मिंग्लीश बालगीते...

सहज एक विरंगुळा म्हणून ईंग्लीश भाषेतील काही बालगीते मराठित भाषांतरित करविशी वाटली.
तुम्हालाहि अशी काहि बालगीते भाषांतरित करता आली तर ईथे जरूर टाका...

Johny Johny....
बंड्या बंड्या...
काय बाबा?
साखर खातोस?
नाहि बाबा...
खोट बोलतोस?
नाहि बाबा...
तोंड उघड,
आई ग...बघ ना बाबा कसे करतायत....

Jack and Jill

पम्या अन पमी,
डोंगरावर जाती, भर ऊन्हात,
पाणी शेंदती, ऊन्हातान्हात,
पम्याचा घसरे पाय..
गडाबडा लोळत खाली जाय...
पमीचा फुटे बांधा...
पम्याशिवाय जगण्याचा वांधा...

Chubby chicks

गोबरे गाल...
सुंदर फार...

निळे डोळे...
दिसतात भोळे...

काळे केस...
लांब कुरूळे...

बाईंची आवडती तुच आहेस काय...?
हो .. हो.. हो...

सगळ्यांचीच आवडती
पाटलीणबबाई

अरे बाप रे!

> सगळ्यांचीच आवडती
> पाटलीणबबाई

सगळ्यांचीच आवडती??????

(आणि Chubby chicks नव्हे हो!!!!!! Chubby cheeks!!!!!!)

असं काय करतोस टग्या?

Chubby 'chicks' हेच बरोबर आहे!!! Wink

चतुरंग

गुबगुबीत कोंबड्या

Chubby 'chicks' म्हणजे गुबगुबीत कोंबड्या का? Wink

ते

chick शब्दाचा सर्वसाधारण अर्थ घेताय की स्लँग ह्यावर ठरेल! Wink

(जिज्ञासूंनी हा दुवा पहावा!)

चतुरंग

रंग्याला अनुमोदन !

आमचं इंग्लिश कच्चं आहे त्यामुळे स्लँगच अर्थ माहिती आहेत Wink

हा हा हा

>>आई ग...बघ ना बाबा कसे करतायत....<<
हा हा हा.. हा खरा ट्विस्ट.. (खरा पंच आता बाबांना ! Wink )
पुढचा संवाद..
आई : अहो, जरा पंख्यावरची जळमटं काढा.. उगीच रविवार असला की बंड्याच्या मागे लागतात !
-- लिखाळ.

ट्विंकल ट्वींकल

http://vipravani.wordpress.com/
ह्या बालगिताने माझा फार छळ झाला आहे. आता मराठी मध्ये येउ द्या.

ट्विंकल ट्वींकल

चम चम करती खट्याळ तारे
सांगा आले कुठून हे सारे...

उंच नभी लुकलुकणारे
जसे देवाच्या मुकुटातील हिरे...

हिंग्लिश भावगीते

थोडे विषयांतर
१) दॅट मिल्क इन युवर पॉट इज बेटर
व्हाय, आय डोन्ट नो टेस्टस् स्वीटर

२) ओ बेबी हाऊ शॅल आय थँक यु
आय बीकेम मदर बिकॉज ऑफ यु

(म्हणून बघा चालीवर, मीटरमधे बसताय)

...

१. ते दूध तुझ्या त्या घटातले का अधिक गोड लागे नकळे
२. बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई

मीटरमध्ये ओढूनताणून बसतंय.