माझ्या आजवरच्या खाण्या (आणि पिण्याच्या) असंख्य Adventures पैकी हे एक . म्हणजे समजा एखाद दिवशी तुम्हाला कोणी विचारलं की बाबा “चहा मध्ये चहा मिसळून पिऊन पाहिलंयस का कधी ?” किंवा “पानात तांबूल घालून खाल्लायस का कधी ?” “अरे बघ करून मस्त लागतं !!” तर आपण त्याच्याकडे एकतर अत्यंत कुत्सित नजरेने बघू अन म्हणू “डोक्यावर पडलायस की काय ?” पण .... हा किस्सा तश्याच वळणावरून जाता जाता अचानक एका अनपेक्षित ठिकाणी आला अन त्या नंतर ही “बला” - हमे उसका कायल बना गई - हमेशा sssssss के लिये !!
तर झालं असं की मी एकदा एका ठिकाणी गेलो होतो जेवायला , सणावाराचं जेवण , ते ही देशस्थांकडील . म्हणजे साधारण एखाद्या कोकणस्थ माणसाकडील न्याहारी , सकाळचे जेवण , दुपारचे भूकलाडू आणि रात्रीचे जेवण एवढ सगळं मिळून होणार नाही इतका मेनू तर एका जेवणात होता . (सकाळचे जेवण दुपारी ३ ला होते हे सांगायला नकोच) असो , विषय परत लायनीवर आणतो. तर पुरणपोळी , खीर , श्रीखंड असा भरगच्च गोडाचा मेनू होता. आणि माझा झाला होता देवानंद . मला काही गोड घशाखाली उतरत नव्हतं . त्यामुळे मी आपलं या मांडीवरून त्या मांडीवर असं करत केव्हा एकदा सगळे आवरतं घेतायत या विचारात होतो ...
आणि हाच तो जालीम क्षण , जेव्हा माझ्या समोर ती बला आली. माझ्या बाजूलाच बसलेले एक आजोबा मला म्हणाले “कारे ? घे की एक पुरणपोळी आणखी !!”. हो-नको करता करता माझ्या ताटात पुरणपोळी वाढली गेलीच. मी कुरकुरत मला आवडत नाही वगैरे पुटपुटत होतो. तेवढ्यात ते आजोबा म्हणाले , “कसे रे तुम्ही आजकालचे जवान ? इतक्यात गुंडाळला गाशा ? घे घे एक पोळी घे मी सांगतो तुला कसं खायचं !!”
असं म्हणून त्यांनी मोर्चा स्वयपाकघराकडे वळवला आणि “सुनबाई sssssss जरा तूप पिठीसाखर लिंबू वेलदोडा पूड आण गं !!” असा आदेश सोडला . झाssssलं ….. ईकडे माझा देवानंद सोडून आता "राजेंद्रकुमार कम भारतकुमार" झाला होता . मला वाटलं आता आजोबा पुरण-गिरण कसं करतात प्रात्यक्षिका सकट सांगतात का काय ?
पण नाही ... म्हातारा तितका पण वाईट नव्हता. त्यांनी माझ्या ताटात एक गरमागरम पुरणपोळी वाढायला लावली , त्यावर लोणकढया तुपाची धार धरली अन मला ते नीट पसरवून घ्यायला लावलं ... अन मग इथे खरी “रेशिपी” सुरु झाली ... त्या पसरलेल्या तुपावर साधारण २-३ चमचे पिठीसाखरेचा थर घालण्यात आला , मग परत थोडं तुप त्यावरून लावून ... सरप्राईज एलिमेंट “लिंबू” मागवण्यात आला ... !! आजोबा म्हणाले “पीळ बाळा हे पोळीवर !! “ ( माझा चेहरा तेव्हा साधारणत: “सर मी ?" हे विचारणार्या मुलाचा होतो तसा झालेला .) मी आवंढा गिळून ते पिळल . मग बारी आली वेलदोडापुडीची , ती भुरभुरली त्यावर ... आणि केला पोळीचा रोल .... अन मग आजोबांच्या या "बाप्तिस्मा" प्रमाणे मान खाली घालून ( अन डोळे मिटून) मी तो घास घेतला .
आणि महाराजा sssssss ….. काय सांगू ? तो ज्या क्षणी तोंडात घोळला .... आहाहाहाहा , (Background la ते कॅथेड्रल मध्ये वाजतं न ते गोस्पेल का काय ते ... हां तेच ) काय तो क्षण ... वावावा ... (मनोमन मी त्या आजोबांना दिलेल्या शिव्या मागे घेतल्या आणि त्यांना अडिशनल १०० वर्षे ग्रांट केली. )
म्हणजे ऐश्वर्या ने अभिषेकला "हो" म्हणलं असेल तेव्हा ... जसा आनंद अभ्या ला झाला असेल ना ... तोच आनंद (कम आश्चर्य ) मी अनुभवत होतो . हीच होती माझी पहिली (शब्दश:) तोंडओळख त्या “त्रिपुर-सुंदरी”शी .
एकीकडे पुरणाची चव जिभेवर घोळतेय ... एकीकडे लिंबू आणि पिठीसाखारेचा साल्सा नाकपुड्या आणि जीभ गाजवून सोडतोय , Backdrop ला लोणकढी तुपाचा धीरोदात्त सुगंध रुंजी घालतोय ... निस्ता धिंगाणा भाऊ ... अन यात वेलदोडा म्हणजे मल्टी-ष्टरार मूवी मध्ये अचानक अपेक्षा नसताना एखादा राजपाल यादव भाव खावून जातो तसा फ्रेश अपीयरंस !!
खरय ... त्रिपुरं व्यापून उरेल असं स्वर्गसुख तुम्हाला रोज नै मिळत महाराजा .... !! बघा तुम्हाला पण भेटतेय का ही "त्रिपुर-सुंदरी" कधी !!
-
ज्याक ऑफ आल ... ( कारण व्होल वावर ईज आवर )
ता.क. : देवानंद होणे – देवानंद ने जन्मभर एक से एक खुबसुरत नट्यांबरोबर काम केले पण लग्न मात्र त्यातील एकीशीही केलं नाही .
ईथे : ताटात अत्यंत छान पदार्थ असून सुद्धा मी ते खात नव्हतो ... पदार्थांच्या बाबतीत माझा “देवानंद झाला होता .”
प्रतिक्रिया
13 Sep 2016 - 4:19 pm | जेपी
कुंद्याच्या पोळीवर तुप टाकुन आणी लिँबु पिळुन खाणे भारी प्रकार आहे.
13 Sep 2016 - 4:22 pm | ज्याक ऑफ ऑल
करून पाहू लवकरच .... कुंदा ... म्हणजे करवीर नगरी न ?
13 Sep 2016 - 7:20 pm | जेपी
भाऊ,
मकरसंक्रांतीला तिळगुळ च्या पोळ्या करतात. त्याला आमच्याकडे कुंद्याच्या पोळ्या म्हणतात.
(मराठवाडी)जेपी
14 Sep 2016 - 11:45 am | ज्याक ऑफ ऑल
मला हा शब्द फक्त एक कोल्हापुरी गोड पदार्थाच्या संदर्भात माहित होता ....
7 Oct 2016 - 6:01 pm | राजाभाउ
नै ओ कुंदा खरतर बेळगावचा फेमस आहे. त्याच्या पोळ्या करतात का माहीत नाही
13 Sep 2016 - 4:22 pm | महासंग्राम
पुरणपोळी वाह वाचून तो.पा.सु.
13 Sep 2016 - 4:42 pm | यशोधरा
मस्त लिहिलेय!
14 Sep 2016 - 11:46 am | ज्याक ऑफ ऑल
मंडळ आभारी हे ...
13 Sep 2016 - 4:49 pm | पद्मावति
:) मस्त.
14 Sep 2016 - 11:47 am | ज्याक ऑफ ऑल
मंडळ आभारी हे ...
13 Sep 2016 - 4:52 pm | भटक्य आणि उनाड
+१११११११११११११११११११११११
14 Sep 2016 - 11:47 am | ज्याक ऑफ ऑल
मंडळ आभारी हे ...
13 Sep 2016 - 4:53 pm | सामान्य वाचक
पुरणपोळी हे माझे पहिले प्रेम
आता ती सुंदरी खाऊन पहिली पाहिजे
13 Sep 2016 - 4:59 pm | अजया
पुपो आवडत नाही पण तुमचा लेख आवडला!
13 Sep 2016 - 5:03 pm | सामान्य वाचक
मेरा दिल तोड दिया तुने
13 Sep 2016 - 5:16 pm | अजया
:(
पुपो न आवडणारी एकमेव देशस्थ ;)
13 Sep 2016 - 7:22 pm | जेपी
अरेरेरे..!
13 Sep 2016 - 5:06 pm | संजय पाटिल
वा!! असा प्रकार करून कधी पुरण पोळी खाल्ली नाही, आता एकदा खाउन बघतो. आणि त्या बरोबर भुरकायला जर कटाची आमटी असेल तर विचारायला नको..
13 Sep 2016 - 7:10 pm | बहुगुणी
वा!! असा प्रकार करून कधी पुरण पोळी खाल्ली नाही
काय भन्नाट वर्णन आहे! खाऊन पाहिलीच पाहिजे अशी त्रिपुरसुंदरी एकदा.
13 Sep 2016 - 5:10 pm | रातराणी
खुसखुशीत!
13 Sep 2016 - 7:16 pm | पगला गजोधर
पुढच्या वेळेस ह्या रोल् मधे कुरडइ कुस्करुन टाकुन प्रयोग करा !
13 Sep 2016 - 7:29 pm | एनिग्मा
पु.पो. आंबट सारात बुडवून खायला मज्जा येते. आणि सोबत पंचामृताचे चाटण. गौरी ला होतो असा स्वयंपाक आमचा कडे.
13 Sep 2016 - 7:50 pm | जव्हेरगंज
भारी!
13 Sep 2016 - 9:09 pm | आनंदयात्री
वा वा! तुमचे शतश: धन्यवाद या लेख बद्दल.
13 Sep 2016 - 11:02 pm | अत्रुप्त आत्मा
असं असतं तर ते सगळं!
13 Sep 2016 - 11:28 pm | टवाळ कार्टा
तुम्ही खा किलोभर साबुदाणा खिचडी
13 Sep 2016 - 11:07 pm | पैसा
लेख आवडला. वाचताना एक जुनी म्हण आठवली. "कोकणस्थाकडे किती आणि देशस्थांकडे कधी जेवायला मिळेल याचा भरवसा नाही." पण पुरणपोळीवर लिंबू? कल्पनाच करू शकत नाहीये.
13 Sep 2016 - 11:33 pm | अनन्त अवधुत
आदरवाईज पुरणपोळी आणि लिंबू?? झक्कास लिहिलंय.
14 Sep 2016 - 2:58 am | रुपी
छान लिहिलंय.
पुरणपोळी आणि तुपाची धार यानंतर मला बाकी काही थर द्यायला संयम राहणार नाही ;)
14 Sep 2016 - 3:06 am | रेवती
पिठीसारखरेपर्यंत सिक्वेन्स पाहिला होता, पण हे पुढील प्रकरण नव्याने वाचलं. नाही धाडस व्हायचं.
माझा मावसभाऊ सत्यानारायणाच्या शिर्यात आमटी घालून खातो व आमचे चेहरे पाहून त्यास चेव चढतो. त्याच्यामते फारच भारी चव असते.
14 Sep 2016 - 9:21 am | पगला गजोधर
माझा एक भाउ, आमरस आणि भात खातो, एक जण आमरस व कुरडइ आवडीने खातो,
एक मैत्रिण चहा व भात खाते....
14 Sep 2016 - 11:55 am | पद्मावति
गजोधर, आमरस आणि कुरडइ कॉंबिनेशन भन्नाट लागते. मला आवडतं. आमरस भात पण ऐकलंय पण ट्राय नाही केलं. बाकी शिर्याबरोबर आंब्याचे लोणचे कधीकधी बरं लागतं. एका सिंधी मैत्रिणीचं पाहून शिर्याबरोबर(खास करून कणकेचा) पापड मी नेहमीच खाते.
14 Sep 2016 - 11:57 am | पगला गजोधर
शिर्याबरोबर आंब्याचे लिम्बाचे लोणचे १+
14 Sep 2016 - 12:00 pm | पगला गजोधर
गरम गरम वरण भात तूप , घेऊन त्यावर पापड कुस्करून टाकायचा, अन लिंबाच लोणचं तोंडी लावायचं
*पापड शक्यतो बाजरीचा व कोळश्यावर शेकलेला हवा :)
14 Sep 2016 - 12:03 pm | पद्मावति
येस्स्स्स्स!!!
14 Sep 2016 - 8:56 pm | बोका-ए-आझम
पोळीत शेंगदाणे आणि बरोबर तिखट लोणचे किंवा ठेचा पाहिजे!
15 Sep 2016 - 6:45 pm | पगला गजोधर
बोकाजी
पुढच्या वेळेस प्रयोग करून जरूर पहा, फोडणीची पोळी, एअर फ्रायर मधे २०० सेंटी वर ३.५ मिनिटे फ्राय करा,
एक चमचा साखर पाणी स्प्रे करा, लिंबू पिळा. अन बघा कसं टेस्टी लागतंय.
15 Sep 2016 - 5:23 pm | रेवती
अहो भाया, वरण भाताबरोबर पापड, काकडीची कोशिंबीर, बटाट्याची पिवळी भाजी काय म्हणाल तो पदार्थ चांगला लागतो की हो..........
15 Sep 2016 - 6:46 pm | पगला गजोधर
+ आणि जिलेबी व मट्ठा ....
14 Sep 2016 - 9:18 am | प्रभास
चवदार धागा... :)
14 Sep 2016 - 9:30 am | बोका-ए-आझम
मग एक वाटी कटाची आमटी प्यायची, मग अजून एक पुरणपोळी, मग अजून एक वाटी आमटी... and so on. याला आमच्याकडे सिमेंट चढवणे असा शब्द आहे. बाकी देशस्थ जेवणाबाबत सहमत. पण स्वयंपाक करणारा/री क-हाडे पाहिजे.
14 Sep 2016 - 10:48 am | गणामास्तर
कटाची आमटी ओरपत पुरणपोळ्या खाणे हि खरी मजा. गुळवणी वगैरे प्रकार पुरणपोळी सोबत वाढणाऱ्या लोकांना
फटके द्यायची इच्छा होते.
7 Oct 2016 - 12:57 pm | नाखु
प्रकार नक्की का शोधला असावा याचाच शोध घेतला पाहिजे.
कटाची आमटी (तर्री जाळ असेल तर )अगदी भाकरी बरोबरही मस्त चवदार लागते. माझ्या मते कटाची आमटी नखरे न करणारे रसायन आहे...भाता बरोबर्,पु पो बरोबर्,भाकरी-साधी पोळीबरोबर तित्च्क्याच गुण्या गोविंदाने नांदते.
लेख आवडला.
14 Sep 2016 - 10:17 am | अनिरुद्ध प्रभू
आवडलं बर लेखन...उत्तम लिहिता..
14 Sep 2016 - 10:36 am | मुक्त विहारि
पुपो आणि आमरस (त्यातही केशर किंवा हापूस) हे माझे आवडते कॉबिनेशन.
बाकी पुपो खावी ती आमच्या सौ.च्या हातची.
तुपावर तळलेली पुपो, बाजूला चांदीच्या वाटीत घरगूती लोणकढे तूप, आमरस आणि जोडीला खंग्री वांग्याची भाजी किंवा झणझणीत खिमा असेल तर, स्वर्ग सूख.
बादवे,
पंचामृत आणि कटाची आमटी (डाळ शिजवतांना जास्त झालेले पाणी सांबार करतांना पण वापरता येवू शकते.) हे स्वयंपाकघरातील उरले-सुरले संपवण्यासाठी, एखाद्या गृहीणीने रचलेला कट आहे, असे माझे मत.
14 Sep 2016 - 11:33 am | बोका-ए-आझम
पुरणपोळी आणि खिमा? किंवा वांग्याची भाजी? मला तिन्ही आवडतात पण एकत्र नाही खाऊ शकत. आणि तुपावरच्या पुरणपोळीला परत तूप? Weird combination आहे हे!
14 Sep 2016 - 12:02 pm | पद्मावति
पुरणपोळी आणि खीमा यावर ''काहीही हं' ला भयंकर अनुमोदन पण तुपात तळलेली पुपो आणि वरती तूप.....आय हाय.....जन्नत!!!!! बाकी श्रीखांडावर तूप, शिर्यावर तूप पण अप्रतिम लागतं. तूप मी कशाबरोबरही खाऊ शकते =))
14 Sep 2016 - 12:22 pm | सामान्य वाचक
तूप कशातही घाला, पदार्थाची उंची फूटभर वाढते
Btw बेसनाचे लाडू कुस्करून त्यात तूप आणि पिठीसाखर घालून मस्त लागते
13 Oct 2016 - 12:56 pm | रानडेंचा ओंकार
याला पाचुंदा म्हणतात, ५ च्या पटीत लाडू घ्यायचे, लाडू कुस्करून त्यात तूप आणि पिठीसाखर... एक नंबर!!!
14 Sep 2016 - 1:09 pm | मुक्त विहारि
त्याचे काय आहे....
मस्त तुपावरची पुरणपोळी खाल्यावर, त्याची गोड चव जायला हवी, असे माझे मत.
मग २-४ घास भाकरीचे खीमा किंवा झणझणीत वांग्याच्या भाजी बरोबर खावून, जीभ थोडी हुळहूळून घ्यायची आणि मग पुपो खायची.
असो,
हा प्रकार एकदा ट्राय करून बघा.
एखादी पुपो अजून खाल.
14 Sep 2016 - 8:53 pm | बोका-ए-आझम
असल्यामुळे जरा विचित्र वाटलं.
4 Jul 2019 - 8:33 pm | mayu4u
आणि ज्याक दादा, सुंदर लिखाण!
मात्र अशी माझ्याच्याने पुपो खाल्ली जाईल का ह्याबाबत सांशक आहे.
14 Sep 2016 - 12:04 pm | सुबोध खरे
बाकी पुपो खावी ती आमच्या सौ.च्या हातची.
@मुवि
केंव्हा बोलावताय जेवायला?
11 Oct 2016 - 4:40 am | पारुबाई
तळलेली???
पहिल्यांदाच ऐकतेय.
14 Sep 2016 - 10:43 am | अजया
काहीही हां मुवि!
किंवा हाय कंबख्त! तुम्ही पंचामृत खाल्लंच नाहीत चांगलं!
14 Sep 2016 - 10:45 am | यशोधरा
पुपो ताकात बुडवून खाल्लीय का कोणी? ;)
14 Sep 2016 - 11:34 am | बोका-ए-आझम
:(
14 Sep 2016 - 11:51 am | यशोधरा
अरेरे ;)
15 Sep 2016 - 5:22 pm | रेवती
ए, ह्या, असलं काही नसतं. उगा, पदार्थाचे अपमान करत फिरु नका..........
15 Sep 2016 - 6:24 pm | यशोधरा
असतं, असतं, असतंच मुळी.
16 Sep 2016 - 9:43 am | मुक्त विहारि
माझा धाकटा मुलगा, पुपो अशीच खात असे.
14 Sep 2016 - 10:57 am | मृत्युन्जय
पुपो वीक पोइंट आहे. आता ही त्रिपुरसुंदरी कधी खाइन की नाही हे मात्र सांगता येत नाही
14 Sep 2016 - 11:53 am | ज्याक ऑफ ऑल
वरील सगळ्या असल्या नसल्या "कौतुक्यांचे" फार्फार आभार ...
२-३ पोस्ट वर तेच ते कॉपी पेस्ट केल्या नंतर लक्षात आलं की हे सगळ्यांना म्हणायला (टायपायला) फार अवघड जाणार .
त्यामुळे आपली ही "ब्लॅंकेट आभार" सोय . (मात्र भावना जुनून आहे बरकां )
(आणि खरं कारण हे ... की एक चित्पावन सारखं सारखं धन्यवाद तरी किती वेळा म्हणणार न ?? त्रास होतो हो !!)
14 Sep 2016 - 12:37 pm | सस्नेह
ही त्रिपुरसुंदरी काय ? एकदा पहिली पाहिजे ट्राय करून !
लेख झकास ! कोल्लापुरी काय तुमी ?
14 Sep 2016 - 12:41 pm | सतिश गावडे
या धाग्यावर देशस्थ/कोकणस्थ/कर्हाडे/चित्पावन वगैरे नसलेल्यांनी प्रतिसाद दिले तर चालतील का? =))
18 Sep 2016 - 9:43 pm | ज्याक ऑफ ऑल
काही हरकत नाही ...
14 Sep 2016 - 12:48 pm | अभ्या..
च्यायला ह्या नावाचे एक थ्रीस्टार हॉटेल आहे सोलापुरात तेवढे म्हाईते.
14 Sep 2016 - 5:51 pm | असंका
हांना....मला पण वाटलेलं त्या हॉटेलबद्दलच काहीतरी असेल म्हणून!!
लेख मात्र लैच भारीये.
14 Sep 2016 - 1:24 pm | सिरुसेरि
छान लेख . देवानंदने कल्पना कार्तीकशी लग्न केले होते ( टॅक्सी ड्रायव्हर , नौ दो ग्यारह फेम ) .
15 Sep 2016 - 4:04 pm | ज्योति अळवणी
देशस्थी जेवणावळी खरच मजा आणतात. माझ्या ओळखीचे एक काका... खर नात नाही; वडिलांचे मित्र म्हणून काका........... एक ताट जिलब्या एका वाढण्यात फस्त करतात. मी स्वतः डोळ्यांनी बघितले आहे. आणि परत खाता याव म्हणून मग मध्ये गरम गरम वरण भात खातात.
अर्थात हा पुरणपोळी प्रकार झक्कास वाटला. मात्र करून बघण्याची हिम्मत नाही.
7 Oct 2016 - 3:40 am | अर्धवटराव
फार काहि अवघड नाहि. तोंडी लावायला भरपूर भजे आणि मट्ठा/ताक पाहिजे मात्र. किंवा एक लिटर दूध, साखर न घालता :)
15 Sep 2016 - 11:52 pm | चित्रार्जुन
लै भारी
6 Oct 2016 - 10:20 pm | अरिंजय
पुढल्या बारीला नक्की अशीच खाणार
7 Oct 2016 - 10:36 am | प्रीत-मोहर
सुंदर लिखाण मात्र अशी माझ्याच्याने पुपो खाल्ली जाईल का ह्याबाबत सांशक.
7 Oct 2016 - 2:10 pm | मितान
लेख आवडला !
देऊळगाव राजा ला बालाजीचे जे संस्थान आहे तिथे तिथे त्रिपुर सुंदरी हा नैवेद्य असतो. तिथे नात्यातल्या पुजाऱ्यांकडे खाल्लाय हा प्रकार.
7 Oct 2016 - 4:00 pm | केडी
कसला धमाल लेख लिहिलाय!! मी फार गोड खात नाही पण पुढल्या वेळी पुरणपोळी समोर आली की नक्की करून बघणार!
लिहीत राहा.....
11 Oct 2016 - 12:20 am | palambar
बेस्टच!
11 Oct 2016 - 10:02 am | chitraa
चान
11 Oct 2016 - 11:05 am | सविता००१
ऐकला पण नाहीये हा प्रकार. पाहिलं पाहिजे अस करून
12 Oct 2016 - 6:46 pm | सूड
उजव्या हाताने तूप वाढलेली पुरणपोळी आणि किंचितसं लिंबू पिळलेली कटाची आमटी !! स्वर्गीय काँबिनेशन!! तशी पुरणपोळी कशासोबतही आवडते पण त्यातल्या त्यात हे बेस्ट.
आमरस-भात हापिसातल्या एका महाभागाने सांगितला म्हणून ट्राय केला होता. त्याने वर्णन केल्याइतका ब्रह्मानंदी टाळी लागणारा नसला तरी चव बर्यापैकी बरी होती. साधारण वाटीभर वाफाळत्या भातावर, किमान दोन चमचे तूप आणि वाटीभर आमरस!!
16 Oct 2016 - 10:41 am | nanaba
लेख आणि प्रतिक्रिया वाचून वजन वाढले :LOL: