पहिल्यान्दाच काय्तरी लिहीतोय, म्हनाव तस लिहीता येत नाहीये, जमून घ्या तेवढ.....
तस पाहील तर हे घडुन तीन एक वर्ष झाली. पण आजबी दोन तीन दिवस झाले की सगळ समोर येत. कदाचीत याला कारण आजुबाजु ला घड्नार्या घटना असतील. आपली एक छोटी मदत एखाद्याला किती महत्वाची ठरु शकते ते मला त्या दिवशी कळाले.
झाल अस की, माझा दिड वर्षाचा मुलगा पुण्यात एका मोठ्या हॉस्पिटलात अॅडंमिट होता. आय.सी. यु. ला असल्या मुळ तिथ बसुन देत नसत. म्हनुन मी बाहेर २/४ बाकडे होते तिथे येउन बसायचो, तिथे बरेच पेपर आणी मासिक ठेवलेले असायचे त्यामुळ तिथ जाउन कायतरी वाचत बसायच हा माझा कार्यक्रम ठरला होता. हॉस्पिटल बरच मोठ होत. मला तिथ ८ दिवस झाल्यामुळ बर्यापैकी चेहरे वळखी चे झाले होते. एक दिवस असच बाहेर बाकड्या वर बसलो होतो. पेपर चाळुन झाला होता मग हिकड-तिकड बघत बसलो. आज म्हनाव तशी गर्दी न्हवती, सामसुमच होती.
२ बाकडे सोडुन एक म्हतारी बसली होती. नववारी लुगड, डोक्यावर पदर, सुरकुतलेला चेहरा, एकदम गावा कडच्या आजीगत. ७० एक वय असाव असा मी अन्दाज बान्धला. मला आजही अस गावाकडच कोण दिसल की त्याच्या विषयी अप्रुप वाटत. का ते माहीत नाही. ट्रेक च्या निमितानी ह्या गावी त्या गावी जात असतो तेव्हा पण एखाद्या पारावर बसलेल्या म्हतार्या बरोबर जुन्या विषयावर गप्पा मारत वेळ कुठ जातो कळत नाय. बर वाटत जुन्या लोकान्शी गप्पा मारायला.
हिकड, म्हतारी ची एकसारखी कायतरी गड्बड चाल्ली होती ते माझा ध्यानात आल. काय तरी शोधत होती म्हतारी अस वाट्ल. तिच्या बाजुलाच एक दरवाजा होता. म्हातारी सारखी त्या दरवजा च्या आत जायची आन बाहेर यायची. २/४ वेळा तिच हेच चाल्ल होत. मला वाट्ल एखान्दा पेश्ण्ट असल त्यान्चा, त्याला जास्ती झाल असल. कारन जरा घाबरल्यागत च वाटत होती म्हतारी. तिच्या जवळ दुसर कोन दिसत बी न्हवत. म्हतारी ची घालमेल वाढाय लागली होती. आनी ही सगळी गडबड बघुन माझ बी लक्ष सारख तिकड जायला लागल. तिची ही गड्बड चालु असतानाच दोन बायका तिथ आल्या. म्हतारी ताडकन उठुन् त्यान्च्या पशी गेली. मी बघीतल त्या बायका कायतरी गप्पा मारत होत्या आनी सारख एकमेकाना टाळया द्युन हसत होत्या. बायका चान्ग्ल्या घरातल्या वाटत होत्या. एकदम जीन्स बिन्स घातलेल्या. मॉडर्न आनी सोफेश्टीकेटेड का काय म्हन्त्यात ते. म्हतारी त्यान्च्या मधी गेली ,त्या बायका गड्बडल्या आनि म्हतारी पन घाई घाईत त्याना काय तरी सान्गु लागली. तशा त्या बायका काढ्ता पाय घेउ लागल्या. लगीच म्हातरी ने त्यातल्या एका बाई चा हाथ पकडला आनि त्या दरवाजा कडे हाथ दाखवु लागली. त्या बाई ने पन म्हतारी चा हाथ लगी झटकला. म्हातारी सारख त्यान्च लक्ष त्या दारा कड नेत होती. माझा आनि त्यान्च्यात अन्तर थोड जास्ती असल्यामुळ मला काय ऐकू येत न्हव्त. पन एवढ कळत होत की त्या बायका म्हतारी ला टाळ्त होत्या. म्हतारी बिचारी मेटाकुटी ला येउन काही तरी सान्गत होती आन त्या दाराकड बघत होती. शेवटी त्या बायका तिथुन तोन्ड फिरवुन तरातरा निघाल्या तस म्हतारी च तोन्ड बारिक झाल. मी हे सगळ मगा पसुन बघत होतो म्हनुन मला त्या म्हतारी च वाईट वाटाय लागल. आता मलाबी राह्वाना. मी लगी उठुन म्हतारीपशी गेलो. आनि इचारल '' का ओ आज्जी काय झाल? तशी म्हतारी सान्गाय लाग्ली. '' आरे बाबा काय सान्गु आता, माझा पोटात कवा पासुन कस तरी होतय, मला तिकड आत जायचय'' आनि ती परत त्या दारा कड हाथ दाखवु लागली.
'' ते आतल मला कायबी कळाना तु बघ कि जरा, तिथ बसायच भांड बी नाहिय'' तस मी तिकड बघीतल तर ते टॉयलेट होत आनि आत जाउन निट बघीतल तर आत मधी कमोड होत. आता माझी टुब पेट्ली म्हतारी अशी का करत व्हती.
'' हिथ पानी कुठुन घ्याव, कुठ बसाव काय बी कळाना, आमची मानस बी नाय हिथ सान्गायला, पोरा मला तिवढी मदत कर की बाबा, मला राहवना आता'' म्हतारी ची हालत बघवना मला.
मी बोल्लो,'' आहो आज्जी कायला घाबरताय त्यात काय बी नसतय, चला मी दावतो, काय बी काळ्जी करु नका'' म्हनत मी म्हतारी ची भिती घालवाय्चा प्रयत्न केला आनि तिला आत घेउन गेलो,
पान्याचा शॉवर म्हतारी ला दाखवत बोल्लो "हे बघा हिथुन पानि येत, ही दान्डी दाबा फक्त' आनि कमोड वर बसत बोल्लो '' आनि हिथ बसा अस, काय नाय होत, आन नाहिच जमल तर घरी कस बसता तस बसा पाय वरती घेउन, तिथ त्यो कागद बी हाये'' म्हनत त्यान्ना टॉयलेट पेपर दाखवला, म्हतारी सगळ शान्त ऐकत आनि बघत होती. '' काय घाबरु बिबरु नका, काय नाय होत, जरा नविन असल्यामुळ ईचीत्र हाय फक्त, जमल ना?'' म्हनत मी बाहेर येउ लागलो. म्हतारी म्हनली'' बघते बाबा जमतय का'' मी पन तिला धीर देत म्हनलो ''जमल जमल, काळ्जी करु नका, मी हाय बाह्रेर''
मी बाहेर आलो आनी बसलो. हिकड तिकड बघु लागलो कुनी बाई मानुस दिसतय का, म्हन्जे समजा म्हातारी ला मदत लाग्ली तर, शेवटी मी तरी किती मदत करनार, बाईमानुस ला बाईमानुस च बर मदतीला, मग आठवल, मगासच्या त्या मॉडर्न कम सोफेश्टीकेटेड पन बाईमानुस च होत कि, २ मिनीट त्या बायकान्चा राग च आला. थोडा वेळ गेला आनी मी विचार करु लाग्लो, म्हातारी ला जमल का?, भावने च्या भरात मी बोलुन गेलो कि कमोड वर पाय वरती घेउन बसा म्हनुन, पन उग पडायची बिडायची नायतर त्यामुळ, म्हनुन मला गिलटी का काय तस वाटाय लागल होत, तिथ कोन दिसाना बी मदतीला,नन्तर मीच ठरवल , काय का होईना, वेळ, पडली तर मी करन सगळ. मी बी ईरेला पेट्ल्यागत झालो ह्याला कारन त्या दोन बायकान्चा आलेला राग बी असल बहुतेक. मनात विचार आला, आईला एव्ढ कुठ असत का राव, ति म्हतारी बिचारी एवढी रड्कुन्डीला येउन त्या बायकान्ना गयावया करत होती आन त्या बाया.........
तेव्ढ्यात म्हतारी बाहेर आली, '' जमल बाबा'' म्हनत तिनी मोकळा श्वास टाकला आनि माझा कड बघुन हसली.
मला बी जरा बर वाटल, मोकळी झालेली म्हतारी बोलु लागली '' आरे बाबा आम्च्या बन्ग्ल्यात बी असच भान्ड हाये, मला नाय जमत तेवर, मन्ग माझा पोरानी ते बदलुन टाकल, '' बन्गला शब्द आइक्ल्यावर मी विचारल , '' आज्जी कुठल्या तुम्ही, '' आम्ही भुगाव चे आजी बोल्ली, आज्जी आम्च्याच मुळशी भागातल्या चान्गल्या वजनदार घरातल्या होत्या हे जरा चवकशी केल्यावर मला कळाल. '' माझी भन हीथ आड्मीट हाय तिला भेटायला आल्ती. आमची मानस खाली चा प्याय्ला गेली, आन मला पोटात कळ आली, तिथ आत जाउन बघती तर तेच भान्ड, म्हनुन बाहेर कुनी हाय का मदत करायला बघत होती, २ बाया आल्या बी होत्या पन तोन्ड वाकड करुन गेल्या. बर बाबा तु आला धावुन नाही तर माझ काय खर न्हवत'' आज्जी ने तिच मन मोकळ केल. तेवध्यात त्यान्ची मानस आली, आज्जी तिकड जाय्ला निघाली, परत माग वळुन आली आनी मला म्हनाली,'' बाळा ह्या असल्या अवघडलेल्या टायमाला बी तु माग पुढ नाय पाहील, असाच एकमेकान्ची मदत केली तर दुनिया हाय बाबा, नाय तर आपल्यात आन जनावरात काय फरक राहिला'' एवढ बोलुन आज्जी तिच्या मानसान सोबत गेली.
तसा मी पन आम्च्या वार्डात गेलो. पन माझा डोक्यातुन काहि केल्या घडलेल जाइना. आन मला एक सारख्या त्या दोन बायका डोळ्या समोर येउ लागल्या. म्हनल, एव्ढा कसला माज आलाय मानसाला कि दुसर्याला आपन येवढ कमी लेखतो. पैशाचा माज की शिक्षनाचा? का, कातर ति म्हतारी जरा अडानी आन गावन्ढळ होती म्हनुन. पैशाच म्हनसाल तर, म्हतारी नी उभ्या उभ्या, हाय त्या कपड्या सकट त्या बायाना इकत घेतल असत एव्ढ्या मोठ्या घरातली ति होती. जरा इचित्र अवस्थेत सापड्ल्या मुळ बीचारी मेटाकुटी ला आली होती एव्ढच. आन शिक्षनाच म्हनसाल तर, भले ति कमी शिकली असल किन्वा नसल बी शिकली, पन जाता जाता मला लाख मोलाचि शिकवन देउन गेली. अस जर असल तर त्या शिकलेल्या बाया तरी काय कामच्या हायेत. अस्ल्याना शिकलेले अडानी का म्हनु नय अस वाटाय लागल. तुम्हाला एखाद्याची मदत करायची नसल तर नका करु, प्रत्येकाचा तो वय्यक्तिक विषय आहे हे मला बी कळ्तय पन दुसर्याला अस हाड्तुड तरी करु नका. कदाचित मी करत असलेला इचार चुकीचा बी असल आन तो चुकिचा असल तर चान्गलच हाय. माणुसकी खरच एव्ढी म्हाग झाली हाये का, की ती कुनाला परवडाना झालीये.
हे घडुन एव्ढे दिवस झाली पन म्हतारी चे शब्द आज पन आठवतात "एकमेकान्ची मदत केली तर दुनिया हाय बाबा, नाय तर आपल्यात आन जनावरात काय फरक राहिला'' आनी जेव्हा अशी जनावर आजुबाजुला बघ्तो तेव्हा अजुन त्रास होतो. त्यामुळच माझा डोक्यातुन हे जात नसाव.
प्रतिक्रिया
3 Nov 2016 - 11:05 pm | एस
अंतर्मुख करणारा अनुभव आहे. लिखाण आवडलं.
4 Nov 2016 - 7:17 am | यशोधरा
हेच म्ह्णते.
4 Nov 2016 - 11:18 am | तुषार काळभोर
+२
8 Nov 2016 - 1:54 pm | शलभ
+३
4 Nov 2016 - 11:43 am | एकनाथ जाधव
+३
8 Nov 2016 - 2:04 pm | नाखु
एकदम टोकदार....
शिक्षण माणसाला साक्षर बनवते सुशिक्षीत नाही.
8 Nov 2016 - 2:28 pm | पाटीलभाऊ
+१
8 Nov 2016 - 11:04 pm | विखि
सगळ्यान्चे धन्यवाद
9 Nov 2016 - 7:28 pm | ज्योति अळवणी
आत कुठेतरी काहीतरी टोचल. छान लिहिलं आहे. मन जाग असं किती आवश्यक आहे या commercial जगात
9 Nov 2016 - 7:45 pm | टुकुल
छान अनुभव आणी विचार.