https://www.youtube.com/watch?v=ameDmBSPciM&t=4332s
इथे घमासान चर्चा झाली. चर्चेत सहभागी असलेले बहुतेक लोक... मुंबईकर आहेत आणि त्यांची वयं पाहता त्यांनी बाळासाहेबांची वाटचाल जाणत्या वयात पाहीलेली आहे.
चर्चेत अनेक मुद्दे आले. सेनेने सुरुवातीला मराठीचा मुद्दा हातात घेतला. तो मुंबईत मराठी माणसाला अपील झाला. लोकांना बाळासाहेबामधे आपला कुणी तारणहार दिसू लागला..
पुढे १९९३ ची दंगल. आंदोलनात सेना सहभागी नव्हती पण मशीद पडल्यावर मात्र जी दंगल उसळली तिचा सामना करण्याचा आदेश सैनिकांना मिळाला, तिथे खर्या अर्थाने बाळासाहेब मुंबईमधे फक्त मराठी नव्हे तर सगळ्याच हिंदूंचे संरक्षक बनले.
बाळासाहेब आणि शिवसेना यांच्यामधे उस्फुर्तता हा सर्वात मोठा गुण आहे. त्यामुळेच त्यांच्या सभा आणि आंदोलने सामान्य माणसाच्या काळजाला हात घालत असत.
सेना निरनिराळ्या वेळी निरनिराळ्या पक्षांबरोबर राहीली... कधी काँग्रेस कधी समाजवाद्यांचा एक गट... पण त्यांची प्रतिमा टिकून राहिली.
काहीही प्रॉब्लेम झाला की शाखा प्रमुख आपला प्रश्न सोडवेल हा विश्वास आसपासच्या लोकांना राहीला.
१९९५ ला युती सरकारमधे मंत्री झाल्यावरही... मनोहर जोशी, नवलकर, सुधीर जोशी हे देखील आपल्या शाखेत येउन बसत आणि जनतेला भेटत असत.
सेनेची ताकद शाखांच्या या नेटवर्कमधे आहे.
बाळासाहेबांनी नेहमीच सर्व प्रकारचे लोक बरोबर बाळगले. एका बाजूला सुधीर जोशी, मनोहर जोशी त्याच बरोबर छगन भुजबळ, दत्ताजी साळवी आणि परब चव्हाण अशी काही नावेही आली.
वडिल के सी ठाकरे यांचा जातीपातींचा प्रचंड अभ्यास होता. बाळासाहेबांना जातीपातींची जाण नसेल असे नाही पण बाळासाहेबांनी कधी जात पात पाहून तिकिटे दिली नाहीत आणि लोकांना विधानसभा, लोकसभेत पाठवले नाही.
जाती पातींच्या राजकारणामुळे किंवा काही जातींच्या वर्चस्वामुळे डावलले गेलेल्या समाजाने यामुळे सेनेला साथ दिली. मुंबईमधून बाहेर पडून महाराष्ट्रामधे विस्तार करताना याचा उपयोग झाला.
भुजबळ गेल्यामुळे अमुक एक जात किंवा घटक आता दुरावेल अशी शक्यता पत्रकारांनी वर्तवली पण असे काहीही होणार नाही यावर बाळासाहेब ठाम होती.
दुसरी एक गोष्ट चर्चेत आली.
बाळासाहेबांनी पूर्वीचा वेष बदलला. भगवा वेष परिधान केला. त्याला तूळजापूरचा काही संदर्भ आहे. ते नीट नाही कळले मला. पण यामुळे त्यांची प्रतिमा देशभर पोचली.
मी स्वतः इंडिया टूडेच्या कव्हरवर वर कैकदा बाळासाहेबांचे भगवे फोटो पाहीले आहेत.
राज ठाकरे जाणे हा सेनेला मोठा झटका होता. मुंबईतही त्याने मनसेचे अनेक आमदार निवडून आणले. पण उद्धवजींच्या नेतृत्त्वाखाली सेना टिकून राहीली. २०१४ ला ६३ आमदार त्यांनी आणले.
व्यक्तिमत्त्व आणि वक्तृत्त्व याबाबत उद्धवजी आणि बाळासाहेब यांच्यामधे फरक आहे. उद्धवजींचे वक्तृत्त्व तितके घणाघाती नसले तरी त्यांचे ग्राउंडवर्क जबरदस्त आहे... बाकी शिवजलक्रांती वगैरे उदाहरणे आली. पवारांच्या खालोखाल दौरे करणारा आणि कार्यकर्त्यांना भेटणारा एकमेव नेता.
अजून एक मुद्दा आला. बाळासाहेबांना मुंबईबाहेर प्रथम प्रमोद महाजन घेऊन गेले पण हे मला खरे वाटत नाही. इतरत्रही सेनेचे कार्यकर्ते होतेच ना...
सेना पूर्वीसारखी रस्त्यावर उतरून आंदोलने करत नाही अर्थात इतर पक्षही करत नाहीत. इ इ
पूर्वीचे भांडवलदार मिलमालक यांच्याशी सैनिकांचे उत्तम संबंध होते... त्यामुळे पैसा उपलब्ध होत असे. आज मिलच शिल्लक नाहीत. आजचे भाडवलदार बिल्डर लोकांशी त्यांचे उत्तम संबंध आहेत अर्थात ते भाजपाचे पण आहेत.
मराठी टक्का कमी झाला त्यामुळे अमराठी ला सामावून घेण्यासाठी मी मुंबईकर हातात घेतले. पण राजच्यामुळे पुन्हा मराठीचा मुद्दा घ्यावाच लागला.
पुढचा मुद्दा आदित्यचा...
त्याचे नेतृत्त्व अजून घडते आहे. तसेच माझ्या उद्धवला आणि आदित्यलाही सांभाळून घ्या या शब्दांमुळे सैनिक आदित्यला साथही देतील.
आदित्यला नव्या पिढीच्या भावना चांगल्या समजत आहेत.
ज्या सेनेनी वॅलेंटाइन डे ला विरोध केला. त्याच सेनेने आदित्यमुळे नाइट लाइफ चा मुद्दा उचलून धरला आहे.
असो
जिथे हे लोक बोलले ते मी लिहीलं मला काय वाटतं तेही मी नमूद केलं
या चर्चेत एक गोष्ट हरवली होती. नेते कार्यकर्ते यांची चर्चा झाली पण जनता कोणाला साथ देते किंबहुना हे सर्वात महत्त्वाचे जनता हा मुद्दा कुणीच चर्चिला नाही ... याचा खेद वाटतो.
मुंबईच्या बाहेर काय चालू आहे हे मुंबईकरांना माहीतच नसते. तिकडे सेनेचे जरा वेगळे स्वरूप दिसते. तिथले नेते कार्यकर्त्याशी जोडलेले आहेत का.
बाकी
त्याच त्याच घरात पदे वाटल्याने कार्यकर्ता आणि नंतर जनता दुरावत नाही का... अशा काही मुद्यांचा विचार केला आणि कृती केली तर महाराष्ट्रामधे जी भीषण पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढण्याची सर्वांनाच संधी आहे... असे मला वाटते
हे वाचून थांबण्यापेक्षा प्रत्यक्ष व्हिडियो पाहून मला काही फीडबॅक दिलात तर बरे होइल
प्रतिक्रिया
4 Jul 2016 - 9:02 pm | टवाळ कार्टा
4 Jul 2016 - 10:34 pm | खेडूत
सांडलेस पहिल्या घासाला..?