मैत्री...

Primary tabs

कावळा's picture
कावळा in जे न देखे रवी...
22 Sep 2008 - 1:41 pm

मैत्री म्हणजे विश्वास
मैत्री म्हणजे अभिमान
मैत्री म्हणजे जीवनातील
जगण्याचा स्वाभीमान

मैत्री म्हणजे प्रेम
मैत्री म्हणजे जाणीव
मैत्री शिवाय जीवनात
आधाराची उणीव

मैत्री म्हणजे विश्व
मैत्री म्हणजे आकाश
मैत्री म्हणजे तिमिरात
वाट दावणारा प्रकाश

मैत्री म्हणजे सुख दु:ख
मैत्री म्हणजे हर्श
मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा
हळुवार स्पर्श

मैत्री म्हणजे रान
मैत्री म्हणजे कोवळे उन
मैत्री म्हणजे जीव जडणारी
सुमधुर वार्याची धुन

मैत्री म्हणजे खेड
मैत्री म्हणजे पायवाट
मैत्री म्हणजे पिकाला
पाणी पाजणारा मळ्यातील पाट

मैत्री म्हणजे तेज
मैत्री म्हणजे तारा
मैत्री म्हणजे प्रत्येकाला
हवा असणारा मोहक वारा

मैत्री म्हणजे दिलेला शब्द
मैत्री म्हणजे आन
मैत्री म्हणजे घातलेली शपथ
मैत्री म्हणजे प्राण

मैत्री म्हणजे ओढ
मैत्री म्हणजे आठवण
मैत्री म्हणजे आयुश्यातील
न सम्पणारी साठवण

प्रेमकाव्यआस्वाद

प्रतिक्रिया

रश्मी's picture

22 Sep 2008 - 3:38 pm | रश्मी

सुरेख आहे.

अनिल हटेला's picture

22 Sep 2008 - 4:51 pm | अनिल हटेला

सही रे भो !!

मैत्री म्हणजे श्वास !!

न संपणारी आस !!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

स्वाती राजेश's picture

22 Sep 2008 - 5:49 pm | स्वाती राजेश

मस्त सोपी...:)
सुरवात मैत्री च्या कवितेपासून केलीस...
पुढील कविता प्रेम म्हणजे.....अशी येणार का?

विनायक प्रभू's picture

22 Sep 2008 - 6:06 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
मैत्री बडे घाम़की चीज है.
वि.प्र.

मीनल's picture

22 Sep 2008 - 6:08 pm | मीनल

क्लास आहे कविता.

मीनल.

विसोबा खेचर's picture

22 Sep 2008 - 10:57 pm | विसोबा खेचर

हे पुढे ढकललेल्या इपत्रातील साहित्य तर नाही ना?

कारण पुढे ढकललेल्या इपत्रात या टाईपचे बरेच साहित्य असते म्हणून विचारले....

आपला,
(अनुभवी) तात्या.