माणसं वाचणारा शायर : राजेश रेड्डी

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
27 Aug 2016 - 11:22 am

असं म्हणतात गझल अनुभवण्याची गोष्ट आहे. मानवी मनाचं प्रतिबिंब गझलेत कायम दिसत आलं आहे.
मीर तकी मीर, गालिब यांसारख्या कित्येक मोठ्या शायरांनी गझल रुजवली. मुघल काळात गझलेला राजाश्रय लाभला, एवढे भाग्य क्वचितच कोणत्या काव्य प्रकाराला लाभले असेल. पुढे दुष्यन्त कुमार, बशीर बद्र, निदा फाजली यांसारख्या लोकप्रिय शायरांनी हिंदुस्तानी भाषेत गझल लिहून ती अधिकच लोकप्रिय केली. आधुनिक काळात राजेश रेडडी हे नाव याच यादीत घेतलं जात. त्यांची उर्दू भाषेवर तेवढीच पकड आहे जेवढी हिंदीवर. त्यामुळे मातृभाषा उर्दू नसतांना त्यांनी उर्दू गझलेत जे मानाचं स्थान प्राप्त केलंय ते निश्चितच कौतुक करण्याजोगं आहे.

राजेश रेड्डींचा जन्म २२ जुलै १९५२ चा नागपूरचा, आकाशवाणी मधून संचालक पदावरून निवृत्त झालेल्या या जिंदादिल माणसाने १९८० च्या दशकात त्यांनी आपल्या वेगळ्या अंदाजात शेर म्हणायला सुरवात केली आणि लौकरच लोकप्रिय पण झाले आतपर्यंत त्यांचे तीन ग़झलसंग्रह हिन्दी-उर्दूत प्रकाशित झाले आहेत. ‘उडान’ (१९९६), ‘वजूद’ (२०११), ‘आस्मा से आगे’ (२०१५). राजेश रेड्डींची गझल अत्यंत सोपी आणि सुटसुटीत भाषा वापरते कदाचित त्यामुळेच आज ते दुष्यन्तकुमार यासारख्या महान गझलकारांच्या पंक्तीत विराजमान झाले आहेत. त्यांची गझल रोजच्या अनुभवातून येते. आज मिसरा, रदीफ, काफ़िये यांच्या या तांत्रिकतेच्या जंजाळातहि अत्यंत सहजपणे त्यांचे शब्द सामान्य रसिकाकडे पोचतात आणि त्याला आपलेसे वाटतात.
त्यामुळेच सामान्य माणूस रोज थकून जेव्हा घरी जातो याच वर्णन करतांना ते म्हणतात,

शाम को जिस वक़्त ख़ाली हाथ घर जाता हूँ मैं
मुस्कुरा देते हैं बच्चे और मर जाता हूँ मैं

जीवन, मैत्री, बंडखोरी, माणूस, समाज यांसारख्या विविध विषयांवर त्याने अत्यंत कुशलतेने लिहिलं आहे.
त्यापैकी काही शेर.

मनातून अहं दूर रहावा असं त्यांना वाटते.म्हणून ते म्हणतात
ये कब चाहा कि मै मशहूर हो जाऊ,
बस अपने आप को मंजूर हो जाऊ

रोज आपल्याला आयुष्यत वेगवेगळे अनुभव येत असतात कधी कधी अशी वेळ येते एक वेळ शत्रू परवडले पण मित्र नको अशी स्थिती येते, मैत्रीच्या त्याना आलेल्या प्रत्ययात ते म्हणतात
दोस्तों का ख़ौफ़ ही काफ़ी है अब
मेरे दिल से दुष्मनों का डर गया

काही झालं तरी हार न मानण्याचा, आपल्या स्वप्नांना पुन्हा जगण्याचा आशावाद त्याच्या खालच्या शेरात दिसतो, ते म्हणतात,
रोज इन आँखों के सापाने तूट जाते है तो क्या,
रोज इन आँखो में सपने सजाने चाहिए !!!

इस अहद के इन्साँ में वफ़ा ढूँढ रहे हैं,
हम ज़हर की शीशी में दवा ढूँढ रहे हैं

माझा सर्वात आवडता शेर
दोस्तों का क्या है वो तो यूँ भी मिल जाते हैं मुफ़्त
रोज़ इक सच बोल कर दुश्मन कमाने चाहिएँ

राजेश रेड्डींची गझल माणसाला कायमच विचारत करायला लावणारी आहे.

गीता हूँ कुरआन हूँ मैं,
मुझको पढ़ इन्सान हूँ मैं

अशा या माणस वाचणाऱ्या शायराला सलाम.....

गझलभाषाआस्वाद

प्रतिक्रिया

शाम को जिस वक़्त ख़ाली हाथ घर जाता हूँ मैं
मुस्कुरा देते हैं बच्चे और मर जाता हूँ मैं

..!!

प्राची अश्विनी's picture

27 Aug 2016 - 1:00 pm | प्राची अश्विनी

आहाहा! क्या बात!

अप्रतिम आणि समजायला सोपी भाषा.

रुपी's picture

1 Sep 2016 - 4:17 am | रुपी

सहमत आहे, नाहीतर शेर शायरी बर्‍याचदा मला समजतच नाही..

अर्धवटराव's picture

31 Aug 2016 - 2:20 am | अर्धवटराव

शाम को जिस वक़्त ख़ाली हाथ घर जाता हूँ मैं
मुस्कुरा देते हैं बच्चे और मर जाता हूँ मैं

हे खुशी के मारे मर जाता हु आहे कि शर्म के मारे ??

महासंग्राम's picture

31 Aug 2016 - 10:02 am | महासंग्राम

अर्धवटराव, कोणता स्वाभिमानी माणूस रिकाम्या हाताने घरी गेल्यावर खुश होईल. याचा विचार करा तुम्हाला उत्तर नक्कीच मिळेल.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

31 Aug 2016 - 10:09 am | मिसळलेला काव्यप्रेमी

छान ओळख.

गीता हूँ कुरआन हूँ मैं,
मुझको पढ़ इन्सान हूँ मैं

हे खासचं. पण समाधान नाही झालं. येऊ द्या अजुन.

राजेश रेड्डींच्या गजलांचं पुस्तक आहे का? असल्यास नाव कळेल का?

महासंग्राम's picture

31 Aug 2016 - 2:06 pm | महासंग्राम

यशो तै उडान’ (१९९६), ‘वजूद’ (२०११), ‘आस्मा से आगे’ (२०१५). हे तीन पुस्तकं प्रकाशित झाले आहेत त्यांचे.

http://www.amazon.in/Vujud-Rajesh-Reddy/dp/9350007355/ref=sr_1_1/254-421...

http://www.amazon.in/Anahad-Rajesh-Reddy/dp/8128825836/ref=sr_1_2/254-42...

यशोधरा's picture

31 Aug 2016 - 2:08 pm | यशोधरा

धन्यवाद मंदार, पाहते.

पद्मावति's picture

31 Aug 2016 - 2:11 pm | पद्मावति

सुंदर ओळख.

दोस्तों का क्या है वो तो यूँ भी मिल जाते हैं मुफ़्त
रोज़ इक सच बोल कर दुश्मन कमाने चाहिएँ

..क्या बात है!!!

महासंग्राम's picture

31 Aug 2016 - 2:14 pm | महासंग्राम

माझा सर्वात आवडता शेर आहे हा..

जयन्त बा शिम्पि's picture

31 Aug 2016 - 2:24 pm | जयन्त बा शिम्पि

" दोस्तोंका क्या है........." मलाही आवडला . भाषा फारच सोपी आहे .पुस्तके घेऊन वाचीन.

सुंड्या's picture

28 Sep 2016 - 12:00 am | सुंड्या

"शाम को जिस वक़्त..." आरपार जाणारा शेर