या आधीचे इतर लेखन - अनुक्रमणिका
दर्द ---- भाग २ ---------( कथा )-----------( काल्पनीक )
राघवची आणी देविकाची नंतर कधीच भेट झाली नाही . राघवनेही कधी तसा प्रयत्न केला नाही . देविकाने त्याला चांगलाच दर्दभरा धक्का दिला होता . त्यामुळे त्याच्या मनात कुठे तरी तिच्याबद्दल राग , द्वेश साठला होता .
त्याने स्वताला परिक्षा , अभ्यास यामध्ये गुंतवुन घेतले . कॉलेज संपल्यावर त्याला शहरातल्या एका चांगल्या कंपनीमधे लगेच नोकरीही मिळाली . त्यामुळे नोकरी , ऑफीसला जाणे येणे , जेवण खाण , झोप यामधेच तो पुर्ण बिझी झाला . बघता बघता त्याला कंपनीमधे चार वर्षे कशी गेली ते कळलंच नाही .
कधी तरी अधुन मधुन त्याचे आपल्या कॉलेजमधल्या मित्रांशी बोलणे होत असे . काहि वर्षांपुर्वी देविकाच्या घरची आर्थिक स्थिती खुप बिघडली होती . त्या अडचणींच्या दडपणाखाली तिने अचानक तो अनपेक्षित निर्णय घेतला असावा असे एकदा त्याच्या मित्राने बोलताना सांगितले . पण राघवला आता परत भुतकाळात गुंतायचे नव्हते . तेव्हा त्याने ते ऐकुन न ऐकल्यासारखे केले आणी विषय बदलला . त्याचे आता फक्त आपल्या कामावर , करीअरवर ध्यान होते .
राघवचे गाणे आता जवळ जवळ बंदच झाले होते . कंपनीच्या वार्षिक संमेलनाच्या पार्टीत तेवढी तो आपली गाण्याची हौस भागवुन घेत असे . कंपनीत जॉइन झाल्याच्या पहिल्या वर्षीच त्याने संमेलनाच्या पार्टीत दोन , तीन गाणी म्हणली . सर्वांनीच तेव्हा त्याची , त्याच्या गाण्याची , त्याच्या आवाजातील दर्द्ची खुप तारीफ केली . तो चांगला गातो हे त्याच्या कंपनीतल्या मित्रांच्या लक्षात आले . तेव्हापासुन कंपनीच्या वार्षिक संमेलनाच्या प्रत्येक पार्टीत त्याला गाणे म्हणण्याचा सगळ्यांकडुनच जोरदार आग्रह होत असे . राघवही आपल्या जादुई आवाजात गाणे म्हणुन सर्वांना भारावुन सोडत असे .
आजही कंपनीच्या वार्षिक संमेलनाची पार्टी सुरु होती . हॉलमध्ये खाणे , पिणे , गप्पा , खेळ चालु होते . कंपनीतलेच काही हौशी गायक , गायिका माईकपाशी जाउन जमेल तशी गाणी म्हणत होते . ते पाहुन राघवच्या कलिग्सना राघवची आठवण आली .
"अरे , आपला उस्ताद कुठे आहे ? राघव ?"
"राघवसाब , होउन जाउदे एक प्यारभरा , मोहब्बतभरा गीत.. कमऑन.."
सर्वांनीच राघवला गाण्याचा आग्रह केला तेव्हा राघवही भारल्यासारखा माईकपाशी गेला . आपल्या दर्दभरल्या आवाजात तो गाउ लागला . आपण कुठले गाणे म्हणत आहोत याचेही त्याला भान राहिले नाही .
" ये जो मोहब्बत है .. ये उनका है काम ..
मेहबुबका जो ... बस लेते हुए नाम ..
मर जाये .. मिट जाये ..हो जाये बदनाम ..
रहने दो ..छोडो ..के जाने दो यार ..
हम ना करेंगे प्यार ... हम ना करेंगे प्यार "
राघवचे गाणे संपले तेव्हा सर्वांनीच टाळ्यांचा कडकडाट केला . काहिंनी हलकेच आपल्या डोळ्यातले पाणी टिपले . काहींनी लगेच त्याच्या भोवती गराडा घालुन त्याचे कौतुक केले .
"वाह राघव , तुने आज पुराने दिन याद दिलाए .."
"यार ...आज तुमने फिरसे रुला दिया .. क्या दर्द है तुम्हारी आवाजमें"
एका शंकातुर जंतुने तेवढ्यात त्याला एक प्रश्न विचारला .
" राघव , इस सवालका बुरा ना मानो ..पण तु हि अशी दर्दभरी गाणी इतकी अफलातुन आणी दिलोजानसे गातोस . असं वाटतं की .. तुम्हारे दिलमें बसा हुआ दर्द तुम्हारी आवाजसे निकल रहा है.. तुझ्या लाईफमध्ये कधी काहि झालं आहे का .."
राघवने कडवटपणे हसुन तो प्रश्न तिथेच टाळला . पण त्या प्रश्नामुळे आत कुठेतरी भरत आलेली जखम परत ओली झाली .
पुढल्या दिवशी ऑफिसमध्ये काम करत असताना राघवला अचानक त्याच्या मॅनेजरने आपल्या केबिनमध्ये बोलावले . राघव येताच मॅनेजरने त्याला एक बातमी दिली .
"राघव , आपल्या शहरामध्ये "ईंटरसिटी कार्पोरेट कल्चरल ग्रुप" अशी संस्था आहे . आपली कंपनी आणी शहरातल्या इतर अनेक नामवंत कंपन्या या ग्रुपचे मेंबर आहेत . या ग्रुपतर्फे नाटक , गाणी , डान्स , खेळ असे अनेक इव्हेंटस आयोजित केले जातात . पुढल्या महिन्यात यांनी गाण्याची स्पर्धा आयोजित केली आहे . काल आम्ही सगळ्यांनी तुझे गाणे ऐकले . सगळ्यांनाच ते खुप आवडले . तेव्हा या स्पर्धेमध्ये आपल्या कंपनीतर्फे तु भाग घ्यावास असे सगळ्यांनी एकमताने ठरवले आहे . "
"थँक यु सर .." राघवला काय बोलावे ते सुचेना . तो मनातुन खुश झाला होता .
"सो विश यु ऑल द बेस्ट .. चांगली तयारी कर ..आणी मुख्य म्हणजे स्पर्धेचे कसलेही टेन्शन घेउ नकोस . जस्ट गो अॅन्ड प्ले युअर नॅचरल गेम ..."
मॅनेजर क्रिकेटचा फॅन असल्याने त्याने सचिन ,सहवागच्या भाषेत राघवला शुभेच्छा दिल्या . राघवनेही उत्साहाने गाण्याची तयारी सुरु केली .
बघता बघता स्पर्धेचा दिवस आला . आज संस्थेच्या ऑडिटोरिअममध्ये बरीच गर्दी उसळली होती . अनेक स्पर्धक आणी त्यांची कंपनीमधली मित्रमंडळी तिथे जमली होती . राघवलाही चिअर अप करायला त्याच्या कंपनीमधली बरीच मंडळी आली होती . सगळ्यांचा एकच धिंगाणा चालु होता .
स्पर्धेला सुरुवात झाली . एक एक स्पर्धक येउन गाउन जात होता . पण प्रेक्षकांवर आणी परिक्षकांवर कुणाचा फारसा प्रभाव पडत नव्हता . पहिली पाच गाणी अशी जेमतेमच झाल्यावर निवेदकाने राघवचे नाव पुकारले . मित्रांनी केलेल्या टाळ्यांच्या गजरात राघव मंचावर आला . तो मंच , स्पर्धा , समोर बसलेले प्रेक्षक बघुन राघवला अचानक जुने कॉलेजमधले गॅदरिंगचे दिवस आठवले . नको त्या जुन्या दुख्खद आठवणीही परत जाग्या झाल्या . आणी राघव स्वताला विसरुन गाउ लागला .
" चुपके चुपके .. रात दिन .. आँसू बहाना याद है
हम को .. अब तक आशिकी का .. वो .. ज़माना याद है "
राघवचे गाणे संपल्यावर सगळ्यांनीच उठुन टाळ्यांच्या गजरात त्याचे कौतुक केले . त्याच्या आवाजातील जादुने परिक्षकही खुश झाले . खुप वेळानंतर त्यांना एक अनोखे दर्दभरे गाणे ऐकायला मिळाले होते .
राघवनंतर आलेले पुढचे चार स्पर्धक केवळ आले आणी हजेरी लावुन गेले . त्यांचे गाणे काहि रंगले नाही .
"बहुतेक राघवच हि स्पर्धा जिंकणार " असे सगळे कुजबुजु लागले .
आता एकच स्पर्धक उरला होता . निवेदकाने स्पर्धकाचे नाव जाहिर केले .
"रसिकहो ..आता आपल्या समोर येत आहे . शेवटचा स्पर्धक .. देविका .."
राघवने चमकुन मंचाकडे पाहिले . होय .. ती तीच होती . देविका .. राघव भुतकाळ विसरु पाहात होता पण जणु नियती राघवला आज परत भुतकाळाची आठवण करुन देत होती .
देविका शांतपणे मंचावर आली . तिने सर्वांना नम्रपणे नमस्कार केला . आणी ती डोळे मिटुन गाउ लागली .
" बिछडे अभी तो हम ... बस कल परसों .. जियूंगी मैं कैसे .. इस हाल में बरसों
मौत ना आई .. तेरी याद .. क्यों आई ... हाय .. लम्बी जुदाई
चार दिनों दा ... प्यार हो रब्बा .. बड़ी लम्बी जुदाई .. लम्बी जुदाई
होंठों पे आई .. मेरी जान .. दुहाई ... हाय ... लम्बी जुदाई.. "
देविकाचे गाणे संपले तेव्हा तिच्या आवाजातील दर्द , साधेपणाने , सच्चाईने सगळेच भारावुन गेले . काहि क्षण सगळेच निशब्द झाले . आणी मग प्रेक्षकांची , परिक्षकांची जोरदार दाद मिळाली . परिक्षकांपुढे " विजेता कोण ? राघव का देविका ?" असा पेच पडला . त्यांनी अर्ध्या तासाचा वेळ मागुन घेतला . प्रेक्षकही आता "हि स्पर्धा नक्की कोण जिंकणार ? राघव का देविका ? " असे एकमेकांशी हलक्या आवाजात कुजबुजु लागले .
देविकाला पाहुन राघवच्या मनात इतके दिवस दबुन असलेला राग , द्वेश परत उफाळुन वर आला . रागारागाने तो देविका जिथे बसली होती तिथे आला . त्याने देविकाला हाक मारली .
"हॅलो देविका .. अभिनंदन. तुझे...तुमचे गाणे खुप छान झाले . तुमच्या गाण्यातला दर्द पुर्वी होता अगदी तसाच अप्रतिम आहे . "
देविका त्याला पाहुन चकीत झाली होती . कसेबसे स्वताला सावरुन फिकट आवाजात ती म्हणाली .
" थॅन्क्स.. तु.. तुमचेही गाणे खुप चांगले झाले . तुमच्या आवाजातला दर्द तर जादुई आहे ."
" धन्यवाद . माझ्या आवाजातला दर्द हि तर तुमचीच देन आहे . तुम्ही मला दिलेल्या अनपेक्षित धक्क्यामुळे हा दर्द आता मला कायमचा मिळाला आहे . तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहे ."
राघव ताड ताड बोलत होता . त्याचे बोलणे ऐकुन देविकाच्या डोळ्यांत पाणी आले . ती राघवला काहितरी सांगु पाहात होती . आपली बाजु मांडायचा प्रयत्न करत होती . पण राघवचे तिकडे लक्षच नव्हते . तो संतापाने बोलतच होता .
" तुम्ही जरी तुमचा शब्द पाळला नाहित . तरी मी असे करणार नाही . आज जर मी विजेता ठरलो तर माझे बक्षिस मी परत तुमच्या बरोबर शेअर करेन . कारण माझा राग माणसांवर आहे . सुरांवर नाही . "
एवढे बोलुन राघव आवेशाने आपल्या जागेकडे निघुन गेला . मनातला राग बाहेर पडल्यावर आता कुठेतरी त्याचे मन त्याला खाउ लागले .
"देविका काहितरी सांगायला बघत होती . पण आपण तीला ती संधीच दिली नाही . आपलेही हे थोडे चुकले ."
आता परिक्षक निकाल हातात घेउन मंचावर आले होते . ते निकाल वाचुन दाखवु लागले .
"रसिकहो ..सर्वच स्पर्धकांनी चांगले गाणे म्हणले . पण विशेष करुन राघव आणी देविका यांनी त्यांच्या गाण्यांनी आपल्या सगळ्यांनाच जिंकुन घेतले . आज या दोघांनाही समान गुण मिळाले आहेत . म्हणजेच हे दोघेही आजचे विजेते आहेत . राघव आणी देविका दोघांचेही अभिनंदन आणी शुभेच्छा "
निवेदकाने दोघांनाही टाळ्यांच्या गजरात मंचावर बोलवले . बक्षिस स्विकारताना राघवच्या मनात विचार येत होते .
"नियती आपल्याला परत त्याच चक्रातुन का फिरवत आहे . दोन जीवांच्या आयुष्यात एकमेकांचे मित्र , रिश्तेदार असण्यापेक्षा एकमेकांचे प्रतिस्पर्धी असणंच का लिहलं असावं ? "
आता निवेदक मिष्किलपणे बोलु लागला होता .
"आजच्या स्पर्धेचे विजेते राघव आणी देविका या दोघांनाही मी विनंती करतो की त्यांनी दोघांनी मिळुन एखादे छान डुएट गाणे म्हणावे . काय मंडळी बरोबर ना ? "
यावर सर्व प्रेक्षकांनी आणी परिक्षकांनी टाळ्या वाजवुन जोरदार आग्रह केला .
राघव आणी देविका एकमेकांकडे पाहु लागले . त्यांना या रसिकांचा आग्रह मोडायचा नव्हता . डुएट हा शब्द ऐकल्यावर दोघांच्याही मनात त्यांनी चार वर्षांपुर्वी तयारी केलेले डुएट गाणे आठवले . राघवने तेव्हा ठरल्याप्रमाणे हाताने तिला खुण केली . देविकाने ते गीत गायला सुरुवात केली . राघवने हळुवारपणे आपला आवाज त्या गाण्यामध्ये मिसळला . मधली चार वर्षे जणु कधीच पुसुन गेली होती . दोघेही मिळुन ते गीत गाउ लागले .
"इस मोड़ से जाते हैं ..कुछ सुस्त कदम रस्ते .. कुछ तेज़ कदम राहें
पत्थर की हवेली को .. शीशे के घरोंदों में ..तिनकों के नशेमन तक ..
इस मोड़ से जाते हैं ..इस मोड़ से जाते हैं...
..... ........... ...........
...... ........... ...........
ये सोच के बैठी हूँ ... इक राह तो वो होगी ..तुम तक जो पहुँचती है ..
इस मोड़ से जाते हैं ..इस मोड़ से जाते हैं..."
कॉलेजच्या बागेमधला सोनचाफा आज खुप खुषीत होता . आज अनेक वर्षांनंतर तो या दोघांना परत एकत्र हसताना , गाताना पाहात होता .
------- समाप्त / एक नव्याने सुरुवात -------- काल्पनीक --------------
प्रतिक्रिया
7 Sep 2016 - 4:16 pm | ज्योति अळवणी
सुंदर प्रेम कथा.
8 Sep 2016 - 12:48 pm | सिरुसेरि
धन्यवाद
8 Sep 2016 - 12:51 pm | अभ्या..
आवडली कथा. छान फिनिशिंग केले आहे.