मी आज केलेला व्यायाम...!!

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
2 Nov 2016 - 5:16 pm

.

नमस्कार,

गेली दोन वर्षे मी जमेल तसे सायकलवर भटकत आहे आणि शक्य त्या राईडचे लेख लिहीत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचून किंवा आपल्या मित्रांच्या संगतीने अनेक लोकांना सायकल चालवावीशी वाटली आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक उत्साहाने आणि नियमीतपणे सायकल चालवत आहेत. मला व्यनीमधून अनेकांनी सायकलबाबत प्रश्न विचारले आणि तेथेही पुढील प्रगती कळवत आहेत.

व्यायामाचे फायदे येथे कोणाला समजावून सांगावेत अशी परिस्थिती नक्कीच नाही. तसेच आपल्या सर्वांच्या व्यस्त दिनक्रमामुळे अनेकदा इच्छा असूनही व्यायाम होत नाही हे ही तितकेच खरे आहे. मग आपण या धाग्यावर "आज केलेला व्यायाम" नोंदवत राहूया.

व्यायाम करणे आवश्यक आहे मग तो कोणत्याही प्रकारे करा.
सायकल चालवा, सकाळी फिरायला जा, पळा, सूर्यनमस्कार घाला, योगासने करा, जिम मध्ये घाम गाळा पण नियमीतपणे काहीतरी करा आणि येथे नक्की नोंदवा.

आपल्यामुळे आणखी बरेच लोक प्रोत्साहन घेतील आणि व्यायामाला नक्की सुरूवात करतील.

मग... आज किती व्यायाम केला..?

**************************************************************

काही डिस्क्लेमर्स.

१) या धाग्याचा उद्देश "जास्तीतजास्त लोकांनी व्यायाम करावा" इतकाच आहे.

२) आपल्या व्यायामाच्या अनुषंगाने अनेकांना अनेक शंका असू शकतात त्या येथे बिन्धास्त विचारा. मिपाकर भरपूर उत्साही आहेत आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारात निष्णात आहेत. माझीही शँपेन (उर्फ चंपाग्ने) हाफ / फुल मॅरेथॉन पळतो, वेल्लाभट नियमीतपणे जिम करतो, शैलेंद्र, प्रशांत मालक, डॉ श्रीहास, आनंदराव, (शेफ) केडी असे अनेक मुरलेले सायकलिस्ट लोक आहेत. डॉक्टर खरे आणि एक्काकाका वैद्यकीय सल्ले देतातच. अशा अनेक अनुभवी लोकांना आपले पेटारे उघडण्यासाठी उद्युक्त करूया.

३) ही कोणतीही स्पर्धा नाहीये त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहून येथे नोंदी करा. फायदा तुम्हालाच मिळणार आहे. :)

**************************************************************

टीप - येथे अवांतर पोस्ट शक्यतो टाळाव्यात. बाकी संपादक मंडळ व चालक-मालक समर्थ आहेतच. :)

क्रीडाविचारअनुभव

प्रतिक्रिया

अमर विश्वास's picture

10 Nov 2016 - 3:35 pm | अमर विश्वास

आजचा व्यायाम :
आज लेग्स डे ..
क्रॉस जॉगर : ३० मिनिटे

लेग प्रेस , लेग एक्सटेंशन , लेग कर्ल & काफ : ३ सेट

squatts & lunges : ३ सेट्स

स्ट्रेचिंग

मोहनराव's picture

10 Nov 2016 - 3:35 pm | मोहनराव

धागा चांगला चालु आहे. मीही थोडाफार व्यायाम चालु केला आहे
जरा अ‍ॅपविषयी व फिटनेस बँड विषयी कोणीतरी चांगले मार्गदर्शन केले तर बरे होईल!!

फिटनेस ट्रॅकर / बँड्स बद्दल थोडेसे :

नुकताच आमच्या ऑफिसमध्ये घडलेला किस्सा : आमचा एक अॅपल प्रेमी मित्र आपले नवे अॅपल वॉच दाखवत म्हणाला .. बघ मी रोज १०००० स्टेप्स चालतो !!!
(खर तर हे वाक्य "मी रोज "अॅपल वॉच" हातात घालून १०००० स्टेप्स चालतो" असा वाचावं )..

त्याच्याकडे (वॉचसकट ) दुर्लक्ष करून माझा प्रतिप्रश्न : ते ठीक आहे पण व्यायाम काय करतोस?
माझ्या या प्रश्नावर विचित्र चेहरा करून तो निघून गेला... दोन दिवस जरा चिडचिड करून परत ओ के झाला..

हे सर्व फिटेनास बँड्स हे मोशन सेन्सोर्स वापरतात. तसेच आऊटडोअर साठी GPS. त्यामुळे त्यांचा उपयोग स्टेप्स मोजणे , हार्ट रेट मॉनिटर करणे यासाठी चांगला उपयोग होतो. पण ते रेसिस्टन्स मोजू नाहीत. म्हणजेच हात वर खाली करणे आणि वजन घेऊन हात वर खाली करणे हे सारखेच ... याच कारणाने त्यांचा कॅलरी बर्न मोजायलाही फारसा उपयोग नाही.

हे बँड्स बाहेर (आऊटडोअर) धावणे किंवा सायकलिंग यासाठी उपयुक्त आहेत. अंतर मोजणे, ऍव्हरेज स्पीड हे बरेचसे बरोबर असते. अर्थात GPS कव्हरेज असेल तर. पण ह्या गोष्टी स्मार्ट फोन आणि MapMyRun सारखे अँप यांनी सुद्धा साध्य होतात.

पण इनडोअर / जिम मध्ये व्यायाम करणार असाल तर यांचा फारसा उपयोग नाही.

त्यामुळे असे बँड्स घेण्यापूर्वी विचार करा.. याबद्दल अजून खूप काही सांगता येईल ... पण इथेच थांबतो..

इंटरनेटवर वाचनात आलेले एक वाक्य :

These bands are like Gym membership. They look shining & attractive when new.. but many times, remain unused to its potential.

पाटीलभाऊ's picture

10 Nov 2016 - 6:31 pm | पाटीलभाऊ

नक्कीच...या बँड्सवर दहा-बारा हजार रुपये खर्च करणे पटत नाही.
मोबाईल अँप वापरूनहि अंतर, वेळ वगैरे मोजता येत.

मोहनराव's picture

10 Nov 2016 - 7:00 pm | मोहनराव

मोलाची माहीती. याबद्दल जरा साशंक होतोच मी!!

प्रशांत's picture

10 Nov 2016 - 7:27 pm | प्रशांत

आज ५ किमि चाललो

एस हेल्थ नावाचे एप्लीकेशन आहे. मोफत आहे. बर्‍यापैकी चालणे मोजता येते. मी वापरतोय.

अन्नू's picture

11 Nov 2016 - 12:02 am | अन्नू

आमच्या पोटाचं सिक्स पॅक कधी होणार कोण जाणे! निस्तीच स्वप्न पडत्यात मेली! :(

सपे-पुणे-३०'s picture

11 Nov 2016 - 11:52 am | सपे-पुणे-३०

महिनाभर खंड पडलेला व्यायाम आजपासून सुरु केला. मी HIIT करते. दर दिवशी शक्यतो ४५ मिनिटे आणि आठवड्याचे ५ दिवस असे शेड्युल आहे. साधारणतः दर ३ आठवड्यांनी वर्कआऊट बदलते. यासाठी 'वर्कआऊट प्रो' नावाचे ऍप डाऊनलोड केले आहे. शक्यतो कोणतेही मशीन वापरत नाही.
मुख्य म्हणजे 'वेटलॉस' पेक्षा 'स्टॅमिना' हे लक्ष्य ठेवले आहे.

स्थितप्रज्ञ's picture

12 Nov 2016 - 1:45 pm | स्थितप्रज्ञ

व्यायाम परत सुरु केल्याबद्दल अभिनंदन!
HIIT मध्ये नक्की काय करता? याचा (HIIT) नक्की काय फायदा होतो?

डॉ श्रीहास's picture

11 Nov 2016 - 12:01 pm | डॉ श्रीहास

सायकलींग ६४.५ किमी,२४किमी/तास,२:४१तास,२५०३ उष्मांक...... आणि सर्वात महत्वाचं नवा मित्र गवसला !!! ( सायकलींग चा सर्वात मोठा फायदा):)

वेल्लाभट's picture

11 Nov 2016 - 1:05 pm | वेल्लाभट

पण उद्या जोमाने व्यायाम करणार

देशपांडेमामा's picture

11 Nov 2016 - 1:06 pm | देशपांडेमामा

आज जिममध्ये फुल लेग्ज वर्कआउट

देश

अमर विश्वास's picture

11 Nov 2016 - 3:44 pm | अमर विश्वास

आजचा व्यायाम
५ किमी धावणे (ट्रेडमिल)

अप्पर बॉडी सर्किट ट्रैनिंग

स्ट्रेचिंग

अरिंजय's picture

11 Nov 2016 - 8:44 pm | अरिंजय

३९ किमी हायवेवर मारल्यामुळे स्पिड चांगली मिळाली.

अरिंजय's picture

11 Nov 2016 - 10:19 pm | अरिंजय

"मी आज केलेला व्यायाम" असे वाचावे

डॉ श्रीहास's picture

12 Nov 2016 - 9:21 am | डॉ श्रीहास

आजची सुट्टी उद्या राईड मारेन मोठी...

स्थितप्रज्ञ's picture

12 Nov 2016 - 1:43 pm | स्थितप्रज्ञ

अंतर: २० किमी
वेग: २० किमी प्रति तास
जळालेले उष्मांक: ७००
आजचा अनुभव: फीलिंग फ्रेश दॅन युज्वल

अंजनेय's picture

12 Nov 2016 - 4:23 pm | अंजनेय

NA

पूर्ण आठवड्यात रोज किमान 16.9 किमी सायकलिंग झाले

आठवड्याचा आलेख समतल ठेवण्यात यशस्वी

मोदक's picture

13 Nov 2016 - 12:16 am | मोदक

आजचे सायकलिंग - 62 किमी

डॉ श्रीहास's picture

13 Nov 2016 - 2:23 pm | डॉ श्रीहास

आज ५०.४६ किमी सायकलींग झालं.... ह्या आठवड्यात २८६ किमी टोटल सायकलींग !!

देशपांडेमामा's picture

13 Nov 2016 - 3:08 pm | देशपांडेमामा

मिळुन अंदाजे 120 किमी सायकलींग झाले !

देश

डॉ श्रीहास's picture

14 Nov 2016 - 9:39 am | डॉ श्रीहास

२३.७३ किमी , १.०५ तास , २१.५ किमी/तास ,८८३ कॅलरीज् .... आजचं सायकलींग :))

अंजनेय's picture

14 Nov 2016 - 10:22 am | अंजनेय

NA

मागचा आठवडा 1 हि दिवस हुकवला नाही

एकूण 126 किमी झाले

अंजनेय's picture

14 Nov 2016 - 10:22 am | अंजनेय

NA

मागचा आठवडा 1 हि दिवस हुकवला नाही

एकूण 126 किमी झाले

बाळ सप्रे's picture

14 Nov 2016 - 10:44 am | बाळ सप्रे

धोंडो भिकाजी जोशी (डी बी अंकल) फ्रेंड्स ओन बॅडमिंटन क्लबचे चेअरमन झाले तेव्हा त्यांना जसं वाटलं तसं वाटतय..
काल झालेल्या 'पुणे अल्ट्रामॅरॅथॉन'मधे ध्यानीमनी नसताना अस्मादीक चक्क जिंकले.
५०किमी ५ तास ३४ मिनिटं

खटपट्या's picture

14 Nov 2016 - 11:25 am | खटपट्या

अभिनंदन सप्रे साहेब

झेन's picture

14 Nov 2016 - 12:13 pm | झेन

अभिनंदन सप्रे सर

मोदक's picture

14 Nov 2016 - 12:15 pm | मोदक

अभिनंदन सप्रे साहेब...!!

.

डॉ श्रीहास's picture

14 Nov 2016 - 4:07 pm | डॉ श्रीहास

मन:पुर्वक अभिनंदन..._/\_

अप्पा जोगळेकर's picture

14 Nov 2016 - 5:35 pm | अप्पा जोगळेकर

नमस्कार घ्या आमचा.
अल्ट्रा मॅरेथॉन १०० + असते असा माझा समज होता.

अप्पा जोगळेकर's picture

14 Nov 2016 - 5:44 pm | अप्पा जोगळेकर

मागच्या वर्षी तुम्ही पावणेसहा तासात पूर्ण केली आणि सातवे होतात असे येथे (https://puneultramarathon.com/results/) कळले.
यावर्षी डायरेक्ट प्रथम म्हणजे जबर आहे.

सूड's picture

14 Nov 2016 - 5:59 pm | सूड

अभिनंदन!!

शलभ's picture

14 Nov 2016 - 9:30 pm | शलभ

एक नंबर. अभिनंदन..

बाळ सप्रे's picture

15 Nov 2016 - 12:19 pm | बाळ सप्रे

सर्वांना धन्यवाद..

फुल मॅरॅथॉनपे़क्षाजास्त अंतर साधारणपणे अल्ट्रा मधे येते.. ५०,७५,१००,१६१ (१०० मैल) वगैरे

पाटीलभाऊ's picture

16 Nov 2016 - 1:36 pm | पाटीलभाऊ

अभिनंदन..लय भारी सप्रे काका...!
एव्हढं कसं धावता हो ? आणि या मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सलग धावावंच लागत कि मध्ये थोड्या वेळ चालू हि शकतो ?

बेकार तरुण's picture

17 Nov 2016 - 5:44 am | बेकार तरुण

अभिनंदन साहेब !!!

स्थितप्रज्ञ's picture

14 Nov 2016 - 11:09 am | स्थितप्रज्ञ

मिपाकर सायक्लीस्ट्स आणि इथला धुमाकूळ बघून प्रेरणा मिळाली आणि आज तडक उठलो आणि हाणली सायकल ४२ किमी.
वेग - अंदाजे साडे एकवीस किमी प्रति तास
एकूण २५६ मि उंची गाठली
साधारण १३०० उष्मांक खर्ची पडले.

आज ३७ किमी सायकलिंग करून हाफिसात पोहोचलो.

१ तास ५० मिनीटे वेळ लागला.

परततानाचे 20 किमी सायकलिंग झाले.

आजचे एकूण सायकलिंग 57 किमी

देशपांडेमामा's picture

14 Nov 2016 - 12:26 pm | देशपांडेमामा

१. ट्रेड मिल ब्रिस्क वॉकिंग - २० मि. (७.५ ते ७.८ च्या वेगाने)
२. दोरीवरच्या उड्या - ४५०
३. क्रॉस ट्रेनर - २० मि.
४. स्ट्रेचिंग - १० मि.

देश

८ नो. पासून पोहायला शिकतोय. एक दिवसाआड धावायचा विचार आहे बरेच दिवस पण अमलात येत नाहीय. तरीही काल १० किमी पुर्ण केलं मास्टेक रन मधे.

८ नो. पासून पोहायला शिकतोय.

अभिनंदन!!

एस's picture

14 Nov 2016 - 10:12 pm | एस

व्यायाम सुरू आहे.

एस's picture

14 Nov 2016 - 10:12 pm | एस

व्यायाम सुरू आहे.

डॉ श्रीहास's picture

15 Nov 2016 - 8:53 am | डॉ श्रीहास

पण When in doubt Pedal it out ! असं म्हणत आळस झटकत उठलो ... २४.२२ किमी , २१.२ किमी/तास वेगानी १.०८ तासात ९५३ कॅलरीज खर्चुन सायकलींग केलं.... आजपासून MTB , Road Bike ला काही दिवस विश्रांती .

आज ३९ किमी सायकलिंग करून हाफिसात पोहोचलो.

अनिरुद्ध.वैद्य's picture

15 Nov 2016 - 5:55 pm | अनिरुद्ध.वैद्य

सायकलनी ४० किमी दुर ऑफिसात! भारीये.
ट्रॅफीक प्रॉब्लेम्स येत नाहीत का?

हाफिस २० च किमी लांब आहे..

मी सायकलच चालवायची म्हणून मुद्दाम पुण्याबाहेर पडून "नवीन कात्रज बोगदा - जुना कात्रज बोगदा - स्वारगेट - हाफिस" असा लांबचा रूट घेतो. ट्रॅफिकचा आजिबात प्रॉब्लेम येत नाही. आपण निवांत रस्त्याच्या बाजूने जात रहायचे.

मोदक's picture

15 Nov 2016 - 10:18 pm | मोदक

हाफिस ते घर 21 किमी.

अनिरुद्ध.वैद्य's picture

16 Nov 2016 - 3:32 pm | अनिरुद्ध.वैद्य

मी विचार केला होता, पण हिंजवडीच ट्रॅफिक बघुन हिंम्मत नाही झाली :)

ऑफिस कोणत्या फेजमध्ये आहे..?

आणि घरापासून वाकड पुलाचे अंतर किती आहे..?

अनिरुद्ध.वैद्य's picture

16 Nov 2016 - 4:33 pm | अनिरुद्ध.वैद्य

क्वॉड्रॉन आयटी पार्क.

वाकड ब्रीज अंतर साधारण १० किमी आहे, पण नंतरचे ८ किमी भयानक गर्दी!

भूमकर चौकातून - मेझ्झा ९ व नंतर नेहमीच्या रस्त्याने पुढे..

असे जाणे जमेल का सायकल ने..?

अनिरुद्ध.वैद्य's picture

16 Nov 2016 - 5:09 pm | अनिरुद्ध.वैद्य

मेझा ९ पर्यंत जरातरी सुटेबल, पण नंतर तीनपदरीचा दोनपदरी रस्ता होत असल्याने मारामारी असते लिटरली. मी मागुन जायचा विचार करतोय, सुस, चांदे अन नंतर हिंजवडी. रस्ता बराय, पण एक २ ३ किलोमीटरचा पॅच खराब आहे. ह्या विकेंडी सायकल दुरुस्त करुन नेक्स्ट वीक सुरुवात करावी असा विचार आहे.

किंवा हायवेनीच सकाळी साडेसात वाजता वगैरे निघुन ट्राय करीन.

बाळ सप्रे's picture

16 Nov 2016 - 5:23 pm | बाळ सप्रे

सूस चांदे नांदे रस्त्यावरील ट्रॅफिक वाढत चाललय. अजिबात सायकल फ्रेंडली नाही .. सायकलने जायचा निर्णय घेतलाच असेल तर खूप खबरदारी घ्यावी !!!

अप्पा जोगळेकर's picture

21 Nov 2016 - 4:38 pm | अप्पा जोगळेकर

मी भूमकर चौक ते फेज २ पर्यंत दररोज जात होतो आत्ता आत्ता पर्यंत. काही प्रॉब्लेम नाही ट्रॅफिकचा.
उलट ४ सीझन नंतर जबर चढ आहे. तिथे ट्रॅफिक असेल तर अजून चांगले. चढ आणि ट्रॅफिक मुळे चांगली प्रॅक्टिस होते. नंतर घाटातल्या राईडला ही प्रॅक्टिस बरी पडते. चांदे रस्ता फालतू आहे.

अनिरुद्ध.वैद्य's picture

21 Nov 2016 - 10:03 pm | अनिरुद्ध.वैद्य

आज तिकडुन गेलो होतो बाईकनी बघायला. पण आता वाटतंय चांदे शक्य नाही. दोनेक किमीच्या पॅच मध्ये रस्ता पुर्ण उखडल्या गेलाय.

तेव्हा आपलं विकेण्डलाच सायकल फिरवणे चांदणी चौक, फर्ग्युसन रोड पाषाण सर्कल ते परत चांदणी चौक. एक चांगला लूप होतो.

अप्पा, दंडवत. त्या भागातुन मोटरसायकल नेणं जिकीरीचं होतं, तिथनं सायकलनी गेलात __/\__

देशपांडेमामा's picture

15 Nov 2016 - 4:50 pm | देशपांडेमामा

काहिच नाहि.. ऑफिसच्या कामामुळे आज व्यायाम नाही झाला :-( उद्या नक्की !!

देश

राम राम मिपा's picture

15 Nov 2016 - 5:07 pm | राम राम मिपा

दररोज ३० मीन्स ब्रिस्क वॉल्क + रन ने सुरुवात झाली आहे .... लवकरच पुढची पायरी गाठू !
-Better Late Than Never

वेल्लाभट's picture

15 Nov 2016 - 6:33 pm | वेल्लाभट

गेल्या ७ पैकी ४ दिवस १.५ किमी धावलो

८००० स्टेप्स अ‍ॅपमधे दाखवल्या
पुशअप्स १५*४ सेट्स
बेंचप्रेस १०*४ सेट्स
ट्रायसेप्सचे विविध व्यायाम.

आहार - सकाळे एक मोठा कप दुध
दुपारी - एक मुदी तेरीयाकी राइस विथ भरपूर चिकन
रात्री - छोले आणि दोन पोळ्या
व्यायामानंतर लगेच अर्ध्या तासात अर्धा स्कूप व्हे पावडर मिश्रण.

सही रे सई's picture

15 Nov 2016 - 11:31 pm | सही रे सई

मागच्या आठवड्यात सोमवार ते बुधवार नियमित १ तास जिम मध्ये जाऊन व्यायाम केला. गुरुवार शुक्रवार आणि पुढे विकांताला काही जमले नाही जायला. परत काल सोमवारी जिम ला गेले होते.

या वेळी सुरुवाती पासून जाणवलेली गोष्ट म्हणजे मी नेहमी काही काळाची सुट्टी (२-३ महिने )नंतर परत व्यायामाला सुरुवात केली कि पहिले २-४ दिवस चांगलेच दुखते अंग. या वेळी असे अजिबात झाले नाही. बर व्यायाम सुध्धा कमी नव्हे केलेला. याचा अर्थ माझा फिटनेस बरा होता या वेळी असा होऊ शकेल का?

खटपट्या's picture

15 Nov 2016 - 11:56 pm | खटपट्या

असा अर्थ काढू शकता. जेव्हा आपण सुरवात करतो तेव्हा टीशू दुखावतात (नक्की शब्द काय वापरावा माहीत नाही) जेव्हा तुमचे अंग दुखले त्यावेळी टीशु पुर्ववत झाले नसावेत. स्नायुना आरामाचीही तीतकीच गरज असते. व्यवस्थीत आराम मिळाला असल्यास अंग दुखणार नाही. म्हणून बहूतेक एका प्रकारचा व्यायाम आठवड्यातून एकदा करावा असे म्हणतात. (वजन कमी करण्याचे कार्डीओ व्यायाम यात येत नाहीत)

अनिरुद्ध.वैद्य's picture

16 Nov 2016 - 4:11 pm | अनिरुद्ध.वैद्य

वर खटपट्या ह्यांनी म्ह्ण्टलेय तसे ते दुखावतात, त्यांना नंतर योग्य आहार अन विश्रांतीची गरज असते. अन ह्यावेळी दुखले नाही, म्हणजे फिटनेस नक्कीच चांगला झालाय!

ह्याविषयी अजुन थोडे:

जेव्हा आपण व्यायामाला सुरुवात करतो, तेव्हा स्नायुंना व्यायामाची सवय नसते अन म्हणुन ते ओव्हर वर्क आउट होतात. ओव्हर वर्कआउट झाल्यांनंतर बहुतेकवेळा ते अकडतात किंवा दुखतात. ते बहुधा एक प्रकारचे अ‍ॅसीड तयार झाल्याने होते (मला नक्की ठाउक नाहनाही)

इंटरनेटवर वाचलेल्या माहीतीप्रमाणे मसल्सच्या पेशी, मसल्स वापरात असतांना तुटतात अन पुन्हा जुळतात. जेव्हा आपण व्यायाम करतो, तेव्हा ते जास्त काम करतात अन मग पुन्हा जुळतात. ह्या तोडपाण्यात बर्‍याचदा आपले स्नायु अकडतात. तेव्हा थोडी रेस्ट घेतली की ते पुर्ववत होतात. हा कालावधी साधारण ४८ तासांचा असतो. मग ४८ तासांनी परत तोच व्यायाम केला असता, तीच प्रोसीजर पुन्हा होते, पण ह्यावेळी स्नायुंना थोडा कमी त्रास होतो अन आपण हळु हळु पुर्ण इफेक्टीव्ह होतो. दरवेळी जेव्हा स्नायु तुटतात, तेव्हा परत जुळतांना त्यांची क्षमता थोडीशी वाढते. म्हणुन त्रास कमी कमी होत जातो अन आपला फिटनेस वाढतो. अन ही सगळी प्रक्रीया भरपुर कॅलरी खाणारी असल्याने, असे म्ह्ण्टले जाते की स्ट्रेंग्थ ट्रेनिंगमध्ये कॅलरीज व्यायाम झाल्यानंतरही जळत राहतात.

ह्या सायकलचा उपयोग जीमींगमध्ये स्प्लीट वर्कआउट करुन अधिक क्षमतेने व्यायाम करवुन घेतला जातो. ४८ तासांची एका मसल गृपला विश्रांती म्हणजे नेम़कं काय तर आपण त्या कालावधीत दुसर्‍या मसल गृपला व्यायाम द्यायचा. सुरुवातीस अपर बॉडी पहिल्या दिवशी, लोअर बॉडी दुसर्‍या दिवशी अन कोअर (म्हणजे पोट, कंबर अन पाठ) तिसर्‍या दिवशी असे स्प्लीट करत व्यायाम केले, तर विविध स्नायु डेव्हलप होत जातात अन फिटनेस वाढतो.

सही रे सई's picture

16 Nov 2016 - 10:34 pm | सही रे सई

दरवेळी जेव्हा स्नायु तुटतात, तेव्हा परत जुळतांना त्यांची क्षमता थोडीशी वाढते. म्हणुन त्रास कमी कमी होत जातो अन आपला फिटनेस वाढतो.

मला पण हेच वाटल या वेळी. म्हणजे पूर्वी माझे मसल्स एव्हढे तयार नव्हते या व्यायामासाठी. पण खूप वर्ष कमी अधिक व्यायाम केल्यामुळे त्यांची मुळची ताकद वाढली आणि त्यामुळे या वेळी काही महिन्यांच्या गेप नंतर सुध्धा हा त्रास झाला नाही कारण एक कमीत कमी ताकद तयार झाली होती मसल्स ची.

अनिरुद्ध.वैद्य's picture

17 Nov 2016 - 1:10 pm | अनिरुद्ध.वैद्य

आता अंडी + दुधाचा सपोर्ट घेउन व्यवस्थीत आहार प्लॅन करा!

विंजिनेर's picture

18 Nov 2016 - 2:58 am | विंजिनेर

किंचित दुरुस्ती/छिद्रान्वषीपणा - ह्याला Delayed Onset Muscle Soreness. असं म्हणायचं. तो acute muscle soreness पेक्षा वेगळा असतो. acute muscle soreness, लॅक्टिक अ‍ॅसिड स्नायूंत साठल्यावर, फटिगमुळे जाणवतो - जो व्यायामानंतर काही वेळातच नाहीसा होतो.
Delayed Onset Muscle Soreness - जो दुसर्‍या दिवशी म्हणजे बर्‍याच तासांनी - विश्रांती काळात जाणवतो - खरं "बॉडी बिल्डिंग" ह्या विश्रांतीच्या काळात होतं.
जर तुम्हाला आता तो जाणवत नाही ह्याचा अर्थ असा की तुमच्या शरीराला त्या तीव्रतेच्या व्यायामाची "सवय" झालीये - म्हणून स्नायूंना (सूक्ष्म) चिरा जात नाहीत - म्हणून Delayed Onset Muscle Soreness जाणवत नाही. म्हणजे व्यायामाची तीव्रता वाढवायची वेळ आलीये.,

सही रे सई's picture

18 Nov 2016 - 5:47 am | सही रे सई

म्हणजे व्यायामाची तीव्रता वाढवायची वेळ आलीये.

हो तो पण विचार केला आहेच. फक्त २-३ दिवस खोकला सर्दीने बेजार झाले आहे त्यामुळे खूप जास्त वाढवला नाहीये व्यायाम.

अनिरुद्ध.वैद्य's picture

21 Nov 2016 - 10:08 pm | अनिरुद्ध.वैद्य

हा अ‍ॅक्युट मसल सोअरनेस्स, ८ - ९ किमी जॉग केल्यावर जाणवतो. अन मग जॉगींग संपुन नुसतं कसबस रेटणं उरत.
हा त्रास कसा संपवावा?

डॉ श्रीहास's picture

16 Nov 2016 - 4:21 pm | डॉ श्रीहास

१२*२ असे २४ जोर मारले बास्स एवढच केलं...... उद्या पासुन सायकलींग सुरू.

पंधरा मिनीटे फुलपाखरी तडाख्याचा सराव आणि मग दहा मिनीटे दैनंदिन जलतरण.

बेकार तरुण's picture

17 Nov 2016 - 5:48 am | बेकार तरुण

फुलपाखरी हात का पाय (कंबर खरेतर !)
हा स्ट्रोक शिकायला मला सगळ्यात जास्ती वेळ लागला होता !!

बाळ सप्रे's picture

17 Nov 2016 - 3:15 pm | बाळ सप्रे

फुलपाखरी तडाख्याचा

हा हा हा हा

फ्रीस्टाइल - मोकळी पद्धत
ब्रेस्ट स्ट्रोक - छातीठोक
बॅक स्ट्रोक - पाठमोरी

:-)

वेल्लाभट's picture

18 Nov 2016 - 8:10 am | वेल्लाभट

काहीच्याकाही भारी !

वेल्लाभट's picture

18 Nov 2016 - 8:11 am | वेल्लाभट

फुलपाखरी तडाखा! लोहल!

किरण कुमार's picture

16 Nov 2016 - 5:19 pm | किरण कुमार

गेली महिनाभर ऑफीसला जाणे येणे सायकलवर चालू आहे,
रविवारी काही मित्रांसोबत मांढरदेवीला सायकल दामटली
एकूण जाणे येणे १५० किमी पडले, त्यात कात्रजचा छोटा आणि मांढरदेवीचा साधारण ८-९ किमी चा घाट चढलो. एकूणच धमाल राईड झाली. सोबत मिपाकर केदार दिक्षित आणि बाकी तीन भिडू होते.

रोजचे अपडेट्स काही फारसे नाही घर ते ऑफीस केवळ १२ किमीचे अंतर आहे त्यामूळे सायकल हा उत्तम पर्याय वाटतो.तेवढाच काय तो व्यायाम.

प्रशांत's picture

16 Nov 2016 - 9:53 pm | प्रशांत

या महिन्यात आतापर्यंत ३३२ किमि सायकलिंग झाली. रोज येथे टाकणे शक्य झाले नाहि. उद्यापासुन अपडेटत जाइल (सायकल चालवल्यास ;) )

यात दिनांक १२ ला सिंहगड वारी पहिल्यांदा झाली..
.

निओ१'s picture

16 Nov 2016 - 11:30 pm | निओ१

मी samsung health (google S Health) हे वापरत आहे, मला खूप मदत होत आहे.

निओ१'s picture

16 Nov 2016 - 11:30 pm | निओ१

In google Play S Health App.

आज ३९ किमी सायकलिंग करून हाफिसात पोहोचलो.

वामन देशमुख's picture

17 Nov 2016 - 3:50 pm | वामन देशमुख

Great job done!

अनुप कोहळे's picture

18 Nov 2016 - 12:05 am | अनुप कोहळे

खुप दिवसांनी Racquetball खेळलो काही मित्रांसोबत ४५ मिनीटे. अमेरिकेत सध्या थंडी पडायला लागल्यामुळे बाहेर सायकलिंग बंद झाल्यातच जमा आहे. शनिवार किंवा रविवारी करावे लागेल.

सायकल चालवली थोडीशी.

मोदक's picture

18 Nov 2016 - 8:30 am | मोदक

वाह

डॉ श्रीहास's picture

20 Nov 2016 - 10:30 pm | डॉ श्रीहास

आज पहील्यांदाच १५० किमी पेक्षा जास्त सायकलींग केलं... १०० किमी केलं होतं ह्यापुर्वी पण १५० ची बातच काही और असते...
१५३.९ किमी, ६:५६ तास,२२.१किमी/तास वेग !!

बाळ सप्रे's picture

21 Nov 2016 - 2:12 pm | बाळ सप्रे

वाह.. १५०+ किमीसाठी ताशी२२+ किमीचा वेग म्हणजे खूपच चांगला आहे.. अभिनंदन..

डॉ श्रीहास's picture

21 Nov 2016 - 8:43 pm | डॉ श्रीहास

कौतुकाचे दोन शब्द उत्साह व्दिगुणित करतात..... पुनश्च धन्यवाद आणि तुमचं देखील अभिनंदन दिल्ली मारल्याबद्दल _/\_.

बाळ सप्रे's picture

21 Nov 2016 - 2:36 pm | बाळ सप्रे

हा वीकान्त दिल्ली हाफ-मॅरॅथॉनचा होता. मार्ग नेहरू स्टेडीयम, इंडीया गेट, राजपथ, राष्ट्रपतीभवन, संसद असा असतो. दिल्लीची नोव्हेंबरमधील थंडी, अजिबात चढ-उतार/खाच खळगे नसलेला मार्ग यामुळे ही मॅरॅथॉन धावपटूंमधे 'वैयक्तिक विक्रमां'साठी प्रसिद्ध आहे. इथे विजेते धावपटू तर हाफ मॅरॅथॉन एका तासाच्या आत पूर्ण करतात.

मलाही या मॅरॅथॉनने निराश केले नाही. वैयक्तिक सर्वोत्तम वेळ १:५९ वरून १:५३ अशी सुधारता आली.

प्रदूषण (स्मॉग) च्या बातम्यांमुळे गेले ३-४ आठवडे सर्व धावपटू चिंतेत होते. पण प्रत्यक्षात तसा काहीही अनुभव आला नाही. प्रदूषण निवळले असावे अथवा बातम्या अतिरंजित होत्या. कोणीही धावताना मास्क लावून धावताना दिसले नाही.

मोदक's picture

21 Nov 2016 - 3:23 pm | मोदक

अभिनंदन..!!!