डॉक्टर ए.आर. शहाणे आणि श्राद्धाचा ब्राम्हण

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
6 Oct 2016 - 9:29 pm

(रूपक कथा)

नुकताच गेलेल्या पितृपक्षातली गोष्ट. बर्याच महिन्यांनी मला माझा एक जुना मित्र भेटला. डॉक्टर ए.आर. शहाणे त्याचे नाव. नावाप्रमाणेच अत्यंत हुशार. विषय कुठलाही असो, ज्ञान पाजायला नेहमीच उत्सुक. पण या वेळी त्याचा चेहरा मरगळलेला होता. मी विचारले कसली चिंता करतो आहे. तो म्हणाला तुला माहितच आहे, दरवर्षी मी पितरांना प्रसन्न करण्यासाठी ब्राम्हणाला घरी जेवायला बोलवितो, दान-दक्षिणा देतो. मी म्हणालो, त्यात एवढे उदास असण्याचे कारण काय. तो म्हणाला, गेल्या वर्षी हा ब्राम्हण पितृपक्षात घरी आला होता, जेवण झाले, दक्षिणा दिली. त्या वर त्याचे समाधान झाले नाही. जाताजाता माझ्या ५ वर्षाच्या मुलाच्या नाकावर मुक्का मारला आणि म्हणाला या वर्षी तुझ्या मुलाचे नाक तोडले आहे पुढच्या वर्षी तुझ्या मुलाची तंगडी तोडणार आहे. मी म्हणालो, एक मुस्कटात का नाही लावली त्याला? तो उतरला, एक तर अतिथी आणि त्यात ब्राम्हण. कसा मारणार त्याला. मुलाला हॉस्पिटलला घेऊन गेलो, नाकाचे हाड तुटले होते, सर्जरी करावी लागली. मी म्हणालो, झाले गेले विसरून जा. आता त्या ब्राम्हणाला पुन्हा घरी बोलवू नको, इतरांना हि तसे करायला सांग. चांगली अद्दल घडव त्याला. त्या वर तो म्हणाला, असे कसे करू शकतो, जुने संबंध आहेत, त्याच्या सोबत. त्याला वाळीत टाकणे केंव्हाही उचित नाही. येत्या रविवार मी त्यालाच घरी बोलविणार आहे.

आता काय म्हणणार, अश्या उच्च शिक्षित विद्वान माणसाला. मी कपाळावर हात मारला, डोळ्यांसमोर, पायाला प्लास्टर बांधलेल्या अवस्थेत त्याच्या मुलाचा चेहरा डोळ्यांसमोर तरळला.

विडंबनआस्वाद

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

6 Oct 2016 - 9:33 pm | पिलीयन रायडर

काय?????

नाकावर मुक्का मारला? नाक फोडलं ५ वर्षाच्या मुलाचं??? आणि तरी मायबाप ओके आहेत?!!!

ही सत्यकथा आहे?

खटपट्या's picture

6 Oct 2016 - 9:34 pm | खटपट्या

ऐकावे ते नवलंच...

रच्याकने, मला त्या डॉक्टरच्या नाकावर ठोसा मारावासा वाटतोय...पितरांना प्रसन्न करतोय मेला....

यशोधरा's picture

6 Oct 2016 - 9:34 pm | यशोधरा

रुपक समजले नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Oct 2016 - 9:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे बहुतेक भारत-पाकिस्तान संबंधांवर रूपक आहे :)

यशोधरा's picture

6 Oct 2016 - 10:26 pm | यशोधरा

अच्छा, ओके.

रघुनाथ.केरकर's picture

13 Oct 2016 - 11:26 am | रघुनाथ.केरकर

सेना भाजप बद्दल तर नाही ना.

अशा लबाड ब्राह्मणांच कशाला समाधान करायच. द्या सोड़ून!मित्र वर्णन केल्याप्रमाणे खरोखरच हुशार आहे का शंका वाटते.काय तर म्हणे त्याला वाळीत टाकणे उचित नाही. मग इथे काय उचित आहे?

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Oct 2016 - 11:05 am | llपुण्याचे पेशवेll

अगदी बरोबर मित्र हुशार आहे पण चाकोरीबाहेर जाऊन त्या ब्राम्हणाला वाळीत टाकयला धजत नाहीये.

टवाळ कार्टा's picture

6 Oct 2016 - 10:10 pm | टवाळ कार्टा

खिक्क...इतके सोपे रुपक समजत नसेल तर औघड आहे =))

संदीप डांगे's picture

7 Oct 2016 - 12:04 am | संदीप डांगे

+10000000

सारक्याजमचे काही खरे नाही राहिले राव!!!

पिलीयन रायडर's picture

7 Oct 2016 - 12:46 am | पिलीयन रायडर

त्याला लागणारी तीक्ष्ण बुद्धिमत्ता कुठंय हो आमच्याकडे!!

तुम्हीच सांगा समजावुन!

संदीप डांगे's picture

7 Oct 2016 - 1:00 am | संदीप डांगे

दोन: रूपक भारत पाक संबंध व बॉलिवूड पाकिस्तानी आर्टिस्ट वर आहे
एक: रूपक अंमळ हुकले आहे

मतितार्थ: आमची बुद्धी क्षीण आहे, सारक्याजमचं खरे नाही राहिले हे दोन्ही अर्थाने होते हे नमूद करायचे इसरलो! ;)

संबंधितांनी हलके घ्यावे!

पिलीयन रायडर's picture

7 Oct 2016 - 2:37 am | पिलीयन रायडर

हं मग ते अंमळ हुकलंय म्हणुनच समजत नाहीये पटकन! असो..

टवाळ कार्टा's picture

7 Oct 2016 - 1:25 am | टवाळ कार्टा

नक्की का?

या वर्षी तुझ्या मुलाचे नाक तोडले आहे पुढच्या वर्षी तुझ्या मुलाची तंगडी तोडणार आहे.
काय कारण ? आणि बाप म्हणून नुसता बघत बसला ? कै च्या कै वाटले. भारत-पाक वर रुपकच लिहायचे होते तर अधिक विस्ताराने चांगले खुलविता आले असते.

काही कळलं नाही. असं कसं असू शकेल? आपल्या पोराचे नाक तोडल्यावर असं गप्प कसं बसले ते!

खटपट्या's picture

7 Oct 2016 - 12:36 am | खटपट्या

तेच ना...

सचु कुळकर्णी's picture

7 Oct 2016 - 1:16 am | सचु कुळकर्णी

डॉक्टर ए.आर. शहाणे त्याचे नाव. नावाप्रमाणेच अत्यंत हुशार. विषय कुठलाही असो, ज्ञान पाजायला नेहमीच उत्सुक. पण या वेळी त्याचा चेहरा मरगळलेला होता.

सचु कुळकर्णी's picture

7 Oct 2016 - 1:28 am | सचु कुळकर्णी

हे रुपक असेल तर कहानी कुछ और हि है !

संदीप डांगे's picture

7 Oct 2016 - 8:35 am | संदीप डांगे

???

सचु कुळकर्णी's picture

7 Oct 2016 - 4:55 pm | सचु कुळकर्णी

संदिप भौ मले तर ते केजरीवाल वर वाटल पन तरी बी गंडलेल हाय.

कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Oct 2016 - 5:16 pm | कैलासवासी सोन्याबापु

ओ डांगे बुआ, ओ सचिन भाऊ लावाचे का बेटींग आकडे "रुपक पहचानो मिलन महा आकडा २०१६" म्हणुन ;)

सचु कुळकर्णी's picture

7 Oct 2016 - 5:44 pm | सचु कुळकर्णी

चालते ना बाप्पु. थांबा जरा मांगच्या हप्त्याचे ओपन अन क्लोज चे रीजल्ट पाहु द्या गेशींग साठी ;)
डांगे बॉ निरा घाबरवते राजा आता आमच्या हल्याच्या मस्तकात नाय घुसली ते रुपक का व्हय ते म्हनुन का ईतले प्रश्न चीन्ह टाकाव ;)

सतिश गावडे's picture

7 Oct 2016 - 1:42 am | सतिश गावडे

(रूपक कथा)

चुकून विनोदी च्या ऐवजी रुपक लिहीले का?

औरंगजेब's picture

7 Oct 2016 - 8:53 am | औरंगजेब

चुक ते चुकच आहे. माझ्या बाबतीत हे झाले आसते तर थेट कोपच्यातच घेतला असता.

औरंगजेब's picture

7 Oct 2016 - 8:54 am | औरंगजेब

रुपक कथा असल्याचा दाट संशय येतोय

जव्हेरगंज's picture

7 Oct 2016 - 12:15 pm | जव्हेरगंज

cC

राजाभाउ's picture

7 Oct 2016 - 5:53 pm | राजाभाउ

आता कस आता कस अं, आम्हाला पण तुमच्या काही ष्टोर्या वाचुन असच विचारात पडायला होत मग

ह.घ्या प्लीज

पिलीयन रायडर's picture

7 Oct 2016 - 8:33 pm | पिलीयन रायडर

अगदी अगदी!!

आणि ह्यांना पण कळालं नाही तर मला काहीच कळालं नाही ह्याचं दु:ख जरा कमी झालं!

सिरुसेरि's picture

7 Oct 2016 - 12:43 pm | सिरुसेरि

ए . आर . रहमान आणी ए . आर . मुरुगाडॉस तेवढे माहिती आहेत .

पैसा's picture

7 Oct 2016 - 5:13 pm | पैसा

=))

आनंदी गोपाळ's picture

8 Oct 2016 - 10:37 am | आनंदी गोपाळ

अवो, पतंजलीची अ‍ॅड आहे ती!

कितीपण खराब प्रॉडक्ट विकले, त्याने नाक फुटलं, पुढे तोंड हात पाय तुटले तरी तेच घेणार अशी गोष्ट आहे.

नाखु's picture

8 Oct 2016 - 10:56 am | नाखु

रहस्य्भेद नाही करायचा किमान पन्नास होईपर्यंत तरी धीर धरायचा !!!

विवेकपटाईत's picture

11 Oct 2016 - 7:13 am | विवेकपटाईत

आनंदी गोपाळ (निश्चितच हे खरे नाव नाही), तुम्हास्नी गोष्ट कळली नाही, त्याला माझा इलाज नाही. वृतपत्र वाचत असता तर निश्चित गोष्ट कळली असती). बाकी काहीही म्हणा तुम्ही मला एक मौका दिला. आटा नूडल बाजारात मिळतात कि नाही म्हणून पतंजलीचे नाव दिले होते. त्या वरून इथल्या विद्वानांनी मला पतंजलीचा प्रचारक ठरविण्यास कमी केले नाही. आता तुम्हाला प्रश्न विचारतो, पतंजलीचे प्रोडक्ट निकृष्ट असतात हे विधान करायला किती मिळाले (रागावू नका). बाकी कुठल्या हि मार्केटिंग वाल्याला विचार एका निश्चित किमतीत पतंजली जी गुणवत्ता देऊ शकते दुसरे देऊ शकत नाही. कारण सुद्धा तो सांगू शकेल.

पटाईतजी,

पतंजलीचे प्रॉडक्ट उत्कृष्ट असतात, हे विधान करायला किती मिळतात? (रागावा)

बाकी माझ्या खरे नसलेल्या नावाला उत्तर द्यायची इतकी निकड का भासली, याबद्दल काही लिहिणार का?

चौथा कोनाडा's picture

8 Oct 2016 - 5:57 pm | चौथा कोनाडा

बाप रे काय हिंसक धागा आहे ...... नाकावर मुक्का, नाक तोडले, तंगडी तोडणार .... !
नुकताच बापुंचा वाढदिवस झाला अन दोन चार दिवसात लगेच एवढी हिंसा ?
भावना दुखावल्या ना आमच्या !

या वरुन एक आठवलं, कायप्पावर पण एक रुपककथा सध्या फिरत आहे:

जंगलात रानडुक्कर माजलंच होतं
सिंहाने काही दिवस सहन केलं
मग घातली झडप, केला खातमा
आणि सहज एक डरकाळी फोडली
तर,
कोल्हा म्हणाला.. पुरावा काय
लांडगा म्हणाला... सिंह खोटं बोलतोय
गाढव म्हणालं... भांडवल करतोय
कहर म्हणजे उंदीर म्हणाला,
माझ्या लग्नापूर्वी मीही सिंह होतो आणि मी तर तेव्हा चार रानडुकरं मारली होती
... पण जंगलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मी नाही ब्वा डरकाळी फोडली..... !