोळ्यांनी पाहिलंय हो ) (मुंबईच्या कथा तर अजून वेगळ्या त्या पुढे येतीलच )
तर माझ रुटीन झालं मुंबईत असताना . आठवड्यातून २-३ वेळा जायचं. जायचं तर कमीत कमी २० हजार उडवायला हवेत. आत गेलो कि एन्ट्री ला माझा गाणं लागणार असेच ३ महिने गेले असतील एव्हाना ४-५ लाख रुपये गेले होते . तेव्हा आम्हाला ती भेटली .
डिस्क्लेमर (१ अजून कहाणी बाकी आहे)
(२ माझ्याकडे पैसे होते म्हणून काही फरक पडला नाही पण लोकं ह्या मुले उध्वस्त होतात म्हणून लिहितोय )

वावरप्रकटन

प्रतिक्रिया

मराठी कथालेखक's picture

5 Nov 2016 - 11:10 pm | मराठी कथालेखक

थोडं विस्ताराने येवू द्या. पहिला आणि तिसरा टाईप नीट स्पष्ट झाला नाही.

हम्म! तुम्ही काय काय केलंय हो! असो. वाचतोय. पुभाप्र.