मी बी काय तरी लिहीन म्हणतो : औरंगाबाद तडका. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जे न देखे रवी...
24 Jul 2016 - 8:35 am

(प्रेरणा) मूळ कवीची क्षमा मागून.

मीबी काय तरी लिहीन म्हणतो.

पांढर्‍या कागदावर काळे शब्द पाहीन म्हणतो.
मीबी काही तरी लिहिन म्हणतो.

कवितेला रास्त प्रतिसाद
भेटले काय, न भेटले काय
कवीला उपासमारीत
जगायची सवयच हाय
तरीबी मी आपलं जमवून
घेईन म्हणतो.
मीबी काय तरी लिहीन म्हणतो.

कवीला मूक्ती
भेटली काय, न भेटली काय
कवीला स्वप्नात जगायची
जन्मजात सवयच हाय
मी तरी वास्तव जगात जगून
घेईन म्हणतो.
मीबी काय तरी लिहिन म्हणतो.

कवितेतून सामाजिक प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या कवींना अजिबात
काय कळतच नसतं.
कविता पेनड्राइव्ह मधे भरुन
पुस्तक काढीन म्हणतो,
मीबी काय तरी लिहिन म्हणतो.

कवितेशी प्रतारणा करुन
कथा लिहिता येते,
कवितेशी इमान राखणारे
घरात कुढत बसतात,
कवीचे नाव फक्त
संदर्भापुरते घ्यायचे,
काम झाले की
वार्‍यावर सोडायचे
पण,कवितेतून नवं काय मांडावे म्हणतो.
मीबी काय तरी लिहिन म्हणतो.

कवितेला कंटाळून कोण तरी म्हणतं भाऊ
'दिलीपला' कोणी तरी दोन घोट 'पाजा'भाऊ.

अविश्वसनीयकविता

प्रतिक्रिया

गंगाधर मुटे's picture

24 Jul 2016 - 8:41 am | गंगाधर मुटे

बेक्कार हसलोय राव!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jul 2016 - 8:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला आपलं लय टेन्शन होतं.
हलकेच घेता की नाय म्हणतो.

कविता इंजॉय केल्याबद्दल आभार.

-दिलीप बिरुटे

गंगाधर मुटे's picture

24 Jul 2016 - 1:45 pm | गंगाधर मुटे

मी तितका बेक्कार नाही हो जितके तुमचे "मित्र" समजतात. a

कविता१९७८'s picture

24 Jul 2016 - 8:49 am | कविता१९७८

अच्छा म्हणजे अस कनेक्शन आहे तर.. ओके

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jul 2016 - 8:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उगा, कुठलेही संदर्भ याला जोडू नका म्हणतो.
मोकळ्या मनाने प्रतिसाद द्या म्हणतो,
मी बी काय तरी लिहीन म्हणतो.

-दिलीप बिरुटे

संजय पाटिल's picture

24 Jul 2016 - 11:09 am | संजय पाटिल

मोकळ्या मनाने प्रतिसाद द्या म्हणतो,>>>
किती करायचेत बोला? ४००? ५००?..
बादवे विडंबन आवडले!!

कविता१९७८'s picture

24 Jul 2016 - 12:23 pm | कविता१९७८

आव डाक्टरसायेब स्वत:चे धागे सोडुन कधीबी अन कुटबी प्रतिसाद देणार्‍या आयडीने इथे प्रतिसाद द्यावा तो ही पहीलाच यातच सगळ आल की

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jul 2016 - 12:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता त्यांच्या रचनेची आम्ही मोड़तोड़ केली आता त्यांनी येऊन बघितलं, आता त्यावर ते काय बोलले तर तो माझा दोष का ? असो, आपल्याला वाटलं ना, त्यांचं माझं कनेक्शन आहे, तर आहेच म्हणतो. कशाला नाय म्हणू.....(तसं माझं जवळ जवळ सर्वच मिपाकरांशी कनेक्शन आहे) आपल्या विचाराला मी थांबवू शकत नाही. आपला रविवार सुखात जावो. :)

-दिलीप बिरुटे

हेमन्त वाघे's picture

24 Jul 2016 - 2:01 pm | हेमन्त वाघे

हा हा ha

नूतन सावंत's picture

25 Jul 2016 - 11:27 am | नूतन सावंत

+100

नूतन सावंत's picture

25 Jul 2016 - 11:31 am | नूतन सावंत

कविता,100%सहमत,स्वतः चाच ढाव्यावर निम्म्यापेक्षा जास्त प्रतिसाद देऊन शिळे वाङ्मय पुन्हा प्रसारित करणार्यांचा पहिलाच इतरांच्या धाग्यावरचा प्रतिसाद पहिला,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Jul 2016 - 11:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विडंबन आवड़लं की नाही ते पण सांगितलं असतं तर लिहिण्याचा हुरूप वाढला असता हो.... :(

-दिलीप बिरुटे

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

26 Jul 2016 - 5:13 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

बिरूटे सर यू टू????
मुटे=बिरूटे

उडन खटोला's picture

25 Jul 2016 - 2:32 pm | उडन खटोला

>>>> स्वतः चाच ढाव्यावर

म्ह्न्जे? मुटेण्चा ढावा/बा आहे?

गंगाधर मुटे's picture

24 Jul 2016 - 2:09 pm | गंगाधर मुटे

होय. डॉ. प्रा. बिरुटे आणि माझं साताजन्माचं कनेक्शन हाय.

१) कलियुगात मी त्यांचा खापरजोबा आहे आणि ते माझे पणतू आहेत.
२) संतयुगात ते तुकाराम होते आणि मी जगनाडे
३) कृष्णयुगात ते बलराम होते आणि मी दुर्योधन
४) रामयुगात ते साक्षात रामच होते मी कुंभकर्ण

एवढं मुखोद्गत झालं की सांगा
नंतर मी त्याआधीचे ३ कनेक्शन सांगतो. d

हेमन्त वाघे's picture

24 Jul 2016 - 2:52 pm | हेमन्त वाघे
कविता१९७८'s picture

24 Jul 2016 - 3:10 pm | कविता१९७८

भारीये

कविता१९७८'s picture

24 Jul 2016 - 5:21 pm | कविता१९७८

धागा बिरुटेजीन्चा आहे, मी प्रतिसाद त्यानाच दिलेत आणि उत्तराची अपेक्षाही बिरुटेजीकडुनच आहे, दुसर्‍याने उगाच बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना होउ नये.

कविता१९७८'s picture

24 Jul 2016 - 5:22 pm | कविता१९७८

हे उत्तर मुटेना दिलय

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jul 2016 - 5:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्री मुटे आणि कविता १९७८ यांना विनंती की आपण माझ्या विंडंबनाला दाद दिली त्याबद्दल मन:पूर्वक आभार. बाकी काही चर्चा करायच्या असतील तर दोघांनीही माझ्या खरडवहीचा वापर करावा ही लम्र विनंती.

नवीन प्रतिसाद आला की माझ्या मोबाइलवर ट्याव ट्याव असा टोन वाजून नोटिफिकेशन येतं. नवीन प्रतिसादात कोणी कौतुक केलं असं बघायला धावत येतो. (आत्ता बाथरुम मधे घुसत होतो परत यावं लागलं) आणि अवांतर बघून मूड जातो. प्लीज सहकार्य कराल अशी अपेक्षा.

-दिलीप बिरुटे

कविता१९७८'s picture

24 Jul 2016 - 6:11 pm | कविता१९७८

कायेना बिरुटेजी नको खरडवही.करु की तुमच्या धाग्याचे पण ५०० .आपल्या माणसाला मदत करावी म्हणून हो .तुम्ही मला पुस्तक नाही का पाठवणार ?

मुटेंचा काय तो पंचनामा आणि जनम जनम का कनेक्शन कळु दे की सर्वाना. उगाच का मुटे राहतात बोका सारखा आयडी जातो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jul 2016 - 6:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण माझ्या धाग्याचा खरडफळाच कारायचाच ठरवला तर.. आपणास मन:पूर्वक शुभेच्छा...!

-दिलीप बिरुटे

कविता१९७८'s picture

24 Jul 2016 - 6:19 pm | कविता१९७८

जशी आज्ञा

गंगाधर मुटे's picture

24 Jul 2016 - 6:22 pm | गंगाधर मुटे

माझी सपशेल माघार.
तुमच्या इच्छेचा माझ्याकडून मान राखला जाईल.
या धाग्यावर माझ्याबद्दल कोणी कसेही बोलले तरी मी बोलणार नाही.
मात्र अधून मधून वाचून आनंद मिळवायला नक्कीच येणार.

सामान्य वाचक's picture

24 Jul 2016 - 6:26 pm | सामान्य वाचक

तुमच्या धाग्यावर फक्त 'लोकांच्या' प्रतिक्रियांच वाचायला जातो
त्याच काय त्या चांगल्या, अभ्यासू, माहितीपूर्ण आणि 'अ'अपमानस्पद असतात

अभिजीत अवलिया's picture

24 Jul 2016 - 9:05 am | अभिजीत अवलिया

मूळ कविता आणी हे विडंबन दोन्ही आवडलेले गेलेले आहे.

कंजूस's picture

24 Jul 2016 - 9:17 am | कंजूस

कुरकुरित भेंडी आवडली.
( बाकी भेंडी कोणाचा बळी घेणार नाही याची खात्री आहे)

औरंगाबादी तडका, कवितेचा भडका. मस्त जमलाय. लगे रहो.

मुक्त विहारि's picture

24 Jul 2016 - 9:48 am | मुक्त विहारि

जमलंय

साती's picture

24 Jul 2016 - 10:04 am | साती

विडंबन आवडलं!

उडन खटोला's picture

24 Jul 2016 - 1:18 pm | उडन खटोला

+१११

ज्ञानोबाचे पैजार's picture

24 Jul 2016 - 10:15 am | ज्ञानोबाचे पैजार

कोण आहे रे तिकडे? बिरुटे सरांनाही दोन घोट द्या बरे?
सर अजुन काही हवे असले तर नि:संकोच सांगा.
बाकी तुमच्या कविते बद्दल म्या पामराने काय बरे बोलावे?
आवडली.....
पैजारबुवा,

संत घोडेकर's picture

24 Jul 2016 - 10:22 am | संत घोडेकर

आवडले!

छान. आपल्या आस्वादासाठी एक शेर ऐकवतो -

बे(भे)सूर आळवावा, कवीला 'भाव' नाही!
पण सुरसुरी आणली, जिल्बी पाडण्याने. ;-)

(ह. घे.)

विनायक प्रभू's picture

24 Jul 2016 - 11:12 am | विनायक प्रभू

फार फार क्रिटिक लिहीता बॉ.
जरा सरळ समजेल असे लिहा बॉ.
टिकल्या सांडल्या ना बॉ.
तुम्ही सी.ई.टी. दिली नव्हती का प्रा. डॉ.?

विनायक प्रभू's picture

24 Jul 2016 - 11:13 am | विनायक प्रभू

९ वर्षांचा हिशोब फिट्टं फाट

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jul 2016 - 11:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर, असा हिशेब पूर्ण केला तर. आपल्या धाग्यावर लक्ष ठेवण्यात येईल. ;)

-दिलीप बिरुटे

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Jul 2016 - 11:25 am | डॉ सुहास म्हात्रे

यु टू प्रा डॉ ?! ;)

फक्कड जमलेय. :)

अत्रुप्त आत्मा's picture

24 Jul 2016 - 12:00 pm | अत्रुप्त आत्मा

वाह व्वा. जबराट !

हेमन्त वाघे's picture

24 Jul 2016 - 12:12 pm | हेमन्त वाघे

डॉक्टर आपण दिलं खुश केलात असा
दोन घोट नाही तर क्वार टर चा मजा आला जसा

मुंबईत येण्याचा काही प्लॅन ? थोडे "बसू" , आणि बोलू!

ज्योति अळवणी's picture

24 Jul 2016 - 3:15 pm | ज्योति अळवणी

विडंबन आवडले

माम्लेदारचा पन्खा's picture

24 Jul 2016 - 3:52 pm | माम्लेदारचा पन्खा

इडंबन फर्मास बर्का सर....एक लंबर...!

मितभाषी's picture

24 Jul 2016 - 4:44 pm | मितभाषी

लै भारी.

सतिश गावडे's picture

24 Jul 2016 - 7:12 pm | सतिश गावडे

दोन घोट कसले पिता म्हणे तुम्ही? ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jul 2016 - 7:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कॉफीचे दोन घोट रे बाबा ! पुढच्या भेटीत कॉफी घेत घेत माझं कुठे कुठे कनेक्शन आहेत त्यावरही लिहीन म्हणतो... ;)

-दिलीप बिरुटे

सतिश गावडे's picture

24 Jul 2016 - 7:33 pm | सतिश गावडे

तुम्ही पुण्याला या. तुम्हाला सीसीडीची कॉफी पाजू. अट एकच, कॉफी प्यायल्यानंतर "यापेक्षा टपरीवरील चहा बरा" अशी नावे ठेवायची नाहीत. ;)

कोणी यापूर्वी अशी नावे ठेवली आहेत का हो?

विडंबन म्हणून कविता छान. मूळ प्रेरणा वाचली असल्याने त्याबाबत पास.

प्रचेतस's picture

24 Jul 2016 - 8:08 pm | प्रचेतस

वाचली 'नसल्याने' असे वाचावे.

अत्रुप्त आत्मा's picture

24 Jul 2016 - 9:55 pm | अत्रुप्त आत्मा

तूच आगोबा.. तूच! ल्लुल्लुल्लुल्लु!

नाखु's picture

25 Jul 2016 - 8:36 am | नाखु

आधी टपरीवर चहा पाजून मग सी सी डी त (मुद्दाम) नेल्यास आपण इथे कॉफी साठी (मुळीच) आलो नाहीत हे वल्लींबरोबर राहून प्रा डाँना माहीत नसेल असे मला वाटत नाही.

देव त्या दिवशी सी सी डीत उपयुक्त गर्दी ठेवो हीच प्रार्थना..

अता कवितेबद्दल ही कवीता कवींच्या व्यथेबद्दल भाष्य करते की प्रथेबद्दल यावर मुवींनी एक समीक्षण लेख लिहावा ही विनंती.शकयतो याच धाग्यात, मला प्रा डाँ चा एकतरी धागा पंच्शतकी पहायचाच आहे.

मूळ अवांतर :(नेहमी प्रमाणे शेवटी) कवीता मस्त आहे पण उपमा मुद्दम सौम्य करून वापरल्या आहेत ते जाणवते (प्रत्यक्ष प्रा डाँना भेटलो असल्याने) अश्या "शाक भाजीची" अपेक्षा ठेवली नव्हती.

मिपा वारकरी नाखु

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Jul 2016 - 9:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभार.

कोणतीही कविता असो, लेख असो, माणूस असो, नवरा असो की बायको असो, की मिपा असो ते कोणाचंही पूर्णपणे समाधान करू शकत नाही. ;)

आपलं माझ्या रचनेने समाधान झालं नाही, आपणास उच्च आनंद मिळाला नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मी आपल्याला माझ्या लेखनातून आनंद देण्याचा नक्की प्रयत्न करीन. असाच लोभ आणि आशीर्वाद असू द्याल, अशी अपेक्षा व्यक्त करतो. :)

-दिलीप बिरुटे

-दिलीप बिरुटे

बाबा योगिराज's picture

24 Jul 2016 - 10:38 pm | बाबा योगिराज

आवड्यास.
सर आवाज द्या. पयली कोप्पी माह्याकडूनच.
.

.

एक अती अवांतर गोष्ट,
आता सरच कॉपीच्या बाता करू रायले म्हणल्यावर...
(पळ भौ)
बाबा योगीराज

नीलमोहर's picture

24 Jul 2016 - 11:11 pm | नीलमोहर

भारी लिहीलेत सर, पण त्यामुळे घोळ झाला ना,
एवढी छान कविता पाहून आम्हालाबी एक सोडून दोन कविता लिहाव्या लागल्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jul 2016 - 11:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दोन्ही वाचल्या. (एकावर ज़रा अवांतर केलं सॉरी हं) खरं तर एकच विडंबन करायला हवं होतं. दोन्ही चांगल्या जमल्या. पण मग वाचकांचा फोकस कमी होतो. शुभेच्छा.

आणि प्रतिसादाबद्दल आभार.

-दिलीप बिरुटे

धाग्याचा खरडफळा स्वतः कवीच करताना प्रथमच पाहिला गडे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Jul 2016 - 11:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हो ना ! काय करू हौस कशी असते. =))

-दिलीप बिरुटे

सालस's picture

25 Jul 2016 - 12:16 pm | सालस

अच्च जालं तर

पैसा's picture

25 Jul 2016 - 12:17 pm | पैसा

लैच्च मणोरंजक!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Jul 2016 - 1:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Thank u.... प्रतिसाद हार्टली नै आला हं पण (राग आलाय तुमचा) च्यायला, एक तर मी काव्य प्रकारात पडत नै, अन भरवशाच्या मिपकारांनी असा तुटक प्रतिसाद दिल्यावर लिहाव वाटतं नाही. ;)

दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jul 2016 - 8:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विड़ंबन आवडल्याचं आवर्जून लिहिल्याबद्दल सर्व मिपाकरांचे मनपूर्वक आभार. आपल्या प्रतिसादांनी लिहीण्याचा उत्साह वाढतो आणि आनंदही वाटतो. विडंबनावर प्रतिसाद लिहायचं सोडून अवांतर प्रतिसाद दिले त्यांचेही आभार, त्यांच्यामुळेही लिहीण्याची खुमखुमी वाढली आहे. मिपा वाचकांचेही आभार. मिपा संपादक, व्यवस्थापन यांचेही आभार त्यांनी मला अभिव्यक्त होण्याची संधी दिली. मी आपल्या ऋणातच राहु इच्छितो. कोणाचे आभार मानायचे राहून गेले असतील तर दिलगिरी व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीने आभार मानायचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.

-दिलीप बिरुटे

सतिश गावडे's picture

26 Jul 2016 - 9:49 am | सतिश गावडे

चहापानाची व्यवस्था कुठे केली आहे?

ह्याच्यानंतर वाचनमात्र होणार का? का चालतील प्रतिसाद अवांतर प्रतिसाद वगैरे?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jul 2016 - 11:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकदा आभार मानल्यावर पुन्हा माइक वर सूचना द्यायचं म्हटलं की मला जीवावर येत. पण धन्या आणि तुम्ही माझे मित्र म्हणून पुन्हा एकदा सूचना देतो.

संगमवाड़ीच्या पूला समोर जिथे बस उभ्या राहतात तिथे एक छोटी टपरी आहे तिथे सर्वांची चहा, दूध , मेदूवडा आणि इडलीची व्यवस्था केली आहे. कूपन दिले आहेतच. मुगाचा शिरा मिळणार नाही. अवांतर प्रतिसाद देणा-या मिपाकरांना वरील मेनूसोबत महालक्ष्मीच्या कहाणी आणि आरतीची पुस्तकं देण्यात येतील. ;)

ता.क. : बाकीचं वाट्सपवर बोलू. संजय क्षीरसागर ओळखीचे असतील तर मिपावर प्रा.डॉ. आपली वाट पाहात आहेत असा निरोप द्या प्लीज.

-दिलीप बिरुटे

सतिश गावडे's picture

26 Jul 2016 - 11:33 am | सतिश गावडे

संगमवाड़ीच्या पूला समोर जिथे बस उभ्या राहतात तिथे एक छोटी टपरी आहे तिथे सर्वांची चहा, दूध , मेदूवडा आणि इडलीची व्यवस्था केली आहे. कूपन दिले आहेतच.

तिथे मसाला दुध छान मिळते. आणि रस्त्याच्या कडेला बसून बाजूने वाहने भरधाव जात असताना मसाला दुध पिण्याची मजा काही औरच आहे.

रातराणी's picture

27 Jul 2016 - 12:25 am | रातराणी

दोन घोटानी भागतं? विशेष आहे!

सतिश गावडे's picture

27 Jul 2016 - 9:28 am | सतिश गावडे

नशा कॉफीत असती तर नाचला असला प्याला ;)

अमितदादा's picture

27 Jul 2016 - 1:55 am | अमितदादा

आवडलं. मस्तच...