अँब्युलन्स मधून खाली कोण तरी उचलत आहे .आता आठवत नाही कोण होता तो .वर कोणीतरी न्हेलं ते हि आठवत नाही .डायरेक्ट जाग १५ तासांनंतर ,इंजेकशन दिलं असावं .बहुधा झोपेचं असावं आता हे हि आठवत नाही
आता पिक्चर प्रमाणे फ्लॅश बॅक सांगतो ..
सुरवात साधी सरळ छान घर मज्जा मज्जा अश्या टाइप . नीट शिक्षण कॉलेज पोस्ट डिग्री हा सगळा प्रवास (त्यात काय झालं हे परत कधीतरी )सगळंच चांगलं असला की घरचेही फार विचार करत नसावेत बहुधा .कारण कोणाला काय माहित कधी काय होता ते.कारण थोडं ड्रिंक परत कॉलेज मध्ये g.s होतो बाकी मजा मस्ती हे सगळं घरी माहित होतं त्यात काही विशेष पण नाही. खूप काही झाला ते वर सांगितल्याप्रमाणे परत येईलच .युनिव्हर्सिटी राजकारण विद्यार्थी खूप मुद्दे आहेत असो तो काही बोलण्याचा भाग नाही आता
सुरवात झाली आम्हाला जॉब लागल्यापासून मोठी कंपनी बाहेर काम साहजिकच संध्याकाळ रिकामी त्यात अंदमान आसाम आणि जम्मू अश्या ठिकाणी कामं ६-६ महिने म्हणजे रिमोट एरिया असला की संध्याकाळ खायला उठायची . दारू रेगुलर चालू झाली. पहिला सिग्नल पण समजला नाही.पुढे गाडी मी आणि ड्राइवर दिवसभर आता दारू हळू हळू सकाळी चालू झालीं . त्यात सरकारी अधिकारी पार्ट्या वैग्रे जोडीला होतच.पार्ट्या सगळेच करतात पण काही लोकांना कळत नाही .म्हणजे काळ वेळ जुळून येते काही वेळा असा घडायला .
पार्ट २
ती नोकरी सोडली आता मोठी कॉर्पोरेट फील्ड आली बाहेर प्रवास मीटिंग मार्केटिंग त्यामुळे हीच दिनचर्या झाली . सगळ्या जवळच्या व्यक्तींना कळत होत आडून आडून बोलतही होते पण तेव्हा हि मी ऐकलं नाही .कारण अर्धवेळ भारताबाहेर कोणाला काय कळणार अश्या विचाराने मी काहीपण कारण द्यायचो
धोक्याची सूचना भाग २
काही काळाने परत घरी आलो इथेच काम मग तर सगळंच भारी. दारूने आता पूर्ण कब्जा घेतला होता.काही महिने तसेच गेले हळू हळू कामावर बहाणे देण चालू झालं . तिथेही कळायला वेळ नाही लागला पण काम नीट असल्याने कोण काही बोलत नव्हतं .पण कधी ना कधी ते घडणार होतं . बऱ्याचदा सकाळी ड्रिंक आणि स्वतःचा आणखी असलेला व्यवसाय यामुळे कामावर दुर्लक्ष झालं .एक दोन दा समजावलं वरिष्ठानी नोटीस पण मिळाली मग मी स्वतःच ह्या नादात एकदा राजीनामा दिला .आता व्यवसाय आणि बाकी वेळा घरी कधी पण ड्रिंक होऊ लागला बाहेर गाडीत घरी ऑफिस मध्ये .
धोक्याची सूचना ३
(बाकी पुढील भागात )
ता.क -सहज अनुभव आहेत मला काही प्रॉब्लेम झाला नाही वेळीच सावरलं तर पण जे सावरू शकत नाहीत अश्यांसाठी
प्रतिक्रिया
19 Sep 2016 - 4:08 pm | अजया
स्वतःचा अनुभव लिहिलेला प्रथमच वाचनात आला. असं लिहायला धाडस लागतंच!
पुभाप्र.
19 Sep 2016 - 4:23 pm | टवाळ कार्टा
+११११
19 Sep 2016 - 4:42 pm | संदीप डांगे
+1000
19 Sep 2016 - 5:42 pm | जव्हेरगंज
19 Sep 2016 - 10:48 pm | गामा पैलवान
अवांतर :
सुवर्णगुणोत्तरी प्रतिसाद आवडला !
-गा.पै.
19 Sep 2016 - 4:55 pm | इनिगोय
वाचत आहे, थोडे मोठे भाग टाका शक्य असेल तर.
19 Sep 2016 - 6:28 pm | अत्रुप्त आत्मा
तुटक तुटक लिहू नका. कारण त्यामुळे आम्हाला गोष्ट समजेल. पण तुम्हाला ती सांगितल्याचं समाधान (म्हऩजेच फायदा. ) मिळणार नाही.
शेअरिंग करो दिल खोल के
मन की बात मन से बोल के.
(निकोटिन एनॉनिमसच्या मिटिंग केलेला जन्मजात व्यसनी~ आत्मछंद. )
19 Sep 2016 - 7:12 pm | सुंड्या
आत्मबंधांशी सहमत.
19 Sep 2016 - 10:53 pm | पिलीयन रायडर
लिहीताय चांगलं, फक्त थोडं जास्त लिहा एकावेळेला! आणि महत्वाचं, लिहा नक्की. सोडून देऊ नका!
सध्या फेसबुकवर तुषार नातु ह्यांचे असेच अनुभव वाचत आहे, अर्थात ते खुपच हाताबाहेर गेलेल्या केस बद्दल आहे. पण माणुस कसा व्यसनातुन बाहेर पडुन सकारात्मक काम करु शकतो ह्याचे फार मोठे उदाहरण आहे.
20 Sep 2016 - 2:53 am | गामा पैलवान
पिरा,
तुनांचे अनुभव वाचवत नाहीत. भयंकर प्रकरण आहे. त्यांना एव्हढ्या बारीकसारीक गोष्टी कशा आठवतात कोण जाणे. माणूस मुळातून हुशार असला पाहिजे.
आ.न.,
-गा.पै.
20 Sep 2016 - 6:54 pm | संजय पाटिल
माणुस अतिशय हुशार, तसेच जीद्द व चिकाटी पण प्रचंड..
20 Sep 2016 - 5:31 pm | सूड
तुटक नका लिहू...आणि लिहायला सुरु केलंच आहे तर खंड पडू देऊ नका.
20 Sep 2016 - 6:12 pm | किसन शिंदे
मागे एकदा पॉपटेट्स कट्ट्याला भेटलेलात ते तुम्हीच का वरूणराव?
20 Sep 2016 - 6:31 pm | वरुण मोहिते
येस सर !