मी बोलतेय बहिणाई...

पारोळेकर's picture
पारोळेकर in जे न देखे रवी...
24 Sep 2008 - 1:05 pm

असं कसं हे जग बापा
अशी कशी ह्‍ये दुनिया
कुढी गेली आडल्या
लोकाय मधली दयामया..!

नही घराले घरपण
नही घरात सासू
दोन्ही जाता कामाले
घर सांभायती कुत्र वासू..!

आमुचं कसं ह्‍यतं
एकोप्‍याचं खटलं
घरात दिसलं म्हातारं त्
ते त्याह्‍यच्या डोयात खपलं..!

नही तुयस- नही दिवा
नको उठणं - नको सारयोणं
नही रांगोयी -नही पूजा
नही घराले तेह्‍यच्या आंगण..!

नको नको देवा मले पाठवू
खालच्या देशात
माणसं त् माणसं
आता बाया बी नशात..!

मह्‍या वक्ती लय सुखी ह्‍यता
माह्‍या खान्देश
अन् आता त् काय रे देवा
लोकायनं केला त्याचा घानदेश..!

( स्व.बहिणाबाई चौधरी यांना नतमस्तक होऊन )

संस्कृतीप्रतिक्रिया