पिंपरी चिंचवडची खाद्ययात्रा

प्रचेतस's picture
प्रचेतस in जनातलं, मनातलं
31 Aug 2016 - 4:43 pm

औरंग्याचे ठाणे खादाडी धागे पाहून पिंपरी चिंचवडमधील ठिकाणांसाठी पण धागा असावे असे वाटल्याने इथल्या काही ठिकाणांची भर टाकत आहे. पिंपरी चिंचवडचे मिपाकर अजून काही ठिकाणांबद्दल लिहितीलच.

१. नाशिककर कॅन्टीन - एच ए कॉलनीत,
ह्याचं फरसाण खूप जबरदस्त. वडापाव पूर्वी खूप छान होता पण हल्ली सोडा जास्त मारतो. सामोसा आणि त्याबरोबर देत असलेली खोबर्‍याची चटणी मात्र अत्युत्तम. गुलाबजामपण खूप उत्कृष्ट. सकाळी ८ ते संध्याकाळी ५.३० / ६ पर्यंत चालू असतं.

२. करमरकर - चापेकर चौक, चिंचवड
साबुदाणा खिचडी, कोथिंबीर वडी खूप छान, पोहे, उपमा, मिसळ वगैरे मिळतात. किंचित महागडं पण दर्जेदार

३. मयुर मिसळ - चिंचवड स्टेशन
पिंचिंमधली सर्वात चांगली मिसळ इथेच खाल्लीय. बाकी चिंचवडगावात नेवाळे ( हा तिखटाचे डबेच्या डबे ओतत असावा रश्श्यात इतकी तिखट), लिंक रोडवर दे धक्का, पिंपरीगावात निसर्ग, अतिथी, जनता, दिप्ती असे मिसळीचे ठेले आहेत.

४. कुदळेची भेळ - पिंपरीगाव, नवमहाराष्ट्र शाळेच्या मागे.
मटकी भेळेसाठी प्रसिद्ध. भेळेची ताटली अगदी भरगच्च देतो. त्यवार मटकी आणि लिंबाच्या रसात वाफवलेल्या हिरव्या मिरच्या. अफाट लागतात.

५. महादेव पॅटिसवाला - पिंपरी कॅम्प
सकाळी ह्याच्याकडे खास सिंधी पक्वान मिळतं. दाल पकवान. आणि संध्याकाळी रगडा पॅटिस (सिंधी स्टाईलचं). दोन्ही वेळा भरपूर गर्दी असते. दालवडा, मिरचीवडा, भजी ह्या अजून काही खासियती.

६. गीता स्नॅक्स सेंटर - निगडी
पावभाजी आणि कॉल्ड कॉफीसाठी फेमस

७. गणेश स्वीट मार्ट - पिंपरी कॅम्प.
ह्याच्यासारखी रसमलई अगदी चितळे बंधू, काका हलवाईकडे देखील मिळत नाही. माफक गोड आणि चवीला प्रचंड सुंदर.

८. यशवंत स्वीट मार्ट - चिंचवडगाव
गुलाबजाम, बाकरवडी आणि इतर पदार्थ. गुलाबजाम जवळपास नाशिककरसारख्याच चवीचे.

९. कलादीप स्वीट मार्ट - चिंचवडगाव.
इथला ढोकळा खूप भारी आणि त्याच्याबरोबर मिळणारी पुदिन्याची चटणीपण खूप भारी. खूप लवकर संपतो ढोकळा इथला.

हाटेलं वगैरे मुद्दामच दिलेली नाहीत, मिपाकर अजून भर घालतीलच.

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

DeepakMali's picture

3 Sep 2016 - 8:36 am | DeepakMali

चापेकर चौक येथे सुद्धा चितळेंची शाखा सुरु झालीय..

कपिलमुनी's picture

3 Sep 2016 - 8:58 am | कपिलमुनी

वाकड गावात हॉटेल परख आहे , खास माणदेशी चवीची मटण थाळी मिळते. आणि कोल्हापूरी पेक्षा वेगळी चव आहे

मिपापन्खा's picture

3 Sep 2016 - 7:26 pm | मिपापन्खा

चितळे पिंपळे सौदागर मध्ये पण चालू झाले आहे कोकणे चौक मध्ये

कपिलमुनी's picture

4 Sep 2016 - 11:47 am | कपिलमुनी

नासिक ( नाशिक) रोड, कासारवाडी,
मासे प्रेमीसाठी खास ! अप्रतिम मासे मिळतात.
आधी फोन करुन जाणे

विनटूविन's picture

4 Sep 2016 - 5:21 pm | विनटूविन

पण कधीच आधी फोन न केल्याने खायला मिळाले नाही

कपिलमुनी's picture

5 Sep 2016 - 5:43 pm | कपिलमुनी

मोरया शेजारचा परदेशी फरसाण वाला चांगला अहे असे ऐकून आहे

नाखु's picture

6 Sep 2016 - 9:12 am | नाखु

कारण मोरया गणपती आणि परदशी एक्मेकांपासून बरेच लांब आहेत (मोरया घाटावर नदी पाशी० तर परदेशी गांधीपेठेत किमान ३/४ किमी.

कपिलमुनी's picture

6 Sep 2016 - 9:20 am | कपिलमुनी

या भागात नवीन आहे त्यामुळे पेठांची नावे माहिती नाहीत . चापेकर चौकातून मोरयाकडे जाताना दुसरा डावा वळण घ्या तिथे उजव्या' बाजूला मोठा दुकान आहे

प्रचेतस's picture

6 Sep 2016 - 9:26 am | प्रचेतस

३/४ किमी नाही तर दीड्/दोनशे मीटर्स फक्त.

तर हे आले लगेच पोच्वायला !!!

अगदी अरसिक ब्वा तुम्ही.

कपिलमुनी's picture

6 Sep 2016 - 10:54 am | कपिलमुनी

नाखुंचा वाचून ३/४ किमी चालल्याचा आनंद हिरावून घेतला :((

वाल्मिक's picture

7 Sep 2016 - 1:14 am | वाल्मिक

pcmc मध्ये रात्री 12 नंतर ची पण खाद्य यात्रा कृपया सांगावी

गणामास्तर's picture

7 Sep 2016 - 9:43 am | गणामास्तर

खाद्य यात्रा विचारली म्हणून फक्त तेवढचं सांगतो ;)
वरील प्रतिसादात जे 'हॉटेल कराची' सांगितले आहे ते पहाटेपर्यंत चालू असते,अर्थात साडे अकरा नंतर प्रवेश मागील दाराने.
निगडी नाक्यावर भुर्जीवाला बराचं वेळ चालू असतो. तसेचं निगडी प्राधिकरणातील 'नायडू' सुद्धा दोनेक पर्यंत चालू असते.
तिथे पाव भाजी,कॉफी आणि पुलाव मिळेल.
'फूड ऍट नाईट' म्हणून एक चालू झालेले आहे. फक्त ऑनलाईन ऑर्डरच करायला लागते. रात्रभर सेवा देतात (फक्त जेवण आणून देतात हं ;) )

कपिलमुनी's picture

7 Sep 2016 - 12:34 pm | कपिलमुनी

पुण्याहून एक्सप्रेस वे ला वळायाचा आहे तिथे डाव्या बाजूब सँटोसा रीसोर्टच्या बाजूला पंजाबी रसोई आहे .
३ वाजेपर्यंत सर्विस देतो .
तिथले इतर लहान ढाबे रात्रभर चालू रहातात पण क्वालीटी भंगार आहे

प्रचेतस's picture

7 Sep 2016 - 12:41 pm | प्रचेतस

मास्तरबरोबरच एकदा पंजाबी रसोईला गेलो होतो.

चाणक्य's picture

7 Sep 2016 - 4:03 pm | चाणक्य

रात्री साडेबारा नंतर बंद होतय आजकाल. एक म्हणजे डोक्यावरून पाणी. फूड अॅट नाईट ठीक आहे. म्हणजे फार भारी नाही, वेळेला केळं टाईप.पण रात्रभर असते सर्व्हिस ते एक बरंय.

बोका-ए-आझम's picture

7 Sep 2016 - 8:31 am | बोका-ए-आझम

म्हणजे पिंचिकर बहुतेक दररोज बाहेरच जेवत असावेत!;)
या धाग्याच्या निमित्ताने प्रचेतस आणि गणामास्तर यांना पिंपरी-चिंचवडचे झोम्याटो हा किताब विभागून देण्यात येत आहे. टाळ्या!

बाहेर कोण कोण जेवायला आलयं,ते बघावं जरा(जमल्यास ओळख-पाळख होईल असा सुप्त हेतुही) असू शकतो बोकेशभौ..

चला अता भूमीगत होऊ यात......

भूमीगत नाखु

महासंग्राम's picture

7 Sep 2016 - 10:13 am | महासंग्राम

हाहाहा नाखुनाना गाणं बरं का ;)

देवांग's picture

7 Sep 2016 - 11:26 am | देवांग

जुना जकातनाका इथे प्रतीक बिर्याणीमध्ये मस्त बिर्याणी मिळणे ...आणि इथे मिळणार अफगाण तंदूर जबरा आहे

महासंग्राम's picture

7 Sep 2016 - 3:01 pm | महासंग्राम

धाग्याच्या द्विशतक पूर्तीनिमित्त वल्ली शेठ आणि गणामास्तर यांचे उकडीचे मोदक देऊन सत्कार करणेत येईल.

अखिल मिपा सत्कार संघटना
अध्यक्ष : नाखु
प्रेरणा स्थान : जेपी

ज्जेब्बात्त्त धागा आहे हा. :)