मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवाळी अंक २०१६ - आवाहन

साहित्य संपादक · · जनातलं, मनातलं
नमस्कार मिपाकरहो! सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या मिपाचा दिवाळी अंक आपण सादर करणार आहोत. आणि सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या भरघोस प्रतिसादाचं आवाहन आम्ही करत आहोत. रहस्यकथा वाचायला कोणाला आवडत नाही! लहानपणापासून आपण सगळेच शरलॉक होम्स, ब्योमकेश बक्षी, फेलूदा, काळा पहाड, बॅ० अमर विश्वास आदिंच्या रहस्यकथा वाचत / ऐकत / पहात आलो आहोत. याच अनुषंगाने यंदाच्या दिवाळी अंकात रहस्यकथांसाठी एक वेगळा कोपरा, वेगळा विभाग आपण ठेवणार आहोत. या दालनासाठी तुमच्याकडून रहस्यकथा हवी आहे. स्वतंत्रपणे रहस्यकथा लिहिलीत तर सोन्याहून पिवळं, पण अन्य भाषांतली भाषांतरित / रूपांतरित कथाही चालेल! (अर्थात योग्य त्या "पेरणे"ला श्रेय द्यायचं मात्र विसरू नका!) अर्थात सगळा अंकच रहस्यकथांना वाहिलेला नाही. अन्य कथा, लेख, पाकृ, कविता, मुलाखती, चित्रं वगैरेंचंही स्वागतच आहे. ...आणि काही नियम/सूचना: १) तुम्ही पाठवलेलं लेखन तुमची स्वतःची निर्मिती असावी. कशावर आधारित असल्यास तसा स्पष्ट उल्लेख करावा. कोणत्याही प्रकारच्या वाङ्मयचौर्याचा ढका आपल्या मिपाच्या दिवाळी अंकाला लागू नये ही आपली सगळ्यांचीच जबाबदारी आहे. २) मिपाचा दिवाळी अंक दर्जेदार साहित्याने भरलेला असावा अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे, आणि त्यासाठी आम्ही दिवाळी अंक टीम आटोकाट प्रयत्नही करणार आहोत. आलेल्या साहित्याला नीट निवडून, टिपून, पारखून मगच दिवाळी अंकात स्थान दिलं जाईल. याचाच अर्थ काही साहित्य नाकारावं लागेल. समजा, तुमचं लेखन नाकारलं गेलं तर कृपया नाराज होऊ नका. आपणांला वाटल्यास ते स्वतंत्रपणे मिपावर नक्की प्रकाशित करा. ३) दिवाळी मंगलमय, आनंदाचा सण आहे हे आपण सगळेच जाणतो. तो सण साजरा करायच्या साहित्यिक मेजवानीत बीभत्सपणाचा आंबटरस असू नये. हा नियम रहस्यकथांसाठीही आहे. विशेषतः रहस्यकथांसाठी हा नियम फारच जाचक वाटू शकतं याची कल्पना आहे. हे सोपं नाही. पण सोप्या गोष्टी करण्यात फारशी मजाही नसते. ;) तरी तुम्हाला काही मदत/सल्ला/मार्गदर्शन हवं असल्यास साहित्य संपादकांशी संपर्क साधावा. --x-- दिवाळी ३० ऑक्टोबर २०१६ला सुरू होते आहे. तुमचं लेखन आल्यावर ते वाचून, मुद्रितशोधन करून, सजवून चकाचक करायला लागणारा वेळही जमेस धरावा लागेल. म्हणून, आपलं लेखन उशीरात उशीरा १ ऑक्टोबर २०१६ पर्यंत साहित्य संपादक या आयडीला व्यनीने पाठवा. त्याआधी किंवा त्यानंतर काही मदत लागल्यास आम्ही आहोतच! - टीम दिवाळी अंक

वाचने 16596 वाचनखूण प्रतिक्रिया 63

In reply to by अभ्या..

ज्योति अळवणी Mon, 08/22/2016 - 14:44
श्री अभ्या... माझी कथा जर दिवाळी अंकात येणार असेल आणि मुख्य वाचक तेच असतील(असं तुमचं मत आहे माझं नाही...) तर मला चालेल. कारण माझा विश्वास आहे जे (तुमच्या म्हणण्याप्रमाणे)मुख्य वाचकांव्यतिरिक्त जे वाचक वाचतील आणि प्रतिसाद देतील ते देखील मला वाचायला आवडतील. कोणी एखादा प्रश्न विचारला की आपण कायमच वाकड्यात का शिरता ते मला कळत नाही

In reply to by ज्योति अळवणी

अभ्या.. Mon, 08/22/2016 - 15:47
कोणी एखादा प्रश्न विचारला की आपण कायमच वाकड्यात का शिरता ते मला कळत नाही
हो, गणपती आले की बदलणारे मी स्वभाव.

In reply to by स्वामी संकेतानंद

अभ्या.. Mon, 08/22/2016 - 21:58
स्वामी, बापू तुम्हीलोक वर्हाडी शिव्या शिकवा कि राव. त्यो भारत गणेशपुरे भैताडाशिवाय दुसरं काय बोलना झालाय.

In reply to by अभ्या..

ह्या शिव्या देणे सरासरी पोरगं "बब्बा" "आज्जी" वगैरे बोलायला लागलं की एकदम अकस्मात पडतं, प्रसंगी ह्या शिव्या प्रचंड घट्ट मैत्री निदर्शक विशेषणे होतात, तर सुरु करूया 1. भोसयच्या/भोसईच्या :- ह्या शिवीचा नागर भाषिक उच्चार देण्याची गरज वाटत नाही, तितका तू हुशार आहेस अभ्या. आत्यंतिक प्रेम-आनंद-आश्चर्य ते राग दाखवायला ही शिवी कामी येते, वैदर्भ दृष्टीनेच नाही तर पॅनइंडिया तत्वावर इतकी सुंदर अन पॉलीमॉर्फिक शिवी सापडणे कठीण आहे, उदाहरणे प्रेम - ह्या इन्याच्या घरी गेलं का ह्याचं पोट्टं नीरा काका काका करत अंगावर कुद्या मारते भोसईचं (ह्यात विन्या, विन्याची लक्ष्मी, रिटायर्ड लक्ष्मी उर्फ माय अन ब्रह्मदेवासारखा मग्न असलेला बाप कोणालाच काही गैर वाटत नाही तर कौटुंबिक संबंध घट्ट असल्याचा तो पुरावा असतो) आनंद - अरे भोसईचा राहणे, काय खास खेडते (खेळतो) रे बावा थो आश्चर्य - १५ जुलाब करून बी भोसईचा दिन्या रोडगे म्हणले का बातच (लगेच धावत येते) तर अश्या ह्या सुंदर शिवी नंतर आपण पुढे वळूयात काही कमअस्सल कॉपीराईट वऱ्हाडी शिव्यांकडे, लक्षात घ्यायचा मुद्दा हा की ह्या शिव्या वऱ्हाड प्रांत म्हणजे विदर्भाच्या अकोला अमरावती वाशीम यवतमाळ बुलडाणा अन काही अंशी वर्धा ह्याच जिल्ह्यात दिल्या जातात, स्वामींच्या भागात म्हणजे झाडीपट्टी मध्ये वेगळ्या शिव्या असतात सूक्ष्म फरकाच्या, म्हणजे बघ जाणकार जसे नासिक सीडलेस अन तासगाव चमन द्राक्षाच्या प्रतीत फरक करू शकतो तितके सूक्ष्म, अन ह्या सगळ्या शिव्यांचे एमसीएक्स उर्फ कमोडिटी एक्सचेंज म्हणजे नागपूर शहर आहे तिथे सगळी व्हरायटी मिळते , असो वऱ्हाडी शिवी संपदेतील पुढील मौक्तिकें खालील प्रमाणे 2 सायच्या :- ह्याचा शब्द अन भाषिक उद्गम मला माहिती नाही पण ही युनिव्हर्सल शिवी आहे आमच्याकडली, प्रोग्रॅमिंग करताना ज्या हेडरफाइल declare करायला लागतात सुरुवातीला ही तसली हेडर फाइल आहे शुद्ध, हिच्याशिवाय कितीही शुद्ध वऱ्हाडी बोलली तरी ती सिंटॅक्स एररच देणार ही खात्री बाळगा, ही शिवी अघोरी साधू सारखी असते, हिला घोंगडी पांघरा का राख हिला फरक पडत नसतो उदाहरणे :- १. विनू :-आज सायचं चिकन खायचा मूड हाय लेक दिनु :- भसकला का सायच्या सावन लागलं हाय ना विनू :- कायच करा सायच्याले सावन कई खतम होते रे बा दिन्या?? दिनु :- राय न सायच्या उगामुगा एखाद हफ्ता मंग लागन तर एखाद कुत्तल्डलं कापून खायजो पर सद्याशीक कंट्रोल मदी राय होबासक्या 3. फोकनीच्या विथ अ "न" नॉट अ "ण" , आमच्याकडे कुलकर्णी/कांबळे/कुरेशी/कुदळे पाटील कोणाच्याही, पोरानं जरी ही शिवी दिली तरी "ण" कधीच लावणार नाही! ती "न" लावूनच दिली जाते, पुर्वीच्याकळी महाभारतात बाण मंत्राभिमंत्रीत करत त्यात उच्चार चुकला तर बाणावर शक्ती विराजमान होत नसे, तेच शास्त्र ह्या शिवीला लागू पडते ह्याची नोंद घ्यावी! तेव्हा "फोकनीच्या" विथ अ "न" तर ही शिवी जरी प्रभावी अस्त्र असले तरी ही मुळात सायच्याची हाय पॉवर गोळी आहे म्हणजे बघ सायच्या जर 250 एमजी असली तर फोकनीच्या ही 500 एमजी असेल, बाकी उपयोग तेच, फक्त ही शिवी बहुतकरून दटावणे चेपणे इत्यादी कर्मसहाय्यक आहे, अन ह्या शिवीचा अखंड सप्ताह पानपट्टी नामक तीर्थक्षेत्री कायम सुरु असतो. हिच्या खेरीज ग्रामीण अंतर्भागात भाडखाव, संतरसोल्या, इमल्या, बालतारा, नसानकोंबड्या, गेंगल्या, बहिनमारी, इचिभना, वगैरे मौक्तिकेंही गुलाल बुक्का उधळावा तश्या सुरूच असतात, ह्या झाल्या सभ्य शिव्या, असभ्य शिव्यांकरता आधी बिरुटे सर म्हणतात तो कोनाडा उघडा तिकडे फुकट शिकवणी धागा सुरु करण्यात आम्हांस आनंद होईल ;)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अभ्या.. Mon, 08/22/2016 - 22:50
ह्ये जिगर, गंडा बांधून घेतलाय बे, अमरावतीत जाऊन चार शिव्या देऊन येईन तवाच तुला गुरुदक्षिणा दिइन.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अभ्या.. Mon, 08/22/2016 - 22:50
ह्ये जिगर, गंडा बांधून घेतलाय बे, अमरावतीत जाऊन चार शिव्या देऊन येईन तवाच तुला गुरुदक्षिणा दिइन.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

इल्यूमिनाटस Tue, 08/23/2016 - 09:09
भाषा ज्ञानात भर टाकल्याबद्दल निशाणी डावा अंगठा या पिच्चर मध्ये अनासपुरे सारखा इचिभन म्हणत असतो , हि शिवी आहे हे आत्ता समजले ! शिव्यांशिवाय बोलणे म्हणजे बिन फोडणीचं वरण खाणे

इरसाल Sun, 09/18/2016 - 12:11
ते ऑलिंपिक मधे सुवर्ण पदक मिळणार होते त्याचे काय झाले. बरं ते पॅरालंपिकवाल्यांना खेलरत्न का नाय म्हणे?

शशिधर केळकर Wed, 09/28/2016 - 18:40
मला एक अनुवादित रहस्यकथा पाठवायची आहे. व्यनि करताना मूळ संदेशात कथा कशी जोडायची ते कृपया कळवावे. धन्यवाद!

साहित्य संपादक गुरुवार, 09/29/2016 - 18:00
अनेकांच्या आग्रहाला मान देऊन अंतिम तारीख १५ ऑक्टोबर करण्यात येत आहे. दिवाळी अंक संपादन-सजावट टीमला कमी वेळ मिळेल. त्यामुळे आपल्या लेखनाची अंदाजे शब्दसंख्या आणि लेखात काही फोटो/व्हीडियो असल्यास "साहित्य संपादक" या आयडीला व्यनि करून कळवावे.

कथा पाठवली आहे, तरीही कृपया साहित्य संपादकांनी जमल्यास अन जास्त जिकिरीचे वाटत नसल्यास प्रवेशिका पाठवणाऱ्यांना जमले तर अगदी एकोळी काय द्विशब्दीय "लेखन मिळाले" इतकी तरी पोचपावती द्यावी ही आग्रहाची विनंती मी साहित्यसंपादक मंडळाला करतो आहे

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आदूबाळ Sun, 10/16/2016 - 14:25
नेहेमी २४ तासाच्या आत पोच द्यायचा प्रयत्न असतो. तरी उशीर झाला असल्यास क्षमस्व.

मी सुद्धा अनुवादित कथा पाठविली होती, ती मिळाली की नाही ते कळविणे, नसेल मिळाली तर पुन्हा पाठवीन. अर्थातच प्रकाशित करण्यायोग्य वाटली नाही तर उत्तर पाठविण्याची आवश्यकता नाही.