बरं झालं साहित्यिक व्हायला
लागत नाही उंची वजन छाती,
नाही तर अनेकांच्या प्रतिभेची
नक्की झाली असती माती.
समईचे गाभार्याशी नाते कोणते?
वेदनांचे जखमेशी नाते कोणते?
लाख यत्न केले तरी सांगता न येते
मनाचे देहाशी नाते कोणते ?
कोळ्शाचंही रक्त लालच असतं
तुकडे केले तरी दिसत नसतं,
स्वत:ला जाळून घेतांना मात्र
निखारे होउन वहात असतं.
प्रतिक्रिया
24 Sep 2008 - 8:07 pm | रामदास
हे आपले प्रथम प्रकाशन आहे असे वाटते.छान आहे.
पुढील कविता कधी?
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
24 Sep 2008 - 8:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कविता छान आहे. पण.....
उंची, वजन, छाती मुळे प्रतिभेची माती कशी होते ते कळले नाही.
समईचे गाभा-याशी, वेदनेचे जखमेशी, नाते सांगता येते. ( किंवा संगती लावता येते. ) तसे मनाचे देहाशी नाते असते, मग यातून आपल्याला काय सांगायचे असेल ते कळले नाही.
कृपया, आपण नाराज होऊ नका. आम्हाला कवितेतले सर्वच कळते असे नाही, पण कवितेतील शब्दांचा अर्थ प्रयत्न करुनही कळला नाही की आम्ही स्वत:पुर्ते अस्वस्थ होतो.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा !!!
24 Sep 2008 - 8:46 pm | लिखाळ
>>उंची, वजन, छाती मुळे प्रतिभेची माती कशी होते ते कळले नाही.<<
उंची, वजन, छाती हे काव्य लेखनाचे निकष असतील तर उंची, वजन, छाती ज्यांच्याकडे नाही पण प्रतिभा आहे त्यांच्या प्रतिभेची माती होईल असा अर्थ वाटला.
कोळश्याचे रक्त ही कल्पना आवडली.
लिहित राहा.
--लिखाळ.
24 Sep 2008 - 8:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लिखाळ,
लेखनाचे निकषाचे माहित नाही( हा दुसरा मुद्दा ) पण प्रतिभेचे निकष उंची, वजन, छाती हे मला कोणत्याच पातळीवर पटणारे नाही. बुद्धीच्या हानीमुळे प्रतिभेची होणारी माती समजू शकलो असतो. पण स्फुर्ती होण्यासाठी उंची, वजन, छाती ची आवश्यकता असते हे पटले नाही. प्रतिभा म्हणजे अंधारमय परिसरात क्षणात वीज चमकावी तशी कल्पना. पण प्रतिभेचा वरील अवयवांशी संबंध कसा जोडायचा ?
>>कोळश्याचे रक्त ही कल्पना आवडली
सहमत !!! कल्पना छान आहे.
24 Sep 2008 - 9:13 pm | लिखाळ
>>पण प्रतिभेचा वरील अवयवांशी संबंध कसा जोडायचा ? <<
सर, तसे नाही वाटत.. मला त्या अवयांचा उल्लेख-उंची वगैरे सामाजिक वाटली. आता कवीला तसे म्हणायचेच नसेल तर भाग वेगळा :) .. कवी स्वतः काय म्हणतात ते ऐकायला उत्सुक आहे.
--लिखाळ.
24 Sep 2008 - 9:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उत्तम रसिकाचं उत्तम वैशिष्टे हेच की 'कही दूर-दूर तक' दिसत नसलेला विचार दिसणे.
आपल्याला सामाजिक विचार दिसला आणि धनंजयला द्वैत-अद्वैत विचार सुचला. रसिक लेखनाची उंची वाढवतात म्हणतात ते हे असे !!!
बाकी कवीला काय वाटते तेही जाणून घेऊच. अर्थात धनंजय, लिखाळांप्रमाचे विचारच सुचले होते, असे म्हटले की मग संपले सगळे :)
24 Sep 2008 - 9:24 pm | लिखाळ
>>अर्थात धनंजय, लिखाळांप्रमाचे विचारच सुचले होते, असे म्हटले की मग संपले सगळे <<
मला बरे वाटले हे ऐकून पण धनंजयाच्या सोबत माझे नाव म्हणजे खरंच संपले सगळे :)
24 Sep 2008 - 8:54 pm | धनंजय
मन आणि शरिरांबद्दल द्वैत-अद्वैत प्रश्नाला सुंदर शब्दांत मांडले आहे.
पुढील कवितांसाठी शुभेच्छा.
25 Sep 2008 - 5:01 am | विसोबा खेचर
समईचे गाभार्याशी नाते कोणते?
वेदनांचे जखमेशी नाते कोणते?
क्या बात है!
25 Sep 2008 - 10:17 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
कोळ्शाचंही रक्त लालच असतं
तुकडे केले तरी दिसत नसतं,
स्वत:ला जाळून घेतांना मात्र
निखारे होउन वहात असतं.
मस्त आहे!
25 Sep 2008 - 1:44 pm | बेसनलाडू
(आस्वादक)बेसनलाडू
25 Sep 2008 - 3:22 pm | स्वाती फडणीस
कविता आवडली