भूत

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जे न देखे रवी...
15 Oct 2016 - 11:27 am

डोईवर माझ्या
नाही टोपी तरी
जगण्याची रीत
सोपी नाही ...
खांद्यावर माझ्या
नाही जरी झेंडा
कधीमधी दांडा
तिरडीचा...
हातामधी माझ्या
नाही तलवार
कसे झेलू वार
देव जाणे...
पायामधी माझ्या
उरले ना त्राण
आवरतो प्राण
कंठाशी खिळले...

मला नाही ठावे
काय माझी जात
तरी नाही जात
भूत ते भयाचे...

कवितामुक्तक

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

15 Oct 2016 - 4:18 pm | अभ्या..

आह्ह्ह्ह,
जब्बरदस्त.
आवडली एकदमच.

विशुमित's picture

15 Oct 2016 - 4:49 pm | विशुमित

हातामधी माझ्या
नाही तलवार
कसे झेलू वार
देव जाणे...!!

विशेष आवडलं

यशोधरा's picture

15 Oct 2016 - 5:06 pm | यशोधरा

आवडली.

पैसा's picture

15 Oct 2016 - 5:24 pm | पैसा

सुरेख कविता!

क्या बात है! फारच छान कविता. भयाचे भूत एकदा मानगुटीवर बसलं की उतरता उतरत नाही.

किसन शिंदे's picture

15 Oct 2016 - 8:13 pm | किसन शिंदे

सुरेख अगदी

अत्रुप्त आत्मा's picture

16 Oct 2016 - 5:48 am | अत्रुप्त आत्मा

येक नंबर.

चाणक्य's picture

16 Oct 2016 - 9:51 am | चाणक्य

आवडली.

कविता१९७८'s picture

16 Oct 2016 - 10:25 am | कविता१९७८

मस्त

चांदणे संदीप's picture

16 Oct 2016 - 11:34 pm | चांदणे संदीप

कविता बरीच गंडलीये पण इथे सगळे प्रतिसाद छान छान आलेत!!

वार झेलायला ढालही वापरली नाहिये.... नवीन टेक्निक असणार बहुतेक!

मीच गंडलोय बहुतेक.... अभ्यास वाढवायला एक मोठ्ठा लिखाणब्रेक घ्यावा लागणारे परत! :((

Sandy

नाखु's picture

17 Oct 2016 - 8:56 am | नाखु

शिंगे रंगविली,बाशींगे बांधली अशी वाटली, थोडी इस्त्री करायला पाहिजे होती.

ही ती कविता

शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली
चढविल्या झुली, ऐनेदार

राजा परधान्या, रतन दिवाण
वजीर पठाण, तुस्त मस्त

वाजंत्री वाजती, लेझिम खेळती
मिरवीत नेती, बैलाला गे

दुल दुलतात, कुणाची वशींडे
काही बांड खोंडे, अवखळ

कुणाच्या शिंगाना, बांधियले गोंडे
पिवळे तांबडे, शोभिवंत

वाजती गळ्यात, घुंगरांच्या माळा
सण बैल पोळा, ऐसा चाले

जरी मिरवीती, परि धन्या हाती
वेसणी असती, घट्ट पट्टा

झुलीच्या खालती, काय नसतील
आसूडांचे वळ, उठलेले

आणि फुटतील, उद्याही कडाड
ऐसेच आसूड, पाठीवर

सण एक दिन, बाकी वर्षभर
ओझे मर मर, ओढायाचे.

चांदणे संदीप's picture

17 Oct 2016 - 9:07 am | चांदणे संदीप

नाखुकाका, मस्तच कविता आहे ही! कुणाची आहे??

नाखूजी.... व्वा व्वा व्वा.... आवडली.. मस्तंय....

नाखु's picture

17 Oct 2016 - 11:15 am | नाखु

चौथीच्या पुस्तकात आम्हाला होती.

लयबद्धतेने लक्ष्यात राहिली इतकेच काय ते.

नको, नको. तू ब्रेक मारु नकोस.

आमच्या काही योजनाअंतर्गत प्रतिसाद आहेत. तू पेपर लिहित राहा. अभ्यास पुरेसा आहे तुझा. ;)

संकल्पना चांगलीच आहे... पण मीटरमध्ये असली असती "६-६-६-४" च्या तर अजून मजा आली असती...
(अर्थात मला कवितेचे तंत्र फारसे माहित नाही... पण असंच वाटलं)
कृहघ्या

ज्योति अळवणी's picture

17 Oct 2016 - 10:01 am | ज्योति अळवणी

अप्रतिम