तेरा नाम कागज पे उतारनेसे
अब डरसा लगता है
तय-ब-तय सारी याँदे ऐसे
खुलने लगती है
जैसे दर्याने अपनी
पोटली से हर रंग कि
सिपीया निकालकर
किनारेपें बिछा दि हो
.
फिर एक एक सिपी
खेालते जाओ
एक एक याद पिरोते जाओ
देखते देखते वो एक बेहद खुबसूरत
माला बन जाती है
उसे गौरसे देखो तो
फिर तेरी यादे
घिर के आती है
....
तेरा नाम कागज पे
उतारने से अब डरसा लगता है
|- मिसळलेला काव्यप्रेमी-|
(२७/०६/२०१६)
–--------------------------------------------------------
चाणाक्य यांचा भावानुवाद
आताशा टाळतोच मी शक्यतो
तुझं नाव लिहीणं
कारण नंतर फार पसारा होतो
तुझ्या आठवणींचा...
समुद्राच्या लाटा कश्या
शंख शिंपले उधळून टाकतात किना-यावर
तस्साच पसारा अगदी
एकेक शिंपला उघडायचा
आणि आठवणमोती वेचायचा आतला
आणि मग तयार होणारा तो मोत्यांचा सर
अजून जवळ आणून ठेवतो तुझ्या आठवणींना
अगदी तुझा श्वास जाणवण्याईतपत
म्हणूनच
.
.
.
.
.
आताशा टाळतोच मी शक्यतो
तुझं नाव लिहीणं
-- चाणाक्य
(०१/०७/२०१६)
ता.क. चाणाक्य यांचे धन्यवाद.
प्रतिक्रिया
2 Jul 2016 - 10:50 am | माहितगार
कविता आवडली
....
इतर विचारात असताना हे विडंबन रचले गेले. विडंबन केल्याबद्दल कविद्वयांना क्षमस्व.
2 Jul 2016 - 11:53 am | रातराणी
सुरेख आहेत दोन्ही कविता!
2 Jul 2016 - 12:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चाणक्य, अनुवाद जब्रा उतरलाय. मस्तच.
"आताशा टाळतोच मी शक्यतो
तुझं नाव लिहीणं
कारण नंतर फार पसारा होतो
तुझ्या आठवणींचा..."
मीही टाळतोच आताशा समुद्रकिना-यावर तिचं नाव लिहिणं. :)
-दिलीप बिरुटे