माझं नशिबच थोर आहे! अमेरिकेत पाऊल ठेवलं आणि न्युयॉर्क कट्ट्याचा धागा! भारतात मी एकाच कट्ट्याला गेले होते, ते ही ३.५ मिनिटं. अनाहितात सुद्धा ऐनवळेस टांगारुपणा करण्यात मी फेमस आहे. हा कलंक धुवुन काढायची नामी संधी आली होती. जायचं हे नक्की होतंच. ते ही सहकुटुंब सहपरिवार!
कट्ट्याच्या दिवशी सकाळी सकाळी नवरा आणि मुलाने भलताच कार्यक्रम काढला आणि फादर्स डे म्हणुन कुठेतरी उंडारायला गेले. टांगारुपणा घरातच आहे. परंपरा राखली बाप लेकांनी!!
अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मी एकदम "पंछी बनु उडती फिरुं मस्त गगनमे.." च झाले! ;) आणि ११ च्या कट्ट्याला १०.४० लाच जाऊन पोहचले. मग लक्षात आलं की आपल्याकडे कुणाचाही नंबर नाही. म्हणुन धाग्यावर प्रतिसाद देऊन ठेवला. पण कुणी तो वाचेल तरी का हा प्रश्नच होता.
न्युपोर्ट मॉल
मी ठरलेल्या ठिकाणी जाऊन जाणार्या येणार्यांना टक लावुन बघत बसले. कुणी तिथे थांबेचना. जरा कुणी रेंगाळलं की मी त्याच्या मागे मागे जाऊन बघायचे. बरं जाऊन "मिपा का?" असं तरी कसं विचारणार? मला तर सगळ्यांनी एकमेकांना कट्टा कॅन्सल करुन कळवलय आणि आपणंच इथे आलोय असं वाटायला लागलं.
काय झालं होतं की "न्युपोर्ट मॉलचा एन्ट्रन्स" असं साधं ठिकाण ठरलं होतं. पण बारिकसा मुद्दा हा होता की मॉलला किमान १५ तरी एन्ट्रन्स आहेत! आणि स्टेशनसमोर म्हणलं तरी तिथे पाथ आणि लाईटरेल असे दोन स्टेशन आहेत. त्यातली पाथ वायली आणि लाईटरेल वायली हे सगळ्यांनाच माहिती नसेल हे कुणाच्या लक्षात नाही आलं. म्हणुन मग आले तर सगळे.. पण कुणीच कुणाला सापडेना!
पण म्हणलं ना, माझं नशिबच थोर आहे! मला उत्सवमुर्ती काकाच दिसले! मी त्यांच्या मागे मागे निघाले खरी, पण त्यांना थांबवुन विचारावं कसं हे कळेना. शेवटी धीर एकवटुन "एक्काकाका का?" असं एका दमात विचारुन टाकलं. काकांना अर्थातच काहीच समजलं नाही. मग नीट "तुम्ही डॉ. सुहास म्हात्रे ना?" असं शिस्तीत विचारल्यावर काका हो म्हणाले आणि आपला पोपट झालेला नाही हे कळल्यावर बरं वाटलं!
काकांकडे सगळ्यांचे नंबर असल्याने त्यांनी भराभरा फोन लावले आणि दोनच मिनिटात तिथे आम्ही ७-८ जण जमलो!
एक्काकाका आपल्या पत्नी आणि मुलासहित न्युयॉर्कहुन तर राघव आपल्या कुटुंबासहित एडिसनहुन आले होते. damn (काय नाव आहे!) सात तास ड्राइव्ह करुन कट्ट्यासाठी आला होता आणि माझ्यासारखाच टेन्शन मध्ये मॉलमध्ये फिरत होता. =))
कट्ट्यासाठी "सात" तास एकट्याने ड्राइव्ह करुन आलेला मिपाच्या इतिहासातला हा एकमेव माणुस असेल. ह्याचा फोटो
बॅनर म्हणुन ह्या वृतांताच्या वर लावुन द्यावा अशी कलामंडळाला विनंती!!
न्युपोर्ट मॉल जवळच न्युपोर्ट ग्रीन म्हणुन बाग आहे. तिथे जायचे ठरले.
एकमेकांशी ओळख करुन घेत, गप्पा मारत बागेत पोहचलो. लगेच मागुन "येडा अण्णा" (हे ही एक धन्य सदस्यनाम!) आणि मिहिर आले. एक्काकाकांच्या मुलाच्या ऑफिसातली एक कलिग तिच्या सर्व परिवारासहित आली. इथे मग तासभर एकमेकांच्या ओळखी, मिपाविषयक गप्पा, लोकसत्ता, अमेरिकेतील मराठी जनता, अमेरिकेतल्या मराठी मुलांची मराठी भाषा वगैरे अनेक विषयांवर भरपुर गप्पा झाल्या. राघव ह्यांनी बरीच वर्ष ह्याच भागात काढलेली असल्याने त्यांच्याकडुन पुष्कळच माहिती मिळाली.
१२:३० च्या सुमारास मात्र भुका लागल्याने परत सगळी जनता मॉलमध्ये फुडकोर्ट कडे निघाली.
डावीकडुन :-
उभे - समस्त जर्सीमधले खादाडीचे अड्डे माहिती असलेले राघव, उत्सवमुर्ती एक्काकाका, भारतात फारसा न राहुनही उत्तम मराठी बोलणारा एक्काकाकांचा मुलगा सागर, अत्यंत शांत धीरगंभीर व्यक्तिमत्व आणि खोदुन खोदुन विचारल्यावर समजलं की खगोलशास्त्रात डार्क मॅटरवर पीएच्डी करणारा मिहिर, कट्ट्यासाठी सात तास ड्राइव्ह करुन आलेला damn, मिपा म्हणजे काय हे ही माहिती नसलेले पेंडसे काका, सदस्यनामाप्रमाणे अजिबात नसणारे येडा अण्णा
बसलेले :- मिपाला सवत मानणार्या पण अधुन मधुन मिपा वाचक आणि राघव ह्यांच्या पत्नी- वृषाली, मी, काकांच्या पत्नी म्हात्रे काकु, मिपा वाचक पण सदस्य नसणार्या आपटे काकु, मिपा माहिती नसलेल्या पेंडसे काकु, मिपा वाचक पण सदस्य नसणारी-आपटेंची मुलगी-पेंडसेंची सुन-सुपर्णा!
सोबत चिल्ले पिल्लेही होते. पण त्यांचे फोटो टाकत नाही. पोरं भलतीच गोड होती, उगा दृष्टावतील!
मॉलला जाता जाता शिष्ट पुणेकर हा ज्वलंत विषय damn ने छेडला. लोक पुण्यावर फार जळतात हेच खरं. ;)
ही आमची खादाडी!
ह्या इथेच आम्हाला साक्षात्कार झाला की damn हे एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व आहेत!! आधी त्यांनी तिखट खाणं आरोग्याला हानिकारक असतं ह्यावर लहानसं प्रवचन दिलं. मग आता मॅक्सिकन पोळी भाजी कशी नीट ग्रिल केलेली नाही ह्यावर नाराजी (१३७व्यांदा) व्यक्त केली. मग आता कोणत्या साईडने खायला सुरवात करावी ह्यावर चिंतन केले. मग एक घास खाऊन पाहिला न पाहिला की बदलापुर मध्ये ऑरगॅनिक भाज्या मिळतील किंवा कसे ह्या विषयावर एक्काकाकांसोबत सपट महाचर्चा सुरु केली. काकांकडुन उत्तर मिळेना तर बाजुला पेंडसे काकांना पकडलं. काकांनी चक्क मदत करु शकतील अशा एकांचा पत्ता दिला. "इतकाच आता ह्याही ग्रुहस्थांच्या मागे लागलास तर ते घरी येऊन तुला भाज्या देऊन जातील रोज!" असंही एक्काकाकांनी त्याला टोलवला! मग तो ही मुद्दा संपला म्हणुन "सदस्यनाम" ह्या विषयावर चर्चा उतरली. तेव्हा महाराजांना लक्षात आलं की damn चा अर्थ damn u असा होतो. तोवर त्यांना ही चार रॅण्डम अक्षरं वाटत होती. मग सदस्यनाम कसे बदलायचे ह्यावर पुन्हा सपट महाचर्चा! मग अचानक त्यांच्या लक्षात आलं की सगळ्यांच जेवुन झालेलं आहे!
"अरे हळु जेवा ना"
"मागची दहा मिनिटं इतर कुणाचा आवाज येतोय का तुला? कमी बोल आणि खा."
मग damn राव जेवायला बसले! तरी जेवता जेवता "उमा जेटली" कोण आहेत हा गहन प्रश्न त्यांना पडला होता! तर लीमाउजेट म्हणजे उमा जेटली नावाची कुणीही बाई नाही हे सांगितल्यावर त्यांना धक्काच बसला. =)) तरी त्यातुन सावरता सावरता "विपश्यना" हा मुद्दा चर्चेला घेतलाच त्यांनी.
damn ने फायनली संधी दिली म्हणुन मग एक्काकाकांनाही बोलायला चान्स मिळाला ;)
काकांनी त्यांच्या कामाबद्दल थोडक्यात पण फार मस्त माहिती दिली. त्यांचे वेगवेगळे अगदी बीजे मेडिकल पासुन ते डिफेन्स मध्ये अधिकारी म्हणुन आलेले अनुभव ऐकुन कट्ट्याला आल्याचं सार्थक झालं असं वाटलं!
मिपावरच्या टर उडवणार्या प्रतिसादांना घाबरुन न लिहीण्याचा विषय निघाला तेव्हा काकांनी एक फार मस्त गोष्ट सांगितली. काका म्हणाले "मी मॅनेजमेंट्मध्ये काम करताना मला हे माहिती होतं की मी कधीच १००% लोकांना १००% वेळा समाधानी ठेवु शकत नाही. तेव्हा मी तेच करायचो जे मला योग्य वाटायचं. जर तुम्ही करत असलेली गोष्ट अनैतिक, अवैध आणि अस्वच्छ नसेल तर मग इतरांचा विचार करायचा नाही. आपल्याला जे योग्य वाटेल तेच करायचं!"
काकांशी गप्पा मारता मारता असा तर कितीही वेळ गेला असता आणि तरीही गप्पा संपल्या नसत्या. पण अखेर जायची वेळ झालीच. एकमेकांचे नंबर घेऊन पुन्हा भेटु म्हणुन निरोप घेतला. कट्ट्याच्या निमित्ताने आपल्या आजुबाजुला किती लोक मिपा वाचत असतात हे जाणवलं! भारी वाटलं!
असेच कट्टे होत राहोत!
जय हिंद! जय महाराष्ट्र! जय मिपा!
(सगळ्यांनी आपल्या जवळचे फोटो आणि आपापले अनुभव नक्की अॅडवा! टंकाळा आला म्हणुन अजुनही रोमात राहिलात तर जनता माफ नही करेगी!)
प्रतिक्रिया
21 Jun 2016 - 9:44 am | मुक्त विहारि
प्रतिसाद मात्र आधीच देतो...
आता वृत्तांत वाचतो...
21 Jun 2016 - 9:47 am | पिलीयन रायडर
खादाडीचा फोटो नाही दिसला तर
21 Jun 2016 - 9:50 am | प्रीत-मोहर
वाह मस्त वृ. आता लंटन्करांचा वृ वाचला की एकत्र इनो घेते
21 Jun 2016 - 10:04 am | पियुशा
भ... ण्णा... ट :)
21 Jun 2016 - 10:11 am | गॅरी ट्रुमन
छान वृत्तांत. मस्त.
21 Jun 2016 - 11:07 am | सिरुसेरि
+१ छान वृत्तांत
21 Jun 2016 - 10:26 am | आदूबाळ
जबरदस्त वृत्तांत! उमा जेटली वाचून बेकार हसलो.
अवांतर: बिजूभाव, व्हेर आर्यू?
21 Jun 2016 - 10:40 am | वेल्लाभट
सुरेखच वृत्तांत आणि फटू. अमेरिकेची आठवण येते मात्र.
21 Jun 2016 - 10:46 am | पक्षी
क्रमश लिहायचं राहील का?
अजून येउद्या...
21 Jun 2016 - 10:50 am | सूड
ह्म्म्म!!
21 Jun 2016 - 10:56 am | रातराणी
मस्त व्रुत्तांत!
21 Jun 2016 - 10:59 am | मुक्त विहारि
आवडला.
आता,
पिरा ताईंच्या अमेरिकेच्या प्रवास-वर्णनाच्या अपेक्षेत.
21 Jun 2016 - 11:02 am | सनईचौघडा
अरे माझ्या देवा आत्ता मला कळलं की तु एवढी का धुमसत होतीस ते. आणि माझ्या खवत येवुन तोफची डागलीस ते. आय माय स्वारी बरं का.
बाकी छोटेखानी कट्टा होता, पण छान झाला. जे अमेरिकन कट्टेकरी वामा आहेत त्यांनी लिहतं व्हावे . खुप माहितीचा खजिना मिपावर येईल.
21 Jun 2016 - 11:16 am | टवाळ कार्टा
पिरा दिसायला वरणभात काकूछाप असेल असे वाटले नव्हते =))
21 Jun 2016 - 11:07 am | समीरसूर
सुंदर वृत्तांत! अगदी खुसखुशीत! आणि जबरा कट्टा! डॉ. साहेबांच्या पुढाकाराने बहार आणली म्हणायची. आणि फोटो झकासच! विशेषत: हजर सदस्यांचा फोटो बघून बरे वाटले. कट्टा चांगलाच रंगला. असेच कट्टे रंगत राहू देत आणि सगळ्यांच्या आयुष्यात आनंद फुलवत राहू देत ही सदिच्छा!
दुक्की पे दुक्की हो, या सत्ते पे सत्ता
गौर से देखा जाये तो है बस कट्टे पे कट्टा,
कोई फरक नही अलबत्ता, कोई फरक नही अलबत्ता
21 Jun 2016 - 11:15 am | टवाळ कार्टा
जब्राट जळ्जळ झालीये...इनोऐवजी इथे कट्टा करायलाच पैजे अता...बाकी वृत्तांत भन्नाअट आहे...लैच आव्डेश
21 Jun 2016 - 11:18 am | अभिजीत अवलिया
मस्त ...
21 Jun 2016 - 11:22 am | सविता००१
जबराट वृत्तांत.
मस्तच
21 Jun 2016 - 11:23 am | प्रचेतस
जोरदार कट्टा एकदम.
अर्थात एक्काकाकांसारखे संयोजक असल्यावर कट्टा रंगणार ह्याची खात्री होतीच.
मिहिरला बघून आनंद झाला. त्याच्यासोबत पुस्तकविश्ववर नेहमी चर्चा होत असे. डार्क मॅटर आम्हाला समजेल असा एखादा लेख त्याने लिहावा अशी आग्रहाची विनंती
21 Jun 2016 - 12:44 pm | विलासराव
झकास झालेला दिसतोय कट्टा.
मिहिरना विनंती डार्क मॅटरवर् लिहाच्.
विपश्यनेवर चर्चा झाली हा सुखद धक्का.
21 Jun 2016 - 1:28 pm | धनंजय माने
ओ विलासराव, तुम्ही फारच ब्वा साधे. ते पुन्हा वाचा एकदा!
21 Jun 2016 - 1:30 pm | धनंजय माने
नाय राव, आमचीच चूक झाली. :((
खरंच चर्चा झालेली आहे.
कट्टा बेष्ट झालेला दिसतोय.
21 Jun 2016 - 2:08 pm | सनईचौघडा
आप बहोत ही प्यारे हो धनाजीराव.
21 Jun 2016 - 5:33 pm | पिलीयन रायडर
हो आणि मग तुमची आठवण निघालीच!
21 Jun 2016 - 8:41 pm | विलासराव
_/\_
21 Jun 2016 - 11:24 am | जिन्गल बेल
मस्त वृत्तांत आणि मस्त फोटो ...
अजून फोटो येउदे..!!
21 Jun 2016 - 11:25 am | स्पा
भारी वृतांत
21 Jun 2016 - 11:30 am | अभ्या..
आरे वा, जोरात कट्टा. आमचा गाववाला राघव दिसतोय भौतेक. खादाड्या हुडकून काढणारच तो.
मला फोटोत समोसा आन पावभाजी दिसली चक्क. आमरिकेतच केलाय ना कट्टा?
21 Jun 2016 - 2:45 pm | जव्हेरगंज
आमरिकेतच केलाय ना कट्टा?
=))
21 Jun 2016 - 5:38 pm | पिलीयन रायडर
उसाचा रस आणी विड्याचं पान सुद्धा मिळतं, समोसा फारच सोपी गोष्ट आहे हो!
काकांनी खाली जो जरनल स्क्वे. चा फोटो टाकलाय ना, त्या रस्त्यावर पानटपरी आहे. तिथे मी रात्री जोरजोरात "दिलके झरोके मे" का "बदनपे सितारे.." गाणं ऐकलय डोसा खाता खाता. समोर किराणामालाचं दुकान आहे पटेल ब्रदर्स नावाचं जिथे आपल्या भारतात जे मिळेल तेच सगळं मिळतं. स ग ळं!
राघव ह्यांच्या पत्नीने तर हे ही सांगितलं की एडिसन मध्ये इतके भारतीय आहेत की अमेरिकन दिसला तर "फॉरेनर फॉरेनर" म्हणुन कौतुकाने लोक बघतात! ;)
21 Jun 2016 - 5:49 pm | रेवती
सहमत.
पूर्वी पानाच्या टपरीपाशी पान खाऊन थुंकणे हेही दिसले होते.
आम्ही तो रस्ता शोधत होतो जिथे ही सगळी भारतीय दुकाने आहेत.
रस्त्यावर कागदाचे बोळे पाहिले आणि हाच तो रस्ता असणार हे समजले.
जर्सी स्वच्छ ठेवताना महापालिकेची त्रेधा उडत असणार. ;)
21 Jun 2016 - 10:14 pm | डॉ सुहास म्हात्रे
विश्वास बसत नसला तर हा घ्या रविवारी जर्सी सिटीत विकत घेतलेला पुरावा... ;)
21 Jun 2016 - 10:16 pm | अभ्या..
गाय छाप अलावूड हाय काय अम्रिकेत? आणि राजेश चुना?
लै दिवस अमेरिकेतील कुणाला तरी ईचारावा म्हणत होतो.
21 Jun 2016 - 10:47 pm | राघवेंद्र
जर्सी सिटी व एडिसन मध्ये RMD चे पाकिटे आरामात रस्त्यावर दिसतात. http://www.royalpaan.com/ ही कॅनडा व अमेरिकेत पानाची दुकानाची chain आहे.
21 Jun 2016 - 11:19 pm | आदूबाळ
दोन डॉलरला नवरतन सादा! ले मॅन!
21 Jun 2016 - 11:48 pm | राघवेंद्र
:)
22 Jun 2016 - 2:37 pm | महासंग्राम
बाब्बो 135.09 रुपड्याला नवरत्न लैच चुना लावतेत की उसगावात.
22 Jun 2016 - 11:50 pm | जव्हेरगंज
आमेरिका कॅन्सल !
23 Jun 2016 - 12:13 am | अभ्या..
म्याबी सोडला नाद अम्रिकेचा.
परत मागायचे वांदे हो "पाव्हणं जरा चुना घ्या" म्हणून
22 Jun 2016 - 12:54 am | पद्मावति
पिरा न्यू जर्सी ला पोहोचलीस नं, आता बघ तू वरलक्ष्मी हल्दी कुमकुम, कोलू, विष्णू सस्त्रानाम, नवरात्री दांडिया, अष्टमी कन्यापुजन, झालंच तर श्री महालक्ष्मी व्रत, साईबाबा भजन ग्रूप, दिवाली पार्टी अशी सूपर बिझी होणार आहेस.
21 Jun 2016 - 5:38 pm | पिलीयन रायडर
उसाचा रस आणी विड्याचं पान सुद्धा मिळतं, समोसा फारच सोपी गोष्ट आहे हो!
काकांनी खाली जो जरनल स्क्वे. चा फोटो टाकलाय ना, त्या रस्त्यावर पानटपरी आहे. तिथे मी रात्री जोरजोरात "दिलके झरोके मे" का "बदनपे सितारे.." गाणं ऐकलय डोसा खाता खाता. समोर किराणामालाचं दुकान आहे पटेल ब्रदर्स नावाचं जिथे आपल्या भारतात जे मिळेल तेच सगळं मिळतं. स ग ळं!
राघव ह्यांच्या पत्नीने तर हे ही सांगितलं की एडिसन मध्ये इतके भारतीय आहेत की अमेरिकन दिसला तर "फॉरेनर फॉरेनर" म्हणुन कौतुकाने लोक बघतात! ;)
21 Jun 2016 - 5:55 pm | खालीमुंडी पाताळधुंडी
तिथे गुजरात्यांवर हल्ले होतात म्हणे!!! फार गर्दी करून टाकलीये अमेरिकेत त्यांनी,
डोनाल्ड ट्रंप यांचेही हेच म्हणणे आहे,
जसे महाराष्ट्रात आपल्याला परप्रांतीयांचा त्रास होतो,तसा तिकडे त्यांनाही होत असेल!
रोजगार,नोकर्या इत्यादी गोष्टीमध्ये स्थानिक लोकांच्या हक्कावर गदा येतेय.ट्रंप निवडून आल्यावर भारतीयांचं काय खरं नाय बघा
21 Jun 2016 - 6:14 pm | पिलीयन रायडर
पण अमेरिकाच मुळात इमिग्रंट्स ने बनवलेला देश आहे. आता कसे ओरडणार ते इमिग्रंट्स विरुद्ध?
हो अर्थात ह्याही मुद्द्यावर चर्चा झाली की फेसबुकवर "Let's make New Jersey Andhrapradesh" वगैरे कमेंट्स दिसतात, ही किती चुकीची मनोवृत्ती आहे. आपण इथे सर्वांमध्ये मिसळुन रहाणे अपेक्षित आहे.
ट्रंप आल्यावर नक्की काय होईल हे बघणे रोचक असेल..
21 Jun 2016 - 10:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
हे ते पटेल ब्रदर्सचे दुकान :)
21 Jun 2016 - 10:20 pm | अभ्या..
वरच्या मजल्यावर पटेलिन काकू ब्युटी पार्लर चालवतात वाटतं.
चांगलंय चांगलंय.
21 Jun 2016 - 11:35 am | मिहिर
जोरदार वृत्तान्त!
डॅमराव महान आहेत.
हा धागा आत्ताच पाहिला. माझाही पिलीयन रायडर ह्या काकूच असतील असा समज झाला होता! ह्या जालाप्रमाणेच वास्तवातही युद्धासाठी सदैव तयारच असतात .
एक्काकाका, राघव, येडा अण्णा ह्यांना भेटूनही मजा आली.
21 Jun 2016 - 11:39 am | अजया
मस्त वृत्तांत. मिपाकर राॅक!
21 Jun 2016 - 11:58 am | शान्तिप्रिय
मस्त व्रुत्तांत.
पुणेकरांच्या यशावर जळणारी जनता वाढत असलेने, इनोचा व्यापार वाढला आहे. त्यामुळे इनो बनवणारी कंपनी
लवकरच पुणेकर मिपांचा सन्मान करेल. तो दिवस दूर नाहि. :):):)
21 Jun 2016 - 2:11 pm | मुक्त विहारि
पुणेकरांच्या स्वतःच्या यशाबद्दल भलत्याच कल्पना बुवा.....
असो,
एक साधा कट्टा पुण्यात कट्टा करायचा म्हटले तरी ३-३ धागे निघतात आणि अमेरिकावसी एका धाग्यात काम करतात.
७-७ तास ड्रायव्हिंग करून पण येतात.
इथे पुणे-३०ला असलेल्या कट्ट्याला पुणे-२८ वाले येतात पण पुणे-३३ वाले मात्र अजिबात येत नाहीत.
असो,
पुण्यातल्या कट्ट्याला खूद्द पुणेकरच टांग मारत असतात, ह्यालाच पुणेरी यश, असे समजायचे.
21 Jun 2016 - 2:24 pm | टवाळ कार्टा
कट्ट्याला येणार अश्शी मोठ्ठी झैरात करून..."जो पर्यंत दुसरे कोणी काँटॅक्ट नंबर मागत नाही तो पर्यंत मी पण दुसर्याचा नंबर मागणार नाही...मग भले कट्ट्याच्या ठिकाणी जाउन कट्टा मिसला तरी चालेल" असा कट्टर पुणेरीपणा करून या ठिकाणी पिरातैंनी "अमेरिका अस्ली म्हणून काय झाले...पुणेकर जीथे जातील तिथे पुण्यात असल्यासारखेच वागतील" हे सोदाहरण दाखवून दिले आहे =))
21 Jun 2016 - 3:05 pm | शान्तिप्रिय
मुवि
मागील पुणॅ कट्टा तर एका धाग्यात झालाय!
डोंबोली कट्ट्यालाच वांझोटे धागे निघतात.
हघ्या!
21 Jun 2016 - 3:10 pm | सूड
हो हो, डोंबोलॅ कट्ट्यालाच असं काहीतरी होत असतं.
21 Jun 2016 - 4:15 pm | मुक्त विहारि
तू गप राव रे....
21 Jun 2016 - 4:13 pm | मुक्त विहारि
"मागील पुणॅ कट्टा तर एका धाग्यात झालाय!"
ह्या अशा अपवादानेच " पुणे कट्ट्याला किमान ३ तरी धागे हवेतच." ह्या नियमाला पुष्टी मिळते.
"डोंबोली कट्ट्यालाच वांझोटे धागे निघतात."
एखादा असेलही असा.... पण "डोंबोली कट्ट्याला एक धागा पुरतो." हा नियम सिद्ध होतो.
21 Jun 2016 - 11:58 am | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं खुसखुशीत वृत्तांत, पिरा.
माझी थोडीशी भर.
इथे आलो आणि बराच वेळ मोकळा होता. तेव्हा जवळपास कोणी मिपाकर असल्यास कट्टा करायला किती मजा येईल असा विचार करून सहज म्हणून एक धागा टाकला आणि चारपाच दिवसांत मिपाकरांनी भरभरून प्रतिसाद दिले !... केवळ जवळपासहूनच नव्हे तर अगदी पश्चिम किनार्यावरील कॅलिफोर्नियासारख्या ४-५,००० किमी दूरवरूनसुद्धा आणि त्याच्या मधल्या अंतरावर असणार्या बोस्टन, मिडवेस्ट, टेक्सास, इ मधूनही ! खंड्प्राय अमेरिकेतील अंतरे पाहता या सर्वांना प्रत्यक्ष येणे जमणार नाही हे माहित होतेच. पण तरीही सर्वांनी ज्या ममतेने लिहिले त्याबद्दल त्यांचे अनेकानेक धन्यवाद !
न्यु जर्सीत राहणार्या राघव८२ व येडा अण्णा यांनी पुढाकार घेऊन न्यु यॉर्कला लागून असलेल्या जर्सी सिटीतला न्यु पोर्ट मॉल हे सर्वांना यायला सोईचे आणि गप्पा व खादाडीसाठी उत्तम ठिकाण नक्की केले. दिवसही पक्का झाला आणि वाट पाहणे सुरु झाले !
कट्याच्या दिवशी आलेली लोकसंख्या आणि त्यातील विविधता आश्चर्यकारक ठरली. 'सक्रिय सदस्य मिपाकर', 'वामा सदस्य मिपाकर', 'मिपा वाचणारे पण सदस्य नसणारे मिपाकर' आणि 'मिपाचे नावही माहीत नसलेली मराठी मंडळी' अश्या १४ मोठ्या मंडळींनी आणि ३ भावी मिपाकरांनी हजेरी लावून प्रचंड बहार आणली ! खास नमूद करण्याजोगी गोष्ट म्हणजे damn हा मिपाकर मावळा "केवळ कट्ट्यासाठी" भल्या पहाटे घरातून निघून एकटा ७ तास चारचाकीचा घोडा उडवत वेळेअगोदर जागेवर पोहोचला होता ! आता बोला !!
कट्ट्याचे ठिकाण आणि परिसर खरेच फार सुंदर होते. जर्सी सिटीचे (उंच इमारतींनी भरलेले) डाऊनटाऊन असलेल्या या विभागाला (मॅनहॅटनचा आद्य वॉल स्ट्रिट ह्डसन नदीपलिकडे या जागेच्या पूर्वेला आहे म्हणून) "पश्चिम वॉल स्ट्रिट" असे संबोधले जाते ते उगाच नाही हे पटले !
रुंद आखीवरेखीव रस्ते; निगा राखलेली मोठी झाडे व फुलझाडांनी सजवलेले पादचारी मार्ग आणि चौक; भव्य मॉल अशी सुंदर जागा निवडण्यात राघव८२ व येडा अण्णा यांनी कल्पकता दाखवली होती...
.
.
मॉलमध्ये थोडे पुढेमागे फिरून झाल्यावर पिरांनी आम्हाला गाठले आणि कारवाँ बनायला सुरुवात झाली. थोडी फोनाफोनी होऊन पुढच्या काही मिनीटांत एक एक करत बहुतेक सर्व मिपाकर जमा झाले.
मॉलमधला पहिला फोटो...
गप्पा मारायला मॉलच्या मागेच असलेल्या न्युपोर्ट ग्रीन पार्कमधे सगळ्यानी प्रस्थान केले आणि तिथली तीन टेबले काबीज करून टाकली. ओळखीची फेरी झाल्यावर क्लासिक मिपाकट्टा पद्धतीप्रमाणे एकदम जुनी ओळख असल्याप्रमाणे गप्पा सुरू झाल्या. पिल्लू लोकांना खेळायला जवळच एक उद्यान होते. त्यामुळे त्यांनी आम्हाला आणि आम्ही त्यांना अजिबात त्रास दिला नाही ;) :)
अनेक विषयांचे चर्वण करता करता एकमेकाचे पाय ओढणे यांत बराच वेळ कसा गेला हे कळलेच नाही. केवळ पोटातले कावळे ऑस्ट्रिच इतके मोठे होऊन ओरडायला लागले तेव्हा नाईलाजाने मॉलच्या फूड कोर्टावर हल्ला करणे भाग पडले. तेथे भारतिय, चिनी, मेक्सिकन, अमेरिकन, इ अनेक प्रकारची रेस्तराँ होती...
तिथेही आम्ही चारपाच टेबले एकमेकाला जोडून फूड्कोर्ट मिपाच्या मालकीचे असल्यासारखे खाणे-बोलणे-हसणे हा कार्यक्रम चालूच ठेवला... आता गाड्यांत पेट्रोल पडत असल्याने जरा जास्तच चेवाने चर्चा होत होती :) याबद्दल जास्त वर्णन मूळ वृत्तांतात आले आहेच.
शेवटी जड अंतःकरणाने एकमेकाचा निरोप घेऊन जो तो आपल्या गंतव्याकडे निघाला. आम्हीही खास भारतिय पदार्थांची खरेदी करण्यासाठी जर्सी सिटीच्या जर्नल स्क्वेअर स्टेशनच्या दिशेने मार्गस्थ झालो...
.
21 Jun 2016 - 12:14 pm | समीरसूर
फारच सुंदर वृत्तांत, डॉ. साहेब! आणि फोटो सुंदरच!
21 Jun 2016 - 7:49 pm | डॉ सुहास म्हात्रे
उशीरा रात्री गडबडीत प्रतिसाद लिहिला आणि एक फार फार महत्वाची गोष्ट लिहायची राहूनच गेली (चतुरंगसाहेब, क्षमस्व) :( ...
ग्रीन पार्कमध्ये गप्पा मारत असताना चतुरंग यांचा फोन आला. कामासाठी त्यांना ४-५,००० किमी दूर पश्चिम किनार्यावर जावे लागले त्यामुळे त्यांचा कट्टा हुकला. पण तरीही त्यांनी तेथून फोन करून माझ्याशी आणि इतर तीन चार कट्टेकर्यांशी संवाद साधून चौकशी केली हे विशेष. अश्याच मिपाकरांच्या आपुलकीमुळे कट्ट्यांना अजूनच रंग चढतो ! धन्यवाद, चतुरंग साहेब !
21 Jun 2016 - 8:44 pm | राघवेंद्र
अजून एक महत्वाची गोष्ट राहून गेली. ती म्हणजे प्रा.डॉ. यांना फोन करायचा. प्रा.डॉ. राग धरू नये.
22 Jun 2016 - 12:43 am | चतुरंग
आणि मला साहेब वगैरे नका म्हणू हो. तुम्ही माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने आणि अनुभवाने सर्वथा मोठे आहात!
मिपाकरांशी बोलून छान वाटले.कट्टा मिसला याचे वाईट वाटतेच आहे.
केवळ फोनवरुन बोलण्यातच समाधान मानावे लागले, पापी पेट का सवाल है!:(
बघूया प्रत्यक्ष भेटीचा योग कधी येतोय ते!
(कट्टाप्रेमी)रंगा
21 Jun 2016 - 12:08 pm | पद्मावति
ज़्ज़े बात पिरा!!!! मस्तं!
डॉक्टर म्हात्रेंचा उपवृत्तांतही छानच.
21 Jun 2016 - 12:09 pm | स्वीट टॉकर
मिपा माहीत नसूनसुद्धा पेंडसेकाका काकू आले म्हणजे फारच कौतुकास्पद आहे. तुमचा उत्साह पाहून ते आता वाचक लेखक होतीलच.
शिवाय आय डीन्ना चेहरे रिलेट करता आले की वाचायला नक्कीच जास्त मजा येते.
21 Jun 2016 - 12:32 pm | सिरुसेरि
फारच सुंदर वृत्तांत .तुम्ही अमेरिकेतील न्युपोर्ट मॉलचे एकदम पुण्याच्या आर डेक्कन नाहितर सेन्ट्रल मॉलमध्ये रुपांतर करुन टाकलंत .
21 Jun 2016 - 12:46 pm | भाग्यश्री कुलकर्णी
भारीच की पिरा. मस्त वर्णन. एक्का काकांचा पण सुंदर प्रतिसादात्मक वृत्तांत. मस्त
21 Jun 2016 - 1:30 pm | मोदक
भारी वृत्तांत..!!!
21 Jun 2016 - 1:48 pm | स्मिता_१३
खुसखुशीत व्रुत्तांत !!!
21 Jun 2016 - 2:11 pm | नीलमोहर
मस्त फोटो आणि वृत्तांत.
21 Jun 2016 - 2:33 pm | भाते
सचित्र सविस्तर वृत्तांत आणि एक्का काकांचा उप वृत्तांत दोन्ही छान.
21 Jun 2016 - 2:40 pm | पैसा
मस्त वृत्तांत!
21 Jun 2016 - 3:09 pm | स्वाती दिनेश
कट्टा जोरदार झालेला दिसतो आहे,मस्त वृत्तांत आणि फोटो..
स्वाती
21 Jun 2016 - 3:13 pm | जगप्रवासी
एक्का काकांचा उप-वृत्तांत देखील छान
21 Jun 2016 - 3:18 pm | एस
छान वृ. बाकी पुणेकरांनी दखल घ्यावी इतके तरी चांगले टोमणे मारावेत की मारणार्यांनी. यांच्याकडील सगळा (मुद्दे)माल शिळाच असतो. :-)
21 Jun 2016 - 4:22 pm | नाखु
ज्यांना मारले त्यांना कळत नसावेत मग काय करणार कळेपर्यंत मारत असावेत.
असा कयास्/अनुमान्/तर्क आहे. पुरावा/विदा/माहीती/लेखाजोखा/साक्षीदार मागू नये.
सख्ख्या पुण्याचा सच्चा शेजारी नाखु
21 Jun 2016 - 5:17 pm | मुक्त विहारि
असे पुणेकरांना वाटते.
21 Jun 2016 - 3:32 pm | नंदन
कट्टा जोरदार झालेला दिसतोय! वृत्तांत, फोटो आणि प्रतिसाद आवडले.
अवांतर - अटलांटिकच्या डाव्या किनार्यावरच्या कट्ट्याचा वृत्तांत आला, आता उजव्या किनार्यावरच्या कट्ट्याचा कधी येणार? युकेकर ब्रेक्झिटच्या काळजीने ग्रस्तावलेत की काय? ;)
21 Jun 2016 - 3:33 pm | नपा
हे एकदम मस्त खुसखुशीत.....थेट शेवटपर्यंत...
कोणी कतार ला आहेत का? इकडे एक कट्टा करू...
21 Jun 2016 - 3:54 pm | खेडूत
मस्त मस्त!
फोटू भयंकर छान आलेत.
असेच कट्टे सर्वत्र होत राहोत, व्रुत्तांत येवोत, मिपाकर भेटत राहोत.
21 Jun 2016 - 3:55 pm | सविता००१
एक्काकाकांचा व्रुत्तांत आणि छायाचित्रे पण मस्त
21 Jun 2016 - 4:43 pm | किसन शिंदे
फोटो आणि व्रुत्तांत दोन्ही मस्त.
21 Jun 2016 - 5:05 pm | रेवती
पिरा, वृत्तांत छान झालाय. फोटूही आवडले.
एक्काकाकांनी दिलेली जोडणी आवडली.
हसतमुख फोटू पाहून सगळ्यांना किती आनंद झालाय हे दिसून आले. अमिपाकर, वाचनमात्र मिपाकर यांचीही हजेरी लागली म्हणून कौतुक वाटले. ज्यांची नावे विचित्र आहेत त्यांनी ती बदलून घ्यावीत असे सुचवते. त्यांचा उल्लेख करताना समोरच्याची पंचाईत होते एवढे बोलून माझे भाषण आवरते घेते नाहीतर झालेली जळजळ सर्वांच्या लक्षात येईल.
21 Jun 2016 - 5:05 pm | रेवती
पिरा, वृत्तांत छान झालाय. फोटूही आवडले.
एक्काकाकांनी दिलेली जोडणी आवडली.
हसतमुख फोटू पाहून सगळ्यांना किती आनंद झालाय हे दिसून आले. अमिपाकर, वाचनमात्र मिपाकर यांचीही हजेरी लागली म्हणून कौतुक वाटले. ज्यांची नावे विचित्र आहेत त्यांनी ती बदलून घ्यावीत असे सुचवते. त्यांचा उल्लेख करताना समोरच्याची पंचाईत होते एवढे बोलून माझे भाषण आवरते घेते नाहीतर झालेली जळजळ सर्वांच्या लक्षात येईल.
21 Jun 2016 - 5:31 pm | पिलीयन रायडर
damn ला त्याच्या नावाचा भयंकर कॉम्प्लेक्ष आणाला आम्ही!!! तो करतो की नाय बघा नाव चेंज! आणि येडा अण्णा ह्यांना मी मॉलमध्ये जोरात "ते बघा ते बघा येडा अण्णा!!" अशी हाक मारली. ती त्यांना नशिबाने ऐकु गेली नाही!!
अजुन एक महत्वाचा विषय चर्चेला होता तो म्हणजे अमेरिकेतुन भारतात परत जाणे! राघव ह्यांनी सांगितलेली टेस्ट म्हणजे "चहातली साखर कमी होत गेली की भारताबद्दलची अटॅचमेंट्सुद्धा कमी होत जाते. चहातली साखर संपली की आता काही आपण भारतात जात नाही असं समजायचं!" =))
(चहा न पिणार्यांसाठी सुद्धा अशी एखादी टेस्ट आम्ही लवकरच शोधुन काढु!)
तुझं चारदा नाव घेतलं बाई मी. यायला पाहिजे होतीस तू, फार मज्जा आली असती..
21 Jun 2016 - 5:35 pm | रेवती
हा हा हा. आता आण्णासाहेब नाव बदलून घेणारच!
मलाही यायचे होते पण जमले नाही.
21 Jun 2016 - 8:42 pm | सही रे सई
मलाही यायचे होते पण जमले नाही.
असेच म्हणते.
जे या कट्ट्याला येऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी अजून एक कट्टा करावा ही विनंती.
21 Jun 2016 - 5:27 pm | खालीमुंडी पाताळधुंडी
फोटो पाहून मनात तयार झालेल्या प्रतिमांना छेद:'(
21 Jun 2016 - 5:38 pm | कवितानागेश
छान झाला कट्टा.
पिरानी खादाडीचा फोटो मुद्दामच परत टाकलाय असं निरीक्षण नोंदवते.
रेवतीताईनी विचित्र नावांच्या लोकांना विचित्र वाटावे यासाठी मुद्दामच २ वेळा प्रतिसाद टाकला असेही निरीक्षण नोंदवते! ;)
21 Jun 2016 - 5:48 pm | पिलीयन रायडर
ए उमा जेटली! कशी आहेस ग!!
damn सर, ह्याच त्या उमा जेटली. =))
21 Jun 2016 - 5:51 pm | नीलमोहर
ह्या नावाबद्दल मलाही कुतूहल आहे, ते जेटमाउली असे आहे का ?
त्यामागे काही विशेष कारण?
21 Jun 2016 - 5:41 pm | बाळ सप्रे
मस्त कट्टा,फोटो आणि वृत्तांत .. न्यूपोर्ट मॉल आणि परीसर फारच मस्त आहे.. मॉलबाहेरच हडसनचा लाकडी जेट्टी बांधलेला किनारा सुद्धा निवांत बसायला मस्त आहे..
21 Jun 2016 - 6:53 pm | राघवेंद्र
न्यू पोर्ट ग्रीन ही बाग तिथेच बनवलेली आहे. छोटासा sand बिच पण आहे :)
21 Jun 2016 - 6:20 pm | विशाखा राऊत
भारी कट्टा दणकट वृत्तांत.. मस्तच