रिहॅब चे दिवस भाग २!!

वरुण मोहिते's picture
वरुण मोहिते in जनातलं, मनातलं
22 Sep 2016 - 3:17 pm

चांगल्या नोकरीचा विचार न करता राजीनामा दिला .फॅमिली बिझीनेस होताच जोडीला चिंता नव्हती. . एक असतं बाजू भक्कम असली कि लांबचे लोक बोलू शकत नाही आणि जवळच्यांचे आपण ऐकत नाही .कळत असतं पण समजत नाही .आई मुख्याध्यापिका होणारी बायको लेक्चरर आणि माझा हे असा वागणं मलाच लाज वाटत होती पण लाज फक्त सकाळी उठताना .एकदा एक पेग झाला कि संपला सगळं .पब पार्टी नेहमीच होतं पण प्रमाण वाढला दारूचं तेव्हा नकळत बहाणे देणं चालू झालं. जवळच्या मित्रांना. कारण एकच ते काय विचार करतील,जेव्हा त्यांच्यासोबत हि असायचो तेव्हाही घरी जाऊन परत ड्रिंक करणं आलच. रात्री २ ला येउदे केव्हा ३ ला कोणाला न सांगता परत एकटा ड्रिंक. झोप येईपर्यंत.
( धोका भाग ३ ).
जसं आधी बोलो कोण काही बोलत नव्हतं कारण बाजू भक्कम पण आता बोलणं चालू झाला होतं मागून .मला ऐकायला येत होतं पण सवयीप्रमाणे दुर्लक्ष . हा दिवसभर पितो. मोहिते संध्याकाळी भेटणार तर प्यायलेलाच असेल. कधी कोणाशी वाईट वागलो नाही ना कधी आयुष्यात तमाशा झाला पण केवळ आपण पितो म्हणून लोक बोलतात कळायला लागला होतं. क्रेडिबलिटी वर शंका चालू झाली !!१० वर्ष जी सोबत होती तिलाही टाळायचा प्रयत्न चालू झाला. खूप प्यायल्यावर .कारण तिचा नेहमी पाठिंबा होता थोडा बदलेन असा विश्वास होता. तिचंही ऐकत नव्हतो .
(धोका भाग ४ )
सकाळी उठलो कि पहिला विचार दारूचा .
जगात कुठेपण जाईन पण पहिला विचार कधी बसतो याचा
एक दिवस पण खंड पडणार नाही किंवा पडलाच तर खूप अस्वस्थ वाटणे .
जवळच्या लोकांना टाळणे .
(धोका ५)
इथे असताना थोडी सवय होती डान्सबार ला जाण्याची. पुढे सिंगापूर ला गेल्यावर अजून वाढली .(होय तिथेही आहेत हो !!पण फक्त गाणं ऐकायचे बार ह्या बद्दल बोलतोय ).बऱ्याच ठिकाणी गेलो पुढे सवय कायम मग परत आलो तेव्हाही तेच. रात्री जाणं आणि टाइम पास कारण कंपल्सरी.(नोट _ सगळे डान्सबार तशे नसतात काही ठिकाणी नुसता गाणं ऐकता येत) त्यामागच्या गोष्टींवर एक स्वतंत्र लेख लिहणार आहे
(समाजसेवक अथवा एक दोनदा जाऊन मत बनवणारे नव्हे तर व या ग्राउंड रिऍलिटी लिहिणार आहे )
असो तर पुढे हेच लाईफ चालू झाला घरचाच व्यवसाय ज्यात मी कधी पडत नव्हतो तरी दारू मुळे नोकरी सोडलेली आता पडणं भाग होता पण तिथे पूर्ण दुर्लक्ष चालू होतं. सगळे तरीही समजून घेत होते .आई आणि होणारी बायको तर खूपच. नजर सगळीकडे लोकांची बदलली होती पाहण्याची .ओळखीचे बार ,जिथे मी तासन तास पडीक असायचो अश्या ससून लायब्ररी ,किताबखाना, मॅजेस्टिक, ह्या लोकांच्याही नजरा बदल्या होत्या.ghari १५०० पुस्तंकच्या वर स्वतःची लायब्ररी पण आता पुस्तकांना हात लावत नव्हतो लावला तर कधी पिऊन ५-१० पान वाचण्यापुरता.
स्कॉच शिवाय पिणार नाही हे तत्व होतं पुढे इंडियन मेड पण चांगली असते रे पुढे ब्लेंडर्स प्राईड बेस्ट इथपर्यंत आलो. सांगायचा मुद्दा का कारण जो पहिलेच साधी पीत असेल तो व्यसनापायी कितीही खाली जाऊ शकतो .
घरी खूप खलबत चालू झाली असावीत कारण एक दोन वेळा घरचेच जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडूनही सल्ला घेतला होता पण मी काय ऐकणार होतो !!
रिहॅब चा हि सल्ला दिला होता पण मी कोणाचाच काही ऐकणार नाही घरच्यांना माहित होतं. एक सांगायचं राहिलं एका पक्षाचे आम्ही युवा आघाडी प्रमुख हि होतो बरका. ईशान्य मुंबईमध्ये. आवड होतीच काही बॅकग्राऊंडही तशी होती. पण शेवटी पैसे देऊनच पद मिळालं हे हि खरंच. तिथेही लक्ष दिलेच नाही .कारण एकच काही काम असला तरी हाताशी ग्लास हवा हि अट होताना आमची त्याकाळात .
अश्यात एक दिवस आला मी गेले २-३ दिवसापासून बोलत होतो की हात पाय खूप दुखत आहेत. घरच्यांनी लक्षात ठेवला असावं. त्यांची चर्चा तर चालूच होती डॉक्टरांकडे माझ्या नकळत . त्याच काळात एकदा नेहमीप्रमाणे सकाळ झाली प्रसन्न चित्ताने आम्ही उठलो ३-४ बियर आणल्या घरी सकाळची सोय म्हणून .आई आज घरी कशी हे विचारायचा होतं पण म्हटलं असेल काही काम मी हळूच माझ्या खोलीत गेलो. प्रोग्रॅम चालू केला .थोड्या वेळाने बेल वाजली. नमस्कार चमत्कार झाले आमच्या फॅमिली डॉक्टरांचेच एक मित्र होते सहज आलो बोले इथे आलेलो तर. चहा नाश्ता झाला आई बोली ह्याला जरा बरं वाटत नाहीये . डॉक्टर लगेच बोले मी मागवतो की गोळी .मला तिथेच कळायला हवा होतं. असो
यथावकाश मी गोळी घेतली डोळे पेंगू लागले काहीतरी कारण काढून इंजेकशन हि दिलं. एकदा उठू शकलो गॅल्लरीतून ऍम्ब्युलन्स दिसली. कळत होता कि नव्हता ते आता नाही आठवत. काही तरी आहे चालू आपल्या विरुद्ध इतका समजत होत. झोप आली कोणीतरी खाली नेलं. मी आणि डॉक्टर ऍम्ब्युलन्स मध्ये. आणि तश्याच मागे घरच्यांच्या २ गाड्या .मधेच कधीतरी घाटात जग आली मोबाईल घड्याळ पाकीट सर्व काढला होता.
आता ऍम्ब्युलन्स गाड्या सुसाट निघाल्या होत्या हडपसर च्या दिशेने .....
(क्रमशः )

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

एस's picture

22 Sep 2016 - 3:38 pm | एस

वाचतोय. पुभाप्र.

अजया's picture

22 Sep 2016 - 3:48 pm | अजया

पुभाप्र

संजय पाटिल's picture

22 Sep 2016 - 4:20 pm | संजय पाटिल

छान.. असं म्हणवत नाही, पुभाप्र...

राजाभाउ's picture

22 Sep 2016 - 4:45 pm | राजाभाउ

वाचत आहे. पुभाप्र

टुकुल's picture

22 Sep 2016 - 5:29 pm | टुकुल

वेगळा अनुभव.. वाचत आहे.
आता या सार्‍यातुन बाहेर पडला आहात हे खुप चांगल झाल.

नशीबवान आहात की असे कुटुंबीय लाभले. शेवट चांगला झाला असावा अशी आशा आहे.

जालावरच यापूर्वी असा एक ब्लाॅग वाचलाआहे, अधोगतीची परिसीमा काय असू शकते हे वाचून थक्क, हताश व्हायला झालं होतं.

पिलीयन रायडर's picture

22 Sep 2016 - 6:37 pm | पिलीयन रायडर

बापरे..!
इनि सारखंच म्हणते, सर्व चांगलं झालं असेल अशी अपेक्षा..

लिहीत रहा!

पिलीयन रायडर's picture

22 Sep 2016 - 6:37 pm | पिलीयन रायडर

बापरे..!
इनि सारखंच म्हणते, सर्व चांगलं झालं असेल अशी अपेक्षा..

लिहीत रहा!

स्वतःच्या चुकांकडे बघण्यासाठी धैर्य लागते. अर्थात, ते असल्यानेच यातून बाहेरही पडला असाल. विचारी साथ देणारे कुटुंब असणेही भाग्याचे असते. थोडक्यात चांगले लिहीत आहात.

जव्हेरगंज's picture

22 Sep 2016 - 8:03 pm | जव्हेरगंज

+1

अत्रुप्त आत्मा's picture

23 Sep 2016 - 8:03 am | अत्रुप्त आत्मा

+१

चाणक्य's picture

22 Sep 2016 - 10:59 pm | चाणक्य

+१

लोथार मथायस's picture

23 Sep 2016 - 3:42 am | लोथार मथायस

+1

सूड's picture

22 Sep 2016 - 7:07 pm | सूड

वाचतोय, लिहीत राहा.

निशाचर's picture

22 Sep 2016 - 8:22 pm | निशाचर

पुभाप्र

रातराणी's picture

23 Sep 2016 - 12:17 am | रातराणी

पुभाप्र

खुप छान लिहिताय. वाचतोय, पण कंसातल्या टिप्पण्यांनी काहीसा रसभंग होतो आहे.
लिहीत राहा...

बोका-ए-आझम's picture

23 Sep 2016 - 8:42 am | बोका-ए-आझम

हे सगळं खरं असेल तर जबरदस्त! काल्पनिक असेल तर तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम!

प्राची अश्विनी's picture

23 Sep 2016 - 10:09 am | प्राची अश्विनी

+११