✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

<< हिशेब-ठिशेब>>

स
सस्नेह यांनी
Fri, 09/02/2016 - 12:49  ·  लेख
लेख
प्रेरणा : ओळखली ना ? ( डॉक खरेकाका ह घ्या..) मागच्या रविवारी संध्याकाळी नवऱ्या बरोबर फिरायला गेले होते.. (मुळात सकाळी संध्याकाळी आम्ही भरपूर भांडण करत असल्याने रविवारी संध्याकाळी आम्ही आवर्जून फिरायला जातो.) तेंव्हा आमचा एक पुतण्या रमेश तिथे फिरताना दिसला. नमस्कार चमत्कार झाल्यावर त्याला विचारले एकटाच इकडे कुठे फिरतो आहेस. त्यावर तो म्हणाला आम्ही इथे जवळच नवीन घर घेतले आहे. आणि आग्रहाने आम्हाला त्याच्या घरी घेऊन गेला. सगळे घर दाखवले कुठे काय कसे घर सजवले आहे हे बोलणे चालू होते. समीरा ( त्याची मुलगी) आता ५ वर्षांची झाली. ती कुठल्या शाळेत जाते. रमेशच्या घरी आई, विधवा बहिण नोकरीवाली, आणि बायको अशा तीन बायका आहेत. बायको दोन्ही वेळचा स्वयंपाक करते. झाडू मारणे लादी पुसणे, भांडी घासणे इ स्वच्छतेची कामेपण बायकोच करते आणि आई सदैव कोणत्या ना कोणत्या भिशीला अगर भजनी मंडळात गेलेली असते. बहिण रविवार म्हणून टीव्ही पहात आरामात सोफ्यावर बसलेली. . घरी चहापाणी अवांतर गप्पा चालू असताना चालू असताना मी त्याला विचारले वैदेही (त्याची बायको) कुठे आहे? तो म्हणाला ती ऋतुलला ( त्याच्या मुलाला ) गिटारच्या क्लाससाठी घेऊन गेली आहे. वैदेही ही एका मुंबईतील मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत चांगल्या पगारावर आहे. मी रमेशला विचारले मग तू का सोडायला जात नाही? त्यावर तो म्हणाला कि पाच दिवस मी नोकरी करतो, घरासाठी राबतो. मग शनिवार रविवार तिने सगळं बघायला नको का? ती तिची ड्युटी आहे. मी विचारले म्हणजे तू काय काय करतो? तो म्हणाला, मला सुटीच असते. मग मी नऊला उठतो. वैदेहीने बनवलेला चहा व ब्रेकफास्ट खातो. मग पेपर वाचून सावकाश अंघोळ करतो. मी म्हटले तेव्हा वैदेही काय करते ? तर म्हणाला, ती मुलांना उठवते, ब्रश करवून दुध देते, सर्वांचा चहा बनवते. ब्रेकफास्ट बनवते, मग देवपूजा करते. मग आई आणि बहिण यांच्या मदतीने जेवण बनवते.दोन दिवस तिला सुट्टी असते, सो तिने बरंच काम करून रमेशला आराम कसा मिळेल याची काळजी घ्यायला पाहिजे. शनिवार रविवार मला पूर्ण फ्री. माझ्या तोंडावर आले होते कि अरे मग तातःवडा भर तीही राबतेच ना ? शनिवार रविवार इला नको का थोडी विश्रांती ?.. पण मी थांबले. बाहेर पडल्यावर नवरा म्हणाला हा बघ आठवड्याचा आराम कसा वसूल करतो ?बिचारी बायको आठवडाभर बाहेर राबते आणि शनिवार रविवार घरी गृहिणी म्हणून ?. बिचारी सालस आहे पाच दिवस मानेवर खडा ठेवून काम करते भरपूर पैसे मिळवते. आणि हा इथे राजासारखा राहतो. मग हा कसला हिशेब? पाच दिवस तो बाहेर जातो तर दोन दिवस तिनं एन्जॉय का करू नये ? घरात तीन बायका आहेत पण राबणारी एकच. चांगले तीस हजार रुपये मिळवते तर स्वैपाकाला बाई ठेवायला काय झालं ? नाहीतर बायकांवर खर्च करण्यापेक्षा याने तिला स्वैपाकात आणि इतर कामात मदत केली तर काय बिघडले ?.(चहा पाण्याच्या वेळेस स्वयंपाकघरात हि माहिती काढून झाली होती). मुलगा चार तास शाळेत जातो. सगळ्या कामाला शनिवार रविवारी तरी हात लावूदेत ना त्याला. पाच दिवस आरामच तर असतो. मग दोन दिवस संपूर्ण आराम करायचा आपण आणि राबायचे बायकोने हा कसला हिशेबीपणा. ..मी अजून विचार करते आहे. आपलाच पुतण्या आहे तो बरोबर का नवरा म्हणतो ते बरोबर? (मिथ्यकथा नावे बदलून)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
धर्म
इतिहास
वाङ्मय
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
प्रतिक्रिया
माध्यमवेध
अनुभव
मत
संदर्भ
चौकशी
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
10895 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

अगागा!

पैसा
Fri, 09/02/2016 - 12:57 नवीन
अगागा!
  • Log in or register to post comments

ख्या ख्या ख्या

झपाटलेला फिलॉसॉफर
Fri, 09/02/2016 - 13:00 नवीन
पॉपकॉर्न
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ

सुबोध खरे
Fri, 09/02/2016 - 13:02 नवीन
हॅ हॅ हॅ मला रमेशचा हेवा वाटतो आहे.
  • Log in or register to post comments

अगदी अगदी

टवाळ कार्टा
Fri, 09/02/2016 - 14:32 नवीन
अगदी अगदी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

बाकी चालू द्या,

नीलमोहर
Fri, 09/02/2016 - 13:03 नवीन
पेढे मिळतील ना इथेतरी ?? फार आशेने आले हो, युगं लोटली पेढे खाऊन.. बस तारीख पे तारीख मिली, पेढा नहीं मिला मिलॉर्ड, पेढा नहीं मिला..
  • Log in or register to post comments

पि जी म्हणून राहू शकतील का ते

त्रिवेणी
Fri, 09/02/2016 - 13:05 नवीन
पि जी म्हणून राहू शकतील का ते म्हणजे कुणालाच जास्त काम नको.
  • Log in or register to post comments

कसलं काय?

संन्यस्त खड्ग
Fri, 09/02/2016 - 13:08 नवीन
कसलं काय? आजकालच्या पोरी म्हणजे .................................................
  • Log in or register to post comments

युद्धस्य कथा रम्यः साठी हा

मृत्युन्जय
Fri, 09/02/2016 - 13:11 नवीन
युद्धस्य कथा रम्यः साठी हा धागा आणि बहिष्कारासाठी तो धागा काय? बाकी हे बरे केलेत की तुमच्या कथेतले दोघेही नौकरी करतात. एक जण आठवडाभर घरी तंगड्या पसरुन बसत नाही.
  • Log in or register to post comments

हे भारी आहे.

बोका-ए-आझम
Fri, 09/02/2016 - 13:14 नवीन
या धाग्यावर बर्फी द्यावी काय?
  • Log in or register to post comments

काजू कतली द्या हो.

मृत्युन्जय
Fri, 09/02/2016 - 13:16 नवीन
काजू कतली द्या हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

काहीतरी

नाखु
Fri, 09/02/2016 - 13:53 नवीन
एक नक्की द्या.. काय द्यायचं याच्यावरून काथ्याकुट करून "रमेश"च्या वांग्याचे भरीत करू नका इतकीच विनंती. अखिल मिपा "जमेल तिथे हिशेब ठेवा मुखी पडो माकडमेवा" संघटनेकडून खुलाश्यासाठी सर्व काकु-पुतण्या व मामा-भाच्यांच्या हितार्थ प्रसारीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

खल्लास!!!

कैलासवासी सोन्याबापु
Fri, 09/02/2016 - 13:16 नवीन
खल्लास!!!
  • Log in or register to post comments

_/\_

यशोधरा
Fri, 09/02/2016 - 13:17 नवीन
छिद्रान्वेषी विडंबने पाडणे ही तुमची ड्यूटी आहे का? . . . पळाऽऽऽ!!
  • Log in or register to post comments

ह्या धाग्याने मला अंतर्मुख

एस
Fri, 09/02/2016 - 13:28 नवीन
ह्या धाग्याने मला अंतर्मुख केलं, विचारप्रवृत्त केलं, मनात घनकल्लोळ माजवला, हृदयात कालवाकालव झाली... असो. मला बहुतेक भूक लागलेली दिसते. :-|
  • Log in or register to post comments

=))

अजया
Fri, 09/02/2016 - 13:57 नवीन
खी खी खी ह्यॅ ह्यॅ ह्यॅ
  • Log in or register to post comments

झालं......

माम्लेदारचा पन्खा
Fri, 09/02/2016 - 14:06 नवीन
मालकांना णम्र इणंटी की गद्य इडंबन विभाग पण उघडा....!
  • Log in or register to post comments

झाला का हिशोबाचा ताळा?

कंजूस
Fri, 09/02/2016 - 14:09 नवीन
झाला का हिशोबाचा ताळा?
  • Log in or register to post comments

क ह र !!

सूड
Fri, 09/02/2016 - 14:25 नवीन
क ह र !!
  • Log in or register to post comments

नई जम्या, इतका काही खास वाटला

टवाळ कार्टा
Fri, 09/02/2016 - 14:31 नवीन
नई जम्या, इतका काही खास वाटला नाही लेख
  • Log in or register to post comments

+2016

जेपी
Fri, 09/02/2016 - 20:35 नवीन
+2016
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

1+

पगला गजोधर
Fri, 09/02/2016 - 14:43 नवीन
(मिथ्यकथा नावे बदलून)
मिथ्यकथा कसली ? स्रीजन्मा ही तुझी कहाणी (सत्य)
  • Log in or register to post comments

लोलवा!!

प्रीत-मोहर
Fri, 09/02/2016 - 14:56 नवीन
लोलवा!!
  • Log in or register to post comments

हिशेब लागला नाही. डॉ. खरे

रेवती
Fri, 09/02/2016 - 19:33 नवीन
हिशेब लागला नाही. डॉ. खरे यांच्या लेखातील महिला राणीसारखी राहतिये, नोक्री करत नाही. विडंबनात रमेश नोकरी करू शकत नाही. आधी घरी बसवा त्याला, मगच प्रतिसाद देता येतिल.
  • Log in or register to post comments

सहमत! ;))

संदीप डांगे
Fri, 09/02/2016 - 20:27 नवीन
सहमत! ;))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

+१

सही रे सई
Fri, 09/02/2016 - 20:33 नवीन
किंवा बायको घरी काम काय काय करते नोकरी न करता ते तरी लिहायचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

कुणाला तरी घरी बसवाच. निदान

स्रुजा
Fri, 09/02/2016 - 22:06 नवीन
कुणाला तरी घरी बसवाच. निदान शेजार पाजारच्यांना तरी. कारण मुलाला सांभाळायला बाकी कोण दिसत नाही. त्यांच्या मदतीसाठी पाठवा ९ हजार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

आणि पेढ्याचं आधीच सांगा..

पिलीयन रायडर
Sat, 09/03/2016 - 00:18 नवीन
आणि पेढ्याचं आधीच सांगा.. ह्या वेळेस कुणी संकल्प सोडलाय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

हही हही हही हही हही !!!

खटपट्या
Fri, 09/02/2016 - 21:04 नवीन
हही हही हही हही हही !!!
  • Log in or register to post comments

हा हा हा हा

आजानुकर्ण
Fri, 09/02/2016 - 21:40 नवीन
मस्त इडंबन
(मुळात सकाळी संध्याकाळी आम्ही भरपूर भांडण करत असल्याने रविवारी संध्याकाळी आम्ही आवर्जून फिरायला जातो.)
हे आवडले. तुम्हाला सुखी संसाराची गुरुकिल्ली सापडली आहे. ;) ;)
  • Log in or register to post comments

सुखी संसाराची गुरुकिल्ली

रुपी
Sat, 09/03/2016 - 00:09 नवीन
सुखी संसाराची गुरुकिल्ली सापडली नाहीये अजून, कारण ही शेवटची ओळ.. इथेही आणि 'तिकडेही' .. मी अजून विचार करते आहे. आपलाच पुतण्या आहे तो बरोबर का नवरा म्हणतो ते बरोबर? >> नवरा-बायकोच्या संसारात बायको नेहमीच बरोबर आणि नवरा नेहमीच चूक असतो. शिवाय इकडे आपलाच भाचा v/s नवरा आहे, त्यामुळे भाचा बरोबर. आणि तिकडे बायको v/s आपलीच भाची काय, बहीण, भाऊ, आई कुणीही असलं तरी बायकोच बरोबर.. ही सुखी संसाराची गुरुकिली :) हा.का.ना.का. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

भारीच....

पूर्वाविवेक
Sat, 09/03/2016 - 12:40 नवीन
भारीच....
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा