गेले आठ दिवस श्रवंती शेखरला भेटायचा प्रयत्न करत होती. दर तासाला फोन करत होती पण साहेब काही फोन उचलत नव्हते. त्यांच्या सगळ्या कॉमन मित्र मैत्रीणीना फोन करून झाले होते पण कुणालाच कल्पना नव्हती काय झाले त्याची. सिक लिव्ह घेतलीये एवढंच कसंबस कळलं होत. एरवी कधीही असं न वागणाऱ्या शेखरला असं अचानक काय झालं हे तिला काही केल्या कळत नव्हतं. डॉकटरकडे जायचंय म्हणालेला. आता घरी जाऊन खात्री केल्याशिवाय चैन पडणार नाही असा विचार करून श्रवंती ऑफिसमधून बाहेर पडली.
काकांनी दार उघडलं आणि त्यांना वाटलं कुणी सेल्समन आलिए की काय म्हणून त्यांनी "कसली औषधं विकायला आलायत?" असं विचारलं.
"काका, एक मिनिट. मी सेल्समन नाहीये. मी श्रवंती. शेखरची मैत्रीण. आम्ही एकत्र काम करतो... म्हणजे करायचो.. आता मी दुसरीकडे करते जॉब. शेखर आहे का घरी?"
"आहे ना. खोलीत बसलाय केव्हाचा एकटा. तूच बघ बोलून, ऐकतोय काय तुझं ते."
श्रवंती आत गेली. शेखर गुढघ्यात डोकं घालून बसला होता.
"काय झालं शोनु? माझं काही चुकलं का?"
शेखरने त्याला मानेनंच नाही म्हणून सांगितलं.
"मला काही सांगशील का? मे बी माझ्याकडे असेल तुझ्या प्रॉब्लेमच सोल्युशन."
"...."
"काय झालंय? तू जेवढा वेळ शांत बसणार आहेस तोपर्यंत इथे माझी काय अवस्था होतीये समजून घे ना जरा. का असा वागतोयस तू?"
"शोनु, मी आहे ना! काकू आहेत. काय प्रॉब्लेम आहे हे तू सांगितलं नाहीस तर मला किंवा कुणालाच तुझी मदत नाही करता येणार."
शेखरने उठून टेबलवरचा हेअर ब्रश हातात घेतला. त्या ब्रशकडे बघून श्रवंतीला धक्काच बसला. त्यात हे एवढे केस अडकले होते!
शेखरपुन्हा शून्यात नजर लावून बसला होता. काही दिवसांपूर्वीपर्यंत अत्यंत नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या आपल्याबाबतीत हे का होतंय याचं उत्तर त्याला काही केल्या मिळत नव्हतं. चारचौघांसारखं आयुष्य हवं होत त्याला. खूप मोठी स्वप्नं,महत्वाकांक्षा कधीच नव्हत्या त्याच्या.
त्या दिवशी शेखर आंघोळीहून आला. केस वाळवल्यावर टॉवेलवर लक्षं गेलं. त्यावर थोडे केस दिसले असं वाटलं खरं त्याला. पण दुर्लक्ष करून ब्रश फिरवला डोक्यातून. ब्रशकडे बघताच शेखरच्या छातीतून कळ गेली एक. ब्रशच्या एका स्ट्रोकमध्ये मोठ गुंतवळच निघालं त्याच्या डोक्यातून.
का़कांचेही केस असेच अवेळी गेले होते. त्यांना शेखरच्या मनात काय चाललय याची कल्पना होतीच. तरी ते त्याला म्ह्णाले "काळजी करू नकोस. आमच्या वेळेला वैद्यकशास्त्र एकदम मागास होतं. पण आजकाल वैद्यकशास्त्राने खूप प्रगती केली आहे असं म्हणतात. त्यांच्याकडे यावर नक्की उपाय असेल." हे ऐकून शेखरला थोडा हुरूप आला. तो लगेच तयार झाला डॉक्टरकडे जायला. त्याने एका मित्राला विचारून डॉ. अत्रे यांची अपॉइंटमेंट घेतली.
वेळ आल्यावर कांपाउंडरने शेखरला आत जायला सांगितलं. शेखर आत गेला. डॉ. अत्रे साधारण साठीचे होते. पण त्यांच्यावयापेक्षा शेखरला सगळ्यात पहिल्यांदा नोटीस झाले त्यांचे केस. साठीचे असून पूर्ण डोक्यावर केस होते. शेखरच्या मनात मत्सराची भावना येऊन गेली.
शेखरने आपली समस्या सांगितली. डॉक्टर म्हणाले,
"मी तुम्हाला काही झुलवत ठेवणार नाही. पण एक सांगतो. गेलेले केस काही परत येत नाहीत. उरले सुरले वाचवणंच आपल्या हातात आहे. नवे केस हवे असतील तर खर्चिक ट्रांसप्लांट हाच एक उपाय आहे."
शेखरचा धीर पुन्हा गेला. डोक्टर बोलत होते काहीतरी पण शेखर कुठेतरी हरवून गेला होता.
शेखर ढसाढसा रडत हे सांगत होता. त्याचा आवेग ओसरल्यावर श्रवंती त्याला धीर देत म्हणाली
"अरे वेड्या! त्या अॅलोपथीच्या डॉक्टरच काय ऐकतोस. टीव्हीवर बाबा रामदेवांचा कार्यक्रम बघत नाहीस काय? नखं घासून केस परत येतात अरे! जंगल उगवतात डोक्यावर! ते सोड, डॉ. बात्रांच्या होमिओपथीच्या औषधाने तर अंड्यावरदेखील केस उगवू शकतात!"
पण शेखरकाही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. मनाशी काहीसा निर्णय घेतल्यासारखा तो म्हणाला,
"मला वाटतं आपण इथेच थांबूया, श्रवंती .माझ्याबरोबर मी तुझंही भविष्य अंधारात नाही ढकलू शकत. आय एम रीयली सॉरी पण.... "
शेखरच्या त्या शब्दानी श्रवंती कोसळली. त्यांच्यात कधी शपथा, वचनं असलं काही घडलं नव्हतं. दोघेही प्रॅक्टिकल विचार करणारे. लग्नाचा विषय एक दोनदा निघाला तरी दोघांनीही कोणताही आक्रस्ताळेपणा न करता अजून वेळ घेतला पाहिजे असं ठरवलेलं. पण सगळ्याच गोष्टी शब्दांनी बोलून दाखवल्या नसल्या तरी आतल्या आत एकमेकांच्या सहवासाची असलेली ओढ बरच काही बोलून गेली होती. आयुष्यातल्या ज्या क्षणी शेखरला खरोखर श्रवंतीची गरज होती तेव्हाच ती त्याला दूर करत होती.
"असं नको करू ना ग शोनु, मी नाही राहू शकणार तुझ्याशिवाय. अगं तू साधं बोलला नाहीस माझ्याबरोबर तर काय अवस्था होते माझी तुला माहितीये का? शेखर, तू माझ्या प्रेमाचा असा अपमान का करतोयस? आणि अरे ट्रीटमेंट आहे ना? तू असा टोकाचा निर्णय का घेतीयेस?"
"हा टोकाचा निर्णय आहे मला मान्य आहे पण मी तो पूर्ण विचार करून घेतोय. ट्रीटमेंट जरी यशस्वी झाली तरी आज मी जो आहे तो अजून महिन्याभराने नसेन. सगळं बदलणार आहे श्रवंती, माझं शरीर, माझं आयुष्य बदलतंय. तू बरोबर आलीस तरी तुला देण्यासाठी माझ्याकडे काही असेल का? मग का असं ओझं लादून घेतेयस तू तुझ्यावर?"
"सगळं तूच ठरवणार आहेस का? मला काही मन आहे की नाही? प्रेम दोघांनी केलेलं... आता एकावर संकट आलं म्हणून त्यान दुसऱ्याला सोडून जायचं असं केलं तर त्याला प्रेम नाही म्हणत. खेळ म्हणतात त्याला, जो तू खेळतीयेस माझ्याशी. आणि तुझं माझ्यासोबत असणं एवढंच मागणं आहे माझं, अजून काहीही नकोय मला..."
"शेखर अरे, माझ्यासाठी नवीन आहे हे सगळं, मला काही माहीत नाहीये आणि इज इट रियली एंड ऑफ द वर्ल्ड? तुझ्या आयुष्याची किंमत जास्त आहे त्याहून... "
"श्रवंती!! एंड ऑफ द वर्ल्ड? खरंच? तुला कल्पना आहे का हा केवढा मोठा बदल आहे माझ्यासाठी.जगाच काय होईल मला माहीत नाही पण मला एकच प्रश्न छळतोय सतत, इथून पुढे माझं पुरुषत्व मला जाणवेल का? मनाचं सामर्थ्य मनाचं सामर्थ्य असा जप सुरू असतो आईचा सतत. सांग ना मला, कुठल्या मनाचं सामर्थ्य मला डोक्यावर केस परत येतील याची खात्री देईल. कुठल्या मनाचं सामर्थ्य मला शृंगाराच्या उत्कट क्षणी एखादी स्त्री डोक्यावर केसातून हात फिरवते तसा अनुभव देणार आहे? ओला चिंब होऊन आलेल्या नवर्याचे केस पुसताना होणारा आनंद मी तुला देऊ शकेन? नुसता एक हात फिरवल्यावर कोरडं होणारं माझं डोक तुला तो आनंद कसं देईल? शरीराच्या मर्यादा असतात हेच सांगत आले आतापर्यंत सगळे, मनाच्या मर्यादा कुणी नाही सांगितल्या. पण मला माहितीये श्रवंती, आता मला चांगलंच कळलंय, मनालाही मर्यादा आहेत. कदाचित मी यातून बरी होईनही, इम्प्लांट्स लावून माझं शरीर पूर्वीसारखं दिसेल अशी सोयही करता येईल, पण खरं सांग कितीही मुलामे लावले तरी मी शेवटी अपूर्णच ना? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत का तुझ्याकडे? तू मला स्वीकारलंस तरी तुझ्या घरचे मला स्वीकारतील का? त्यांना पटेल असं ज्या मुलाच्या केसाची खात्री नाही अशा मुलीशी त्यांच्या मुलाचं भविष्य जोडलं गेलेलं?"
शेखरच्या प्रश्नांच्या भडिमाराने श्रवंती बुजून गेली. त्याच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नव्हतं त्याच्याकडे. ति;आ फक्त एवढं कळत होत की जर कधी तिच्यावर अशी वेळ आली असती तर शेखर त्याला कधीच सोडून गेला नसता. पुरुषाच्या बाह्य रुपाला अतोनात महत्व असलेल्या समाजात जर रूपानं, रंगानं सामान्य असलेल्या मुलांना अनेक समस्यांना समोर जावं लागत तर इथं तर.... आपले आई वडील कितीही पुरोगामीपणाचा आव आणत असले तरी ते ही शेवटी सामान्य माणसं आहेत. त्यांना झेपेल हे सगळं? त्यांना स्वीकार करता येईल शेखरचा? आपली स्वतःचे बाबा काय प्रतिक्रिया देतील हे सगळं कळल्यावर? एक पुरूष असून ते शेखरला समजून घेतील की नाही याची आपल्याला खात्री नाही. पण या सर्व गोष्टी खरंच इतक्या महत्वाच्या आहेत का? अगदी लहानपणापासून आपण सगळे नियम जपत आलो समाजाचे. काय मिळालं आपल्याला? मग आता एक वेळ आपण एखादा संकेत नाही पाळला तर घेतील आपल्याला सांभाळून? समाजाने नाही तर नाही घरचे तरी? पण एका प्रश्नचिन्हाशिवाय श्रवंतीकडे काहीही नव्हतं. तिच्या मनातली चलबिचल शेखरने ओळखली आणि तोच म्हणाला,
"कधी कधी मौनही खूप बोलकं असतं श्रवंती. तू निर्धास्त मनाने जा. तुझ्याविषयी माझ्या मनात काहीही राग नाही हे विसरू नकोस."
"नाही जाणार मी. कुणी काही म्हणू देत. मला तू जसा आहेस, जसा असशील तसा हवा आहेस. का अशी शिक्षा देतोयस? असं मुद्दाम करतियेस?"
"हो करतीये. का माहितीये? उद्या लग्न झाल्यावर माझ्याकडे पाहणाऱ्या प्रत्येक नजरेत मला फक्त एकच भाव दिसेल कुठला माहितीये, "लंगूर के मुंह मे अंगूर!" नकोय मला ते ओझं! नाही जगायचं मला असं गुदमरून जाऊन."
डोळ्यात आलेल पाणी तसंच लपवून श्रवंती बाहेर पडली. स्वैपाकघरात उगीच खुडबुड करत बसलेल्या काकूंच्या हातातून गडबडीत चहाचा कप फुटला. घाईघाईत त्या बाहेर आल्या.
"श्रवंती ... अरे श्रवंती .. चहा ठेवला होता ग" घशात दाटून आलेला आवंढा कसाबसा मागे ढकलत काकू म्हणाल्या.
"आज नको काकू. परत येईन." भरल्या डोळ्यांनी श्रवंती म्हणाली आणि गेटबाहेर पडली.
शेखर आणि श्रवंती काही भेटले नाहीत यानंतर...
प्रतिक्रिया
17 Jul 2016 - 10:54 pm | टवाळ कार्टा
नै जम्या
17 Jul 2016 - 11:02 pm | रातराणी
थांबा वाचते. जरा मोठं झालंय नै.
17 Jul 2016 - 11:04 pm | लालगरूड
लय चुका आहेत.
17 Jul 2016 - 11:06 pm | डॉ सुहास म्हात्रे
नायक-नायिकेने संवादात अनेकदा लिंगबदल केला आहे ;) :)
17 Jul 2016 - 11:12 pm | टवाळ कार्टा
+११११
18 Jul 2016 - 9:52 am | अनुप ढेरे
कॉपीपेस्टच्या डुलक्या...
18 Jul 2016 - 8:33 am | अजया
:)
18 Jul 2016 - 9:37 am | ज्ञानोबाचे पैजार
अरे देवा "भग्न शरीरे"चे ही कोणी विडंबन करेल असे वाटले नव्हते.
पण आयडिया आवडली आणि प्रयत्न ही चांगला होता.
पु.वि.शु.
पैजारबुवा,
18 Jul 2016 - 9:54 am | जव्हेरगंज
हे सत्कार्य आपल्याच हातून घडल्यास आमोद सुनांस होतील.. ;)
18 Jul 2016 - 11:41 am | रातराणी
असेच म्हणते. :)
19 Jul 2016 - 10:19 am | नाखु
बाडीस आहे...
पैजारबुवा कळफलक धूळ झटका आणि द्या "गुरु"दक्षीणा
18 Jul 2016 - 9:58 am | सिरुसेरि
मी सेल्समन नाहीये. मी श्रवंती. शेखरची मैत्रीण ---- सेल्समन ?
"I" पिच्चरची कथा काहिशी अशीच आहे .
18 Jul 2016 - 10:02 am | स्पा
खिक्क
18 Jul 2016 - 12:37 pm | मराठी कथालेखक
या महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या एका लेखात विडंबनयोग्य मसाला सापडला..adult comedy प्रकारचे विडंबन होवू शकते. पण एकट्याला पुर्ण सूचत नाहीये. भागीदारीत बनवता येईल का ? कुणी आहे का ? व्यनि करा ...
18 Jul 2016 - 12:49 pm | नमकिन
आवडला.
घाई गडबडीत झाले असे दिसते, विनोदी/ विडंबन
19 Jul 2016 - 11:49 am | nanaba
19 Jul 2016 - 11:49 am | nanaba
19 Jul 2016 - 11:50 am | nanaba
Hasale.
22 Jul 2016 - 12:16 pm | अनुप ढेरे
सर्व प्रतिसादकांचे आभार!