बादलीयुद्ध ३

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
2 Aug 2016 - 10:52 pm

बादलीयुद्ध एक , दोन
-------------------------------------------------------------------------------

मी बादलीचा
बादली माझी
मी बादलीतल्या 'मगा'चा
'मग' माझ्या बादलीचा

आपण एक प्रथितयश कवी होऊ शकत नाही ही माझ्या हृदयातली एक भळभळती जखम आहे.

चित्रं काढता काढता मला कविता करण्याचा नाद लागला. नादच. छंद ही खूप मोठी गोष्ट झाली.
यमकं जुळवायला जी एक तंद्री लागते ती माझ्यात नाही हे आपल्याला कबूल.
यमकं जुळवणं हीच खरी कविता असंही काही नसतं हेही आपल्याला कबूल.
पण माझ्याकडे भरपूर रिकामा वेळ असतो हे शेवटी कुठेतरी मान्यच केले पाहिजे.

जगातले तमाम कवी हे बसस्टँडवर शबनम थैली घेऊन उभे असतात असं मला उगाचच वाटतं. माझ्या मनातलं त्यांचं हे चित्र मला काहीकेल्या पुसता येत नाही. मी त्या अनाम कवींना सलाम करतो.

नाहीतरी ह्या खोलीत टाईमपासच्या नावाला फक्त एक वही आणि पेन्सिल आहे. गाणी ऐकणे मी सध्या बंद केले आहे.

माझा एक सिनीयर म्हणतो, प्रेम ही एक महत्वाची गोष्ट आहे. साल्या तू प्रेम कर. प्रेमामुळे आयुष्यात एक प्रकारची जिद्द येते.
पण त्या वाटेला मी अजूनतरी गेलेलो नाही.तो आपला प्रांत नाही. कंसांची झुलपे वाढवून पोरींच्या मागे बिड्या फुकत फिरणे ही आपली परंपरा नाही. ती तर गोरखचीसुद्धा नाही. पण तो गेल्याच आठवड्यात शलाकाशी दोन शब्द बोलला होता. तो नक्की काय बोलला हे अजून गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे साहजिकच मी त्याच्यावर बोगसपणाचा ठपका ठेऊ शकत होतो.
पण परवा लायब्ररीत ती त्याला "हाय गोरख" म्हणून हात हलवत निघून गेली. ही नक्कीच एक दखल घेण्याजोगी गोष्ट आहे.

शलाका सुंदर नाही. मात्र ती कायम उत्तान कपडे घालते. तिच्या वळणदार शरीराच्या कमानी त्यातून डोकावत राहतात. मधून भांग पाडलेल्या तिच्या कपाळावर एक भलीमोठी टिकली असते. आणि रोज कुठल्या ना कुठल्या बिहारी पोराबरोबर ती फिरत बसते.
गोरखच्या तिच्याकडून काय अपेक्षा आहेत याची मला कल्पना नाही.

खूप दिवसांपासून माझी एक काल्पनिक प्रेयसी आहे. जी ख्रिश्चन आहे. जी कायम धुक्यात राहते. चर्चमध्ये जाऊन प्रेयर करते. जी इवल्याश्या स्कुटरवर चेरी ब्लॉसम घेऊन माझ्या भेटीला येते. काऊबॉय हॅट, स्कर्ट अँड टॉप, स्टे अप्स स्टॉकींग्ज आणि बरेच काही...
जी मला अजून कधी भेटली नाही. आणि मी तिच्या शोधात आहे.

झऱ्यातून पाणी जसे गळतच गेले
तुझे दु:ख मला कायम छळतच गेले

मी विचार करतो. असं काही होणं कितपत शक्य आहे. एकतर मी कुठल्याच ख्रिश्चन कुटुंबाला ओळखत नाही. आजपर्यंत मी त्यांचं साधं घरही बघितलं नाही. ख्रिश्चन धर्माविषयी एक सुप्त आकर्षण मात्र जरुर आहे.

चॅको. इज माय फ्रेंड. ही इज लिविंग अॅट रेल्वे लाइन. अँड ही इज ए ख्रिश्चन.
वन्स ही केम इन आवर होस्टेल. अँड ही डान्सड लाईक मायकेल जॅक्सन.
इट्स ट्रूली हिल्यारीयस.

चॅको. एक उध्वस्त कवी जसा दिसेल तसा. ख्रिश्चन तो मुळी वाटतच नाही. मला म्हणाला, "पल्ली आहे का आत?"
वर्गाबाहेर मी उभा होतो. आणि 'रोज डे' नावाचा तो एक थिल्लर दिवस होता.
कठड्याला रेलून मी उभारलो. आणि म्हणालो,
"कोपऱ्यातल्या बेंचवर बसलीय, बघीतलं मी तीला".
चॅको जरा वेळ तसाच उभारला. मग त्यानं वर्गात आत वाकून बघितलं आणि पुन्हा माझ्याजवळ आला.
"अरे ऐकना, आज ना, मी तिच्याशी फ्रेंडशीप करणारे" बहुतेक त्याची घालमेल होत असावी. पण खुल्या दिलाने तो बोलला.
"क्या बात है यार, बेस्ट ऑफ लक!" मी म्हटलं खरं, पण म्हटलं तर ही एक फॉर्म्यालिटी होती. म्हटलंतर एक प्रोत्साहनही होते.

गुलाबाचं फुल घेऊन तो आत चालत गेला. आणि साधारण तीस सेकंदानं बाहेर आला.

"अरे मी काय कमी वाटलो काय हीला, हिच्यासारख्या छप्पन बघितल्या, मला म्हणते पोलिसात देईन, घे आमचा XXX, अरे हिच्या सगळ्या खानदानाला XXX XXX"
चॅको सॅक सांभाळत बडबडत राहीला. मी त्याला उडपीमध्ये चहा प्यायला घेऊन गेलो. तिथे दिलीप भेटला.
"अरे होता है चॅको भाय, काम डाऊन यार" दिलीप सिगारेटचा झुरका मारत म्हणाला.

बाजूलाच एक पडकी खोली होती. मग आम्ही तिच्या व्हरांड्यावर जाऊन बसलो.
"आज गाना गाणे का मन कर रहा है यार" चॅको चा मूड अजूनच खराब होत चालला होता.
खरंतर आम्हां तिघांनाही चांगल मराठी बोलता येतं. पण त्या बिहारी पोरांमुळे आम्हालाही हिंदी बोलायची घाणेरडी सवय लागली.
"चल मेरे रुम पे, तेरेको गझल सुनाता हू " मी म्हटलं. तसंही गोरखकडं पंकज उधासचं एक कॅसेट होतंच.
पण आम्ही बसलो. खूप वेळ बसलो. एखादा पेशंट शेवटच्या घटका मोजत असावा अशी विचित्र शांतता तिथे बराच वेळ पसरली.

"ना मैं मोमन विच्च मसीतां, ना मैं विच्च कुफर दीय रीता
ना मैं पाकां विच्च पलीता, ना मैं मूसा ना फिरवोन..."
बराच वेळ चॅको गात राहीला. दिलीपनं सिगारेट संपवून पलिकडं कटींगची ऑर्डर दिली. मला मात्र या सगळ्याचा कंटाळा आला.

संध्याकाळी मी खोलीवर गेलो. नुकतंच कोणीतरी निवर्तलं असावं अशी अवकळा माझ्या खोलीला आली होती. मग दरवाज्याला मोठं कुलूप घालून मी गच्छीवर जाऊन बसलो. गच्छीवर एक जुनी फाटकी गादी पडली होती. तिच्यातला कापूस बाहेर आला होता. एकंदरीत ते दृष्य बघण्यारखे नव्हते. म्हणून मी तिकडे फारसे बघितलेच नाही. आभाळकडे बघितले तर ते तांबूस झाले होते. झाडे काळवंडली होती. एकूणच तिथे पाहण्यासारखे असे काही नव्हतेच. म्हणून मग पुन्हा खाली आलो.

रात्री ऊशिरा गोरख माझ्या खोलीवर आला. समोरच्या रिकाम्या कॉटवर बसून राहीला. आणि माझा टेपरेकॉर्डवर त्यावेळी बंद होता. ना त्याने चालू केला ना मी.
आज मी चित्रे काढली नाहीत. कविताही केली नाही. बस तो नायट्रीक अॅसीडचा एक तुकडा जरुर तोंडात टाकला.

"तरी मी तुला सांगत होतो, आपल्या लेवलची नाय रे ती" मी गोरखला म्हटलं.
"च्यायला, पण अडीचशे रुपये फुकट गेले रे माझे" गोरख हसून म्हणाला.
"त्यात काय एवढं, अजून कोणी भेटली तर तिला दे" हा एक रास्त मार्ग होता. पण गोरखसारख्या माणसाने याचा विचार अगोदर करुन ठेवलेला असणार.

त्यानं मला ग्रिटींग कार्ड आणून दाखवलं. ते एक भलंमोठं आठदहा पानांच झुरमुळं ग्रिटींग कार्ड होतं. अगदी संग्रही करुन ठेवावे असे.
काल रात्रीच त्याने बाजारात जाऊन गुपचूप विकत आणले होते. अगदी माझ्यापासूनही लपवलं.

सकाळी त्याला कँटींगमध्ये शलाका दिसली. मग तो खुर्ची ओढून तिच्यासमोर बसला. तिने स्माईल दिली. मग तिची चायनीज न्यूडल्सची ऑर्डर आली. भलीमोठी प्लेट आणि भलामोठा चमचा. ती घापघाप खात बसली.
खिशामध्ये दहा रुपये असलेल्या गोरख केवळ चहाच पिऊ शकला. त्याला म्हणे प्रचंड ऑकवर्ड वाटलं. वहीमध्ये लपवलेलं ग्रिटींग कार्ड बाहेर आलंच नाही.

"सालं तिचं बिल द्यायची पण आपली औकात नाही रे" गोरख म्हणाला.
मी बाटलीतलं घोटभर पाणी पिलो. आज झोप लवकरच येणार असे दिसते.

"तिनं नक्की कोणते न्यूडल खाल्ले रे?" मी डोळे चोळत म्हणालो म्हणालो.

"च्यायला नावंच माहीत नाही रे, आणि तिनं माहित्ये का, कपात पांढरं कायतरी पिली रे, च्यायला कायकाय खातात ही लोकं"

त्यादिवशी गोरख माझ्या रुममध्ये बराच वेळ येरझाऱ्या घालत होता. रात्री कधीतरी तो निघून गेला.

-----------------------

पॅसेंजेर ट्रेन भुरर्कन निघून जाते. भलामोठ्या अवजड मालगाड्या मात्र मनाला विशेष आनंद देऊन जातात. गेलाबाजार रेल्वेचे रिकामे रुळसुद्धा मला पाहायला आवडतात.

कुठून कुठल्या गल्लीत आलो कळलं नाही. चॅकोची बाईक मात्र सुसाट सुटली होती. ना रेल्वे दिसली ना रुळ. रस्त्यात एक फाटक मात्र जरुर लागलं. तो क्षणिक लोहमार्ग रस्त्यावरच्या चिक्कार गर्दीने मला नीटसा पाहता आला नाही.

चॅकोची बाईक पुन्हा सुसाट सुटली. बरीच म्हणजे साधारण चार दोन किलोमीटर्स. आणि मी चॅकोच्या घरी पोहोचलो.
चॅकोचा कंप्यूटर अगदीच जुना. मळकट ठोकळा. घर मात्र ठिकठाक. ओकेबोके.
कुठलासा इंग्लिश पिच्चर टिव्हीवर लागला होता. आणि त्याची मम्मी अश्लिल कॉमेडी ऐकून खदखदून हसत होती.
"अरे बैठो बेटा, कुछ चाय वाय लोगे?"
मी म्हटलं, नको.
चॅको म्हटला "मम्मी...?"
मग तिनं चॅनेल बदलला आणि उठून चहा करायला निघून गेली.
चॅकोचा कंप्यूटर सुरुच होईना. सुरु झाल्यावर त्यानं माझ्याकडची सीडी मागितली. त्याचं प्रेझेंटेशन कॉपी करुन मग त्याने ती बर्न केली.
फावल्या वेळात चॅकोच्या दोन गलेगठ्ठ बहीणी दिसल्या. त्यातली एक वाडग्यात काहीतरी खात बसली होती.
अचानक सीपीयूनी सीडी बाहेर फेकली. मी तिला पिशवीत घातली. मग चहा पिऊन मी त्या घरातून बाहेर पडलो.
जाताना चॅको म्हणाला "बस नाम चेंज कर, और सबमीट कर दे"
मी म्हणालो, थँक्यू.

संध्याकाळी मग मी खोलीवर परतलो. मेसमध्ये जेवण केलं आणि झोपलो. त्यादिवशीही मला काहीच करु वाटलं नाही. माझं सुप्त ख्रिश्चन आकर्षण ढळत चाललंय हे नक्की.

-----------------------

सकाळी उठून मी कॉलेजला गेलो. वर्कशॉपमध्ये घाम गाळून लेथ मशीन चालवली. ते दलिंदर अॅप्रॉन कधी एकदाचा काढून फेकून देतोय असं झालं. टूलला धार लावताना दिलीप म्हणाला, "चॅको दिसला कारे तुला?"
मी म्हटलं, नाही.
"हुडक त्याला, पार्टी घ्यायचीय साल्याकडून"
मी म्हटलं, काय झालं?
"म्हणजे तुला काय म्हायीतच नाही, हाहा"
"नाही"
"मग उडपीत गेल्यावर बोलू"
दोन तास घाम गाळल्यावर वर्कशॉपमधून आमची सुटका झाली.

ते दलिंदर अॅप्रॉन रुमवर फेकलं आणि सरळ उडपीत गेलो.
"और चॅकोभाय, लो मजे करलो" दिलीप त्याची खेचत होता.
"पागल है रे वो, किसने बताया तेरेको"
"क्या हुआ रे?" मी मध्येच घुसलो.
"अरे सांग तुझ्या दोस्ताला, मॅसेज पाठवलाय म्हणावं शलाकानं" दिलीप पुन्हा सिगारेट पेटवत म्हणाला.
मी चॅकोचा मोबाईल घेतला. काल रात्री साधारण आठ वाजताचा एसेमेस होता. शलाकाचा.
"DO U LYK TO WATCH BLUE FILM WITH ME, THEN COME 2 MY HOME"

"मग गेलास की नाय साल्या?" मी आपली अशीच माहीती काढण्याचा प्रयत्न केला.
"अरे रंडी है वो साली, आपुन काय को टाईम बर्बाद करेगा, तुझे जाना है तो तू जा, सेटींग आपण लगायेगा" आता मात्र एक झुरका चॅकोनेही मारला.

साली यांची ओळखतरी कधी झाली. संध्याकाळी गोरखला जेव्हा मी हा किस्सा सांगितला, तेव्हा तो ही बराच वेळ हसत होता.

-------------------------------------------------------------------------------
क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

2 Aug 2016 - 11:01 pm | आदूबाळ

जव्हेरभाव....

अभिदेश's picture

2 Aug 2016 - 11:07 pm | अभिदेश

माझे इंजिनीरिंग चे दिवस आठवले.

नीलमोहर's picture

2 Aug 2016 - 11:59 pm | नीलमोहर

पुस्तक कधी लिहीताय ?
शब्द कमी पडतात आम्हाला इथे,

ज्योति अळवणी's picture

2 Aug 2016 - 11:59 pm | ज्योति अळवणी

ओह.... हॉस्टेलचा अनुभव नाही. पण म्हणूनच उलट वाचायला मजा येते आहे.

बोका-ए-आझम's picture

3 Aug 2016 - 12:34 am | बोका-ए-आझम

असं जाहीर करण्यात येत आहे! ल ई च दिलखेचक प्रकार चाललेला आहे अण्णा! चक्कीत जाळ एकदम!

खेडूत's picture

3 Aug 2016 - 9:36 am | खेडूत

१११
अगदी...मस्तच रंगलीय.

नाखु's picture

3 Aug 2016 - 11:28 am | नाखु

जा बोलवा त्या सगळ्यांना ज्यांना मिसळपाव वर काहीच दिसत नाही "वाचण्यासारखे" ! म्हणून इथे तिथे गळे-ऊमाळे काढणार्या चिंतामहर्षींना (आणि त्यातच आनंद शोधणार्या उच्च्शिक्षीतांनाही).

पुन्हा एकदा वाचकाम्ची पत्रेवाला नाखुस मिपाकर

कपिलमुनी's picture

3 Aug 2016 - 12:46 am | कपिलमुनी

कोसलाची आठवण आली

राजाभाउ's picture

3 Aug 2016 - 10:54 am | राजाभाउ

+१
असेच म्हणतो.

चांदणे संदीप's picture

3 Aug 2016 - 9:18 am | चांदणे संदीप

विसरला तर नाही ना?

बाकी स्श्टोरी झ्झकास्स!! :)

Sandy

ब़जरबट्टू's picture

3 Aug 2016 - 9:32 am | ब़जरबट्टू

हा भाग आवडला. म्हणजे ना आवडल्यासारखे काही वाटले नाही, म्हणून आवडले असेल, मग आवडल्यावर परत कशाला वाचायचे असे ठरवूनसुद्धा परत वाचले.. :)

अमितसांगली's picture

3 Aug 2016 - 9:50 am | अमितसांगली

मस्त चालू आहे....

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Aug 2016 - 9:55 am | ज्ञानोबाचे पैजार

हा भागही आवडला.
पैजारबुवा,

संजय पाटिल's picture

3 Aug 2016 - 10:15 am | संजय पाटिल

हे समदं भारीच हाय, आवडलं, पण त्या बादलिचं काय झालं?

स्पा's picture

3 Aug 2016 - 10:33 am | स्पा

क ड क

चिनार's picture

3 Aug 2016 - 10:51 am | चिनार

जव्हेर भाऊ !!

या कथेतले सगळे पात्र मी थोड्याफार फरकाने जवळून अनुभवले आहेत...फारच मस्त कथा रंगवता तुम्ही...

राजाभाउ's picture

3 Aug 2016 - 10:57 am | राजाभाउ

जव्हेर भाउ . तुमच कौतुक करायला खरच शब्द कमी पडतायत. दंडवत घ्या __/\__

अभ्या..'s picture

3 Aug 2016 - 11:36 am | अभ्या..

चॅको टकाटक
स्टोरी खटाखट
येउद्या पटापट

अप्पा जोगळेकर's picture

3 Aug 2016 - 12:21 pm | अप्पा जोगळेकर

या संस्थळावरचे सांप्रतचे सर्वोत्तम लिखाण

उडन खटोला's picture

3 Aug 2016 - 12:28 pm | उडन खटोला

जियो!

कोसला तर आहेच पण मिपा'गविं'च्या केळकर ची आठवण या भागात आली.

भारी सुरु आहे. आन दो पटापट.

जव्हेरभाव लई भारी लिहत आहात..

सिरुसेरि's picture

3 Aug 2016 - 1:17 pm | सिरुसेरि

+१. छान .
---------खूप दिवसांपासून माझी एक काल्पनिक प्रेयसी आहे. जी ख्रिश्चन आहे. जी कायम धुक्यात राहते. चर्चमध्ये जाऊन प्रेयर करते. जी इवल्याश्या स्कुटरवर चेरी ब्लॉसम घेऊन माझ्या भेटीला येते. काऊबॉय हॅट, स्कर्ट अँड टॉप, स्टे अप्स स्टॉकींग्ज आणि बरेच काही...जी मला अजून कधी भेटली नाही. आणि मी तिच्या शोधात आहे. --------
हि बहुतेक सपनेमधली ( आवारा भंवरे फेम ) काजोल असावी . किंवा जोश मधली ( मेरे खयालोंकी फेम ) राय असावी .

असंका's picture

3 Aug 2016 - 1:33 pm | असंका

जव्हेरभौ ___/\___

धन्यवाद!

मोदक's picture

3 Aug 2016 - 1:34 pm | मोदक

भारी लिखाण..!!

जगप्रवासी's picture

3 Aug 2016 - 1:43 pm | जगप्रवासी

हॉस्टेल लाईफ कधी अनुभवलं नाही पण वाचायला मजा येतेय.
जव्हेर भाऊ खूब जियो और लिखते रहो.....

अमितदादा's picture

3 Aug 2016 - 2:25 pm | अमितदादा

आवडलं...

किसन शिंदे's picture

3 Aug 2016 - 3:34 pm | किसन शिंदे

बुंगाट लिहिता राव तुम्ही. अगदी सहजरीत्या शब्द फेकताय

प्रचेतस's picture

3 Aug 2016 - 5:44 pm | प्रचेतस

सरस

अजया's picture

3 Aug 2016 - 6:15 pm | अजया

_/\_ पुभाप्र

रांचो's picture

3 Aug 2016 - 7:25 pm | रांचो

वाचताना वाटत होतं, का वाचतोय...पण वाचल्या शिवाय रहावतपण नाही...
जादु आहे लेखनात कसली तरी. खेचत रहाते.

पद्मावति's picture

3 Aug 2016 - 10:30 pm | पद्मावति

खूप खूप सुंदर लिहिताय....

पैसा's picture

3 Aug 2016 - 10:38 pm | पैसा

पण त्या बादलीचं काय झालं!

रातराणी's picture

3 Aug 2016 - 11:18 pm | रातराणी

साश्टान्ग दंडवत घ्या! क ह र!

खटपट्या's picture

4 Aug 2016 - 12:41 am | खटपट्या

बाबौ, काय लीवता बाप्पा... येउद्या अजुन

मृत्युन्जय's picture

4 Aug 2016 - 4:17 pm | मृत्युन्जय

कोसला वाचल्याचे फीलिंग का येते आहे?

कथा बाकी मस्त चलु आहे.

विजुभाऊ's picture

5 Aug 2016 - 5:42 pm | विजुभाऊ

तेच म्हणतोय,
एकदम पांडुरम्ग साम्गवीकरचा नवा अवतार भेटल्याचा फील आला.........

DO U LYK TO WATCH BLUE फिल्म... बगा मग . :)

http://www.gobollywood.com/wallpapers/movies/blue/0015.jpg.html

विजुभाऊ's picture

5 Aug 2016 - 5:41 pm | विजुभाऊ

जव्हेरभाय...
साला एकदम पांडुरंग सांगवीकर वाचतोय हा फील आला.
लै भन्नाट लिखाण .....
आपण तर फैन झालो.........

मारिओ पोचतोय पोचतोय आणि एकदम प्रिन्सेस इज इन दि अदर कासल!!!

बादली कहाँ है? कहाँ है बादली? लवकर टाका हो पुढचा भाग. आमचा जीव अडकलाय त्या बादलीत.

बाबा योगिराज's picture

7 Aug 2016 - 2:37 pm | बाबा योगिराज

____/\____

अभिजीत अवलिया's picture

7 Aug 2016 - 7:41 pm | अभिजीत अवलिया

____/\____

पथिक's picture

16 Sep 2016 - 12:34 pm | पथिक

जव्हेरगंज जी, तुमच्या लिखाणाचा मी 'पंखा' झालो आहे!

तुमच्या नायकाच्या सुप्त ख्रिश्चन आकर्षणासारखंच मला सुप्त मुस्लिम आकर्षण वाटायचं. प्रेम, लग्न एका मुस्लिम मुलीशीच करायचं असं ठरवलं होतं.. पण नंतर प्रत्यक्षात समोर येणारे उबडखाबड चेहरे, लाल डब्ब्यातून प्रवास करताना आलेला बंदिस्त शरीरांचा दर्प, बकाल वस्त्या, खुंटलेली बौद्धिक वाढ, ई ई मुळे ते आकर्षण हळूहळू हरवून गेले..