दिवाळी अंक २०१६ - आवाहन

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in जनातलं, मनातलं
22 Aug 2016 - 1:00 am

नमस्कार मिपाकरहो!

सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या मिपाचा दिवाळी अंक आपण सादर करणार आहोत. आणि सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या भरघोस प्रतिसादाचं आवाहन आम्ही करत आहोत.

रहस्यकथा वाचायला कोणाला आवडत नाही! लहानपणापासून आपण सगळेच शरलॉक होम्स, ब्योमकेश बक्षी, फेलूदा, काळा पहाड, बॅ० अमर विश्वास आदिंच्या रहस्यकथा वाचत / ऐकत / पहात आलो आहोत. याच अनुषंगाने यंदाच्या दिवाळी अंकात रहस्यकथांसाठी एक वेगळा कोपरा, वेगळा विभाग आपण ठेवणार आहोत. या दालनासाठी तुमच्याकडून रहस्यकथा हवी आहे. स्वतंत्रपणे रहस्यकथा लिहिलीत तर सोन्याहून पिवळं, पण अन्य भाषांतली भाषांतरित / रूपांतरित कथाही चालेल! (अर्थात योग्य त्या "पेरणे"ला श्रेय द्यायचं मात्र विसरू नका!)

अर्थात सगळा अंकच रहस्यकथांना वाहिलेला नाही. अन्य कथा, लेख, पाकृ, कविता, मुलाखती, चित्रं वगैरेंचंही स्वागतच आहे.

...आणि काही नियम/सूचना:

१) तुम्ही पाठवलेलं लेखन तुमची स्वतःची निर्मिती असावी. कशावर आधारित असल्यास तसा स्पष्ट उल्लेख करावा. कोणत्याही प्रकारच्या वाङ्मयचौर्याचा ढका आपल्या मिपाच्या दिवाळी अंकाला लागू नये ही आपली सगळ्यांचीच जबाबदारी आहे.

२) मिपाचा दिवाळी अंक दर्जेदार साहित्याने भरलेला असावा अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे, आणि त्यासाठी आम्ही दिवाळी अंक टीम आटोकाट प्रयत्नही करणार आहोत. आलेल्या साहित्याला नीट निवडून, टिपून, पारखून मगच दिवाळी अंकात स्थान दिलं जाईल. याचाच अर्थ काही साहित्य नाकारावं लागेल. समजा, तुमचं लेखन नाकारलं गेलं तर कृपया नाराज होऊ नका. आपणांला वाटल्यास ते स्वतंत्रपणे मिपावर नक्की प्रकाशित करा.

३) दिवाळी मंगलमय, आनंदाचा सण आहे हे आपण सगळेच जाणतो. तो सण साजरा करायच्या साहित्यिक मेजवानीत बीभत्सपणाचा आंबटरस असू नये. हा नियम रहस्यकथांसाठीही आहे. विशेषतः रहस्यकथांसाठी हा नियम फारच जाचक वाटू शकतं याची कल्पना आहे. हे सोपं नाही. पण सोप्या गोष्टी करण्यात फारशी मजाही नसते. ;) तरी तुम्हाला काही मदत/सल्ला/मार्गदर्शन हवं असल्यास साहित्य संपादकांशी संपर्क साधावा.

--x--

दिवाळी ३० ऑक्टोबर २०१६ला सुरू होते आहे. तुमचं लेखन आल्यावर ते वाचून, मुद्रितशोधन करून, सजवून चकाचक करायला लागणारा वेळही जमेस धरावा लागेल. म्हणून, आपलं लेखन उशीरात उशीरा १ ऑक्टोबर २०१६ पर्यंत साहित्य संपादक या आयडीला व्यनीने पाठवा.

त्याआधी किंवा त्यानंतर काही मदत लागल्यास आम्ही आहोतच!

- टीम दिवाळी अंक

हे ठिकाण

प्रतिक्रिया

बोका-ए-आझम's picture

22 Aug 2016 - 1:29 am | बोका-ए-आझम

ज्जे बात! दीर्घकथा चालेल का?

आदूबाळ's picture

22 Aug 2016 - 1:52 am | आदूबाळ

चालेल की! पळेल!

सस्नेह's picture

22 Aug 2016 - 10:54 am | सस्नेह

तुमची तर हवीच !!

प्रचेतस's picture

22 Aug 2016 - 12:05 pm | प्रचेतस

दिवाळी अंकास शुभेच्छा.
अंक नेहमीप्रमाणेच दर्जेदार असेल ह्याची खात्री आहेच.

ज्योति अळवणी's picture

22 Aug 2016 - 1:12 pm | ज्योति अळवणी

मला माझी एखादी कथा द्यायला आवडेल मिपा च्या दिवाळी अंकात.

ज्योति अळवणी's picture

22 Aug 2016 - 1:21 pm | ज्योति अळवणी

अगोदर मिपा वर टाकलेली कथा परत दिली तर चालेल का?

आदूबाळ's picture

22 Aug 2016 - 1:28 pm | आदूबाळ

नाही. लेखन पूर्वप्रकाशित नसावं.

हा मुद्दा नजरेला आणून दिल्याबद्दल आभार.

अहो तै, मुख्य वाचक तेच असणार ना?
.
प्रतिसाद पण तेच येतील. चालेल का? ;)

ज्योति अळवणी's picture

22 Aug 2016 - 2:44 pm | ज्योति अळवणी

श्री अभ्या... माझी कथा जर दिवाळी अंकात येणार असेल आणि मुख्य वाचक तेच असतील(असं तुमचं मत आहे माझं नाही...) तर मला चालेल. कारण माझा विश्वास आहे जे (तुमच्या म्हणण्याप्रमाणे)मुख्य वाचकांव्यतिरिक्त जे वाचक वाचतील आणि प्रतिसाद देतील ते देखील मला वाचायला आवडतील. कोणी एखादा प्रश्न विचारला की आपण कायमच वाकड्यात का शिरता ते मला कळत नाही

कोणी एखादा प्रश्न विचारला की आपण कायमच वाकड्यात का शिरता ते मला कळत नाही

हो, गणपती आले की बदलणारे मी स्वभाव.

लालगरूड's picture

23 Aug 2016 - 8:44 am | लालगरूड

अभ्या काकूला त्रास नको देऊ

लालगरूड's picture

23 Aug 2016 - 8:44 am | लालगरूड

अभ्या काकूला त्रास नको देऊ

स्वाती दिनेश's picture

22 Aug 2016 - 1:39 pm | स्वाती दिनेश

अंकासाठी शुभेच्छा!
स्वाती

मुक्त विहारि's picture

22 Aug 2016 - 1:46 pm | मुक्त विहारि

"एका लग्नाची गोष्ट" ह्या नावाची.

ती दिली तर चालेल का?

अद्याप ती कथा कुठेही प्रकाशित झालेली नाही.

अभ्या..'s picture

22 Aug 2016 - 1:47 pm | अभ्या..

येऊ द्या मुवि.
मी पण 'टॉवेलटोपी' लिहितो.

मुक्त विहारि's picture

22 Aug 2016 - 1:49 pm | मुक्त विहारि

ह्या बाबत काही विचारू नकोस.

एका पेक्ष एक भारी अनुभव आहेत.

मी पण "शाल-श्रीफळ", "कद-उपरणं" असलं काहीतरी लिहीन!! =))

किसन शिंदे's picture

22 Aug 2016 - 5:30 pm | किसन शिंदे

धन्याकडून वरातीत वाजणार्‍या गाण्यांवर लेख मागवता येईल. =))

आदूबाळ's picture

22 Aug 2016 - 1:48 pm | आदूबाळ

__/\__ अर्थात!

जागु's picture

22 Aug 2016 - 2:34 pm | जागु

रेसिपी देते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Aug 2016 - 3:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दिवाळी अंकासाठी शुभेच्छा ! नेहमीप्रमाणे अंक बहारदार असेल यात काही वाद नाही. दिवाळी अंक टीमला शुभेच्छा !!! :)

-दिलीप बिरुटे

स्वामी संकेतानंद's picture

22 Aug 2016 - 3:53 pm | स्वामी संकेतानंद

कधी लिहून पाहिली नाही रहस्यकथा, पण प्रयत्न करण्यात येईल.

आदूबाळ's picture

22 Aug 2016 - 4:39 pm | आदूबाळ

बहुत आभार!

बोका-ए-आझम's picture

22 Aug 2016 - 4:45 pm | बोका-ए-आझम

येऊ द्या.

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Aug 2016 - 4:55 pm | कैलासवासी सोन्याबापु

सर्व लेखकु मंडळींस शुभेच्छा!!

फराळाच्या ताटाची वाट पाहतोय

-बाप्या

स्वामी संकेतानंद's picture

22 Aug 2016 - 5:13 pm | स्वामी संकेतानंद

तू बी लिव बे सायच्या

अभ्या..'s picture

22 Aug 2016 - 9:58 pm | अभ्या..

स्वामी, बापू तुम्हीलोक वर्हाडी शिव्या शिकवा कि राव. त्यो भारत गणेशपुरे भैताडाशिवाय दुसरं काय बोलना झालाय.

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Aug 2016 - 10:41 pm | कैलासवासी सोन्याबापु

ह्या शिव्या देणे सरासरी पोरगं "बब्बा" "आज्जी" वगैरे बोलायला लागलं की एकदम अकस्मात पडतं, प्रसंगी ह्या शिव्या प्रचंड घट्ट मैत्री निदर्शक विशेषणे होतात, तर सुरु करूया

1. भोसयच्या/भोसईच्या :- ह्या शिवीचा नागर भाषिक उच्चार देण्याची गरज वाटत नाही, तितका तू हुशार आहेस अभ्या. आत्यंतिक प्रेम-आनंद-आश्चर्य ते राग दाखवायला ही शिवी कामी येते, वैदर्भ दृष्टीनेच नाही तर पॅनइंडिया तत्वावर इतकी सुंदर अन पॉलीमॉर्फिक शिवी सापडणे कठीण आहे,

उदाहरणे

प्रेम - ह्या इन्याच्या घरी गेलं का ह्याचं पोट्टं नीरा काका काका करत अंगावर कुद्या मारते भोसईचं (ह्यात विन्या, विन्याची लक्ष्मी, रिटायर्ड लक्ष्मी उर्फ माय अन ब्रह्मदेवासारखा मग्न असलेला बाप कोणालाच काही गैर वाटत नाही तर कौटुंबिक संबंध घट्ट असल्याचा तो पुरावा असतो)

आनंद - अरे भोसईचा राहणे, काय खास खेडते (खेळतो) रे बावा थो

आश्चर्य - १५ जुलाब करून बी भोसईचा दिन्या रोडगे म्हणले का बातच (लगेच धावत येते)

तर अश्या ह्या सुंदर शिवी नंतर आपण पुढे वळूयात काही कमअस्सल कॉपीराईट वऱ्हाडी शिव्यांकडे, लक्षात घ्यायचा मुद्दा हा की ह्या शिव्या वऱ्हाड प्रांत म्हणजे विदर्भाच्या अकोला अमरावती वाशीम यवतमाळ बुलडाणा अन काही अंशी वर्धा ह्याच जिल्ह्यात दिल्या जातात, स्वामींच्या भागात म्हणजे झाडीपट्टी मध्ये वेगळ्या शिव्या असतात सूक्ष्म फरकाच्या, म्हणजे बघ जाणकार जसे नासिक सीडलेस अन तासगाव चमन द्राक्षाच्या प्रतीत फरक करू शकतो तितके सूक्ष्म, अन ह्या सगळ्या शिव्यांचे एमसीएक्स उर्फ कमोडिटी एक्सचेंज म्हणजे नागपूर शहर आहे तिथे सगळी व्हरायटी मिळते , असो वऱ्हाडी शिवी संपदेतील पुढील मौक्तिकें खालील प्रमाणे

2 सायच्या :- ह्याचा शब्द अन भाषिक उद्गम मला माहिती नाही पण ही युनिव्हर्सल शिवी आहे आमच्याकडली, प्रोग्रॅमिंग करताना ज्या हेडरफाइल declare करायला लागतात सुरुवातीला ही तसली हेडर फाइल आहे शुद्ध, हिच्याशिवाय कितीही शुद्ध वऱ्हाडी बोलली तरी ती सिंटॅक्स एररच देणार ही खात्री बाळगा, ही शिवी अघोरी साधू सारखी असते, हिला घोंगडी पांघरा का राख हिला फरक पडत नसतो

उदाहरणे :-
१. विनू :-आज सायचं चिकन खायचा मूड हाय लेक
दिनु :- भसकला का सायच्या सावन लागलं हाय ना
विनू :- कायच करा सायच्याले सावन कई खतम होते रे बा दिन्या??
दिनु :- राय न सायच्या उगामुगा एखाद हफ्ता मंग लागन तर एखाद कुत्तल्डलं कापून खायजो पर सद्याशीक कंट्रोल मदी राय होबासक्या

3. फोकनीच्या विथ अ "न" नॉट अ "ण" , आमच्याकडे कुलकर्णी/कांबळे/कुरेशी/कुदळे पाटील कोणाच्याही, पोरानं जरी ही शिवी दिली तरी "ण" कधीच लावणार नाही! ती "न" लावूनच दिली जाते, पुर्वीच्याकळी महाभारतात बाण मंत्राभिमंत्रीत करत त्यात उच्चार चुकला तर बाणावर शक्ती विराजमान होत नसे, तेच शास्त्र ह्या शिवीला लागू पडते ह्याची नोंद घ्यावी! तेव्हा "फोकनीच्या" विथ अ "न" तर ही शिवी जरी प्रभावी अस्त्र असले तरी ही मुळात सायच्याची हाय पॉवर गोळी आहे म्हणजे बघ सायच्या जर 250 एमजी असली तर फोकनीच्या ही 500 एमजी असेल, बाकी उपयोग तेच, फक्त ही शिवी बहुतकरून दटावणे चेपणे इत्यादी कर्मसहाय्यक आहे, अन ह्या शिवीचा अखंड सप्ताह पानपट्टी नामक तीर्थक्षेत्री कायम सुरु असतो.

हिच्या खेरीज ग्रामीण अंतर्भागात भाडखाव, संतरसोल्या, इमल्या, बालतारा, नसानकोंबड्या, गेंगल्या, बहिनमारी, इचिभना, वगैरे मौक्तिकेंही गुलाल बुक्का उधळावा तश्या सुरूच असतात, ह्या झाल्या सभ्य शिव्या, असभ्य शिव्यांकरता आधी बिरुटे सर म्हणतात तो कोनाडा उघडा तिकडे फुकट शिकवणी धागा सुरु करण्यात आम्हांस आनंद होईल ;)

अभ्या..'s picture

22 Aug 2016 - 10:50 pm | अभ्या..

ह्ये जिगर,
गंडा बांधून घेतलाय बे, अमरावतीत जाऊन चार शिव्या देऊन येईन तवाच तुला गुरुदक्षिणा दिइन.

अभ्या..'s picture

22 Aug 2016 - 10:50 pm | अभ्या..

ह्ये जिगर,
गंडा बांधून घेतलाय बे, अमरावतीत जाऊन चार शिव्या देऊन येईन तवाच तुला गुरुदक्षिणा दिइन.

इल्यूमिनाटस's picture

23 Aug 2016 - 9:09 am | इल्यूमिनाटस

भाषा ज्ञानात भर टाकल्याबद्दल
निशाणी डावा अंगठा या पिच्चर मध्ये अनासपुरे सारखा इचिभन म्हणत असतो , हि शिवी आहे हे आत्ता समजले !
शिव्यांशिवाय बोलणे म्हणजे बिन फोडणीचं वरण खाणे

संदीप डांगे's picture

22 Aug 2016 - 5:17 pm | संदीप डांगे

तुमच्याकडून पेस्शल हेरगिरी कथा अपेक्षित आहे,

महासंग्राम's picture

22 Aug 2016 - 5:21 pm | महासंग्राम

डांगेण्णा ना पेशल फूलछाप वाले हनुमोदन +१२३४५६७८९

अगदी अगदी. बापू लिहाच हेरकथा.

दिवाळी अंक टीमला शुभेच्छा !!!

अंक नेहमीप्रमाणेच दर्जेदार असेल ह्याची खात्री आहेच.

सर्वत्र सहमती.

वाचनमात्र नाखु

यशोधरा's picture

22 Aug 2016 - 6:42 pm | यशोधरा

दिवाळी अंक टीमला अनेक शुभेच्छा. अंक नेहमीप्रमाणेच दर्जेदार असेल ह्याची खात्री आहे.

खूप खूप शुभेच्छा. मस्तं होणार दिवाळी अंक निश्चितच.

उल्का's picture

22 Aug 2016 - 7:08 pm | उल्का

दिवाळी अंक टीमला खूप खूप शुभेच्छा!

सही! रहस्यकथा लिहली नाही कधी पण प्रयत्न करेन.

कथा कश्या स्वरूपात प्रसिद्ध होतात ? प्रत्येक कथा स्वतंत्रपणे कि सर्व कथा एकत्र ( अगर एकाच pdf मध्ये ) ?

पैसा's picture

18 Sep 2016 - 9:57 am | पैसा

उजव्या कॉलममधल्या विशेषांकाच्या लिंक्स बघा, म्हणजे लक्षात येईल.

इशा१२३'s picture

18 Sep 2016 - 9:50 am | इशा१२३

पाककृती देते.

बोका-ए-आझम's picture

18 Sep 2016 - 11:34 am | बोका-ए-आझम

म्हणजे नक्की कशाची आहे हा suspense? (ह.घ्या.)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Sep 2016 - 11:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्यंगचित्र पाठवतो असं म्हटलं आहे.

-दिलीप बिरुटे

इरसाल's picture

18 Sep 2016 - 12:11 pm | इरसाल

ते ऑलिंपिक मधे सुवर्ण पदक मिळणार होते त्याचे काय झाले.
बरं ते पॅरालंपिकवाल्यांना खेलरत्न का नाय म्हणे?

शशिधर केळकर's picture

28 Sep 2016 - 6:40 pm | शशिधर केळकर

मला एक अनुवादित रहस्यकथा पाठवायची आहे. व्यनि करताना मूळ संदेशात कथा कशी जोडायची ते कृपया कळवावे.
धन्यवाद!

पैसा's picture

28 Sep 2016 - 7:06 pm | पैसा

संदेश म्हणूनच सबंध कथा कॉपी पेस्ट करून पाठवा.

संदीप डांगे's picture

28 Sep 2016 - 10:25 pm | संदीप डांगे

अर्रे... हे काय, आली की एक ऑक्टोबर...!!!

दोनच दिवस...?? काही एक्स्टेन्शन नै मिळणार्कं????

आदूबाळ's picture

28 Sep 2016 - 10:56 pm | आदूबाळ

द्या की दादा! थोडा उशीर झाला तरी हरकत नाय.

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Sep 2016 - 8:04 am | कैलासवासी सोन्याबापु

आमचं बी लिखाण अर्धवट राहिल्या गेले आहे, दोन दिवस अजून मिळावी म्हणे मुदतवाढ :(

शिव कन्या's picture

29 Sep 2016 - 5:38 pm | शिव कन्या

सेम सेम!
थोडीसी मोहलत दो भाई.
:(:(

हरेश तुपे's picture

29 Sep 2016 - 10:43 am | हरेश तुपे

क्रुपया साहित्य संपादक आयडी सांगावा.

जव्हेरगंज's picture

29 Sep 2016 - 10:52 am | जव्हेरगंज
साहित्य संपादक's picture

29 Sep 2016 - 6:00 pm | साहित्य संपादक

अनेकांच्या आग्रहाला मान देऊन अंतिम तारीख १५ ऑक्टोबर करण्यात येत आहे.

दिवाळी अंक संपादन-सजावट टीमला कमी वेळ मिळेल. त्यामुळे आपल्या लेखनाची अंदाजे शब्दसंख्या आणि लेखात काही फोटो/व्हीडियो असल्यास "साहित्य संपादक" या आयडीला व्यनि करून कळवावे.

साहित्य संपादक's picture

14 Oct 2016 - 9:36 pm | साहित्य संपादक

नमस्कार!

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवायचं असल्यास रविवार संध्याकाळपर्यंत पाठवावं ही विनंती.

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Oct 2016 - 2:17 pm | कैलासवासी सोन्याबापु

कथा पाठवली आहे, तरीही कृपया साहित्य संपादकांनी जमल्यास अन जास्त जिकिरीचे वाटत नसल्यास प्रवेशिका पाठवणाऱ्यांना जमले तर अगदी एकोळी काय द्विशब्दीय "लेखन मिळाले" इतकी तरी पोचपावती द्यावी ही आग्रहाची विनंती मी साहित्यसंपादक मंडळाला करतो आहे

आदूबाळ's picture

16 Oct 2016 - 2:25 pm | आदूबाळ

नेहेमी २४ तासाच्या आत पोच द्यायचा प्रयत्न असतो. तरी उशीर झाला असल्यास क्षमस्व.

स्वाती दिनेश's picture

16 Oct 2016 - 2:33 pm | स्वाती दिनेश

मलाही मिळालेली नाही, मी अ‍ॅझुम केलं आहे की माझा संदेश पोचलाय,:)
स्वाती

आदूबाळ's picture

16 Oct 2016 - 2:46 pm | आदूबाळ

ओह. आपले दोन्ही लेख पोचले आहेत. क्षमस्व आणि धन्यवाद!

जयन्त बा शिम्पि's picture

16 Oct 2016 - 6:45 pm | जयन्त बा शिम्पि

मी सुद्धा अनुवादित कथा पाठविली होती, ती मिळाली की नाही ते कळविणे, नसेल मिळाली तर पुन्हा पाठवीन. अर्थातच प्रकाशित करण्यायोग्य वाटली नाही तर उत्तर पाठविण्याची आवश्यकता नाही.

पैसा's picture

16 Oct 2016 - 7:37 pm | पैसा

व्यनि केला होतात की जीमेल? शक्य असेल तर मला पुन्हा व्यनि करून पाठवा.

साहित्य संपादक's picture

16 Oct 2016 - 9:09 pm | साहित्य संपादक

सासंला व्यनि आलेला नाही आपल्या कथेचा.कृपया व्यनि किंवा जी मेल परत करावा.

मिपा दिवाळी अंकाच्या आगमनाचा सांगावा देणारे फटाके चेपुवर (फेसबुकवर) फुटायला सुरुवात झालेली आहे! आपल्या भिंतीवरूनही शेअर करा.