२००० सालानंतर मी थियेटर ला जाऊन जुना हिंदी वा मराठी सिनेमा बघितला नाहीये... आजकाल पिक्चरचं आयुष्य थिएटरमध्ये फक्त १ वा २ वीकएंड एवढेच असते . हायस्कुल व कॉलेजला असतांना बच्चन , धर्मेंद्र , सनी देवल,मिथुन, नाना , अनिल कपूर ई . हिरोंचे कित्येक पिक्चर मित्रांबरोबर टॉकीजमध्ये बघायला जी मजा यायची ती मजा घरी कॉम्पुटर वर CDya बघण्यात नाहीच... मुंबईत होस्टेलला असतांना १९९५ च्या दरम्यान वरळी नाक्याची गीता , डिलाईल रोड ची दीपक , मराठा मंदिर, मिनर्व्हा पासून पार रेड लाईट एरिया मधील Alexandra ला जाऊन आमची gang मिळेल ते जुने सिनेमे बघत असे ....त्या आधी नाशकात 12-15 वर्ष सगळ्याच टॉकीजमध्ये खूप सिनेमे पहिले..
मालेगावात तर त्याकाळी हिंदी सिनेमाची खूप च क्रेझ होती.. शुक्रवारी खास "मुंबई बरोबर मालेगावात रिलीज " अश्या जाहिराती पेपरात येत.आणि गाजलेले पिक्चर तर वर्षानुवर्षे चालत .. कदाचित अजूनही तिथे जुने पिक्चर थिएटरमध्ये लागत असावेत असे वाटते ...मुंबई / पुणे/ नाशिक / मालेगाव मध्ये कुठल्या थियेटर ला जुने हिंदी पिक्चर अजूनही लागतात का ?
प्रतिक्रिया
29 Jul 2016 - 5:40 pm | चौथा कोनाडा
आमच्या गावात (पुणे, पिंचिंवाडी) इथे तर लागत नाहीत जुने सिनेमे. कधी काळी रंगीत मोगले आझम अन नंतर त्रिमि शोले वाजत गाजत प्रदर्शित झाले होते.
इतर ठिकाणच्या परिस्थितीवर बुजुर्ग मिपाकर सांगतीलच.
29 Jul 2016 - 6:27 pm | आदूबाळ
दीपक टॉकीजच्या आठवणीने अं ह झालो. काय एर्या आहे बॉस!
-------
मंगला टॉकीज जेव्हा एकपडदा होतं तेव्हा रोज सकाळी ९ वाजता जुने सिनेमे लागायचे. तिकीट रु. १५. फक्त प्रॉब्लेम असा होता, की आयत्या वेळी मिळेल ती रिळं लावायचे. त्यामुळे कोणतेही चित्रपट बघायला मिळायचे (लागायचे?)
29 Jul 2016 - 6:31 pm | मुक्त विहारि
हे असे फक्त पुण्यनगरीतच होवू शकत असेल नाही.
कदाचित तशी पाटी पण लावली असेल.
१. एकदा तिकिट घेतल्या नंतर, आम्ही दाखवू तोच सिनेमा बघायला लागेल.
२. आम्ही सिनेमे दाखवतो, बनवत नाही.
३. एकदा विकलेले तिकिट परत घेणार नाही.
वगैरे वगैरे
29 Jul 2016 - 7:09 pm | मार्मिक गोडसे
कॉलेजचे काही मित्र तंदुरस्त रहाण्यासाठी 'मॉर्निंग वॉच'ला जायचे. स्वस्त आणि 'मस्त' सिनेमे बघायला, स्थळ : अशोक टॉकीज ठाणे.
29 Jul 2016 - 7:15 pm | मुक्त विहारि
डोंबिवलीतील रामचंद्र टॉकीज.
29 Jul 2016 - 7:41 pm | किसन शिंदे
अशोकपेक्षा खोपटचे प्रताप टाॅकीज या शोजसाठी कित्येक वर्षे फेमस होते. :)
29 Jul 2016 - 10:51 pm | माम्लेदारचा पन्खा
तसली पोस्टरं पहायला गर्दी करायचे लोक !
30 Jul 2016 - 12:16 am | किसन शिंदे
>>तसली पोस्टरं पहायला गर्दी करायचे लोक !
त्यात एमएचची पोरंही बरीच असायची ;)
आमचा बापलेकर एकदा माॅर्निंग शो ही पाहून आलता. =))
30 Jul 2016 - 11:34 am | मार्मिक गोडसे
एखाद्या शोला तुरळक प्रेक्षक असले की अर्ध्या तासानंतर अचानक शो थांबवून धाड पडल्याचे नाटक केले जायचे व एक दोन प्रेक्षकांना(त्यांचीच माणसे) पकडल्याचे नाटक केले जायचे. त्यामुळे बाकीचे घाबरून पळून जायचे. शो कॅन्सल व्हायचा.
30 Jul 2016 - 1:54 pm | माम्लेदारचा पन्खा
लिखाण पूर्ण करा की राव !
29 Jul 2016 - 7:47 pm | बोका-ए-आझम
त्यात मुघल-ए-आझम,तेरे घर के सामने आणि तीसरी मंझिल हे पाहिल्याचं आठवतंय. १९९९ सालची गोष्ट. डोंबिवली पूर्वेस असलेल्या टिळक मध्ये प्यासा; साहिब, बीबी और गुलाम; आरपार आणि सी.आय.डी. हे पाहिले होते. पण त्याला बरीच वर्षे झाली.
29 Jul 2016 - 11:53 pm | चौथा कोनाडा
च्यामारी, हा धागा डोंबिठाणे मिपाकरानी हायजॅक केला की ! हळूच अभ्यादा पण घुसनार सोलापुरकरा ना घेवून.
आता कुठलं नाशिक मालेगाव ?
30 Jul 2016 - 10:58 am | अभ्या..
राह्यलं, गप्प बसतो.
2 Aug 2016 - 4:21 pm | चौथा कोनाडा
:-)))
बस्स का राव ?
तुमी इथं खेळायला यावं म्हणुनच असं लिहिलयं
या घुसा बिनधास !
30 Jul 2016 - 10:48 am | सिरुसेरि
पुर्वी एका चित्रपटाबद्दल "ट्रॉली निस्ती गार्र गार्र फिरावली आहे" असा उल्लेख वाचला होता . तो चित्रपट "गॉन विथ द विंड" तर नव्हे ?
30 Jul 2016 - 1:46 pm | vcdatrange
नाशकातही नसतात हो हल्ली. बाकी जेव्हा रिळं यायची तेव्हा,गुरुवारी रात्री ऊशीराचे खाजगी शोज कोणी पाहिलेत काय? नाशिकरोडच्या अनुराधा कडे कायम दुस-या थेटरातले रिळ यायची, एक रिक्षावाला ठरलेला, दोन्हीकडची रिळं इकडुन तिकडे घेऊन जाण्यासाठी.त्यामुळे शोज् च्या वेळापण अर्धा पाऊणतास उशिराच्या असायच्या
30 Jul 2016 - 1:47 pm | vcdatrange

30 Jul 2016 - 1:48 pm | vcdatrange
नाशकातही नसतात हो हल्ली. बाकी जेव्हा रिळं यायची तेव्हा,गुरुवारी रात्री ऊशीराचे खाजगी शोज कोणी पाहिलेत काय? नाशिकरोडच्या अनुराधा कडे कायम दुस-या थेटरातले रिळ यायची, एक रिक्षावाला ठरलेला, दोन्हीकडची रिळं इकडुन तिकडे घेऊन जाण्यासाठी.त्यामुळे शोज् च्या वेळापण अर्धा पाऊणतास उशिराच्या असायच्या
30 Jul 2016 - 1:56 pm | vcdatrange
फोन गंडला राव,घ्या आता एडजेस करुन
30 Jul 2016 - 4:58 pm | एस.योगी
औरंगाबादला 'गुलजार' मध्ये लावायचेत जुने सिनेमे ...
सध्या माहीत नाही...
प्रा. डॉ.साहेब तुम्हाला काही आयडिया ?