उकडीचे मोदक - एक ब्लेमगेम!

पिलीयन रायडर's picture
पिलीयन रायडर in पाककृती
8 Sep 2016 - 8:44 pm

डिस्क्लेमरः-
इथे तुम्ही नेहमीच एकाहुन एक सरस पाकृ पहाता. पण ते म्हणजे कसं की सेलेब्रेटींचं आयुष्य रुपेरी पडद्यावर पाहिल्या सारखं आहे. सामान्यांच्या व्यथा तुम्हाला कशा कळाव्यात? तर समाजातलया तळागाळातल्या लोकांच्या स्वयंपाकघरात काय घडतं ह्याच विदारक चित्रण ह्या पाकृ मध्ये आहे. हृदय हेलावणारे काही फोटो आहेत. कोमल मनाच्या लोकांनी पाहु नका!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

तर काय झालं की गणपती आले.. मग सगळीकडे मोदकांचे फोटोच फोटो.. साधेसुधे नाही, उकडीचे! आम्ही इथे अमेरिकेत, जिथे आई नाही की चितळे नाहीत की मोदक करुन आयते खाऊ घालतील. (आय ब्लेम अमेरिका!). त्यात पुन्हा वॉट्सअ‍ॅपवर मेसेज की कसं कोकणातल्या समुद्र किनार्‍यावरच्या वातावरणामुळे तिकडे उकडीचे आणि घाटावर तळणीचे मोदक असतात. मग मी म्हणलं की आपण आता घाटावरुन काठावर आलो ना (अ‍ॅझ इन इस्ट कोस्ट!) मग करावे का उकडीचे? (आय ब्लेम वॉटसॅप). मग काय झालं की मोदकांचे फोटो पाहुन पाहुन शेवटी एकाक्षणी माझ्या रिकाम्या (अ‍ॅझ इन प्रचंड रिकामटेकड्या!) मनाने निर्णय घेतला की आपण सुद्धा यंदा उकडीचेच मोदक करायचे.

एक भारतात फोन, एक स्रुजाला, एक माबोच्या लिंकला भेट आणि एक युट्युब रेसेपी ह्यावरुन माझं मत असं झालं की उकडीच्या मोदकांची उगाच हाईप आहे, हे काय कुणालाही जमतील. स्रुजाला जमले हे कळल्यावर तर माझा आत्मविश्वास दुप्पट झाला! ;) त्यात वर कुणीतरी म्हणे की इडीअप्पमच्या पीठाचे म्हणे फार छान मोदक होतात. आणि काय योगायोग बघा, घरात इडीअप्पमचं पीठ! त्यावर घटक पदार्थ - तांदुळ पीठ असं लिहीलेलं. म्हणलं असेल अजुन काहीतरी बारिक वगैरे दळलेलं पीठ.

तर तमाम जनतेने सांगितल्या प्रमाणे जाड बुडाच्या भांड्यात दोन कप पाणी उकळायला ठेवलं, त्यात तुप आणि मीठ टाकलं. उकळलं की त्यात बरोब्बर दोन कप इडीअप्पम पीठ टाकलं. टाकता क्षणी हलवलं आणि तत्क्षणी ते उपम्यासारखं दिसु लागलं!

upma

म्हणलं वाफ काढलं की होत असेल बुवा नीट. म्हणुन त्यावर झाकण ठेवलं. हां आता इंडक्शन कमी करायला विसरले मी जराशी पण म्हणुन काय ३० सेकंदात त्या पिठाने करपावं?? (आय ब्लेम इंडक्शन!) अर्धं पीठ जीवाच्या आकांताने तळाला चिकटलं होतं. मी जरासं हलवुन काय पाहिलं, सगळ पीठ काळं काळं दिसायला लागलं. मन घट्ट करुन ह्याचे काही मोदक होत नाहीत हे सत्य मी स्वीकारलं आणि नवर्‍याला फोन लावला. उकड चुकेल किंवा मोदक फुटतील अशा अपेक्षा त्याला होत्याच, पण उकड जळाली?? त्याचं खदाखदा हसुन झालं की म्हणलं बाबा तू घरी ये लवकर. आपण परत नुसतं तांदुळाचं पीठ घेऊन करुन पाहु.

ह्यावेळेस कुकरच घेतला डायरेक्ट. मागच्या वेळेस जे भांड घेतलं त्याचं बुड पुरेसं जाड नव्हतं वाटतं (आय ब्लेम भांडं!). पुन्हा दोन वाट्या पाणी उकळायला ठेवलं. ह्या वेळेस मात्र एक वाटी पिठ (अपना बझार तांदुळ पीठ - आणि अर्थातच आय ब्लेम अपना बझार) घातल्या घातल्याच ते चांगलंच मिळुन आलं. मी जात्याच चाणाक्ष असल्याने रेसेपीने काहीही सांगितलं तरी अजुन पिठ टाकलं नाही. मला चांगलं आठवत होतं की स्रुजाने सांगितलं होतं "चांगली दणदणीत वाफ काढ!". मग खाली लागत नाही ना हे सतत बघत दणदणीत वाफ काढली. (ऑफकोर्स, आय ब्लेम स्रुजा!). मनासारखी वाफ काढली की त्याला ताटात घेतलं आणि शक्य तेवढं मळलं. एवढी गरम उकड, पण मी हुं की चुं केलं नाही. फार सोशिक आहे हो मी. फायनली घेतला एक लहानसा गोळा आणि अक्षरशः तुपात बुडवुन बुडवन, चारदा मळुन, गोल गोल गरगरीत करुन मोदक करायला घेतला. पण हाय रे माझ्या कर्मा.. त्याला बारिक बारिक तडे जायला लागले. पहिला मोदक भुताचा म्हणुन दुसरा घेतला तर त्याचाही तोच अवतार..! वाफच कमी पडली बै म्हणुन परत ते सगळं प्रकरण पुन्हा कुकर मध्ये टाकुन परत दणदणीत वाफ काढली (स्रुजाच.. टु बी ब्लेमड )परत ते सगळं ताटात घेतलं आणि परत मोदक करण्याचा प्रयत्न चालवला.

उद्या तुम्हाला कुणी भाताची मुद देऊन ह्याचा मोदक करुन दाखव आणि कळ्या नाजुक काढ हं असं सांगितलं तर तुम्ही त्याच्या डोक्यात काय घालाल? मी कुकर घालेन..! भाताला आकार दिल्यासारखा आम्ही आपला प्रयत्न करतोय करतोय, त्या मोदकाचे तुकडेच व्हायला लागले. तरी मी बळं बळं सारण भरुन एक मोदक सदृश आकार बनवला. पण पुढच्याला मात्र सारण सुद्धा बाहेर येउन "काय चेष्टा लावलीये राव?" म्हणु लागलं.. मग त्याला "गप रे..गप" म्हणुन लाडु कसे वळतो आपण, तसं वळुन गप्पं करुन टाकलं. ह्या नादात त्याचा लाडुच झाला. तिकडे नवरा गेले साडे अकरा मिनिटं एक मोदक करायचा प्रयत्न करत होता.. मी जोरजोरात कुणा कुणाला ब्लेम करता येईल त्याची लिस्ट काढत होते..

"एक म्हण आहे ना ग!! आठवत नाही मला नीटशी.. काही तरी वाकडं.. कुणाचा तरी नाच.."

आय डेफिनाईटली ब्लेम नवरा..!

अखेर बर्‍याच झटापटीनंतर "उकडीचे लाडु" झाले. ते आधीच इतके शिजले होते की नाममात्र रेसेपी सेक ३० सेकंद वाफ काढुन आम्ही ते खायलाही घेतले. खाताना बाजुला सारणाचं भांडं घेतलं. एक घास मोदकाचा घेतला की एक बकाणा वर सारणाचा भरायचा.

सुंदरच लागत होते लाडु.. आपलं.. उकडीचे मोदक!

Modak Ladu

------------------------------------------------------------------------------------

ताजा कलमः-

मी मोदक लाडुंची पाककृती टाकल्यावर ४-५ तासातच मला इतके सल्ले मिळाले की का कोण जाणे परत एकदा मला "उकडीचे मोदक काही अवघड नाहीत" असं वाटायला लागलं. (स्रुजाला जमतात म्हणजे काय!!) ताडकन उठुन मी वाटीभर पाणी मीठ आणि तुप घालुन उकळलं. त्यात बरोब्बर एक वाटी पीठ टाकलं आणि लगेच इंडक्शन बंद करुन पटापट हलवलं. इंडक्शन बराच वेळ चांगलंच तापलेलं रहातं म्हणुन भांडं बाजुला सरकवलं आणि झाकुन ठेवलं. साधारण ५-६ मिनिटांनी ताटात घेऊन मळलं. सुमारे ५ मिनिटं पाणी आणि तुपाचा हात लावत लावत पुष्कळ मळल्यावर छोटा गोळा घेतला आणि मोदक करायला सुरवात केली. अगदी सुगरणीसारख्या मोदकाच्या कळ्या आल्या नसल्या तरी किमान कळ्या करता तर आल्या! सारण भरुन हलक्या हाताने मोदक बंद केला. असे ६-७ मोदक झाले. आणि मग ५ च मिनिटं वाफ काढली कारण मुळ उकडीत फार कच्चटपणा नसल्याने फार उकडायची गरज वाटली नाही.

आता बाप्पा करो आणि मला अमेरिकेतल्या भिकार सोना मसुरी नामक फडफडीत तांदुळाच्या ऐवजी भारतातल्या सुरेख तांदुळाची पिठी मिळो आणि बारिक बारिक कळ्या असणारा टप्पोरा मोदक माझ्या हातुन घडो!!

बघा तीन पैकी दोन मोदक किती चांगले जमलेत! आता एक भुताचा म्हणुन सोडुन द्यायचा!!

a

प्रतिक्रिया

हा हा हा. पिरावती देवींचे पाकप्रयोग भरपूर चाललेत. सगळे फोटू द्यायलाच हवेत असे नाहे गं. ;)

पिलीयन रायडर's picture

8 Sep 2016 - 10:05 pm | पिलीयन रायडर

अगं जगाच्या कल्याणा संतांच्या विभुती! उकडीच्या लाडवांची पाकृ जनमानसात रुजवण्याची तळमळ आहे हो!

ऐका जरा मिसेस रामतिर्थकरांची लेक्चरे!

पिलीयन रायडर's picture

8 Sep 2016 - 10:09 pm | पिलीयन रायडर

तीच ऐकुन नवर्‍याची "सेवा" चालवली आहे ना!

इरसाल's picture

9 Sep 2016 - 9:28 am | इरसाल

याला तुम्ही नवर्‍याची "सेवा" म्हणत असाल तर.......तर तर...

...तर अच्छे दिन अजून खूप लांब आहेत.

आनन्दिता's picture

9 Sep 2016 - 1:19 am | आनन्दिता

लोल :)

प्रियान's picture

8 Sep 2016 - 10:07 pm | प्रियान

पिरा !! :D :D

तू सगळे नियम पाळून (सुद्धा) जर मोदक बिघडले तर पिठाला blame करू शकतेस ;)
"इकडे कोकण/मुंबई सारखे मोदकाचे पीठच कसे मिळत नाही !!! " असे म्हणून.

पिलीयन रायडर's picture

8 Sep 2016 - 10:08 pm | पिलीयन रायडर

नाहीच मिळत!! लोक अग्र्जच्या तांदुळ पिठ्या आणतात पुण्याहुन, फ्रिज करुन ठेवतात, म्हणुन त्यांचे मोदक चांगले होतात हो! बाकी काही सुगरणपणा नाहीये त्यात! ;)

आजच इथली स्वाद ची तांदूळपिठी आणून त्याचे सुंदर मोदक केले.. त्यामुळे अग्रजचीच पिठी पहिजे असे काही नाही हा.

मानसी१'s picture

8 Sep 2016 - 10:20 pm | मानसी१

हा हा हा. अगदी खदखदुन हसले.
बाकी उकडीचे मोदक ज्याना जमतात त्याना जमु दे बाबा.
मी पण उकडीच्या गोळ्या बरोबर भरपुर टाइमपास करुन झाल्यावर शेवटी हार मानली. आता अजीबात भानगडीत पडत नाही. सरळ उकडीच्या करंज्या करते. एकदम सोपा प्रकार

मानसी१'s picture

8 Sep 2016 - 10:20 pm | मानसी१

हा हा हा. अगदी खदखदुन हसले.
बाकी उकडीचे मोदक ज्याना जमतात त्याना जमु दे बाबा.
मी पण उकडीच्या गोळ्या बरोबर भरपुर टाइमपास करुन झाल्यावर शेवटी हार मानली. आता अजीबात भानगडीत पडत नाही. सरळ उकडीच्या करंज्या करते. एकदम सोपा प्रकार

सर्वात वाइट वाटलं ते इतक्या विनोदी लेखाला विकिछाप प्रतिसाद देऊन सूड घेतला गेला आहे याचं.
आमच्याकडेही बाप्पाचा प्रसाद जाहिर केला आणि मी सांगितल्याप्रमाणे हिने मोदक करून दिले पण चवीला उजवे झाले तरी रूपाला डावे झाल्याने पाकृ दिली नाही.बाकी पिरा मोदक पाकृती लेखन सेक्सी का काय ते झाले आहे.

आमचा ब्लेमगेम आमच्यावरच होता हे राहिलं.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Sep 2016 - 10:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदरच दिसत आहेत लाडु.. आपलं.. उकडीचे मोदक! =)) =)) =))

लेखाची पाकृ खास जमली आहे. पुढच्या वेळेस पनीर वापरुन पहा व नंतर ते खाल्लेल्या लोकंचे फोटो टाका ;) :)

ह्याला म्हणतेत परफेक्त मापं काढणं. एक्काकाका तुमच्याकडे काय मेनूय यंदा?

पिलीयन रायडर's picture

8 Sep 2016 - 10:53 pm | पिलीयन रायडर

खाल्लेल्यांचे फोटो मात्र अगदी बघणेबल गोष्ट असेल हो!!

मोदक असले
कसले फसले
वाचक सगळे
फिसकन् हसले!

पिरा ताई: मिपावरच्या उपवासाची साबुदाण्याची बॅचलर थालिपीठे आणि अ‍ॅक्सिडेंटल वडे अशा अजरामर फसलेल्या पाककृतीं मध्ये स्वागत असो!

नेहमीप्रमाणेच खुसखुशीत लेखन!

असेच लेख येत राहिले तर मिपाचा नंबर लवकरच पहिला येणार ;)!

नूतन सावंत's picture

8 Sep 2016 - 10:48 pm | नूतन सावंत

पिरा,तुझे राईस बॉल आपलं ते हे,उकडीचे मोदक झकास झालेत.

स्रुजाच्या नादि लागलीस!मग काय बोलावे ?
लाडुरुपी मोदक धमाल जमलेत!

भोळा भाबडा's picture

8 Sep 2016 - 10:58 pm | भोळा भाबडा

शेवटच्या चित्रात जे आहे ते--- चंद्रावर कि मंगळावरचे असे दगडगोटे आहेत म्हणे!!

अलका सुहास जोशी's picture

8 Sep 2016 - 11:25 pm | अलका सुहास जोशी

Hahaha.पिलियन रायडर....मोदक नही जम्या पण ल्हिणं जमून आलंय. मस्त. बाकी उकडीचे मोदक अती hyped पाकृ होय!!

स्वीट टॉकर's picture

8 Sep 2016 - 11:46 pm | स्वीट टॉकर

हसून हसून पुरेवाट झाली ! क्लास लिखाण ! लेखाला नाव पण कसलं परफेक्ट दिलं आहेत!

मला पंधरा वीस वर्षांपूर्वीची आठवण झाली. मी कोकणस्थ, स्वीट टॉकरीणबाई देशस्थ. एक दिवस म्हणाली, "काय तुमच्या उकडीच्या मोदकाचं कौतुक, करून बघतेच!" मला आणि पुनवला बाहेर पिटाळलं. आम्ही तासाभरानी खेळून घामाघूम घरी परतलो. स्वयंपाकघरात डोकावलो तर स्वीट टॉकरीणबाई आमच्यापेक्षा जास्त घामेजलेली! चेहर्यावर हताश भाव! मला काही विचारायचं धाडसंच झालं नाही. तिनी आत्यंतिक तळमळीनी फक्त तीन शब्द उच्चारले, "चिकचिकाट आणि रबरबाट!"

आणि तिघेही हसून हसून गडाबडा लोळलो!

आता आमच्याकडे नियमितपणे उकडीचे मोदक असतात. 'जोशी फूड्स्' मधून आणलेले.

पिलीयन रायडर's picture

8 Sep 2016 - 11:51 pm | पिलीयन रायडर

=))

अगदी अगदी!!! सगळी भांडी तुपकट नाहीतर चिकट!

बाबा योगिराज's picture

8 Sep 2016 - 11:58 pm | बाबा योगिराज

आम्हाला कुंग-फु-पांडेंचे डम्पलिंग्स खायला मिळाले नै,
आय तर लगेच ब्लेम पिरा तै.

लेख तर लेख, प्रतिक्रिया पण भारी.

बाबा योगीराज.

स्मिता_१३'s picture

9 Sep 2016 - 3:02 am | स्मिता_१३

मोदक नाहीत पण लेख मात्र फक्कड झालाय पिरा __/\__

पिलीयन रायडर's picture

9 Sep 2016 - 4:04 am | पिलीयन रायडर

ताजा कलमः-

मी मोदक लाडुंची पाककृती टाकल्यावर ४-५ तासातच मला इतके सल्ले मिळाले की का कोण जाणे परत एकदा मला "उकडीचे मोदक काही अवघड नाहीत" असं वाटायला लागलं. (स्रुजाला जमतात म्हणजे काय!!) ताडकन उठुन मी वाटीभर पाणी मीठ आणि तुप घालुन उकळलं. त्यात बरोब्बर एक वाटी पीठ टाकलं आणि लगेच इंडक्शन बंद करुन पटापट हलवलं. इंडक्शन बराच वेळ चांगलंच तापलेलं रहातं म्हणुन भांडं बाजुला सरकवलं आणि झाकुन ठेवलं. साधारण ५-६ मिनिटांनी ताटात घेऊन मळलं. सुमारे ५ मिनिटं पाणी आणि तुपाचा हात लावत लावत पुष्कळ मळल्यावर छोटा गोळा घेतला आणि मोदक करायला सुरवात केली. अगदी सुगरणीसारख्या मोदकाच्या कळ्या आल्या नसल्या तरी किमान कळ्या करता तर आल्या! सारण भरुन हलक्या हाताने मोदक बंद केला. असे ६-७ मोदक झाले. आणि मग ५ च मिनिटं वाफ काढली कारण मुळ उकडीत फार कच्चटपणा नसल्याने फार उकडायची गरज वाटली नाही.

आता बाप्पा करो आणि मला अमेरिकेतल्या भिकार सोना मसुरी नामक फडफडीत तांदुळाच्या ऐवजी भारतातल्या सुरेख तांदुळाची पिठी मिळो आणि बारिक बारिक कळ्या असणारा टप्पोरा मोदक माझ्या हातुन घडो!!

बघा तीन पैकी दोन मोदक किती चांगले जमलेत! आता एक भुताचा म्हणुन सोडुन द्यायचा!!

Modak

रुपी's picture

9 Sep 2016 - 4:20 am | रुपी

वा! मस्तच!
बाकी तुझं लेकरू तुला इतके प्रयोग करु देतं आणि लिहायलाही वेळ देतं म्हणजे फारच गुणी हो :)

पिलीयन रायडर's picture

9 Sep 2016 - 5:08 am | पिलीयन रायडर

अगं भलतं गुणी आहे ते!

पिलीयन रायडर's picture

9 Sep 2016 - 5:08 am | पिलीयन रायडर

अगं भलतं गुणी आहे ते!

पिलीयन रायडर's picture

9 Sep 2016 - 5:08 am | पिलीयन रायडर

अगं भलतं गुणी आहे ते!

रेवती's picture

9 Sep 2016 - 6:29 am | रेवती

सही जा रही हो.

इरसाल's picture

9 Sep 2016 - 9:40 am | इरसाल

हे मोदक तुमच्या "कुंकवाने" बनवलेत ना ;)

सूड's picture

9 Sep 2016 - 4:00 pm | सूड

जमलं की!!

आता उगाच उपदेशाचे बोलः मुखर्‍या करताना आपली तर्जनी पारीच्या आतल्या भागात ठेवायची आणि जिथे तर्जनी असेल, पारीचा नेमका तो भाग अंगठा आणि मधल्या बोटाच्या चिमटीत धरायचा. असं केलं तर आरामात ९-१० मुखर्‍या होतात.

पिलीयन रायडर's picture

9 Sep 2016 - 5:27 pm | पिलीयन रायडर

हो कळ्या काढता येतात मला बर्‍यापैकी पण कालच्या उकडीच्या सुद्धा कडा तुटत होत्याच. पण किमान कळ्या सदृश काही करता तर येत होतं हीच काय ती समाधानाची बाब. आता अजुन प्रॅक्टिस करुन उकड करते.

पण तुमच्यामुळेच जमलं हां!!

तुम्ही आणि सईने फार छान टिप्स दिल्या!

धन्यवादः ।

किती किती वेळा शाब्बासकी देऊ तुला. तुझ्या उत्साहाला आणि चटकन शिकण्याला माझा त्रिवार सॅल्युट.
मस्त झाले आहेत मोदक. आता पुढच्या वर्षी बप्पा नाचत नाचत येतील तुझ्या हातच्या मोदकांचा नैवेद्य खायला मिळणार म्हणून.

हा फोटो बघून न जाणो का वाटलं की पिरातै ट्रोलिंग करतायेत. =))

पिलीयन रायडर's picture

9 Sep 2016 - 8:59 pm | पिलीयन रायडर

??
कळालं नाही हो!

पण काल मल मोदक जमले आहेत ह्याला माझा नवरा, फेसबुक आणि स्रुजा साक्षी आहे!!
टाईमस्टॅम्प्स दाखवु का?! =))

स्रुजा's picture

9 Sep 2016 - 9:27 pm | स्रुजा

नवरा डझ नॉट काऊंट ! :प तो आधीच्या मोदकांना पण छान म्हणालाय आम्हा सगळ्यांच्या साक्षीने.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Sep 2016 - 9:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

आणि फेस्बुकावर तर लोक स्वतःबद्दल कायपण लिहितात, म्हणजे तो पण फाऊलच आहे. एकंदरीत हा दावा २/३ बहुमताने फेटाळला गेलेला आहे. :)

पिलीयन रायडर's picture

9 Sep 2016 - 9:42 pm | पिलीयन रायडर

टाईमस्टॅम्प चे फोटो टाकण्यात येतील!

पिलीयन रायडर's picture

9 Sep 2016 - 9:54 pm | पिलीयन रायडर

तू घोडे साक्षीदार आहेस ना माझी.. मग गप की!!!

बेवफा सनम कुणीकडची! =))

मी आहेच की साक्षीला. पण नवरा डझ नॉट काऊंट :प

नूतन सावंत's picture

29 Sep 2016 - 9:59 pm | नूतन सावंत

पिरा,उकड खूप मळून घ्यावी लागते.तेलपाण्याचा हात लावून आणि ती सुद्धा गरम असतानाच.म्हणजे तुटत नाही पारी.

स्मिता_१३'s picture

9 Sep 2016 - 6:36 am | स्मिता_१३

१००

अभिजीत अवलिया's picture

9 Sep 2016 - 6:43 am | अभिजीत अवलिया

धाग्याच्या शतकानिमित्त सर्वाना 2-2 उकडीचे मोदक मिळतील खास पिरा ताईने बनवलेले

मंजूताई's picture

9 Sep 2016 - 7:47 am | मंजूताई

कोशिश करनेवालोंकी कभी हार नही होती .... स्वानुभव :) शुभेच्छा!मोदक करण्यात अयशस्वी झाली असली तरी निर्दोषत्व सिध्द करण्यात यशस्वी :) लेख उत्तम जमलाय..

तुषार काळभोर's picture

9 Sep 2016 - 8:48 am | तुषार काळभोर

काटेकोर बनवणे, सुंदर प्रेझेंटेशन, उत्कृष्ट फोटो, झक्कास एण्डप्रॉडक्ट हे सगळं एकत्र करून पाककृती टाकायला 'कौशल्य' लागतं.
अज्जिबात न जमलेला पदार्थ खुसखुशीत शैलीत मिपावर टाकायला डेरिंग लागते.
आणि फिनिक्सप्रमाणे भरारी घेत मस्स्त उकडीचे मोदक बनवायला मिपाचं सदस्यत्व लागतं.

हाबिणंदन ओ...

जयंत कुलकर्णी's picture

9 Sep 2016 - 8:52 am | जयंत कुलकर्णी

मोदक : शुभांगीताईंची मोदक करण्याची (ते मधे जाड ठेवायचे इ.इ. पद्धत मस्त आहे.

शुभांगी ताईंनी केलेले चिकन मात्र फार मस्त होते. मोदक आता बायकोला करायला सांगणार आहे. पण सूड यांनी सांगितलेली टीप वाचायला देऊन.... :-)

सामान्य वाचक's picture

9 Sep 2016 - 9:02 am | सामान्य वाचक

100 झाले पिराबै

हाबीनंदन

राजेश घासकडवी's picture

9 Sep 2016 - 9:23 am | राजेश घासकडवी

पिलियन रायडर,

तुम्ही पण ना! तुम्हाला मोदक बिलकुल जमत नाहीत (आय ब्लेम पिरा) हे ठीक आहे. (बऱ्याच जणांना जमत नाहीत. फेसबुकवर टाकलेले बहुतेक फोटो शॉप्ड असतात. जगात खरं तर फारच थोडे मोदक बनतात. त्यांचेच वेगवेगळ्या अॅंगलने फोटो काढून खपवले जातात.) पण म्हणून तुम्हाला मार्केटिंग सुद्धा जमू नयेत असं नाही. अहो, तुमच्या मोदकांना वर चेपून थोडा सोंडेसारखा आकार करता आला असता तर अष्टविनायक म्हणून खपवता आले असते तुम्हाला. त्यातले काही मोदक ऑलरेडी दिसताहेत तसे. पण तुम्हाला रडगाणं गाण्याची हौसच दिसते (आय ब्लेम पिरा)...

पिलीयन रायडर's picture

9 Sep 2016 - 5:25 pm | पिलीयन रायडर

अय्या हो की!! अष्टविनायक करुन रंगभुषा मंडळाकडे फोटो पाठवला असता तर बॅनर झालं असतं की हो!!!

श्या..... गेला ना चान्स!

पण आता मोदकलाडुंवर आणि त्यतुन बनणार्‍या गणपतीवर मी कॉपीराईट जाहिर करत आहे. घासुगुर्जिंणा मानधन देण्यात येईल.

साती's picture

9 Sep 2016 - 9:39 am | साती

मोदक बघून दहा मिनीटं हसत राहिले.
त्यातही हा प्रकार बिना सारणाचा आहे कळल्यावर जास्तच.

:)

पिलीयन रायडर's picture

9 Sep 2016 - 5:16 pm | पिलीयन रायडर

आहे आहे.. सारण आहे त्यात!!! फक्त आवरण जरासं जाड झालं इतकंच.. म्हणुन सारणाचा बकाणा ग!!!

साती's picture

9 Sep 2016 - 10:15 am | साती

एका कोंकण्याने एक घाटी बायको केली.
आधीच सासू सूनेचे पटत नाही, त्यात हा कल्चरल डिफरंस.
सासू गावाला रहायला गेली.
इकडे कोंकण्या आपला कोंकणी पदार्थाची आठवण काढून संत्रस्त!

गणपरीच्या दिवसांत कोंकण्या 'आईच्या हातचे उकडीचे मोदक' आठवून सुस्कारे सोडायला लागला.
बायको शेवटी वैतागलीम, म्हणाली करते हो मोदक.
सासूला फोन लावला.
'सासूबाई, हे तुमच्या हातचेच उकडीचे मोदक खायचं म्हणतायत. तसं तर बाकी मला माहित्येय , पण तरी तुम्हाला फोन केला'

(खरंतर सूनेला उमो माहितही नव्हता, तिने कधी खाल्लाही नव्हता आणि रेसिपीही माहित नव्हती. पण सासूसमोर कबूल कसं करणार?)

'सूनबाई, पहिले पारीसाठी तांदूळपिठी, पाणी , लोणी घे हो! '
'ते मला माहित्येय, पुढचे सांगा'
'पिठी अगदी बारिक दळलेली हवीय हो'
'ते मला माहित्येय, पुढचे सांगा'
'लोणी अगदी ताजे हवे हो'
'ते मला माहित्येय, पुढचे सांगा'
'सारणासाठी एक नाऱळ पूर्ण खवून घे हो, आणि गूळ, जायफळ'
'ते मला माहित्येय , पुढचे सांगा'
'नारळाच्या चवात नारणाची पाठ येता नये हो'
'ते मला माहित्येय, पुढचे सांगा'

आता मात्र साबांचा संयम संपला.
सूनेला काहिही माहित नाही तरी शहाणपणा दाखवत्येय ते कळलं.
' आणि काय गो, पूढचे सगळे तुला माहितीय तसेच. कर एकत्र आणि काढ उकडी'

'हो , हो! इतकेच ना. आम्ही पण असेच करतो.मला वाटलं हे इअतकं सांगतायत तर तुमची काही स्पेशल पद्धत असेल'

आणि फोन बंद केला

नवरा जेवायला घरी आला. गोडसर नारळा गूळाचा वासतर छान येत होता.
आता मोदक खायला मिळेल अशा स्वप्नरंजनात असताना बायको म्हणाली,
' आज केलेत हो मी तुमचे ते उकडीचे मोदक. चांगले मोठेठे पातेले भरून केलेत, तुम्हाला किती पळ्या वाढू?'

......
तर हा की अश्याच टायपाचा जोक आमच्या लहानपणी 'पळीवाढे मोदक' म्हणून प्रसिद्ध होता आणि उकडीचे मोदक करायच्या प्रत्येक वेळी हा जोक आठवला जायचाच!

स्मिता चौगुले's picture

9 Sep 2016 - 10:42 am | स्मिता चौगुले

हे हे माझी आज्जी अशी पुरणपोळीची गोष्ट सांगायची.

पैसा's picture

9 Sep 2016 - 11:46 am | पैसा

अग त्यांच्याकडे तळलेले मोदक असतात म्हणे! मी तळलेला मोदक पहिल्यांदा बघितला तेव्हा ओल्या नारळाच्या करंज्या करायच्या सोडून हे असले नसते धंदे का केलेत असं वाटलेलं. आजकाल लोक कशालाही मोदक म्हणतात बै असं शंभरदा म्हणाले असेन. =))

स्मिता चौगुले's picture

9 Sep 2016 - 12:03 pm | स्मिता चौगुले

असं नाही काही..
आमच्या कडे वाफवलेलेच मोदक जास्त होतात, पण जरा गड्बड असेल आणि तळ्लेल्या मोदकाची आवड असेल तर तसे मोदक पण करतात लोक , करु बापडी आवड आपली आपली. आम्ही सगळ्या पद्धतीचे तितक्याच मिट्क्या मारत खातो आणि करुन पाह्ण्याचा प्रयत्न्ही करतो. शेवटी खाण्याशी मतलब... :)

आणि त्याचे काय ना, तुमच्याकडे कोकणात तांदूळ येतो आणि तोच जास्त खाल्ला जातो त्यामुळे मोदक तांद्ळाच्या पिठीचे तसेच आमच्याकडे गहू होतो आणि तोच जास्त खाल्ला जातो त्यामुळे मोदक गव्हाचे, मग ते उकडून असो वा तळून

हाकानाका...विविधतेत एकता..

स्मिता चौगुले's picture

9 Sep 2016 - 10:45 am | स्मिता चौगुले

पिरा .. काय गं हे, अबिर आणि तु दोघांनी मिळून केलेत का?

मी ही यावेळेस पहिल्यांदाच केले होते , पण उकड जमुन आली. आणि फार सुगरणी सारखे अगदी १६ कळ्यांचे नसले तरी ७-८ कळ्यांचे मोदक जमले.

टवाळ कार्टा's picture

9 Sep 2016 - 11:29 am | टवाळ कार्टा

अरे वा, शेवटचा फोटो आज बघितला, नर्मदेतले गोटे म्हणून सहज खपून जातील

चाणक्य's picture

9 Sep 2016 - 11:29 am | चाणक्य

या विकांताला करून पाहीन पाकृ. धन्यवाद पिरा.

वेल्लाभट's picture

9 Sep 2016 - 11:34 am | वेल्लाभट

कहीच्याकाही फनी !
जबर शैली.

जाम आवडलं.

अनन्न्या's picture

9 Sep 2016 - 11:53 am | अनन्न्या

उकडीचा उंडा कणकेत भरून मऊसूत गवसणीची पोळी करून खिरीसोबत खा.सारणाच्या करंज्या कर किंवा कणकेत भरून खोबय्राची पोळी.
बिघडलेल्या मोदकात दोन नैवेद्य होतील!

पिलीयन रायडर's picture

9 Sep 2016 - 5:21 pm | पिलीयन रायडर

मला भेंडी बेसनवाली म्हणजे पिठ पेरुन केलेली भेंडीची भाजी हे लक्षात यायला २ दिवस लागले, इथे उकडीला मी दोनदा वाफा काढतेय.. इडीअप्पमच्या पीठाला करपवतेय.. तू काय मला इतके अवघड सल्ले देतेय!!

सारण चमच्याने नुसतं खाल्लं! सोप्पं!! पुन्हा कोण काहीतरी मळणार, काही तरी लाटणार, भाजणार, तळणार.. नकोच बै तो व्याप!

पण परत मोदक जमले मला.. हे बघ - http://www.misalpav.com/comment/877688#comment-877688

वैदेहिश्री's picture

9 Sep 2016 - 12:24 pm | वैदेहिश्री

उकडीचे मोदक हा प्रकार आहेच तसा. प्रॅक्टिस करून होईल बरोबर. मी सुद्धा पहिल्यांदा केले तेव्हा बिघडले होतेच.

साती's picture

9 Sep 2016 - 12:27 pm | साती

दर संकष्टीला पाच मोदक तरी प्रसादापुरता करण्याचा नेम ठेवल्यास वर्षभरात सहज जमून जातील २१ कळ्यांचे नाहूक, गोरेपान मोदक!

वाह, सकाळी सकाळीच वाचून काढला.....धमाल लिहिलंय ..... एकदम खुसखुशीत लिखाण

माणदेशी's picture

9 Sep 2016 - 3:12 pm | माणदेशी

खुसखुशीत लेखन

स्वाती दिनेश's picture

9 Sep 2016 - 3:23 pm | स्वाती दिनेश

तुझ्या मोदकांचा ब्लेमगेम पाहिला.
दर चतुर्थीला एक वाटी तांदळाच्या पिठीची उकड काढून (उकडीच्या सूचना आल्या आहेतच वर) ५ मोदक केलेस तर २१ व्या वेळी उत्तम जमतील असा आशीर्वाद आत्ताच देऊन ठेवते,:)
स्वाती

साती's picture

9 Sep 2016 - 3:48 pm | साती

मी पण हा ह आशीर्वाद दिलाय वर!
दोन्ही स्वाती सेम विचार करतायत!
;)

स्वाती दिनेश's picture

9 Sep 2016 - 4:11 pm | स्वाती दिनेश

अग, नंतर वाचला तुझा प्रतिसाद, :)
थिंक अलाइक! ;)
स्वाती

विशाखा राऊत's picture

9 Sep 2016 - 4:17 pm | विशाखा राऊत

मस्त लिहिले आहेस आणि मोदक खासच :)

गौतमी's picture

9 Sep 2016 - 4:30 pm | गौतमी

जबरदस्त हसले मी.... लिखाण वाचुन तर हसलेच पण फोटो बघुन तर हसुन हसुन वेड लागायची पाळी आली. तरी बर बॉस नाहीये आज वॉच ठेवायला. त्यामुळे मनसोक्त हसुन घेतलं. मम्मीला पण दाखवणार हा नविन पदार्थ...

सस्नेह's picture

9 Sep 2016 - 4:33 pm | सस्नेह

गणपतीबाप्पा एकदम अंतर्धान पावले असतील ना नैवेद्य पाहून ?
..पण लेखन बाकी फर्मास =))

बाळ सप्रे's picture

9 Sep 2016 - 4:48 pm | बाळ सप्रे

उपमासदृश फोटो पाहून गॉन केस वाटत असली तरिही :-) .. लाडवांचे फोटो बघून उकड अगदीच बिघडलीय असं वाटत नाहिये.. जरा अजून मळली असती तर नक्की झाले असते मोदक त्या उकडीचे.. आणि मोदक करता करता थोड्या भेगा पडत असल्या तरी हाताला थोडंसं तेल लावून त्या भेगा हळूहळू जुळवून घेता येतात.

मी-सौरभ's picture

9 Sep 2016 - 5:09 pm | मी-सौरभ

मोदकांच्या ह्या असल्या छ्ळाबद्दल खुद्द मोदक भाउ काही बोलेनात.

दया, कुछ तो गडबड है...

पिलीयन रायडर's picture

9 Sep 2016 - 5:19 pm | पिलीयन रायडर

ओ रसिक प्रेक्षकांनो!!! काल केले की लगेच चांगले मोदक.. पहा पहा!!

http://www.misalpav.com/comment/877688#comment-877688

ओ साहित्य संपादकांनो.. जरा माझा ताजा कलम अ‍ॅडवता का मुख्य धाग्यात?
त्याचा बॅनर वगैरे बनवुन घ्यावा असंच बै वाटतय सारखं!!

सप्तरंगी's picture

9 Sep 2016 - 5:19 pm | सप्तरंगी

सुगरणीचा उपमा आणि लाडू सॉरी सॉरी मोदकपुराण वाचून हसावेच लागले (आय ब्लेम यु पिरा), पण आता मला कळले आहे कि मी कुणाकुणाला ब्लेम करू शकते मोदक बिघडले कि, १-२ दिवसात ती वेळ येईलच.
मी ना एक नवीन रेसिपी शिकलेय.... उकडीचे लाडू - खपवणारच मी आता मी ते तुझ्या नावावर :)

पिलीयन रायडर's picture

9 Sep 2016 - 5:22 pm | पिलीयन रायडर

ओय!!! पुरवनी आलेली आहे ह्या लेखाला एक.. आधी ती वाच!!!

http://www.misalpav.com/comment/877688#comment-877688

सप्तरंगी's picture

9 Sep 2016 - 5:32 pm | सप्तरंगी

वाह हे छानच झालेत, हे वाटतायेत हो उकडीचे मोदक, मला तर असेही फारसे जमत नाहीत, मी साचा वापरूनच करू शकते. ( आय ब्लेम माझे देशस्थ कुटुंब :)

मुक्त विहारि's picture

9 Sep 2016 - 5:25 pm | मुक्त विहारि

हहपुवा...

मी-सौरभ's picture

9 Sep 2016 - 5:55 pm | मी-सौरभ

प्रतिसादांची देणगी या धाग्याला मिळाली आहे.

हे वाचून मला माझ्या आम्रविकेत असताना केलेल्या प्रयोगांची आठवण झाली..
पहिल्या वेळेस मी तांदूळाचे पीठ म्हणून जे काही आणते ते डोश्याचे पीठ निघाले, आणि गरम पाणी घातल्यावर त्याचा तुम्ही म्हणताय्तसाच उपमा(आणि माझा पोपट) झाला. दुसर्‍या वेळेस मात्र मी भरपू संशोधन करून चांगले पीठ आणले.
घरी (भारतात असताना) तांदूळाच्या भाकर्‍यांची उकड काढण्याची रेसिपी रोजच्बघत होतो, त्यामुळे उकड काढायला फार त्रास झाला नाही. फक्त ते शिजवण्याचे प्रकरण तेव्हढे ठीक झाले नाही त्यामुळे खाणार्‍यांची नंतर पोटे दुखली.
असो. आता भारतात आहे आणि लग्न पण झालेय, त्यामुळे उकडीच्या मोदकांचा प्रश्नच सुटला.
बाकी -
उकडीचे मोदक फ्रीझमधून काढून खाण्यात काही अर्थ नाही. ते वाफाळतेच तुमच्या पानात आले पाहिजेत.. लगेच तो फोडून त्यात तूप ओतायचे, आणि मग चवीने खायचे.
मोदकाचे सारे सौंदर्य त्याच्या मऊ लुसलुशीत पारीमध्ये आहे, तीच जर मऊ नाही मिळाली तर त्या मोदकाला काहीच अर्थ नाही.

सुखीमाणूस's picture

9 Sep 2016 - 6:17 pm | सुखीमाणूस

ह ह पु वा
एकदम मन्गला गोडबोले type लेखन

पीर तै मी तुमच्या लिखाणाचा पंखा आहे. तुम्ही कुठल्याही घटनेकडे ज्या तऱ्हेने बघू शकता आणि सहज खुमासदार शैलीत लिहिता झकास

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Sep 2016 - 8:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

ह्यँ, हे उकडीचे मोदक आणि तळलेले मोदक यांच्या भाऊगर्दीत मिपावर एक सायकलवरचा मोदक आहे हे सगळे विसरलेले दिसताहेत =)) =))

पिलीयन रायडर's picture

9 Sep 2016 - 9:00 pm | पिलीयन रायडर

त्याला कसं विसरु?!! त्याला कालच विचारलं तू कोणता मोदक आहेस बाबा.. तळलेला की उकडीचा की लाडु-मोदक!

तर म्हणाला तो गरीब बिचारा मोदक आहे!

उत्तरावरुन मी म्हणते ती की तो डिप्लोमॅटिक मोदक आहे!!!

संदीप डांगे's picture

9 Sep 2016 - 10:18 pm | संदीप डांगे

तो सायक्लोपॅथीक मोदक आहे!

अभिजीत अवलिया's picture

9 Sep 2016 - 9:40 pm | अभिजीत अवलिया

सलग 3 धाग्यात शतक मारलेत तुम्ही. अगोदर त्रासदायक झालेली भटकंती, नंतर जनातलं मनातलं आणि आता फसलेली पाककृती. क्या बात. साक्षात अझरच्या विक्रमाची बरोबरी.