दोन मूठ राख

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
22 Jul 2016 - 2:12 am

दोन मूठ राख

अस्तित्वहीनाने एकदा
अस्तित्वाला आव्हान दिलं...

म्हणालं

"तुला लोळवायला दोन घटका
पुरेशा ठरतील.... माझ्यासाठी"

अस्तित्व हसलं......

म्हणालं

"जिंकणे किंवा हरणे... दोनपैकी एक
काहीतरी नक्कीच करू शकेन मी....

पण तुझं काय?
तुला ना नांव, ना गांव... ना हात ना पाय
ना बाप .......................... ना माय

माझ्याशी दोन हात करण्यापूर्वी
माझ्याशी बरोबरी कर
अंधुकसं का होईना...
पण स्वतःचं अस्तित्व तयार कर...

आणि

अभयपणे हे सुद्धा लक्षात घे की
मी संपलो तरी, मी नाहीच सरणार
माझी दोन मूठ राख तरी
नक्कीच उरणार....!"

पण
बिनमायबापाच्या लेकरा तुझं काय?????

                         - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अभय-काव्यकविता

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

22 Jul 2016 - 2:20 am | संदीप डांगे

कहर... जब्रा कविता मुटेसर. लै भारी.

बाकी सगळं जाऊ द्या, पण तुम्ही कविता फार सुंदर करता. कीप इट अप!

काहीच कल्ले नाही, डांगे इतक्या आग्रहाने छान म्हतात मंजे असेलच

अभिजीत अवलिया's picture

22 Jul 2016 - 2:22 am | अभिजीत अवलिया

आवडली कविता

अभिजीत अवलिया's picture

22 Jul 2016 - 2:22 am | अभिजीत अवलिया

आवडली कविता

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jul 2016 - 6:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रचना आवडली.

-दिलीप बिरुटे

मारवा's picture

22 Jul 2016 - 8:31 am | मारवा

छान आहे कविता
आवडली.

पैसा's picture

22 Jul 2016 - 9:06 am | पैसा

सुरेख कविता!

सस्नेह's picture

22 Jul 2016 - 9:14 am | सस्नेह

आशयघन कविता !

जव्हेरगंज's picture

22 Jul 2016 - 9:15 am | जव्हेरगंज

कडक!!!!

कविता१९७८'s picture

22 Jul 2016 - 9:35 am | कविता१९७८

200 प्रतिसाद

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Jul 2016 - 9:37 am | ज्ञानोबाचे पैजार

कवितेतला विचार नकारात्मक आणि अपूर्ण वाटला.

घराच्या कोणत्या तरी कोनाड्यात उलट्या टांगलेल्या काळ्या बाहूलीलाही असेच काहीसे वाटत असावे की "माझ्या मूळेच हे घर टिकून आहे, मी नसते तर....". घरमालका कडेही ती बाहूली तशीच मगृर पणे पहात असते.

तसा काहीसा विचार अस्तित्व या कवितेमधे करते असे वाटले.

आणि तशीही अस्तित्वाने अस्तित्वहिनाचा उपहास करावा ही तर जगरहाटीच आहे, त्यात विशेष ते काय?

पैजारबुवा,

सतिश गावडे's picture

22 Jul 2016 - 10:15 am | सतिश गावडे

आणि तशीही अस्तित्वाने अस्तित्वहिनाचा उपहास करावा ही तर जगरहाटीच आहे, त्यात विशेष ते काय?

जरा वेगळ्या कोनातून पाहीले तर "अस्तित्व" कधी अस्तित्वहीनाचा उपहास करणार नाही असे वाटते.

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Jul 2016 - 11:25 am | ज्ञानोबाचे पैजार

हम्म... हे देखिल बरोबरच आहे खरे...

आणि माझें जाणणें नेणणें । तें तंव भूतांचिया दैवाचें करणें ।
म्हणौनि भूतीं भावाचें होणें । विषम पडे ॥

माझे असे होते कधिकधि.

पैजारबुवा,

दोन मूठ राख कि किमत तुम क्या जाणो पैजार / सतीश बाबू

-- शक्तिमान मुटे

सतिश गावडे's picture

22 Jul 2016 - 9:56 am | सतिश गावडे

२०१० ला प्रकाशित झालेली कविता एका धाग्यावर चालू असलेल्या धुलवडीत उल्लेख करुन ती पुन्हा एकदा समोर आणणे यात शुद्ध हेतू दिसत नाही.

नाखु's picture

22 Jul 2016 - 9:53 am | नाखु

असे म्हणून तुम्ही झुंडशाहीचे समर्थक+सहभागी ठरू शकाल अशी मला सार्थ भीती वाटते.

कवीता २०१० ला खरेच अर्थवाही होती पण अता......

मिपा वारकरी शहरी नाखु

मस्त कविता, काळाचे बंधन नाहीच ह्याला.
अस्तित्वाचा नक्की अर्थ मात्र सापडला नाहीये मला. म्हणून मी आहेरे नाहीरे अर्थ लावून वाचली.

सतिश गावडे's picture

22 Jul 2016 - 10:19 am | सतिश गावडे

मला या कवितेत लागलेले अर्थः

अस्तित्व: कर्तृत्ववान, ज्याने स्वतःची अशी एक ओळख किंवा प्रतिमा जनमानसात तयार केली आहे असा
अस्तित्वहीन: कर्तृत्वहीन, स्वतःची अशी एक ओळख किंवा प्रतिमा नाही असा

चांदणे संदीप's picture

22 Jul 2016 - 11:36 am | चांदणे संदीप

पण रूपकांचा गोंधळ होतोय का? अस्तित्वहिनाला बिनमायबापाचे लेकरू म्हणणे म्हणजे नक्की काय?

कवितेचा आशय आणि एकंदरित रचना आवडलीच!

Sandy