ईती स्थितप्रज्ञ लक्षणं – स्थितप्रज्ञम - इदं न मम !!

ज्याक ऑफ ऑल's picture
ज्याक ऑफ ऑल in जनातलं, मनातलं
24 Sep 2016 - 1:14 pm

स्थितप्रज्ञ म्हणजे काय याची अनेक लक्षणं वेळोवेळी संत-महात्म्यांनी सांगून ठेवलेलीच आहेत. आता मी सांगतो (म्हणजे मला पहा फुलं वहा). तर.. जसा जसा मानव “डार्विन काकांनी” म्हंटल त्या प्रमाणे उत्क्रांत का काय ते होत गेला , तशी तशी त्यातली स्थितप्रज्ञ लक्षणं पण बहुदा बदलायला लागली. सबब , कलीयुगातले स्थितप्रद्न्य म्हणजे एक वेगळी जमातच आहे महाराजा !!

चेहऱ्यावरी मंद भावे ,
निवांतपणे जो कान खाजवे ,
ना कोणाशी हेवे दावे ,
तो एक स्थितप्रद्न्य !!


ई.स. २०१६ संत ज्याक (ग्रंथ-ज्याकाई मधून) (म्हणजे मीच्तो)

तर मी आणि असे स्थितप्रज्ञ , आमचं अन यांचं फार जुनं नातं आहे. म्हणजे बुवा मी खूप घाईत असलो , की आलाच हा “स्थिप्र” मला भेटायला. टेलीपथीच जणू. आमचे नाही नाही म्हणता खूप किस्से आहेत सांगण्या सारखे. हां , मात्र “स्थिप्र” हा काही माझीच मक्तेदारी आहे असं नाही बरका. तो सगळ्यांची आयुष्य व्यापून उरलेला आहे. जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी कुठेही तो कोणालाही भेटू शकतो.

कलीयुगात लोकांची भाषा शिवराळ होण्याला ही प्रजातीच (पक्षी : स्थिप्र ) जवाबदार आहे , ही माझी दुसरी थेयरी. (साभार : संत ज्याक यांचा आकांतवाद आणि ईतर बरेच काही). तर , मी म्हणत होतो त्याप्रमाणे असे स्थितप्रज्ञ तुम्हालाही खूप ठिकाणी भेटत असतील . ते कोणत्याही रुपात कोणालाही कधीही भेटू शकतात. त्यातील मला भेटलेली सगुण साकार रूपे खालील प्रमाणे :

1. आपला Stop आलेला असताना हळू हळू पैसे मोजून देणारा कंडक्टर.
2. पेट्रोल पंपावर पंपासमोर उभे असून पण आपल्याकडे न बघणारा पंप्या.
3. रस्त्यावर आपण जीव खाऊन हॉर्न वाजवत असतांना निवांssssssत रवंथ करत मंद नजरेने बघणाऱ्या गाई म्हशी.
4. ट्राफिक खूप असताना सुद्धा डीवायडर च्या बाजूने संथ दिशेने स्कूटी हाकणारी रुमालाच्छादित तरुणी.
5. निसर्गाची हाक जोरात आलेली असतांना अन आपण अवघडलेले असताना आतून खूप वेळ पाण्याचा आवाज करत बसून (बहुदा) राहणारे महाभाग.
6. “बर्थ/सीट” माझी आहे हे स-तिकीट पटवून देऊन सुद्धा चौकट राजा/राणी सारखे आपल्याकडे बघत राहणारे संतश्रेष्ठ.
7. तिकीटाच्या रांगेत असताना आपले तिकीट प्रिंट करून परत द्यायचे पैसे मोजता मोजता अंतर्धान पावलेला तिकीट्या.
8. इंटरनेट एक्स्प्लोरर चं “वेट - पेज ईज लोडिंगचं” चिन्ह.
9. सिग्नल ऑरेंज असताना अचानक अडवून “गाडी मागे घ्या” असं थंड चेहऱ्याने सांगणारा ट्रोपिक वाला.
10. अत्यंत सुरेख शेर ऐकवून आपण “दाद” ची वाट पहात असताना , “दाद” हा फक्त त्वचारोग असतो असा चेहरा करून बसलेले “मनमोहन”
11. मंदिराच्या गाभाऱ्यात असलेला “कोsत्वं?” असे चेहरे करून बसलेला ब्रम्हवृंद. (कधी कधी हे आहोत म्हणून आपण आहोत असं देवाला वाटत असेल बहुदा).
12. “मी नै जा” असं म्हणून सुरूच न होणारं/री यंत्रं (उदा : कम्प्युटर , गाडी , वाशिंग मशीन ई )
13. “ही प्यांट तू नीट शिवलेली नाही!!” असं आपण सांगत असताना कानात सुई-दोरा लावून “आजी म्या ब्रम्ह पहिले” असं आपल्याकडे पाहणारा शिंपी.

तर ... ही लिस्ट फारफार मोठी आहे. हे असे थोर लोक आपल्या आयुष्यात येतात हे खरं तर आपलं भाग्य म्हंटल पाहिजे. सतत सदोदित अश्या लोकांच्या सानिद्ध्यात राहिल्याने , संपर्कात आल्याने आपल्या “चिदाकार-वृत्ती” शांतवत जातात. तरल चेतना जागृत होवून हे असे जणू “गीताख्यान” देणारे अनेकानेक कृष्णच आपल्या आयुष्यात येत असतात.

“पार्था , कितीही झालं तरी वेळ-काळ या रेलेटीव गोष्टी आहेत , तश्याच त्या सब्जेक्ट ओरीएनटेड आहेत . त्यामुळे त्या साठी कोणावर चिडणे , शिव्या देणे हे योग्य नाही पार्था ....!! सबब तू गुमानं लायनीत उभं रहा , ट्रोपिक मध्ये थांब , शांतम-पापम् म्हणून मंदिरात जा !!” “बीहोल्ड – अराईज – एनलायटन “

तुमच्या आयुष्यात सुद्धा असे कोण-किती-कधी स्थितप्रद्न्य आलेत हे आठवा आणि त्यांचे आभार माना ...

-
आपलाच (अवघडलेला) ज्याक ऑफ ऑल !!
२४/०९/२०१६

मुक्तकसद्भावना

प्रतिक्रिया

असंका's picture

24 Sep 2016 - 1:19 pm | असंका

कोsत्वं?

हे " कस्त्वम् " असं हवं ना?

ज्याक ऑफ ऑल's picture

26 Sep 2016 - 12:37 pm | ज्याक ऑफ ऑल

आसं का ?? आसन आसन ... आपलं संकृत काय यवड चांगलं नाय बा ... पण आता तुमी म्हणता तर आसन कस्त्वं का काय ते ..

बाकी भावणा पोचल्या ना ? बास तर मग

असंका's picture

26 Sep 2016 - 2:35 pm | असंका

यस्सर...

संदीप डांगे's picture

24 Sep 2016 - 1:28 pm | संदीप डांगे

भा री!!

रिकर्सिव्ह डुआयडी पण. ;-) एकदम स्थिप्र. हलणारच नाहीत.

ज्याक ऑफ ऑल's picture

26 Sep 2016 - 12:38 pm | ज्याक ऑफ ऑल

हाना तीजायला ... हाकानाका !!

जव्हेरगंज's picture

24 Sep 2016 - 1:52 pm | जव्हेरगंज

रस्त्यावर आपण जीव खाऊन हॉर्न वाजवत असतांना निवांssssssत रवंथ करत मंद नजरेने बघणाऱ्या गाई म्हशी.=)) लैच भारी !

चाणक्य's picture

25 Sep 2016 - 11:13 pm | चाणक्य

हे कसं जमवलं ?

माझं आख्खं गाव स्थितप्रज्ञानी भरलेलं आहे.
कितीही बोंबलून सांगा. सगळं ऐकून घेतील शांतपणे. झालं की "ऑ.... **ट्टं." एवढाच उद्गार येईल.

अमु१२३'s picture

24 Sep 2016 - 2:57 pm | अमु१२३

..

अभ्या..'s picture

24 Sep 2016 - 3:01 pm | अभ्या..

एकझाटली परफेक्ट.
तेरातेरातेरासुरुर

ज्याक ऑफ ऑल's picture

26 Sep 2016 - 12:39 pm | ज्याक ऑफ ऑल

सोलापूर ... आवडीच पूर ...

बाबा योगिराज's picture

24 Sep 2016 - 3:16 pm | बाबा योगिराज

चेहऱ्यावरी मंद भावे ,
निवांतपणे जो कान खाजवे ,
ना कोणाशी हेवे दावे ,
तो एक स्थितप्रद्न्य !!
लोळच लोळ.

ददुस निरीक्षण लैच्चं खत्री हाय बुआ. लेख आवड्यास. पुढील वेळेस जरा मोठा लेख येऊ द्या.

आपलाच स्थिप्र वाचक
बाबा योगीराज.

ज्याक ऑफ ऑल's picture

26 Sep 2016 - 12:40 pm | ज्याक ऑफ ऑल

कसं करता आता ?? भ्येटा एकदा ... भेटूनसनी आणि किस्से सांगतो ...

मारवा's picture

24 Sep 2016 - 4:45 pm | मारवा

ज्याक ऑफ ऑल म्हणताय तुम्ही तुमच नाव मात्रं
हा तर मास्टर स्ट्रोक आहे.
मस्तय मजेदार.
यात ते कोण आपले थोर नेते मुलाच्या मृत्युची बातमी कळाली तरीही "हलले" नाहीत त्यांनाही घ्या.
आणि ते "शो मस्ट गो ऑन " फिलॉसॉफी वाले स्थितप्रज्ञ जोकर्स
शो कुठल्या लायकीचा आहे प्रतीचा आहे कुठल्या दीड दमडी साठी होतोय त्या बाजुने कधी डोक लावत नाही
फक्त
शो मस्ट गो ऑन

ज्याक ऑफ ऑल's picture

26 Sep 2016 - 12:41 pm | ज्याक ऑफ ऑल

कोणाला कशाचं तर बोड्खीला क्येसाच ... जाना देव ...

संजय पाटिल's picture

24 Sep 2016 - 4:48 pm | संजय पाटिल

“दाद” हा फक्त त्वचारोग असतो असा चेहरा करून बसलेले “मनमोहन”>>>..
लोल..

चाणक्य's picture

25 Sep 2016 - 11:14 pm | चाणक्य

मजा आला वाचताना.

रस्त्यावर आपण जीव खाऊन हॉर्न वाजवत असतांना निवांssssssत रवंथ करत मंद नजरेने बघणाऱ्या गाई म्हशी.

गो mate baddal upshabd . ghor ninda. तुमच्यावर खटला दाखल करण्याचा विचार करतोय.

मंदिराच्या गाभाऱ्यात असलेला “कोsत्वं?” असे चेहरे करून बसलेला ब्रम्हवृंद. (कधी कधी हे आहोत म्हणून आपण आहोत असं देवाला वाटत असेल बहुदा).

hahaha. Amhal chalenge. Thamb kortat khechato.

ज्याक ऑफ ऑल's picture

26 Sep 2016 - 12:47 pm | ज्याक ऑफ ऑल

बसां ... दोन घोट पाणी घ्या ... कोर्ट कचेरीत काय ठेवलंय ?

सुबोध खरे's picture

25 Sep 2016 - 11:23 pm | सुबोध खरे

असे स्थित प्रज्ञ आणि मूर्ख लोक यात एक सूक्ष्म रेषा असते आणि ती केंव्हा पार करतात ते त्यांचे त्यांनाच कळत नाही.
उदा. "फुलमती देवी" नाव धारण केलेली जाट स्त्री तुमच्याकडे येते बाळाला मांडीला गळू झालेलं असता तुम्ही तिला औषध देऊन कणकेचे पोटीस(गळू पिकण्यासाठी) त्यावर लाव म्हणून सांगता. ती दुसऱ्या दिवशी येऊन सांगते कि "बच्चा तो पोटीस खाता हि नही"
अशावेळेस तुम्हालाच "स्थित प्रज्ञ" व्हावे लागते

मुक्त's picture

25 Sep 2016 - 11:37 pm | मुक्त

Mi lashkarat asatana lihayche rahile ka

ज्याक ऑफ ऑल's picture

29 Sep 2016 - 2:02 pm | ज्याक ऑफ ऑल

लोळू लोळू हसू लागलो मायला ..

रमेश आठवले's picture

26 Sep 2016 - 4:39 am | रमेश आठवले

तुझे आहे तुजपाशी या नाटकात पु ल देशपांडे यांनी स्थितप्रज्ञ चे उदाहरण असे दिले आहे.
रस्त्यावर आंब्याची साल अथवा रद्दीचा कागद सारख्याच चवीने चघळणारी गाय ही स्थितप्रज्ञ असते.

सस्नेह's picture

26 Sep 2016 - 10:43 am | सस्नेह

स्थितप्रज्ञ .

नाखु's picture

26 Sep 2016 - 11:15 am | नाखु

इतर पृष्ठे वाचकांना खुली करावीत. यादीत काही गाळीव रत्ने का गाळली आहेत ते व्य्नीत कळविणे

स्थीति प्रज्ञ नाखु

ज्याक ऑफ ऑल's picture

26 Sep 2016 - 12:48 pm | ज्याक ऑफ ऑल

उगाच अवघड जागच्या गळू ला स्पर्श नको म्हणून टाळलं ... थोडक्यात गोडी असते ... नेका ?

बाळ सप्रे's picture

28 Sep 2016 - 5:38 pm | बाळ सप्रे

आपल्या मागे तुंबलेले ट्रॅफिक व पुढे असणारा मोकळा रस्ता याची पर्वा न करता उजव्या लेनमधून कूर्मगतीने गाड्या चालवणारे वाहनचालक..

ज्याक ऑफ ऑल's picture

29 Sep 2016 - 12:11 pm | ज्याक ऑफ ऑल

आपण अगदी बरोब्बर ओळखलंय मला काय म्हणायचंय ... २ गुण .. अचूक उत्तरा बद्दल !!

भम्पक's picture

28 Sep 2016 - 6:34 pm | भम्पक

एकदम भन्नाट रे जाकानंद......

ज्याक ऑफ ऑल's picture

29 Sep 2016 - 12:11 pm | ज्याक ऑफ ऑल

बरका ...

पैसा's picture

28 Sep 2016 - 7:10 pm | पैसा

=)) लै भारी!

ज्याक ऑफ ऑल's picture

29 Sep 2016 - 12:12 pm | ज्याक ऑफ ऑल

;)

मदनबाण's picture

29 Sep 2016 - 6:06 am | मदनबाण
ज्याक ऑफ ऑल's picture

29 Sep 2016 - 12:12 pm | ज्याक ऑफ ऑल

धन्यवाद !!

पद्मावति's picture

29 Sep 2016 - 10:06 pm | पद्मावति

खूप छान लिहिलंय.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

30 Sep 2016 - 8:59 am | भाग्यश्री कुलकर्णी

मस्त. भारी लिहलयं

ज्याक ऑफ ऑल's picture

2 Oct 2016 - 12:52 pm | ज्याक ऑफ ऑल

धन्यवाद ...