विश्वस्ता...

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
27 Oct 2016 - 8:17 am

विश्वस्ता...

जगावेगळा आहे मी फिरस्ता
चोखाळतो मी अनोळखी रस्ता

लावतो मलम मी परोपरी
घाव घालणे हा तुझा शिरस्ता

राहतो हजर प्रत्येक समारंभास
बांधतो वेदनेचा नेहमी बस्ता

केला गुन्हा, केली प्रीत तुजवरी
आयुष्यात काढल्या अनेक खस्ता

झालो चरणी लीन नियतीच्या
आता तुझाच आहे भरवसा विश्वस्ता

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

27 Oct 2016 - 9:48 am | प्रचेतस

धन्यवाद

अत्रुप्त आत्मा's picture

27 Oct 2016 - 10:22 am | अत्रुप्त आत्मा

+ १

चांदणे संदीप's picture

27 Oct 2016 - 11:56 am | चांदणे संदीप

+ २

तिमा's picture

27 Oct 2016 - 10:00 am | तिमा

रे भक्ता
नकोस म्हणू मज विश्वस्ता
तुमचा भार सांभाळून
कंटाळलोय मी आता
कुणाची करणी, कुणाची सत्ता
प्रत्येक घटनेचा भार
मजवर कशाकरिता
असेन जगाचा मी कर्ता
पण प्रत्येकाचा भार घेण्याचा
मी घेतला नाहीये मक्ता |