"सतीश आळेकर" : डीव्हीडी उद्घाटन

मुक्तसुनीत's picture
मुक्तसुनीत in जनातलं, मनातलं
25 Sep 2008 - 3:40 am

प्रख्यात नाटककार सतीश आळेकर यांच्या नाट्यप्रवासाचा आढावा घेणारी " नाटककार सतीश आळेकर" या नावाची डिवीडी लवकरच प्रकाशित होत आहे. एका प्रतिभावान नाटककाराच्या प्रवासाच्या निमित्ताने, महाराष्ट्रातल्या आणि मराठी भाषेच्या स्वातंत्र्योत्तर काळातल्या बदलत्या सामाजिक आलेखाचे दर्शन या फिल्ममधे घडावे ; या बदलांचा परिणाम लेखकाच्या जडणघडणीवर कसकसा झाला हे आपल्याला यातून पहायला मिळणार आहे.

आळेकरांच्या नाटकातील आशय , भाषा आणि वेगवेगळ्या प्रयोगक्षम घटकांचा आढावा घेतानाच , एकूण मराठी नाटकाच्या परंपरांशी त्यांचे काय नाते आहे तेही या फिल्ममधे पहायला मिळेल. निर्मितीशील कलावंताचे अवतीभवतीच्या अवकाशाशी असणारे बहुपदरी नाते उलगडण्याचा हा एक प्रयत्न आहे. १९४७ ते २००८ च्या या नाट्यलेखनाच्या प्रवासात , त्या काळाचेही प्रतिबिंब पडलेले पाहायला मिळेल. प्रतिभावान आणि समाजाभिमुख कलावंताची कला ही त्याचे एकट्याचे संचित न रहाता , एकूण समष्टीचा आवाज बनतो , समग्र काळाचे भान त्या संचितात असते. मराठी नाटकांच्या समृद्ध अशा परंपरेचे दस्तावेजीकरणाच्या प्रयत्नातला हा एक मैलाचा दगड ठरावा.

या फिल्मची संकल्पना , संहिता , दिग्दर्शन , छायाचित्रण हे सारे अतुल पेठेंचे आहे. राहुल पुंगालिया यांनी लिखाणात मदत केली आहे. प्रसिद्ध समीक्षिका रेखा इनामदार-साने यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे. संगीत नरेंद्र भिडेंचे आणि संपादन केले आहे समीर शिपुरकर यानी. हेमंत जोशी यांनी आणि क्यालिफोर्नियाच्या "कला" ने या कामाकरता पूर्ण अर्थसाह्य दिलेले आहे.

या फिल्मचे तीन खेळ पुण्यात सुदर्शन रंगमंचावर २ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० , दुपारी ४ व संध्याकाळी ६ वाजता केले जातील. समर नखाते यांच्या हस्ते उद्घाटन होईल व या प्रसंगी डीवीडी विकायला ठेवलेल्या असतील. हे खेळ सर्वाना विनामूल्य असून याच्या पत्रिका खेळाच्या आधी दोन दिवस सुदर्शनला मिळतील. हॉलमधे केवळ २५० लोक बसू शकतात याची कृपया नोंद घ्यावी.

नाट्यबातमी

प्रतिक्रिया

प्राजु's picture

25 Sep 2008 - 7:17 am | प्राजु

हा एक सुंदर योगच म्हणावा.
मी पुण्यातील माझ्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना नक्की सांगेन या प्रयोगाबद्दल.

धन्यवाद.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

नंदन's picture

25 Sep 2008 - 7:45 am | नंदन

उपक्रम. नाट्यरसिकांसाठी आणि अभ्यासकांसाठी, असे दस्तावेजीकरण होणे महत्त्वाचे आहे. अतुल पेठेंसारख्याचे निर्मितीत सहाय्य होत असल्याने, ही डीव्हीडी संग्राह्य असेल यात काही शंका नाही.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

विसोबा खेचर's picture

25 Sep 2008 - 8:54 am | विसोबा खेचर

ही डिव्हिडी नक्की पाहणार! :)

मेघना भुस्कुटे's picture

25 Sep 2008 - 10:07 am | मेघना भुस्कुटे

माहितीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. पुण्यातील कुणालातरी माझ्यासाठी डीव्हीडी घेण्याची गळ घालाय्ला हवी... :)

विसुनाना's picture

25 Sep 2008 - 11:05 am | विसुनाना

आळेकरांवर डीव्हीडी काढणार्‍या अतुल पेठे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन...

माहिती येथे दिल्याबद्दल मुक्तसुनितांचे आभार!
कृपया आणखी माहिती द्यावी की कार्यक्रमास उपस्थित राहू न शकणार्‍यांसाठी ती डीव्हीडी नंतर कोठे उपलब्ध होईल?

दत्ता काळे's picture

25 Sep 2008 - 4:42 pm | दत्ता काळे

माहिती दिल्याबद्द्ल आभार.

आनंदयात्री's picture

2 Oct 2008 - 12:18 pm | आनंदयात्री

मिपाकर्स कोणी येणार आहे का ?