एक स्पॅनिश टोपी

सुहास बांदल's picture
सुहास बांदल in जनातलं, मनातलं
8 Sep 2016 - 2:54 pm

ऑनलाईन बँकिंग आता आपल्या जीवनातील रोजचा भाग आहे. गेल्या एका दशकात आपण बरेच त्यात निपुण झालो आहोत. तरी आपल्याला वाटते कि आपल्याला सगळे माहित आहे आणि आपण एवढी काळजी घेतो कि आपल्याला कोण टोपी घालणार आहे. आमच्या आयुष्यात हा टोपी घालण्याचा प्रसंग ८ महिन्यांनपुर्वी घडुन आला आणि प्रस्थापित मुलतत्वाला सॉलिड धक्का लागला.

जानेवारी च्या दुसऱ्या आठवड्यात आम्ही मित्र मंडळी बसुन या वर्षी च्या ट्रिप चे नियोजन करत बसलो होतो. अखेर बऱ्याच चर्चे अंती टेनेरीफ स्पेन वर एकमत झाले. मार्च च्या इस्टर हॉलीडेज मध्ये जायचे ठरले. लहान मुलांची पसंती पण कुठे तरी समुद्र किनारी जायची होती. एकदा ठिकाण पक्के झाल्या नंतर विमान प्रवासाची लंडन ल्युटन ते टेनेरीफ टिकेट्स पण बुक करून झाली. ल्युटन च एअरपोर्ट पार्किंग पण लागली च बुक करून टाकले कारण विमान निघायची आणि परतायची वेळ पहाटे ची होती. त्या मुळे घरची कार घेऊन जाणे जास्त सोयीस्कर होते. पुढच्या २ दिवसात मी टेनेरीफ एअरपोर्ट वरून रेंटल ९ सीटर कार पण बुक केली . विमानाची टिकेट्स,एअरपोर्ट पार्किंग आणि रेंटल कार ची डील चांगली मिळाली होती त्यामुळे सगळे जण आनंदात होते. पण त्याला लवकर च ग्रहण लागेल असे मनात पण आले नाही. साधारणपणे एक मानवी भावना असते कि मी कुणाचं वाईट केले नाही अथवा वाईट चिंतिले नाही त्या मुळे माझे भले च होणार. असो तो एक वेगळा मुद्दा आहे.

आता खरा कळी चा मुद्दा होता कि व्हिला बुकिंग. कारण आम्ही सगळे मिळुन ३ परिवार आणि लहान मुले धरून १० जण होतो. व्हिला बुकिंग मध्ये प्रत्येका ची काही तरी खास आवड निवड होती. त्या मुळे सगळ्यांच्या आवडी निवडी आणि गरजा यांची बेरीज करून व्हिला शोधणे म्हणजे एक अतिशय क्लीष्ट काम होते. जणु काही गवताच्या गंजी मधून सुई शोधणे . मी असे म्हणायचे कारण म्हणजे आंतर जालावर एवढ्या साईट्स आहेत त्यातुन पाहिजे तसा व्हिला शोधणे एक टास्क आहे. जवळ जवळ २ आठवडे उलटून गेले होते विमान टिकेट्स बुक करून पण अजून व्हिला वर काही एकमत होत नव्हते. आंतर जालावरील जवळ जवळ सगळ्या साईट्स आम्ही रोज बघत होतो. काही व्हिला आवडत होते त्यांना बुकिंग साठी ई-मेल करत पण चांगले व्हिला आधीच बुक झाले होते. विमानाची टिकेट्स नॉन रिफंडबल होती त्या मुळे आम्हाला टेनेरीफ ला जाणे च भाग होते. दुसऱ्या ठिकाणी ज्याचा पर्याय आपोपाप निकालात निघाला होता. अखेर फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्यात आम्हा सर्वाना एक व्हिला पसंत पडला. अर्थात महिला मंडळानी याच श्रेय लाटुन घेतले त्याला कारण पण तसेच होते एकतर मार्च आर्थिक वर्ष जवळ येत होते त्यात आम्ही व्यग्र होतो. या पुर्वी पण स्पेन च्या बुकिंग्स चा अनुभव सर्वांना होता त्या मुळे काळजी करण्या जोगे नव्हते.

मग सुरु झाला ई-मेल वर पत्र व्यवहार. आम्ही व्हिला बुकिंग च्या सगळ्या अपेक्षित बाबींसह विस्तृत ई-मेल केली. अखेर २ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर उत्तर आले कि व्हिला आम्हाला मिळु शकतो. मग आमचा आनंद गगनात मावेनासा झाला कारण £२१०० ला असा बेस्ट डील मिळाले होते. प्रत्येक फॅमिलीला £७०० खर्च होता व्हिला चा. आम्हाला ८ आठवड्या मध्ये २ टप्प्यानं मध्ये ५०-५० टक्के पैसे द्यायचे होते. रेंटल ऍग्रीमेंट वर सही करून बँक ट्रान्सफर करायची होती. ह्या पुर्वी जेव्हा स्पेन ला गेलो तेव्हा सुद्धा अशीच बँक ट्रान्सफर केली होती त्या मुळे काही धोक्याची घंटा वाजली नाही. मित्राने पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन बँक ट्रान्सफर केली. २ दिवसांनी ई-मेल वरून पैसे मिळाले असे उत्तर आले. दरम्यान आम्ही कधी एकदा सुट्टीवर जातोय या विचारात होतो. ट्रिप १० दिवसांची होती त्या मुळे प्रत्येक दिवशी काय करायचे ह्याच प्लँनिंग जोरदार चालू होते.

मार्च चा पहिला आठवडा उलटुन गेला तरी आम्हाला उर्वरित पैसे पाठवा म्हणून इमेल नाही आली मग आम्हाला च वाटले कि व्हिला हातचा जाऊ नये म्हणून आम्ही च ई-मेल करून विचारले कि राहिलेलं पैसे कधी देऊ. दुसऱ्या दिवशी उत्तर आले कि लगेच २ दिवसात करा. मग काय आम्ही पण २ दिवसांनी पैसे ट्रान्सफर केले आणि बाकी गोष्टींच्या मागे लागलो. कारण आता फुल पेमेंट केले होते त्यामुळे निर्धास्त होतो.

पण .....

टेनेरीफ ला जायच्या बरोबर ८ दिवस आधी बायकोला काही तरी स्थानिक गोष्टीविषयी माहिती पाहिजे होती त्यामुळे ति व्हिला मालकाला ई-मेल करत होती पण इमेल्स परत येत होत्या. आणि इथे च पहिली धोक्याची घंटा वाजली. मग तिने स्पॅनिश मोबाईल नंबर होता त्या वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण मोबाइल बंद होता. आता आमच्या गोटा मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. आम्ही सगळ्यांनी व्हिला मालकाला केलेल्या इमेल्स परत आल्या आणि मोबाइल कॉल्स पण लागत नव्हते. अर्थात मग आपत्कालीन चर्चा सत्र घेतले. तोपर्यंत एक गोष्ट ठळक पणे समोर आली होती कि आम्हाला किती सहज आणि पद्धतशीर पणे चुना लावला होता.

आता व्हिला च नसल्या मुळे टेनेरीफ जायचे का असा प्रश्न पडला होता सगळ्याना. आमच्या कन्येच्या डोळ्यात तर अश्रुं चा महापुर आला होता. (असा एक प्रसंग पूर्वी ब्रुसेल्स एअरपोर्ट ला घडला होता त्या विषयी परत कधीतरी). कारण एका आठवड्यात व्हिला मिळणे केवळ अशक्य होते. एक तर आमचा ग्रुप मोठा होता आणि त्यात इस्टर हॉलीडे. तरी पण सर्वानुमते असे ठरले कि बच्चे कंपनी साठी टेनेरीफ ला जाणे भाग होते.

पुनश्च हरिओम या उक्ती प्रमाणे युद्ध पातळी वर आम्ही ६ लोकांनी व्हिला / हॉटेल जे मिळेल ते शोधायला सुरवात केली. आणि सर्वांच्या मेहनती ला फळ आले. व्हिला आम्हाला ७ दिवसाचा च मिळत होता आणि ३ दिवस कुठे राहायचं ह्या वर खल चालू होता. प्रश्न खूप च कठीण होता. कारण बऱ्याच गोष्टींचे आम्ही आगाऊ बुकिंग केले होते. परिस्थितून कसा मार्ग काढायचं कळत नव्हते पण सौ ना एकदम साक्षात्कार झाला कि आपण ३ दिवस टेनेरीफ नॉर्थ मध्ये हॉटेल मध्ये राहु शकतो आणि त्या ३ दिवसात टेनेरीफ नॉर्थ चि ठिकाणे पाहू. ३ दिवसांनी टेनेरीफ नॉर्थ हॉटेल मधून चेक आऊट करून टेनेरीफ साऊथ ला व्हिला मध्ये ७ दिवस राहू शकतो. टेनेरीफ नॉर्थ आणि टेनेरीफ साऊथ जागा अंदाजे ७० किमी दुर आहेत . आता प्रश्न होता कि टेनेरीफ साऊथ ला पहिल्या ३ दिवस जे प्लॅन केले होते आणि जायचे आगाऊ बुकिंग केले होते ते बदलून घ्याचे आणि टेनेरीफ नॉर्थ च जे बुकिंग शेवटी होते ते पहिल्या ३ दिवसात करावे असे ठरले. ठरलेल्या प्रमाणे त्या त्या लोकांना इमेल्स करून झालेला प्रकार सांगितल्या मुळे कुठलेही जास्त पैसे न देता सगळी बुकिंग्स बदलुन मिळाली. अशा प्रकारे टेनेरीफ मध्ये सगळ्यांचा राहायचा प्रश्न मिटला आणि बाकी आमची ट्रिप उत्तम तऱ्हेने पार पडली.

दरम्यान हा आर्थिक फसवणुकीचा प्रकार जेव्हा लक्षात आला तेव्हा लगेचच मी ज्या स्पॅनिश बँकेत पैसे ट्रान्सफर केले होते त्यांच्या लंडन ब्रँच ला फोन करून झालेला प्रकार सांगितला आणि ज्या खात्यात रक्कम जमा झाली आहे त्यांची माहिती मागितली पण बँकेने 'Data Protection ' च्या गोड नावाखाली अधिक माहिती देण्यास असमर्थता दर्शवली. त्याच दिवशी संध्याकाळी मी आमच्या स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये जाऊन झालेला प्रकार सांगितला पण पोलिसाच्या मते फसवणुकीचा गुन्हा अजुन घडला नव्हता त्या मुळे त्यांनी पण हात वरती केले. जाता जाता त्यांनी सायबर गुन्हयांसाठी Action Fraud UK ह्या साईट वर जाऊन नोंद करा म्हणाले.

टेनेरीफ मध्ये असताना ३ गोष्टी प्रामुख्याने करायच्या ठरवल्या होत्या.
१. आधी जो व्हिला बुक केला होता तो प्रत्यक्ष पाहणे.
२. स्थानिक पोलीस स्टेशन जाऊन तक्रार नोंदवणे .
३. त्या स्पॅनिश बँकेचे जी स्थानिक शाखा असेल तिथे जाणे.

आम्ही टेनेरीफ साऊथ ला च पहिल्या दिवशी विमानाने आलो होतो. एअरपोर्ट वरून बुकिंग केल्या प्रमाणे कार घेऊन लगेच आधी जो व्हिला बुक केला होता तो प्रत्यक्ष बघायला गेलो. हिच एक शेवटची आशा होती कि कदाचित व्हिला नक्की च असेल. पण आमच्या दुर्दैवानं आम्ही पूर्णपणे व्हिला च्या बाबतीत फसलो गेल्या च शिक्कामोर्तब झालं . आम्ही स्थानिक लोकांकडून चौकशी केली पण सगळे व्यर्थ गेले. स्पेन मधून च त्या स्पॅनिश मोबाईल नंबर वर संपर्क साधण्याचं प्रयत्न पण वाया गेला . दुसरा विचार असाही मनात आला होता कि आम्ही बऱ्यापैकी सुदैवी पण होतो जर ह्या क्षणाला आम्हाला कळाले असते कि व्हिला च नाही तर काय केले असते. असो मग आम्ही टेनेरीफ साऊथ वरून टेनेरीफ नॉर्थ कडे प्रयाण केले.

आमच्या ट्रिप च्या ७ व्या दिवशी जेव्हा आम्ही परत टेनेरीफ साऊथ ला परत आलो तेव्हा त्या स्पॅनिश बँकेच्या स्थानिक शाखे मध्ये जाऊन भेटलो पण त्यांनी पण मदत करायला असमर्थता दर्शवली पण म्हणाले कि जेव्हा तुम्ही पोलीस तक्रार कराल तेव्हा पोलीस बँकेला संपर्क करतील. त्यामुळे इथे पण अपयश आले.

८ व्या दिवशी सकाळी ९ वाजता आम्ही ३ मित्र स्थानिक पोलीस स्टेशन ला पोचलो. आमच्या दुर्दैवानं स्टेशन वर इंग्लिश बोलणारे आणि समजणारे कुणीच नव्हते. कसे बसे खाणा खुणा करून पोलिसला समजेल असे सांगितले व शेवटी म्हणाला वाट बघा. आम्ही पोलीस स्टेशन वर ४ वाजेपर्यंत बसून होतो. शेवटी ४ वाजता एक ऑफिसर नि सांगितलं कि ६. ३० ला या तेव्हा कुणी तरी मदत करेल. ७ तासाच्या पोलीस चौकी च्या वास्तव्यात आमच्या ज्ञानात बरीच भर पडली. ह्या वेळात जवळ जवळ ८ केसेस चोरी च्या आल्या होत्या. लोकांचे मोबाईल,पाकीट,सोन्याची चैन अशा होत्या. १ केस मारा मारी ची होती. एक ब्रिटिश पर्यटक होता त्याला चोरी मध्ये मारहाण केली होती. कपडे फाडले होते. अजुन एक ब्रिटिश परिवार होता त्यातील सर्वात वयस्कर आजोबा हरवले होते. स्पेन हे ब्रिटिश पर्यटकांसाठी पहिल्या पसंतीचे स्थळ आहे. तरी पण स्थानिक पोलीस थोडे उदासीन च दिसले ह्या सगळ्या प्रकारात. एक तर भाषेचा भयंकर अडसर आहे.

आम्ही संध्याकाळी ६ ला च पोलीस स्टेशन ला जाऊन बसलो. जरा वेळानी एक दुभाषी मुलगी आली मग आम्हाला आत मधल्या एका खोलीत नेले. तिथे साधारणपणे पुढचे २ तास आमची सगळी कहाणी सांगण्यात आणि त्याचे स्पॅनिश मध्ये रूपांतर करण्यात आले. आम्ही जेव्हा आमची केस तिथल्या मोठया अधिकाऱ्याला समजावत होतो तेव्हा त्याच्या एका सहकार्यांनी मोलाची माहिती दिली कि अशा प्रकारे मागच्या महिन्यात एका परिवाराला १०००० युरो ला फसवले आहे. पोलीस त्या भामट्यांचा माग काढत आहेत. एक जोडपे अशी कृत्ये करत आहेत. पोलिसानी आमची सगळी माहिती स्टॅम्प करून दिली म्हणजे आम्ही इन्शुरन्स क्लेम करू शकु. स्पॅनिश पोलीस म्हणाले होते कि आम्ही तुम्हाला संपर्क करू पण अजून ६ महिने उलटून गेले तरी काही खबर नाही.

लंडन ला परतल्या नंतर आम्ही ट्रॅव्हल इन्शुरन्स ला क्लेम केला तर आमचा क्लेम नाकारण्यात आला म्हणे कि राहाण्याचे जागा आमच्या कव्हर मध्ये नाही . शेवटचा पर्याय म्हणून ज्या बँकेचे डेबिट कार्ड वापरून पोस्ट ऑफिस मधून पैसे दिले होते त्यांना पण संपर्क केला. अपेक्षेप्रमाणे त्यांनी पण जबाबदारी नाकारली.

ह्या सर्व प्रकरणात खुप काही शिकायला मिळाले आणि बराच मनःस्ताप पण सोसावा लागला. ह्यात नक्की काय चुकले आणि कुठे चुकले याची कारण मिमांसा केली तरी ठोस उत्तर मिळत नाही. फक्त एवढे मात्र शिकलो कि ऑनलाईन व्यवहार करताना अजुन काळजी घेण जरुरी च आहे. आज च्या डिजिटल जगात ज्याला आपण विश्वासाने पैसे ऑनलाईन देतो त्याला बऱ्याच वेळेला पाहत नाही अशा वेळी 'पेपाल' चा पर्याय जास्त योग्य वाटतो. नंतर असे कळलं कि क्रेडिट कार्ड नि पेमेंट केले असते तर पैसे परत मिळाले असते. Airbnb आणि Booking.com ह्या साईट्स ची विश्वासार्हता उत्तम आहे. आमच्या बाबतीत ह्या सर्व गोष्टी नजरेआड केल्या गेल्या कारण कदाचित जो व्हिला आम्ही बुक केला होत्या त्या किमतीला त्या वर आम्ही भाळुन गेलो.

ह्या लेखाचा उद्देश एवढा च आहे कि ऑनलाईन हॉलिडे बुक करताना अधिक दक्षता बाळगणे जरूरच आहे अन्यथा आपण कष्टानं कमावलेले पैसे भुरटे कसे टोपी घालू शकतात.

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

8 Sep 2016 - 3:25 pm | टवाळ कार्टा

पर्यटनासाठीचा अंगठा नियम - ट्रिप प्लान करताना रहायची सोय नेहमी तिथेच करावी जिथे पर्यटकांचे अभिप्राय सगळ्यात जास्त चांगले असतील

टवाळ कार्टा's picture

8 Sep 2016 - 3:27 pm | टवाळ कार्टा

अखेर फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्यात आम्हा सर्वाना एक व्हिला पसंत पडला. अर्थात महिला मंडळानी याच श्रेय लाटुन घेतले त्याला कारण पण तसेच होते एकतर मार्च आर्थिक वर्ष जवळ येत होते त्यात आम्ही व्यग्र होतो.

बाकी याबाबतीत महिला मंडळाने जबाबदारीसुध्धा घेतली का आणि घेतली तर कशी ते जाणून घ्यायला आवडेल :)

>>>>> भामटे लोक स्वतःच वेगवेगळ्या आयडीने ५ स्टार अभिप्राय देत असतात , त्या पेक्षा खात्रीच्या वेब साईट वरून बुक करणे केव्हाही चांगले .

श्रीगुरुजी's picture

8 Sep 2016 - 3:30 pm | श्रीगुरुजी

बापरे! भयंकर अनुभव. पैसे गेलेच आणि मनस्तापही झाला.

असंका's picture

8 Sep 2016 - 3:55 pm | असंका

बाकी ट्रीप कशी झाली?

लेखाबद्दल आभार..आता जास्ती काळजी घेणं आलं!!

पैसा's picture

8 Sep 2016 - 4:33 pm | पैसा

भयंकर अनुभव आहे!

उदय के'सागर's picture

8 Sep 2016 - 4:35 pm | उदय के'सागर

तुम्ही त्या फसव्या वीला ची बुकिंग कोणत्या वेब-साईट वरून केली होती हे समजू शकेल का? म्हणजे अश्या वेब-साईट ला भविष्यात टाळण्यात येईल.
इथे माहिती दिल्याबद्दल आणि इतरांना सतर्कतेचा इशारा दिल्याबद्दल धन्यवाद.

पद्मावति's picture

8 Sep 2016 - 5:05 pm | पद्मावति

बापरे, फारच मनस्ताप.. हा अनुभव शेअर केल्याबदद्ल धन्यवाद.

अभिजीत अवलिया's picture

8 Sep 2016 - 5:08 pm | अभिजीत अवलिया

खूपच वाईट अनुभव आहे. नशीब तिथे जाण्यापूर्वी 'तो' व्हिला अस्तित्वात नाही हे समजले. नाही तर खूप हाल झाले असते.

Mrunalini's picture

8 Sep 2016 - 5:42 pm | Mrunalini

बापरे... भयंकर अनुभव.
आमचाही असाच स्पेनमधला अनुभव खुप भयानक होता.
त्याची लिंक :- http://misalpav.com/node/34812

मनस्ताप देणारा अनुभव म्हणायचा. जीवावर काही बेतले नाही, हे नशीब म्हणायचे. बाकी सहल कशी पार पडली?

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Sep 2016 - 2:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

भयानक अनुभव ! जालावरून बुकिंग्ज करताना नामवंत कंपन्यांच्या संस्थळावरूनच करावे हेच खरे !

स्वाती दिनेश's picture

9 Sep 2016 - 10:11 pm | स्वाती दिनेश

वाईट अनुभव.. इटली आणि स्पेन मध्ये जरा सांभाळून राहणे आवश्यक असते. पिकपॉकेटिंग इ. साठी.. पण ही तर हाइटच झाली. आमची रोमकहाणी आठवल्याशिवाय राहिले नाही.
स्वाती

सुहास बांदल's picture

11 Sep 2016 - 9:18 pm | सुहास बांदल

@ टवाळ कार्टा, शुंभ - तुम्ही म्हणता ते १००% खरे आहे. पुढच्या वेळे पासुन जास्त खबरदारी घ्यावी लागेल.
@ उदय के'सागर - आम्ही इस्पानि ब्रेक्स वरून बुकिंग केली होती पण त्यांनी नंतर तो व्हिला काढून टाकला कारण कुणी तरी ते Property Listing अकाऊंट हॅक केले because they found some suspicious activity on that account. That site is genuine but you never know who can hack into particular villas.
@ Mrunalini , स्वाती दिनेश तुमचे अनुभव पण खूप च त्रासदायक आहेत. परदेशात असे अनुभव घ्यावे लागणे म्हणजे सहनशक्ती ची कसोटी आहे. इटली स्पेन मध्ये जरा जास्त च खबरदारी घ्यावी लागते. खूप वर्षांपुर्वी इजिप्त मध्ये पण ह्याच धर्ती वर अनुभव घेतला कारण एक तर तिथे भारतीय पर्यटक म्हणून खूप मागे लागतात विशेषतः स्त्रियांच्या जास्त च अंगलट येतात.
बाकी सर्वांचे अनेक अनेक आभार.
बाकी आमची ट्रिप मस्त झाली त्या वर सविस्तर पणे लिहीनच लवकर च. स्पेन खूप च सुदर आहे.