अनप्लॅन्ड उत्साहः अर्थात्, "अ‍ॅक्सिडेंटल वडे"!

बहुगुणी's picture
बहुगुणी in पाककृती
22 Aug 2009 - 9:58 pm

इथे सगळंच unplanned आहे, म्हणून फोटो आधी, मग पाककृती, आणि साहित्यसूची नाहीच! (का ते पुढे कळेलच!)

फक्त लक्षात घ्यायची गोष्ट एकच मंडळी - तयारीला वेळ जवळपास शून्य, प्रत्यक्ष पाककृतीचा वेळ १० मिनिटे!

आणखी एक आठवडाभर भरपूर काम केल्यानंतरची शुक्रवारची संध्याकाळ, ८ वाजता घरी एकटाच, बाहेर खाऊन कंटाळा आलेला. मि पा वाचता वाचता चावायला चिवडा काढायला गेलो तर microwave मध्ये भाजून ठेवलेले पांढरे स्वच्छ शेंगदाणे दिसले, म्हंटलं आज साबुदाण्याची खिचडी!

पण साबुदाणा भिजवायला निदान सहा-सात तास तरी हवेत. मि पा वर आणि जालावर इतरत्र उंडारत काढत जागरण नक्की असलं तरीही रात्री तीन-साडेतीनला जेवणं म्हणजे काही खरं नाही. मग विचार केला, साबुदाण्याची झाली काशी तर झाली, एक (अ)शास्त्रीय प्रयोग करून पाहू! साबुदाणा झटपट भिजवण्यासाठी त्याला आधिक hygroscopic कसं करता येईल? microwave-proof डब्यात दोन वाट्या साबुदाणा कोरडाच घातला, आणि ३० सेकंद हाय पॉवर वर गरम केला. छान कुड्कुडीत साबुदाणा बाहेर आला. अर्धी वाटी पाणी घातलं, त्या साबुदाण्याने दोनच मिनिटांत ते आधाश्यासारखं पिऊन घेतलं. उत्साहाने आणखी तीन वाट्या पाणी घातलं. (बहुतेक चूक क्र. १!) साबुदाणा तरंगायला लागला. परत डबा microwave मध्ये, यावेळी २ मिनिटांसाठी. (चूक क्र. २) तोपर्यंत दाण्यांचं कूट करावं म्हणून दाणे बाहेर काढले. चूक क्र. ३! लक्षात आलं, आपण नव्या घरात आल्यापासून निम्मं न लागणारं (????) सामान अजून बॉक्सेस मधून बाहेरच काढलेलं नाहीये, आणि deep down कुठेतरी त्यात आहे मिक्सर! Now what? Now बोंबला!! तोपर्यंत microwave ने चार छोटया शिट्या वाजवल्या - Your food is ready! साबुदाणा बाहेर काढला. हाय रे दैवा!! साबुदाणा व पाणी यांचा चकाकता लगदा झालेला! कडेला चमचा आत घातला तर पूर्ण slab च्या slab बाहेर यायला लागली! अब क्या करेंगे?

असू दे, situation salvage तर करायला लागणार. कोणत्याही परिस्थितीत केलेला प्रयोग वाया जाऊ द्यायचा नाही, त्यातून पुढे वापरता येईल असा निष्कर्ष तरी काढायचा किंवा काही तरी उपयुक्त तरी करायचं, हे Thomas Alva Edison ने सांगितलं नाही का? (असं म्हणतात की त्याने tungsten filament वापरून incandescent light bulb तयार केल्यावर एका खवचट पत्रकाराने त्याला 'तुम्ही या आधी शंभर एक चूकीच्या वस्तू वापरल्याबद्दल आणि ते सर्व प्रयोग फसल्याबद्दल खेद वाटत नाही का?' असं विचारलं तेंव्हा एडिसन म्हणाला 'ते प्रयोग फसले नाहीत, त्या शंभर प्रकारच्या filaments प्रकाश उत्पन्न करायला अयोग्य आहेत हे मी शोधलं, तेंव्हा no result is negative, we learn from everything.' - आता मी एडिसन च्या विधानाचा आधार घेतोय इतकंच, बाकी माझ्या-त्याच्यात साम्य शून्य! तो लई मोठा माणूस!)

मग एकीकडे कोरड्या frying pan वर तेलाचा स्प्रे मारून गरम करायला ठेवून मी त्या साबुदाण्याच्या लगद्यात बारीक चिरून कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या घातल्या. कूट न करता आल्याने दाणे तसेच घातले, म्हंटलं त्यामुळे कडकपणा वाढेलच. (हे मात्र चूक नव्हतं, कुरकुरीत पणा अखंड दाण्यामुळे वाढलाच.) दोन चमचे मीठ, किंचित साखर आणि ३ चमचे तेल घालून हे सर्व एकत्र कालवलं. तरीही चिकटपणा बराच होता. मग दोन चमचे रवा घातला. आता मात्र जरा हातावर गोळे करता येतील इतपत consistency आली. मग त्याचे दहा एक वडे करून shallow fry केले. वेळ ६-७ मिनिटे.

मग नॅपकिनवर काढून २-३ मिनिटे वाळवले. तयार झाले मस्त कडकडीत हिरवे-पांढरे साबुदाण्याचे अ‍ॅक्सिडेंटल वडे! [इथे या वड्यांना 'अ‍ॅक्सिडेंटल' म्हणायचं कारण हे unintended consequence होते, केला तुका अन् झाला माका! पण जे झालं ते चवीला फर्मास होतं राव!]

प्लेट मध्ये दही आणि लाल चटणी घालून फक्त एक फोटो घाईघाईने काढण्यापुरताच थांबलो, मग दहा मिनिटांत तयार झालेले हे वडे त्याहून कमी वेळात फस्त झाले!

(कोण रे तो तिकडे 'चिकट साबुदाण्याच्या थापट्या अंमळ जल्ल्या वाटतं' म्हणतोय??)

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Aug 2009 - 11:07 pm | बिपिन कार्यकर्ते

चिकाटीने केलेले चिकट साबुदाण्याचे वडे. ग्रेट!!!

बिपिन कार्यकर्ते

छोटा डॉन's picture

23 Aug 2009 - 5:49 pm | छोटा डॉन

बहुगुणीसाहेबांचा हा ही गुण आवडला.
मस्त वर्णन आणि पाकृ, फोटु ज्याम आवडला, बाकीच्याशी आपल्याला काय देणेघेणे नाय ...

बाकी तुम्ही आमच्याच कुळातले निघालात हे पाहुन आनंद झाला

------
( साबुदाण्याची धमाल बॅचलर थालपिठे करणारा ) छोटा डॉन

टारझन's picture

23 Aug 2009 - 6:21 pm | टारझन

वड्यांचे आकार्स पाहुन आष्ट्रोलियाची आठवण झाली ! सुरेख दिसतात वडे !!

(आष्ट्रेलियाला पळण्याच्या तयारीत) टारेनाराआय

लवंगी's picture

22 Aug 2009 - 11:08 pm | लवंगी

8| खरोखरीच बहुगुणी आहात

अवलिया's picture

22 Aug 2009 - 11:09 pm | अवलिया

हा हा हा लै भारी :)

--अवलिया
============
काळाच्या पुढचा विचार मांडुन वर्तमानकाळात 'अपात्र' ठरण्यासाठी काय करु ? कुणाला सांगु ?

मस्त कलंदर's picture

22 Aug 2009 - 11:10 pm | मस्त कलंदर

सही झट्पट पाककृती!!! भन्नाट नि हटके रेसिपीज अशाच जन्माला येतात.. :)

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

ब्रिटिश टिंग्या's picture

22 Aug 2009 - 11:49 pm | ब्रिटिश टिंग्या

लै बेस्ट!
एकटे असताना असे प्रयोग करायला भारी मजा येते!

वेदश्री's picture

22 Aug 2009 - 11:53 pm | वेदश्री

बहुगुणी,

तुमच्या चिकाटीला मानावे लागेल. प्रयोग फसायला लागल्याचे लक्षात येता त्यातून सावरून घेणे हे जास्त कुशलतेचे काम असते .. तुम्हाला जमतेय म्हणायचे ते. पुपाशु (पुढील पाककृतीस शुभेच्छा)!

साबुदाणा लवकर भिजायला हवा असल्यास तो गरम पाण्यात भिजवावा. लवकर भिजतो. अर्थात खरी लज्जत नेहमीप्रमाणे भिजवल्यावरच येते म्हणा.

मिश्रणात ३ चमचे तेल नसते टाकले तरी चालले असते बहुतेक. साबुदाण्याचा लगदा हाताला चिकटू नये यासाठी टाकले असल्यास तेल मिश्रणात टाकण्याऐवजी दोन्ही हाताला थोडेसे लावले असते तर ७-८ थेंबही पुरले असते.

वडे पडावे इतपत साबुदाण्याचा चिकटपणा घालवण्यासाठी रवा टाकण्याऐवजी उकडलेले बटाटे कुस्करून टाकले असते तर हा पदार्थ उपवासालाही चालणेबल होईल.

दाण्याच्या कुटाचे काय वैर असते कोण जाणे.. माझ्या पायातही (की हातात) काय्यम खोडा घालण्यात पटाईत आहे हा पदार्थ..

चतुरंग's picture

23 Aug 2009 - 12:16 am | चतुरंग

साबूदाणा ह्या पदार्थाने किती जणांची/जणींची, कुठे कुठे आणी कशी कशी विकेट घेतली असेल हे सांगता येणं अशक्य आहे; असे असताना एकतर तुम्ही साबूदाण्याचे काही करायचे ठरवणे इथेच तुम्हाला सलाम! त्यापुढे जाऊन फसत चाललेला प्रयोग सुधारणे म्हणजे हॅट्स ऑफ टू यू!
वडे भन्नाट झालेले असणार ह्यात शंका नाही! अभिनंदन! :)

(उलथण्याला चिकटलेली साबूदाण्याची संपूर्ण स्लॅब कढईतून उचलणारा) चतुरंग

रेवती's picture

23 Aug 2009 - 12:18 am | रेवती

आहाहा! काय ती पाकृ!
सुंदर पाकृ व त्याहून अतिसुंदर फोटू!
आपल्या प्रयोगशीलतेला सलाम!
प्रयत्न करणे महत्वाचे!
आपल्यापासून प्रेरणा घेऊन उद्याच साबूदाण्याचे वडे करावेत म्हणते.

रेवती

चतुरंग's picture

23 Aug 2009 - 12:20 am | चतुरंग

( :T )चतुरंग

बहुगुणी's picture

23 Aug 2009 - 1:02 am | बहुगुणी

काय हे चतुरंग? 'पिकतं तिथे विकत नसतं' म्हणतात ते खरं असावं काय!! काही हरकत नाही, रेवती ताई, द्या इकडे पाठवून, पत्ता व्य नि ने पाठवू काय?

प्राजु's picture

23 Aug 2009 - 7:41 am | प्राजु

सह्ही!!!
माझ्यासारखंच स्वयंपाक घराला प्रयोगशाळा समजणारं कोणीतरी आहे हे पाहून मन भरून आलं हो!! :)
प्रयोग करणं सोडू नये.... त्यातून योग्य पदार्थ बनो अथवा सुधारीत आवृत्ती तयार होवो.. प्रयोग महत्वाचा!!!
लगे रहो!! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

दशानन's picture

23 Aug 2009 - 10:21 am | दशानन

=))

लै भारी !!

त्यातून योग्य पदार्थ बनो अथवा सुधारीत आवृत्ती तयार होवो.. प्रयोग महत्वाचा!!!

असेच म्हणतो...

मी पुन्हा एकदा किचन मध्ये जाऊ का :?

अवलिया's picture

23 Aug 2009 - 10:34 am | अवलिया

>>>मी पुन्हा एकदा किचन मध्ये जाऊ का
:D

लेख टाकणार नसशील तर जरुर जा ! :)

शुभेच्छा !!!

--अवलिया
============
काळाच्या पुढचा विचार मांडुन वर्तमानकाळात 'अपात्र' ठरण्यासाठी काय करु ? कुणाला सांगु ?

बहुगुणी's picture

24 Aug 2009 - 4:39 am | बहुगुणी

टिउ's picture

28 Aug 2009 - 7:54 pm | टिउ

जमलं जमलं...चटणी पण भारी दिसतेय!

विसोबा खेचर's picture

23 Aug 2009 - 11:07 am | विसोबा खेचर

सुरेख रे! :)

तात्या.

प्रभाकर पेठकर's picture

23 Aug 2009 - 3:26 pm | प्रभाकर पेठकर

त्या साबुदाण्यांच्या भावनांचाही कोणीतरी विचार करा रे! असो.
साबुदाण्यात बटाटा घालणे इष्ट. असल्यास वर्‍याचे तांदूळ शिजवून घालावेत.
शेंगदाणे लाटण्याने चेपूनही कूट करता येतो. प्रयत्न करून पाहावा.

पण पाककलेतील तुमची 'चिकाटी' साबुदाण्याच्या 'चिकट' स्वभावालाही लाजवणारी आहे.
अभिनंदन.

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

क्रान्ति's picture

23 Aug 2009 - 5:38 pm | क्रान्ति

वडे बनवले कसेही असले, तरी दिसतात मात्र झक्कास! पुढील प्रयोगास शुभेच्छा!
[कोणे एके काळी प्रेशर कुकरमध्ये साबुदाणा वाफवून घेऊन त्याची केलेली धमाल खिचडी खाणारी आणि त्या पाकृला मनापासून दाद देणारी =D> ] क्रान्ति

अवांतर :- ती पाकृ माझी नव्हती, फक्त माझ्यासमोर केली गेली होती, हे चाणाक्ष मिपाकर ओळखतीलच! ;)
अतिअवांतर :- मी मात्र तो प्रयोग कधी केला नाही! :)

दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Aug 2009 - 5:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त दिसत आहेत वडे, ही पाकृ मी करेनच असं नाही, पण लिखाण मात्र एकदम खुसखुशीत झालं आहे.

अदिती

स्वाती दिनेश's picture

28 Aug 2009 - 12:29 pm | स्वाती दिनेश

लिखाण मात्र एकदम खुसखुशीत झालं आहे.
अदितीशी सहमत.
स्वाती

धनंजय's picture

29 Aug 2009 - 8:26 am | धनंजय

खुसखुशीत लेखन, दिसायलाही मस्तच आहेत आकस्मिक वडे.

सुनील's picture

29 Aug 2009 - 3:25 pm | सुनील

व्वा. नुसताच फोटो टाकलात आणि एखाद्या पुस्तकातील पाकृ उचलून चिकटवलीत तर कोणाला कळणारही नाही!

चिकाटीने केलेल्या कुठल्याही पदार्थाला अमृततुल्य चव असते.

(चुकत-माकत पाकृ शिकलेला) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.