नेत्याईसाठी बी CET चालु कराले पाहीजे....

Sanjay Kokare's picture
Sanjay Kokare in जनातलं, मनातलं
23 Jul 2016 - 7:31 pm

गण्या रस्त्यान चालला होता तेवढ्यात त्याले राम्या येताना दिसते,
गण्या: कुठ चाल्ला बे!
राम्या: कुठ नइ मयी CET ची परिक्षा आहे न त्याचेच पुस्तक आणाले चाल्लो.
गण्या: अबे राम्या हे CET म्हणजे काय होते रे!
राम्या: काय राजा गण्या तुले CET म्हणजे काय महीत नही काय, अबे माय d.ed. झाल न् झाल नोकर्याच संपल्या राज्या मग सरकारन पात्रता परिक्षा ठेवली हुशार तपासुन नोकरी लावासाठी त्याच परिक्षाले राज्या CET म्हणते.
गण्या: हुशार पोरं तपासुन लावा साठी हे पात्रता परिक्षा होय मग? काय रे मग तु कायले चाल्ला मग तिथ?
राम्या: तुले मघाशीच त् सांगतल ना बे CET ची परिक्षा द्यायाची हाय म्हणुन त्याइचे पुस्तक आणाले चाल्लो म्हणुन
गण्या: नइ ते बरोबर हाय तुय, पण हे CET परिक्षा त् हुशार पोर तपासुन लावते ना मग तु कायले चाल्ला बे ते परिक्षा द्याअले.
राम्या: काय राज्या मले डायरेक्ट बह्याड म्हणुन राह्यला तु!
गण्या: मजाक करुन राह्यलो ना बे तुई. आता तुई मजाक नई कराव त कोणाची कराव राज्या.
राम्या: थे बी बरोबर हाय म्हणा, आपलेले अशेच मजाक करत दिवस काढा लागते.
गण्या: काय बे राम्या ह्या आमदारायसाठी, खासदारायसाठी कोण नई बे CET ठेवत हे सरकार
राम्या: त्यान काय हुयीन बे,
गण्या: ह्या नेत्याइतल्या बह्याडाईले बाहेर काढुन हुशारायीले शोधुन आमदार, खासदार तरी करता येइन बे
राम्या: बरोबर हाय तुय! पण नेमक त्यान काय हुयीन.
गण्या: जस बह्याड पोराईतले हुशार पोर ले पारखुन चांगला मास्तर तयार करते हे सरकार, तसच मग ह्या नेताईतले बह्याड नेत्याइले बाहेर काढुन हुशार नेत्याले आमदारकी, खासदारकी उभ करता ईन मग आपला देश बी लई पुढ जईन राज्या.
राम्या: खर बोलला राज्या तु गण्या....

Sanjaykokre.blogspot.com

नाट्यकथा

प्रतिक्रिया

सुरुवात व मध्य छान आहे. पण शेवट अजून खुलवता आला असता. पुलेशु.