मला आठवते १९८०-९० दशकात मुंबईतल्या सिनेसृष्टीत '"दाऊद के इशारे के बिना यंहा पत्ता भी नहीं हिलता" अशी वाच्यता होती. तस्करी आणि उगाही (वसूली)चा पैसा दाऊद सिनेसृष्टीच्या माध्यमातून दुसर्या धंद्यात वळवायचा. दाऊद सारख्या तस्कारांमुळे आपल्या देश्यातील कोटीपेक्षा जास्त तरुण नशेच्या आहारी गेले, हजारोंच्या संख्येने अपराधी बनले, हे वेगळे. तरीही सिनेसृष्टीने दाऊदचे स्वागत केले. मोठे-मोठे मल्टी स्टारर् सिनेमे बनू लागले, त्यांत बहुतेक वसुली आणि तस्करीचा पैसाच लागत असे, अशी वाच्यता होती. नट आणि नट्यांना दाऊदच्या चरणी सर्वस्व अर्पित केल्याशिवाय सिनेसृष्टीत काम मिळत नाही, अश्या आशयाच्या गाॅसिप सिने पत्रिकांमध्ये वाचायला मिळायचे
१९९३ साली मुंबईत बॉम्बस्फोट झाले. शेकडोंच्या संख्येत मुंबईत लोक मारल्या गेले. दाऊद फरार झाला. आता वाटले होते, सिनेसृष्टीत दाऊदचा प्रभाव कमी होईल. पण तसे घडले नाही. दाऊदची पकड सिनेसृष्टीवर अधिक मजबूत झाली. देशप्रेम, स्वाभिमान इत्यादी विसरलेले, केवळ पैश्यांसाठी नट आणि नट्या परदेशात असलेल्या दाऊदच्या चरणी नाक घासण्यात आणि दरबारात ठुमके धन्यता मानू लागले.
आता प्रश्न येतो आपली जनता आणि सरकार काय करत होती. दुसरा कुठलाही देश असता, तर अश्या कलाकारांवर सिनेसृष्टीत काम करण्यावर कायम बंदी टाकली असती किंवा आतंकवादीशी संबंध ठेवण्यासाठी त्यांना जेलमध्ये धाडले असते. (आपली सरकारने अश्या कलाकारांवर का कार्रवाई केली नाही, हेच समजत नाही). जनतेने हि अश्या कलाकारांचा बहिष्कार केला पाहिजे होता. पण असे घडले नाही. मुंबईचे वाघ म्हणविणार्या नेत्यांनी अश्या कलाकारांचा बहिष्कार करण्याच्या धमक्या वैगरे दिल्या होत्या असे ऐकिवात आहे. बहुतेक त्यांच्या धमक्यांना दाऊद समर्थित सिनेसृष्टीने 'कुत्र्यांचे भुंकणे' याहून जास्त भाव दिला नसावा. ज्या मुंबईत शेकडों लोक मृत्युमुखी पडले, त्याच मुंबईत अनेक नेता किंवा दरबारात ठुमके लावणारे दाउदच्या आशीर्वादाने निवडणूक जिंकले अश्याही वाच्यता आहेत. (उत्तर प्रदेशातील गवर्नर श्री राम नाईक यांनी तर उघडपणे आरोप लावले आहेत).
यानंतर हि मुंबईत अनेक आतंकवादी घटना घडल्या. २००८च्या हल्ल्यात जनतेसोबत अनेक पोलीस अधिकारी हि मारल्या गेले. तरीही कराचीत बसलेल्या दाऊदचे नियंत्रण आपल्या सिनेसृष्टीवर कमी झाले नाही. आता तर पाकिस्तानी कलाकार हि सिनेसृष्टीत दिसू लागले. पण भारतात काम करीत असताना, इथे घडणाऱ्या आतंकवादी घटनांचा विरोध त्यांनी कधीच केला नाही. विषयांतर होईल, पण मला आठवते, अलिबाबा चालीस चोर मधले चोर हि ज्या घरात दरोडा टाकायचा असेल त्या घरातले मीठ खात नसे. इथले मीठ खाऊन हि, इथल्या आतंकवादी घटनांचा जर पाकी कलाकार विरोध करीत नाही, तर त्यांना इथे काम देण्यात काय अर्थ. खरे म्हणाल तर सिनेसृष्टीने जी मुंबईमध्ये आहे निदान त्यांनीतरी पाकी कलाकारांवर १९९३ नंतरच बहिष्कार टाकायला पाहिजे होता. आपल्या दुर्दैवाचे कारण असलेल्या दाऊदच्या कठपुतली कलाकारांना डोक्यावर घेऊन नाचणारी मुंबईकर/ देशातील सिनेप्रेमी जनतेला काय म्हणावे.
आज काश्मिरात आपले सैन्याचे जवान शहीद झाले. आपल्या देशाचे मीठ खाणार्या पाकी कलाकारांनी या घटनेची निंदा केली नाही. उलटपक्षी पाकिस्तानांत परतून, आपल्या देशाची निंदाच केली, असे ऐकिवात आहे. अश्या पाकी कलाकारांचा बहिष्कार करण्याएवजी, सिनेमा सृष्टीतील सर्व मोठे कलाकार, पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन करीत आहे. कारण स्पष्ट आहे, हे सर्व कलाकार आतंकवादी मालकाच्या इशार्यावर नाचणाऱ्या बाहुल्या आहेत. पाकी कलाकारांसोबत अश्या बाहुल्यांचा हि बहिष्कार आपल्या सिनेसृष्टीने/ आपण केला पाहिजे, हीच आपल्या शहीद सैनिकांना खरी श्रद्धांजली असेल.
प्रतिक्रिया
1 Oct 2016 - 11:17 pm | लिओ
आज एका नेत्याने विधान केले की
सीमेवरील जवानांना लागणार्या गोळ्या खर्या असतात. हे विधान एका अभिनेत्याला उद्देशुन होते. आज सीमेवरील शत्रुशी कसे लढावे हे सांगायला सगळे तत्पर व तज्ञा होतात.
कित्येक वर्षे अभिनेता झगडत होता गाडी स्वतः विचार करणारी होती व स्वविचाराने फुट्पाथावर गेली हे सिध्द करायला १ पतंग उडवला आणि गाडिने कोर्टात साक्ष दिली व अभिनेता सुटला.
सीमेच्या आत राहणार्या या शत्रुशी लढायला काय तयारी करावी. तज्ञानी मार्गदर्शन करावे.
2 Oct 2016 - 12:02 am | श्रीगुरुजी
Those who give opportunity to Paki artists are INDIANS, those who work with Paki artists are INDIANS, those who distribute movies starring Paki artists are INDIANS, those who show movies starring Paki artists in the movie halls and on TV channels are INDIANS, those who watch movies starring Paki artists are INDIANS and those, who support Paki artists, are INDIANS as well.
Then who should be blamed? "आपलीच मोरी आणि लघुशंकेची चोरी" अशी आपली परिस्थिती आहे.
4 Oct 2016 - 11:11 am | विशुमित
गुर्जी रास्त प्रतिसाद...!!
2 Oct 2016 - 2:22 am | जयन्त बा शिम्पि
...... आणि ' अभिनेता ' सुटला आणि त्याला भेटायला हाच ' नेता ' गेला, असे वाक्य पुरे करायला हवे होते ...जाऊ द्या. " अपनी अपनी डफली, अपना अपना राग ' हेच खरे ! !
मुद्दा असा आहे की बाहेरच्या शत्रुंशी लढा देण्यासाठी आमचे सीमेवरील बहाद्दर शिपाई व अधिकारी सक्षम आहेत. खरी लढाई आहे ती ' घरातल्या ' घरभेद्यांशी '. खरं म्हणजे आमच्या तथाकथित ' संवेदना ' पार बोथट झाल्या आहेत. सीमेवरील जवानांमुळे आम्ही वर्षाचे बाराही महिने सुरक्षित राहून, सर्व प्रकारचे सण, समारंभ साजरे करतो. सात डिसेंबर ला सैनिक दिवस किती जणांच्या स्मरणात असतो, हे प्रत्येकाने आपल्याच मनाशी ताडून पहावे.अगदी वाईटातील वाईट्ट सिरियल जरी असली,तरी ती पहात राहून, तिच्यावर सोशल मीडिया च्या माध्यमातून टीका करणार, पण सिरियल पहाणे काही बंद करणार नाही. माझ्या मनात असे काल्पनिक चित्र नेहमी उभे रहाते की स्मशान भूमीत कुणाचा तरी अंत्यसंस्कार चालला आहे आणि आवई उठली की एखादा ' अभिनेता ' बाजुला आला आहे किंवा त्याचे शूटींग सुरु झाले आहे, तर ९० % टक्के पब्लिक, त्या प्रेताचा विधी तसाच सोडून, शूटींग पहायला पळत सुटेल. मला आठवते, धूळे येथे आठव्या यत्तेत शिकत असतांना, हायस्कूल च्या बाजुला असलेल्या ' विश्राम ग्रुहाकडे ' आमच्या शाळेतील बरेच जण पळत गेले. कां ? तर म्हणे ' दिलिपकुमार ' ला बघायला ! ! मलाही कोणीतरी म्हणाले,' चल जाऊ या ' मी म्हटले होते ' कां, तोही माणुसच आहे ना ? मग त्याला काय पहायचे ? '. या अभिनेत्यांना ' मोठे ' कोण करतो ? यांची कोटीच्या कोटी उड्डाणे कुणाच्या जीवावर होतात ? त्यावेळी 'पहिलाच शो, पहिलेच तिकीट ' 'काढण्यात स्पर्धा कोण लावतो ? ह्यांची व्रुत्ती अशी की " हमीसे मुहब्बत, हमीसे लढाई, अरे मार डाला, दुहाई दुहाई '
असो शेवटी ' कोळसा उगळावा तेव्हढा काळाच ' कोणाला उपदेश करण्यापेक्षा, आपण आपल्याला जे मनापासून पटते ते करावे .
2 Oct 2016 - 5:07 am | विकास
सर्वप्रथम आत्ताच्या काळात पाकीस्तानी कलाकारांवर बहीष्कार घातला हे योग्यच आहे आणि त्यातून योग्यच संदेश जाईल अशी अपेक्षा आहे...
अज्ञानाबद्दल क्षमस्व, पण केवळ माहीतीकरता प्रश्न विचारत आहे: नक्की कोण पाक कलाकार बॉलीवूडमधे काम करत असतात? काही ठळक नावे? त्यांना नक्की कोणत्या व्हिसावर काम करता येते आणि त्यांना नक्की स्पॉन्सर कोण करतं?
3 Oct 2016 - 2:36 pm | श्रीगुरुजी
मला नक्की आकडा माहिती नाही. परंतु सध्या फवाद खान, अली जाफरी, कोणतरी माहीरा खान नावाची नटी इ. चित्रपटात काम करतात असे ऐकून आहे. फवाद खानाच्या भावालाही कोणीतरी चित्रपटात घेतले आहे असे ऐकून आहे. यापूर्वी १९८० च्या दशकात सलमा आगा ही गायिका अभिनेत्री निकाह चित्रपटामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत आली. तिने नंतर काही टुकार चित्रपटात काम करून कायमस्वरूपी मुंबईत स्थायिक झाली. गुलाम अली सातत्याने येऊन कार्यक्रम करीत असतो. त्याची एक गझल निकाह मध्ये होती. १९९० च्या दशकात राजकपूरने हीना चित्रपटात झेबा बख्तियार नामक पाकडीला घेतले होते. सध्या ती कोठे आहे खुदा जाने. नंतर काही वर्षांपूर्वी वीणा मलीक नाम एक मॉडेल २-३ वर्षे बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध होती. तिचे नाव शोएब अख्तर व अजून एका पाकिस्तानी क्रिकेटपटूशी जोडले गेले होते. ती आता लग्न करून दुबईत आहे म्हणे. फत्ते अली खान नावाचा एक गायक बर्याच वर्षांपासून बॉलीवूडमधील चित्रपटात गाणी म्हणतो. तो विशेषतः सलमान खानच्या चित्रपटातील गाणी म्हणतो. कोणतरी अतीफ नावाचा पाकिस्तानी गायक सुद्धा आहे म्हणे.
मला इतकेच माहिती आहेत. जाणकार अजून मंडळींची माहिती देऊ शकतील.
ते भारतात कोणत्या व्हिसावर काम करतात याची अजिबात कल्पना नाही. भारतात काम करण्यासाठी वर्क परमिट नावाची गोष्ट आहे का याची कल्पना नाही. बहुतेक असला काही प्रकार नसावा. परदेशातून भारतात येऊन काम करणार्यांसाठी भारताची काही पॉलिसी आहे का याची कल्पना नाही. बहुतेक नसावी. अदनान सामी नामक गायक वर्षांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये गाणी म्हणतो. त्याला जे पैसे मिळतात त्यावर तो कर भरीत नाही असे वाचल्याचे आठवते. २०१२ मध्ये तो मुंबईत असताना त्याचा वास्तव्याचा परवाना संपल्यावर सुद्धा व्हिसाचे नूतनीकरण न करता तो इथे निवांत राहत होता. कोणीतरी पोलिसात तक्रार केल्यानंतर स्वत: कमिशनर त्याला भेटायला गेले व तातडीने व्हिसा नूतनीकरणासाठी अर्ज करावा असा त्याला सल्ला दिला. इतर देशांतून व्हिसा संपल्यानंतर ओव्हरस्टे करणार्याला तुरंगवासाची शिक्षा होते. किमान डीपोर्ट तरी केले जाते. अशा व्यक्तीला भविष्यात देशात प्रवेश करण्यासाठी तहहयात बंदी घातली जाते व कधीही व्हिसा दिला जात नाही. अदनान सामीच्या बाबतीत तर शिक्षा किंवा डीपोर्टिंग लांबच राहिले, बेकायदेशीर वास्तव्यासाठ जराही आक्षेप न घेता त्याला तसेच राहून दिले व त्याच्या व्हिसाचे नूतनीकरण करून दिले. आता तर त्याला नागरिकत्व दिलेले आहे.
एकंदरीत भारतात काम करणे, व्हिसावर किती दिवस राहणे, व्हिसा संपल्यानंतर ओव्हरस्टे करणार्यांबद्दल काय कारवाई करायची, इथे काम करून पैसे मिळविणार्यांनी आयकर वगैरे भरायचा का नाही इ. संबंधी भारताचे कोणतेच नियम, कायदे व धोरण दिसत नाही. आओ जाओ घर तुम्हारा अशी परिस्थिती दिसते.
याचाच गैरफायदा पाकडे घेताना दिसतात. इथे राहून भारतालाच शिव्या दिल्या तरी आपण काहीही करू शकत नाही. फवाद खाननेही भारताला नावे ठेवल्याचे वाचले. निदान तो स्वतःच्या देशाशी तरी प्रामाणिक राहिला. भारतात मिळणार्या पैशांच्या मोहाने त्याने स्वतःच्या देशाशी प्रतारणा केलेली दिसत नाही. याउलट करण जोहर, सलमानसारखी मंडळी पाकड्यांच्या हल्ल्यांकडे दुर्लक्ष करून पाकड्या कलाकारांची भलामण करण्यात मग्न आहेत.
3 Oct 2016 - 8:32 pm | कैलासवासी सोन्याबापु
भारतात काम करण्यासाठी वर्क परमिट नावाची गोष्ट आहे का याची कल्पना नाही. बहुतेक असला काही प्रकार नसावा.
भारतात काम करायला वेगळा व्हिसा लागतो, त्याला व्हिसा टाइप "ई" (इंग्रजी मोठा ई) असे म्हणले जाते. गृह मंत्रालय भारत सरकार ह्यांच्या अधिकृत संस्थळावर उपलब्ध आहेत हे सगळे नियम (पीडीएफ स्वरुपात), त्यात काही श्रेणी सोडता (वेगवेगळ्या वकीलातींमधील कर्मचारी, अतिशय दुर्लभ प्रकारची जेवणे अन खाद्यप्रकार करु शकणारे "एथनिक शेफ्स " वगैरे) बाकी लोकांना किमान वार्षिक उत्पन्न घसघशीत २५,००० डॉलर्स/वर्ष असणारी नोकरी असली तरच काम करायची परवानगी असते.
अर्थात ह्याच्या इंप्लीमेंटेशन मधे काय होते ह्यावर आपण न बोलताही आपले एकमत होइलच म्हणा ;)
मुद्दा हा आहे की नियम अगदी बयाजवार अस्तित्वात आहेत :)
3 Oct 2016 - 8:52 pm | श्रीगुरुजी
हे माहिती नव्हते. धन्यवाद!
4 Oct 2016 - 11:06 am | बोका-ए-आझम
म्हणजे जवळपास १७ लाख रुपये झाले. एवढे चित्रपट अभिनेत्यांना आणि गायक-संगीतकारांना सहज मिळत असतील. अजून एक पळवाट अशी आहे की पाकिस्तानी कलाकाराचा एजंट/सेक्रेटरी हा भारतीय असतो. व्यवहार त्याच्याशी होतो आणि चित्रीकरण परदेशात होतं. डबिंग (असलंच तर कारण आजकाल बरेच चित्रपट सिंक साऊंडने बनतात) करण्यासाठी तो कलाकार भारतात येतो. किंवा तेही बाहेर होतं. तो कलाकार फक्त प्रमोशनसाठी भारतात येतो. त्यामुळे त्याने भारत सरकारच्या कुठल्याही नियमाचं उघडपणे उल्लंघन केलेलं नाही, पण तरीही भारतीय चित्रपटात काम केलेलं आहे. अनेक कलाकारांनी भारतात टूरिस्ट व्हिसावर येऊन काम केलंय आणि कामाचे पैसे भारताबाहेर स्वीकारलेत.
2 Oct 2016 - 5:36 am | अर्धवटराव
हे म्हणजे सैन्याला सोडायचं आणि बाजारबुजण्यांना झोडायचं असच झालं. एक मामुली तस्कर पुढे डोईजड होतो, राज्य आणि केंद्र सरकारांच्या नाकावर टिच्चुन आपल्या देशातल्या नागरीकांना टिपतो, आपण त्याला किंवा त्याच्या पैशाला थांबवु शकत नाहि, किंबहुना त्याच्या मलाईवर ताव मारतो. आणि तो पैसा बॉलेवुडमधे यायला लागला कि फिल्मी कलाकारांना दोष देतो.
जर सरकार/पोलिसांनी मनापासुन बॉलिवुडला दाऊदपासुन अभय दिलं तर दाऊदची काय टाप नाहि उत्पात करायची. दीड-दमडीचा स्मगलर होता तो. अनेकांच्या कुंडल्या त्याच्या मृत्युपत्रात नमुद असतील म्हणुन त्याला अजुनही आपलं सरकार हात लावत नाहि. दाऊदच्या प्रतापाबद्दल जर बॉलिवुडला दोष द्यायचा असेल तर पहिले त्याला मोठं करणार्या सत्ताधारी आणि पोलिस यंत्रणेला जोडे हाणायला हवे.
2 Oct 2016 - 8:14 am | संदीप डांगे
आत्ताचे सत्ताधारी खमके आहेत, दाऊदला मुसक्या बांधून आणतील यावर माझा प्रचंड विश्वास आहे, न रहेगा बास ना बजेगी बासुरी..
2 Oct 2016 - 10:43 am | अर्धवटराव
त्यांचीही बासरी बरीच वाजली आहे दाऊदसोबत :)
2 Oct 2016 - 7:29 am | फेदरवेट साहेब
असं म्हणता, मग आता काय करायचं, पतंजली प्रॉडक्शन निर्मित सिनेमे यायची वाट पहावी ? =)) =))
2 Oct 2016 - 11:02 am | lakhu risbud
संपादक मंडळी, मिपा च्या
स्वगृह
साहित्य
चर्चा
काव्य
पाककृती
तंत्रजगत
भटकंती
नवे लेखन
मदत पान
घोषणा
श्रीगणेश लेखमाला - २०१६
या टब्स मध्ये अजून एक "मोदींसाठीच्या शिव्या" या नावाने खिडकी (टॅब) देण्यात यावी म्हणजे या बद्धकोष्टी मंडळी ची सोय होईल. मळमळ व्यक्त करायला प्रत्येक वेळी नवीन धागा शोधण्याचे कष्ट सुद्धा कमी होतील.
2 Oct 2016 - 11:06 am | संदीप डांगे
सहमत, त्यासोबत केजरीवाल, काँग्रेस, डावे यांच्यासाठीसुद्धा एक एक टॅब हवा, हो कि नाही?
2 Oct 2016 - 11:11 am | मोदक
हो तर... मुळात प्रतिसादाला शब्दानुसार चार्जेस सुरू करावेत म्हणजे पिवळे चष्मेवाले गिगाबायटी प्रतिसाद लिहून सोयीस्कर अजेंडा राबवणार्यांना थोडा तरी चाप बसेल. ;)
2 Oct 2016 - 11:31 am | संदीप डांगे
माक्कायतर...
पक्षीय अजेंडे राबवणाऱ्यांकडून बक्कळ पैसा मिळेल आणि वाचकांनाही संस्थळाबद्दल ठोस निर्णय घेणे सोप्पे होईल..
2 Oct 2016 - 1:20 pm | कैलासवासी सोन्याबापु
बाकी काही करा का करु नका, फ्रॅक्चर्ड मेंटॅलिटीच्या लोकांसाठी तरी एक विभाग काढाच राव, हा का ना का. ;) =))
3 Oct 2016 - 8:09 pm | कपिलमुनी
प्रचारकी शब्दांना चार्जेस सुरू करावेत म्हणजे मालकांचा भार हलका होइल !
5 Oct 2016 - 7:28 pm | विकास
इतर धाग्यामधे दिलेला प्रतिसाद येथे चिकटवत आहे...
माझ्या मर्यादीत वाचनाप्रमाणे IMMPA या मला वाटते बिगर सरकारी असलेल्या चित्रपट दिग्दर्शक-निर्मात्यांच्या संघटनेच्या नावाने बातमी आलेली आहे. त्यांचा अधिकृत ठराव खाली चिकटवेला आहे. ज्यांना माझ्याप्रमाणे अधिकृत प्रस्ताव (सही शिक्क्यानुसार) बघून खात्री करून घेण्याची हौस आहे त्यांनी येथे बघावा.
यात म्हणल्याप्रमाणे त्यांनी, "...appeal to all IMPPA members" अर्थात त्यांच्या सभासद कंपान्यांना वगैरे जाहीर आवाहन केले आहे. आवाहन करणे म्हणजे बॅन करणे असते का? त्यात काही "आज्ञा" असते का? आणि असली तरी ती एका संघटनेच्या सदस्यांना दिलेली आज्ञा फारतर असू शकेल... सरकार काही मधे पडले आहे का? बरं कोणी कुणाला घ्यावे आणि का घेऊ नये आणि घेतले तरी नंतर फायर करावे हे आवडो अथवा न आवडोत, पण ते त्या पैसे देणार्याचे हक्क असतात, हे खाजगी कंपन्यांमधे नोकरदार असतात त्यांना तरी किमान कळायला हवे.
IMPPA takes significant decisions in its Extraordinary General Body Meeting
and Annual General Meeting
IMPPA in its Seventy Seventh Annual General Meeting began the meeting with obituary and condolence for the brave martyrs of the Indian Armed Forces in the cowardly terrorist attack at Pathankot and Uri. All members present were highly concerned and aggrieved at the total silence of the Pakistani artistes and technicians towards the shameful attack on India and after discussions and deliberations the members in the meeting unanimously decided that this silence of Pakistani artistes
was an insult and humiliation of our armed forces and the country at large.
The members unanimously felt that this is the right time to react and stand by the emotions and dignity of our Country and passed the following resolution.
It is unanimously resolved to appeal to all IMPPA members to henceforth in future not to work with any artistes, singers or technicians from Pakistan until the situation of hostilities between Pakistan and India subsides and the Government of India declares that all is well with Pakistan and India.
माझ्या दृष्टीने हा ठराव म्हणजे शुद्ध चावटपणा पक्षी धूळफेक आहे... मराठीत "हात रे" म्हणणे अथवा इंग्रजी, "slap on the wrist" वाक्प्रचारासारखा प्रकार आहे... त्यातून ऐन पंजाब-युपि निवडणुकांच्या वेळेस नवीन कावकाव करण्याची तयारी झालेली आहे इतकेच.