गाभा:
सहज एक विरंगुळा म्हणून ईंग्लीश भाषेतील काही बालगीते मराठित भाषांतरित करविशी वाटली.
तुम्हालाहि अशी काहि बालगीते भाषांतरित करता आली तर ईथे जरूर टाका...
Johny Johny....
बंड्या बंड्या...
काय बाबा?
साखर खातोस?
नाहि बाबा...
खोट बोलतोस?
नाहि बाबा...
तोंड उघड,
आई ग...बघ ना बाबा कसे करतायत....
प्रतिक्रिया
23 Sep 2008 - 9:38 pm | मध्यमवर्गीय
पम्या अन पमी,
डोंगरावर जाती, भर ऊन्हात,
पाणी शेंदती, ऊन्हातान्हात,
पम्याचा घसरे पाय..
गडाबडा लोळत खाली जाय...
पमीचा फुटे बांधा...
पम्याशिवाय जगण्याचा वांधा...
23 Sep 2008 - 11:25 pm | पाटलीणबाई
गोबरे गाल...
सुंदर फार...
निळे डोळे...
दिसतात भोळे...
काळे केस...
लांब कुरूळे...
बाईंची आवडती तुच आहेस काय...?
हो .. हो.. हो...
सगळ्यांचीच आवडती
पाटलीणबबाई
23 Sep 2008 - 11:34 pm | टग्या (not verified)
> सगळ्यांचीच आवडती
> पाटलीणबबाई
सगळ्यांचीच आवडती??????
(आणि Chubby chicks नव्हे हो!!!!!! Chubby cheeks!!!!!!)
23 Sep 2008 - 11:37 pm | चतुरंग
Chubby 'chicks' हेच बरोबर आहे!!! ;)
चतुरंग
23 Sep 2008 - 11:56 pm | प्रियाली
Chubby 'chicks' म्हणजे गुबगुबीत कोंबड्या का? ;)
24 Sep 2008 - 12:06 am | चतुरंग
chick शब्दाचा सर्वसाधारण अर्थ घेताय की स्लँग ह्यावर ठरेल! ;)
(जिज्ञासूंनी हा दुवा पहावा!)
चतुरंग
24 Sep 2008 - 1:05 am | संदीप चित्रे
आमचं इंग्लिश कच्चं आहे त्यामुळे स्लँगच अर्थ माहिती आहेत ;)
24 Sep 2008 - 1:16 am | लिखाळ
>>आई ग...बघ ना बाबा कसे करतायत....<<
हा हा हा.. हा खरा ट्विस्ट.. (खरा पंच आता बाबांना ! ;) )
पुढचा संवाद..
आई : अहो, जरा पंख्यावरची जळमटं काढा.. उगीच रविवार असला की बंड्याच्या मागे लागतात !
-- लिखाळ.
24 Sep 2008 - 11:09 am | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
ह्या बालगिताने माझा फार छळ झाला आहे. आता मराठी मध्ये येउ द्या.
24 Sep 2008 - 2:07 pm | मध्यमवर्गीय
चम चम करती खट्याळ तारे
सांगा आले कुठून हे सारे...
उंच नभी लुकलुकणारे
जसे देवाच्या मुकुटातील हिरे...
25 Sep 2008 - 9:47 am | हेरंब
थोडे विषयांतर
१) दॅट मिल्क इन युवर पॉट इज बेटर
व्हाय, आय डोन्ट नो टेस्टस् स्वीटर
२) ओ बेबी हाऊ शॅल आय थँक यु
आय बीकेम मदर बिकॉज ऑफ यु
(म्हणून बघा चालीवर, मीटरमधे बसताय)
27 Sep 2008 - 3:06 am | टग्या (not verified)
१. ते दूध तुझ्या त्या घटातले का अधिक गोड लागे नकळे
२. बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई
मीटरमध्ये ओढूनताणून बसतंय.